शरद जोशी

निवले तुफान आता

Submitted by अभय आर्वीकर on 13 December, 2015 - 05:53

निवले तुफान आता

ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही
त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही

निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया
पोटात सागराच्या घुसले तुफान काही

देण्यास अंधुकांना संधीप्रकाश थोडा
किरणासमान चर्या जगले तुफान काही

संसार ध्वस्त झाला, हटलेच ना तरीही
झुंजून निश्चयाने लढले तुफान काही

तू रोवलेस येथे बी अर्थकारणाचे
पैकीच माळरानी रुजले तुफान काही

कमतोल पाइकांचे सेनापती जरी ते
चेतून आत्मशक्ती तपले तुफान काही

तापून षड-रिपुंनी पेटून पाहिले पण;
भट्टीतही जरा ना जळले तुफान काही

घेरून मध्यभागी केलाय कोंडमारा
नाहीच डोंगरांना नमले तुफान काही

स्त्रियांचे प्रश्न अन् 'चांदवडची शिदोरी (लोकसत्ता - शरद जोशींचे सदर)

Submitted by अभय आर्वीकर on 9 January, 2013 - 06:17

विशेष लेख - लोकसत्ता

Subscribe to RSS - शरद जोशी