नक्की किती पैसे पुरेसे?

Submitted by उडन खटोला on 30 December, 2014 - 01:16

नुकतीच मी स्वेच्छानिव्रुत्ती घेतली. एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले . सुमारे २० लक्ष रुपये बॅन्केत एफ डी स्वरुपात आहेत , त्याचे १०% व्याजानुसार सुमारे १६५००/- रुपए प्रतिमहिना व्याज येते. माझे वय सद्या ५० आहे . तरी हे पुरेसे आहेत का? व याव्यतिरिक्त कुठे सेफ गुंतवणूक करता येइल? मी कोकणातील खेडेगावात राहत असुन महिना खर्च साधारण १००००/- आहे, यामध्ये १+१ जेवन व स्वताचे वडिलोपार्जित घर व शेती तसेच माझा खान व "पाना"चा खर्च समाविष्ट आहे , माझ्याकडे एक मोटरबाईक असून तिचा वापर मी जवळच्या अन्तरावए प्रवासासाठी करतो.

तरी मी काय करावे ? यावर जाणकरानी गाम्भीर्याने सल्ला देणे ,अशी नम्र विनन्ती आहे

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले
----- बहुराष्टीय कम्पनी मध्ये उच्च पदावर अनेक वर्षे काम केल्यावर असा प्रश्न पडू शकतो याचे सखेद आष्चर्य वाटले.

प्रथम दोघान्च्याही आरोग्यासाठी थोडी रक्कम (३ लाख, FDI - हवे तेव्हा तुम्हाला तोडता येण्यासारखे आहे) बाजुला ठेवावी लागेल. सोबत तुम्हाला काही एक रक्कम खुप सुरक्षित पण गुन्तवावी लागेल, मी ४ लाख रुपयान्ची जमीन विकत घेईल जेणेकरुन त्या जागेला १० वर्षानन्तर चान्गला भाव मिळेल.

वायफळ खर्च होणार नसेल आणि थोडी बचत करत राहिलात तर पुढील काळात आर्थिक ताण येणार नाही. तुम्हाला आज १०,००० रु/ महिना लागत असतील तर २०२० मधे महागाई धरुन तुम्हाला १७,००० रु/महिना लागणार आणि गॅप काळानुसार वाढत रहाणार.

पुढील काळासाठी शुभेच्छा...

२० लाख रुपये तुमच्या एकटासाठी पुढिल २० वर्षासाठी पुरेसे नाहीत..

कारणे -
१. महागाईमुळे २० लाख रुपयाचे मूल्य दरवर्षी कमी कमी होत जाणार.
२. महागाईमुळे तुमच्या खर्चाची किंमत (सध्या जे १०,००० रु) दरवर्षी वाढत जाणार.
३. तुम्ही अनियोजित खर्च (आजारपण/अडीअड्चणीचा/खर्च) धरलेला नाही
४. एकाच ठिकाणी केलेली गूंतवणूक

उपाय -
१. प्रथम आरोग्यविमा घ्या
२. काही रक्कम (२५%) सोने/ जमिन/ घर/ व्यवसाय (हॉटेल) मध्ये गुंतवा म्हणजे त्यांचे मूल्य कायम राहिल
३. काही रक्क्म (१५%) SBI म्युचल बॅलन्स फंडमध्ये गुंतवा
४. काही रक्कम (५०%) फिक्स डिपॉझिट्म्ध्य ठेवा (जेव्हा तुम्ही ज्येष्ठ नागरिक व्हाल तेव्हा LIC च्या पेंशन सिक्म्म्ध्ये ठेवा. सध्या ६ लाख ठेवले तर दरमहिना अंदाजे ६००० रु मिळतात. मेल्यानंतर ६ लाख वारसाला मिळतात)
५. १०% रक्क्म सेव्हींग अकांऊटम्ध्ये ठेवा.
६. सर्वात महत्त्वाचे.. स्वस्थ बसू नका... स्वतः काहितरी (छंद, समाजसेवा किंवा व्यवसाय) करत रहा...

गुड लक!

तूम्ही स्वतःला कुठल्यातरी कामात गुंतवणे गरजेचे आहे. अगदी पैश्यासाठी नसले तरी मानसिक स्वास्थ्यासाठी !
धर्मादाय संस्थेचा विश्वस्त किंवा सल्लागार म्हणून काम करू शकता.

पैसा कितीही कमावला तरी वाढत्या महागाईमूळे कमीच पडणार आहे. बँकेत ठेवलेला पैसा मूल्याने वाढणार नाही, उलट त्यात घटच होईल.

तुमच्या अवलोकनाकडे पाहिल्यावर तुमच्या धागाविषयावर, वयावर इ. विश्वास ठेवणे जड जाते आहे. तरीही फुकट सल्ले तेही मागितलेले पाहिले, की द्यावेच लागतात. तस्मात,

नुसत्या खान "पाना"च्या सवयी बदलल्यात तरी भरपूर फरक पडेल असे वाटते आहे.

