तू लिही तू लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
खांद्या वरून डोकवून
नाहीतर तिरप्या नजरेतून
पण ठाव त्यांच्या शब्दांचा
लागल्यावरच लिही
तू लिही तू लिही
ते लिहितात ना तस लिही
तसं येत नसेल तर असही चालेल
अरे मीटरमधे असेल तर हेही चालेल...!
ते तिकडे काय पडलाय ते दाखव की
अरे हेच ते...हेच शोधत होतो मी...!
बाकी असू दे...नंतर वाचू
इथे खपत नाहीत रे माणिक अन पाचू
चल येतो...चाल लावायची आहे
शब्दांना पांघरायला शाल विणायची आहे
गप गुडूप झोपतील शब्द ओढून उबदार शाल
हिशेबाच्या युद्धामध्ये सूरच होतील ढाल