Network 18 ह्या कंपनीचे मालक आणि मुख्य संपादक राजदीप सरदेसाई आणि उप-संपादक सागरिका घोष ह्यांनी मे महिन्यात झालेल्या कंपनीच्या takeover नंतर काल राजीनामा दिला.
रिलायन्स कडुन झालेल्या या ४००० कोटी रुपयांच्या व्यवहारानंतर हे होणे अपेक्षित होते असे बरेच जाणकारांचे मत आहे.
एका महिन्यात बुलेट ट्रेण रॉकेटस स्पेसमधे पाठवुन नमोंनी धक्का दिला आहे. शास्त्रद्न्यांना केले मार्ग्दर्शन आणि टिपा मोलाच्य आहेत. सार्क देशाना स्पेस मधे पाठवुन त्य़ा देशात पण मोदीसरकार येण्याची व्यवस्था केली आहे. पाच देशात मोदी सर्कार, भूतान मधे पण संघाचि राजवट येणार आहे याचि चुणुक पहायला मिळाली. नोइस्त्रोडॅम्च्या शायरन चं कोड उलगडल.
आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते. त्यामुळे माती रस्त्यवर येत नाही.
थोड्या वेळापूर्वी पी एम सी ऑनलाईन टॅक्स भरला. बॅंकेतून पैसे कापले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. अकाऊंट मधून पैसे पण गेले आहेत परंतु, ट्रान्साक्शन कंम्प्लीट अशी पोच मात्र मिळाली नाही. तसेच पीएम्सी वेबसाईट वर अजूनही अमाउंट ड्यु आहे असे दिसते आहे. काय करावे?
हा लेख लिहिण्याचे कारण म्हणजे गेले काही दिवस निवडणुकीच्या निमित्ताने विविध गोष्टी बघायला मिळत आहेत. विविध प्रकारचे, विचाराचे लेख समोर येत आहेत. विनोदी, मार्मिक आणि अगदी गालीच्छ sms पण येत आहेत. या सगळ्यामध्ये 'तरुण मतदार' हा एक विशेष भाग आहे. 'हा तरुण मतदार यंदाच्या निवडणुकीचे चित्र बदलणार' वगैरे घोषणा होत आहेत. चित्र बदलेलही कदाचित पण तरुण मतदाराच्या मनात नक्की काय चाललंय?
३०/०९/२०१२
मा. गिरीश कुबेरजी,
नमस्कार,
अर्थकारण कळत नसण्याच्या वयापासून ते पुढील अनेक वर्षे "शेअर बाजार" हा नोकरी व्यवसाय यापेक्षाही भरपूर प्रमाणात पैसे कमावण्याचा मार्ग आहे हि एक माझी ठाम समजूत होती. आणि त्यातून जर तुम्ही कधी स्वत:बद्दल एखाद्या कुडमुड्या कडून तुमच्या पालकांना किंवा तुम्हालाच जर हे सांगताना ऐकलं असेल की "नशिबाचा खूप पैसा आहे, अचानक धनलाभ आहे नशिबात" तर मग काय विचारायलाच नको!
अशी मीच एकमेव नाही तर अनेकजण असतील…. खात्रीने सांगते की या मंडळीनी आयुष्यात किमान एकदा शेअर बाजारातून पैसे थोड थोडके नाही तर बक्कळ पैसा कमवायचा विचार केला असेल. इतकेच नव्हे तर आपले हात ही येथे पोळून घेतले असतीलच.
अॅगाथा ख्रिस्तीचे चाहते आहेत का? 
तुम्ही कोणती पुस्तके वाचली? सगळ्यात आवडते कोणते? याबद्दल वाचायला नक्कीच आवडेल.
आवश्यक तिथे कृपया स्पॉयलर वॉर्निंग द्या.