पेट्रोलचे गौडबंगाल.

Submitted by हतोडावाला on 21 December, 2014 - 23:40

सध्या आंतरराष्ट्रिय बाजारपेठेत पेट्रोलचे दर दणाणून आपटले असून सगळे पेट्रोल सप्लायर्स देश हादरुन गेले आहेत. ओपेकनी तर चक्क पेट्रोलचे उत्पादन कमी करुन बाजाण्यारात कृत्रीम तुटवडा निर्माण करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण सौदी अरिबीयाने हा प्रस्ताव धुडकावताना एक विचित्र युक्तीवाद मांडला तो म्हणजे 'जर ओपेकनी सप्लाय कमी केला तर इतर पेट्रोल उत्पादक देश बाजार काबीज करतील व परत एकदा ओपेकला तो बाजार काबीज करायला काही वर्षे लोटतील. ही वेळ येऊ नये म्हणून अजून सहा महिने पडलेल्या भावात पेट्रोल विकणे कधीही बेहत्तर" विशेष म्हणजे सौदी अरेबियानी सांगितलेला हा धोका इतर सर्व ओपेक देशाना पटला. अन त्यानी पुढचे सहा महिने नुकसान झेलायच्या त॑यारीने सध्याचे उत्पादन स्थीर ठेवण्याचे मान्य केले आहे.

किती आहे सध्याचे उत्पादन?
ओपेक संघटनेचे उत्पादन ३० मिलियन बॅरल प्रतिदिन. ( ३ कोटी बॅरल प्रतिदिन) आहे.
१२ देशाच्या या संघटनेत वरील उत्पादनात सौदीचा एकट्याचा वाटा आहे १ कोटी बॅरल्स प्रतिदिन.

(एक बॅरलात १५८ लिटर तेल असते. उत्सूकता असणार्‍यानी लिटरात आपापली गणिते मांडावी)

संपुर्ण जगाला रोज ९२ मिलियन बॅरल ( ९ कोटी २० लाख बॅरल) प्रतिदिन पेट्रोलची गरज असते. त्यातील ३० मिलियन (३ कोटी ) बॅरल एकटा ओपेक पुरवतो. यातील मजेदार भाग असा की अमेरीका एकटा १८ मिलियन ( १ कोटी ८० लाख ) बॅरल्स फस्त करतो. तसं पाहता अमेरीका सुद्धा पेट्रोलचे उत्पादन प्रचंड मोठ्या प्रमाणात करते. २०१३ च्या शेवटी अमेरीकेचे रोजचे उत्पादन होते ८ मिलियन (८० लाख) बॅरल्स प्रतिदिन. तरी पिण्याचे प्रमाण पाहता अमेरिकेला रोज १ कोटी पेट्रोल बाहेरुन मागवावे लागते. संपुर्ण जगाची पेट्रोलची तहान आहे ९.२० कोटी बॅरल्सची अन अमेरीका एकटा त्यातले जवळपास २ कोटी पिऊन घेतो हे एक भयानक वास्तव आहे. इतर सगळ्यानी ७ कोटी बॅरल्समध्ये भागवायचे असते.

सध्या पेट्रोलचे भाव जे आपटत आहेत त्यावर जगभारतील तज्ञांचे मत असे आहे की अमेरीकेत प्रचंड प्रमाणात पे ट्रोलचे साठे सापडल्यामुळे त्यानी बाजारात पुरवठा वाढविला आहे. त्यातूनच भाव पडायला सुरुवात झाली वगैरे. सध्या अमेरीका रोज ४ मिलियन ( ४० लाख) बॅरल्स बाजारात ओतत आहे अशा बातम्या आहेत. पण यात एक विसंगती आहे जे कोणी सांगायला तयार नाहीत. प्रत्येकजण ही विसंगती टाळून अमेरीकेच्या वाढीव पेट्रोलचे गुणगाण गात आहेत. ही विसंगती म्हणजे ८ मिलियन बॅरल्स प्रतिदिन उत्पादन करणारा अमेरीक अचानक १५ मिलियन बॅरल्स प्रतिदिन एवढे वाढीव उत्पादन कुठे व कसे करु लागला हे कोणीच सांगत नाही.

