माजं चोरिला गेलेलं लिखान

Submitted by बाबूराव on 12 March, 2013 - 13:12

माझं एक लिखान चोरिला गेलं होतं. जुन्या बाडात एक कापी सापडलि. आपनासाठि त्यातला काहि भाग स्पेशल देत आहे.

- ए भाई, तु आज मला हितं काहुन बोलवले ?
- आपन हितंच भेटु शकलो अस्तो.
- काहुन ?
- हितुन पुढं तुजी हद्द चालु होते
- मंग ?
- तुझी मानसं चिन्धिचोर हायेत. माजी मानसं कापडं काडुन घेत नाहित.
- माज्या मानसानि काडून घेतल्ली कापडं आधि त्यांचिच व्हती
- हम्म्म. मंग आपुन या पुलाखालिच भेटु शकलो असतो.
- व्हय.
- आठवतं का ? हितं तू माज्या गोट्या चोरुन नेल्या व्हत्या
- आनि तु माझ्या बिड्या
- हम्म. या पुलाखालि आपलं ल्हानपन गेलं.
- हितंच आपल्या बाबाला पोलिस घेऊन गेल्ते
- आनि तुच पोलिसाना म्हनलेला मेरा बाप चोर है
- हम्म. बसुन खात व्हता. आई निरुपायानि कापडं शिवायची.
- कुनाचि ?
- ते आजबी सस्पेन्स हाय. सज ला इच्चार !
- कापडं शिवुन अन इटा वाहुन तिचा चेहरा सुजला व्हता.
- इटांनी अन शिलाईनं चेहरा सुजतो असं कोन म्हनलं ?
- मागच्या गल्लीतलं सलीम अन जावेद
- त्ये लई डँबीस हायेत. परवा कुनाच्यातरी घरात शिरुन कागद चोरत व्हते
- कागद कशापायी ?
- त्येंचा धंदा वाहिला, आपला वाहिला. आपल्याला त्यातलं कलत नाय.
- भाई ! आपन जेव्ही करायचं का ?
- जेव्ही ? आन तुज्याबरोबर ? थुत या जिंदगानीवर
- भाई ! तू जेवी करतोस का नाय ?
-नाय
- भाई ! तू जेवी करतोस का नाय ?
- नाय
- काय नाहि माज्याकडं ? माज्याकडं गुंडे हायेत, गन्स हायेत, अफू, चरस, गांजा हायेत, शार्प शूटर हायेत, किडनॅपर हायेत, डिस्को क्लब्ज हायेत, मॉल्स हायेत, सरकारी जागा हायेत.. काय हाय तुझ्याकडं ? आं , तुज्याकडं काय हाये ?
- माज्याकडं ..

माज्याकडं.. पार्टीचं तिकीट हाये...

(वाफच्या इन्जिनाचा शॉट. फुक्क फुक्क करत वाफंची शक्ती दावायचा शीन )

- भाई ! मला माफ कर बाबा.. तूच सबसे बडा भाई ! आजसे मै भी तेरा, मेरा भी सब तेरा, और तेरा भी सब तेरा.
- आनि आय ?
- आता माज्याकडं रायलं काय ? सांभाळिन आयला. मला त्वांड लपवायला कुटंतरी एका कोप-यात जागा दे
पॉ S SSS
( ट्रेनच्या डब्बोला डब्बोचा शीन _)

- बाबूराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माजं श्ट्रगलच्या कालातलं लिखानच चोरिला गेलतं. कुनाकडं सापडलं तर मला कलवा. येकदम सुरवातीचं हाये, गोड मानुन घ्या ही इनंती.

बाबुराव, तुमच्या पर्षन्यालिटीत फुल्टू रंग भरत चाल्लेत. आमास्नी आवडली बरं ही ष्टोरी! कुटं बाड गवसलं तर द्येईन तुमच्याकडं धाडून. तोवर आजून लिखान यिउद्यात! Biggrin
आ.न.,
-गा.पै.

Biggrin

माजं श्ट्रगलच्या कालातलं लिखानच चोरिला गेलतं. कुनाकडं सापडलं तर मला कलवा. >>> मागच्या गल्लीतल्या सलीम - जावेदला विचारा.

(वाफच्या इन्जिनाचा शॉट. फुक्क फुक्क करत वाफंची शक्ती दावायचा शीन ) आणि ( ट्रेनच्या डब्बोला डब्बोचा शीन _)
>>> चोरीला गेलं असलं तरी लिखाणातली ओरिजिनल प्रतिकात्मता अतिशयच भावली. Lol

Biggrin आणि त्या कागदचोर सलिम-जावेदलाही सलाम, इतकी वर्षे झाली तरी त्यांच्या सिनेमातील प्रसंगांची नवी रुपे येतच आहेत!

Rofl
Lol

Proud

तुम्ही अजुन आहात ???????????????????????????????????? Uhoh
.
.
.
बाबुराव नारायण शिरवाळकर परतले...:)

Pages