सादरकर्ते चिदंबरम...!

Submitted by शिवम् on 12 March, 2013 - 14:17

अर्थाचा संकल्प नवा
मंत्र्याचे कर्तव्य परम्,
जुन्या तांदळाची नवीन 'इडली' ,
सादरकर्ते चिदंबरम्...!

गोंधळ होता सभागृही,
सभापती होतात नरम,
करांसाठीचे 'उथप्पे' नवे,
सादरकर्ते चिदंबरम...!

अब्जावधींची तुट भराया,
लादले नवे 'कर'म,
कोटींचा हा 'डोसा',
सादरकर्ते चिदंबरम..!

सामान्यांना वार्यावर सोडा,
विकासदर यांचा धरम,
गरम सांबरी 'मेदूवडा',
सादरकर्ते चिदंबरम...!

मनमोहन-मॉटेक संगे,
थाटले 'उडपी' हॉटेलम्,
कोटींच्या कोटी उड्डाणे,
गाठणार चिदंबरम...!

-शिवम पिंपळे,औरंगाबाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा...वा.!
चिदंबरमला ऐकवली तर घाम फुटेल...
चालू घडामोडींवर लिहिण्यात आपला हातखंडा आहेच..
आवडलीच..हे सांगणे न लगे.!
दै.दिव्य मराठीच्या औरंगाबाद आव्रुत्तीत मागच्या बुधवारी हीच प्रकाशित झाली होती ना.?

आवडली नाही वाटते कुणाला...
सुधारणा सुचवा नक्की बदल करु...!

धन्यवाद सुशांतराव!

Happy