जगातली सर्वात मोठी पेट्रोल उत्पादन कंपनी 'सौदी-एरामको' जिची एकून संपत्ती आहे ३० ट्रिलियन डॉलर. म्हणजे अमेरीकेच्या वार्षीक जीडीपीच्या दुप्पट. म्हणजे नेमके किती? 3 00 00 00 00 00 000/- (तीन पद्म अमेरिकन डॉलर) एवढी मोठी. हे गणित सोपं जावं म्हणून मायक्रोसॉफ्टचे आकडे बघू या. मायक्रोसॉफ्टची संपत्ती आहे १७२ बिलियन म्हणजे 1 72 00 00 00 000 /- ( एक खर्व बाहत्तर अब्ज). सौदी-एरामको' व मायक्रोसॉफ्टची % मध्ये तुलना केल्यास मायक्रोसॉफ्ट ही फक्त 0.0000016% एवढी टक्के कंपनी ठरते. यातून एरामकोचा आवाका लक्षात येतो. तर ही एवढी अजस्त्र एरामको ४.४ मिलियन ( ४४ लाख) बॅरल प्रतिदिन उत्पादन करते. अमेरीकेला स्वतःची तहान भागवून बाजारात जर ४ मिलियन बॅरल उतरवायचे झाल्यास स्वतःची १० मिलियन ( १ कोटी) ची भूक भागवून वरचे ४ मिलियन ( ४० लाख) बॅरल्स एवढे उत्पादन वाढवायला हवे. याचाच अर्थ एवढे उत्पादन वाढण्यासाठी वर उल्लेखित 'सौदी-एरामको' सारख्या तीन कंपन्या अमेरीकेत उभ्या व्हायला हव्यात. अन अशा तीन 'सौदी-एरामको' उभ्या झाल्या असत्या तर अमेरीकेची मंदी पार पाय लावून पळाली असती. बेरोजगारी शोधून सापडली नसती. अन एवढ्या आवाढव्य कंपन्या काय रातोरात उभ्या होत नसतात. तयार पैसा ओतला तरी त्याला किमान १० वर्षे लागतील एवढा मोठा तो सेटप असतो. म्हणजे अमेरिकेनी १.४ कोटी बॅरल्स प्रतिदीन एवढे उत्पादन वाढविलेले नाही हे स्पष्ट आहे.

वरील सर्व निरिक्षण केल्यावर दोन प्रश्न अनुत्तरीत राहतात.

१) अमेरीकेची १ कोटी बॅरल्सची भूक कुठून भागविली जात आहे?
२) ९ कोटीच्या बाजारात ४० लाख अधीकचे बॅरल्स कुठून येत आहेत?

=======

रशिया हा सौदी अरेबीयापेक्षाही मोठा पेट्रोल उत्पादक आहे. २०१३ च्या आकडेवारी नुसार रशियाचे एकून प्रतिदिन उत्पादन १० मिलियन ( १ कोटी) बॅरल्स प्रतिदिन होते तर सौदीचे ९.७ मिलियन ( ९७ लाख) बॅरल्स प्रतिदीन. उत्पादित १ कोटी बॅरल्सपैकी रशीया स्वतः ४० लाख बॅरल्स वापरतो व उरलेले ६० लाख बॅरल्स एक्स्पोर्ट करतो. याच्या उलट अमेरीका मात्र कायम १ कोटी बॅरल्स आयात करत असे. रशियाला उत्पादन व बाकी सगळे खर्च मिळून ९० डॉलर प्रतिबॅरल पडत असे. म्हणजे बाजारात पेट्रोलचे भाव ९० च्या खाली गेल्यास रशियाला तोटा होणार होता. हा डाव ओळखून अमेरीकेनी काहितरी डाव खेळला आहे अशी शंका येते.

अमेरीकेने उत्पादन वाढविले असे तर दिसत नाही. म्हणजे यानी काही देशाना हाताशी धरुन मागच्या दोनचार वर्षात पेट्रोलचे साठे करवून घेतले व आज ते अचानक बाजारात उतरवायला सुरुवात केली असून रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अमेरीकेने खेळलेला सर्वात मोठा गेम दिसतोय.

.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या विषयावर प्रकाश टाकणारा लेख लोकसत्ता मध्ये वाचला होता. या परिस्थीतीच तसेच भारताची भविष्याची पेट्रोल तजवीज याबद्द्ल. गिरीश कुबेर यान्चा. शोधून पोस्ट करते इथे.

सध्याच्या परीस्तीथित भारतीय सरकार पेट्रोलचे दर बरेच कमी करू शकते. परंतु ५० पैसे, २ रुपये असे दर कमी करून ते देशवासीयांच्या तोंडाला पाने पुसत आहेत.

म्हणजे यानी काही देशाना हाताशी धरुन मागच्या दोनचार वर्षात पेट्रोलचे साठे करवून घेतले व आज ते अचानक बाजारात उतरवायला सुरुवात केली असून रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी अमेरीकेने खेळलेला सर्वात मोठा गेम दिसतोय. >>>> असू शकेल. ते काहीही करु शकतात आणि ते ही जगाच्या डोळ्यात येणार नाही अश्या रितीने. इराककडे mass distruction weapons आहेत अशी जगभर भिती, हवा निर्माण झाली होती. सद्दाम हुसेन मारला गेला, इराकचीही वाट लावली गेली. पुढे त्या mass distruction weaponsचं काय झालं? कुठे आहेत ती?