इब्लिसराव - तुमच्या अवलोकनाकडे पाहिल्यावर तुमच्या प्रोफाइलच्या खरेपणावर देखील विश्वास ठेवणे जड जाते आहे.>

तरीही तुमचे फुकट सल्ले ध्यानात घेत आहे.

नियमित मर्यादित प्रमाणात "पान" केल्यास आरोग्यदॄष्ट्या फायदेशीर असे कुठेतरी वाचल्याचे आठवते ,ते खरे असेल का?

आरोग्य विमा २ लाखापुरता मर्यादित आहे .शेतीचे उत्पन्न फारसे नाही ,पण लक्ष घातल्यास मिळू शकेल. गायी-म्हशी पाळाव्या म्हनतोय

पुढील ३० वर्षांचा विचार करता २० लाख रुपयांवर येणारे व्याज एवढा एकच उत्पन्नाचा मार्ग पुरेसा नाही. व्याज दर कमी झाल्यास हे उत्पन्न कमी होऊ शकते. जोडीला इंन्फ्लेशन मुळे बाईंग पॉवर कमी होणार. शेतीचे उत्पन्न किती ते लिहिले नाहिये. कोकणात स्वतःचे घर आणि शेती आहे तर त्यातून उत्पन्नाचा सोर्स/ लिविंग ऑफ द लँड होऊ शकेल. वाढत्या वयानुसार डॉक्टर आणि औषधोपचारांवरील खर्च वाढत जातो. त्यासाठी तरतुद हवी.

कोकणात स्वतःचे घर आणि शेती आहे तर त्यातून उत्पन्नाचा सोर्स/ लिविंग ऑफ द लँड होऊ शकेल >> +१
योग्य जागी घर असेल तर थोडाफार खर्च करुन simple home stay द्वारा उत्पन्न वाढवता येईल.

एका मल्टिनॅशनल कम्पनी मध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर २० वर्षे काम केले
----- बहुराष्टीय कम्पनी मध्ये उच्च पदावर अनेक वर्षे काम केल्यावर असा प्रश्न पडू शकतो याचे सखेद आष्चर्य वाटले.>>

मलादेखील हाच प्रश्न पडला

असो.तरीही यानिमित्ताने चर्चा चान्गली व्हावी ,अशी अपेक्षा. याच धाग्यावर अन्यत्र फारच उद्बोधक चर्चा झालेली आहे.

महागाई कमी असेल तर व्याज कमी मिळेल, महागाई जास्त असेल तर व्याज जास्त मिळेल. त्यामुळे व्याज हे महगाई बरोबर cancel होईल. त्यामुळे जर १०००० खर्च असेल तर २० लाख रुपये हे २०० महिने ( २०लाख /१००००) पुरायला पाहिजेत. २०० महिने म्हणजे १६ वर्ष पुरतिल. जर व्याज दर कमी होत असतिल तर long term FD/Bonds मध्ये पैसे गुंतवुन हे १६ चे २० वर्ष करु शकतिल. ( Because in this case interest gets locked for few years while inflection is going down).

तसेच पैसे एकाच ठिकाणी गुंतवु नका.

>>व्याज हे महगाई बरोबर cancel होईल.>>
फूड इंन्फ्लेशनच्या बाबतीत तसे होत नाही.( म्हणजे इंनफ्लेशन लो असते पण फूडची कॉस्ट वाढलेली असते.) तिच गोष्ट औषधे आणि इतर वैद्यकिय उपचारांची. व्याज दर कमी असल्याने लोकांना ग्रोसरी की औषधे असा विचार करायची वेळ येते.

एक लाख पासष्ट हजार महिना व्याज येत असेल तर निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आणखी किती पैसे हवेत ? तुमचा खर्च किती ते नाही दिलेत. भाड्याचे घर आहे का ? विकत घेतले आहे का ? कर्जाचे हप्ते चालू आहेत का इत्यादी.

या व्यतिरिक्त फार तर १५००० रु दर महा खूप होत असावेत. औषधपाण्यासाठी वेगळी सोय नसेल तर तो एक अतिरिक्त खर्च (नियमित औषधे असतील तर). अकस्मात उद्भवणा-या औषधोपचारासाठी वेगळे सेव्हिंग्ज करावे लागेल इतकेच.

काळजी करण्यासारखे कारण दिसत नाही. व्याज दर कमी होतात तेव्हां महागाई देखील कमी झालेली असते.

<<महागाई कमी असेल तर व्याज कमी मिळेल, महागाई जास्त असेल तर व्याज जास्त मिळेल. त्यामुळे व्याज हे महगाई बरोबर cancel होईल. त्यामुळे जर १०००० खर्च असेल तर २० लाख रुपये हे २०० महिने ( २०लाख /१००००) पुरायला पाहिजेत. २०० महिने म्हणजे १६ वर्ष पुरतिल. जर व्याज दर कमी होत असतिल तर long term FD/Bonds मध्ये पैसे गुंतवुन हे १६ चे २० वर्ष करु शकतिल. ( Because in this case interest gets locked for few years while inflection is going down).>>

तुम्ही कोणत्या utopia राहता?