सद्दाम हुसेन मारला गेला, इराकचीही वाट लावली गेली. पुढे त्या mass distruction weaponsचं काय झालं? कुठे आहेत ती?>>>>>>> @अश्विनी के - तुम्हाला काय त्रास झाला? अमेरिकेने जे केले ते उत्तम केले.

मला नाही हो काही त्रास Lol मी आपली इथे भारतातल्या एका शहरात ह्या क्षणी तरी सुरक्षित बसले आहे Happy

माझं म्हणणं एवढंच होतं की पेट्रोलच्या बाबतीतही काहीही असू शकतं. इराकच्या बाबतीत ती weapons सुद्धा शोधून निरुपद्रवी करुन टाकायला हवी होती. नको होती का?

माझं म्हणणं एवढंच होतं की पेट्रोलच्या बाबतीतही काहीही असू शकतं. इराकच्या बाबतीत ती weapons सुद्धा शोधून निरुपद्रवी करुन टाकायला हवी होती. नको होती का?>>>>>> तुमच्या प्रतिसादावरुन अमेरिकेच्या कृती बद्दल नकारत्मक भाव दिसुन आला म्हणुन मी ते लिहिले.

WMD असोत वा नसोत, अमेरिकेने केले ते उत्तम केले. असेच त्यांनी जर इराक च्या आजुबाजुच्या २० देशांमधे पण केले तर उपकार होतील.

सत्यवादी,

या आधिचेही कुबेरांचे तेलावरील बरेच संपादकिय वाचलेत. सग्ळे लेख अमेरीकेनी बाजारात तेल उतरविले म्हणत आहेत. पण काल पर्यंत जो देश १ कोटी बॅरल्स आयात करायचा तो अचानक निर्यात कसा काय करु लागला हे मात्र कुबेर सांगत नाहीत.

हे वाढीव तेल येत कुठून आहे हे सर्वात मोठे गूढ आहे!

येत आहे एवढे मात्र नक्की, कारण ओपेकनी सुद्धा मार्केट गमाविण्याचा धसका घेतला आहे.

सद्दाम वाईट होताच पण ज्या हेतूने ते केले होते तो हेतू अर्धवट सोडून दिला (सद्दाम मेल्यावर mass distruction weaponsचं लग्न न लावताच मिशन संपलं?) तर शंकेला वाव असतो. अमेरिका साळसूद नक्की नाही Happy

WMD असोत वा नसोत >>> ??? समजा एखाद्या राष्ट्राकडे WMD नसतील किंवा इतर कुठलंही जगाला हानिकारक कृत्य नसेल तर का एखाद्या राष्ट्राला कुणी संपवावं? भारताकडे WMD नसतील किंवा असली तरी एखाद्या ट्रीटीमधून ती कन्स्ट्रक्टिव्ह कारणासाठी वापरु अशी बंधनं मान्य केली असतील आणि कुणी उद्या उगाचच टाळकं सरकल्यासारखं भारताला जगाच्या नकाशावरुन संपवायचं ठरवलं तर मान्य असेल का? योग्य असेल का? भारत करतो का कधी असं? आपण कधीच निरपरध्यांना हानी पोहोचवायला जात नाही.

संपुर्ण जगाची पेट्रोलची तहान आहे ९.२० कोटी बॅरल्सची अन अमेरीका एकटा त्यातले जवळपास २ कोटी पिऊन घेतो हे एक भयानक वास्तव आहे.
>>>>>>>
अमेरीकेला नक्की कशासाठी लागायचे एवढे तेल? की हेच ते साठा करणे होते?

रशियाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याकरता हे केलेले असेल तर ओबामाला लोक क्रेडिट देतात त्यापेक्षा तो जास्त मुत्सद्दी आहे असे म्हणावे लागेल. पुतिन विरूद्ध तो काही करत नाही म्हणून रिपब्लिकन्स व येथील त्याचे इतर विरोधक बरेच महिने टीका करत आहेत. रशियावर अमेरिकेने स्वतः कारवाई न करता आंतरराष्ट्रीय समुदायातर्फे आर्थिक निर्बंध आणावेत असे प्रयत्न ओबामाचे प्रशासन करत होते. पण जर्मनीसारख्या देशांचे आर्थिक हितसंबंध रशियात गुंतलेले असल्याने ते करू शकले नाहीत. त्यामुळे पुतिन क्रिमिया गिळंकृत करून पुन्हा उरलेला युक्रेन खायला निघाला होता, आणि त्याला कोणीही काहीही करू शकत नाही असे चित्र दिसत होते.

आता पेट्रोलच्या भावांमुळे तेथील अर्थव्यवस्था धोक्यात आली तर त्याला इतर देशांकडे मदतीला जावे लागेल अशी चर्चा आहे.

वरती अमेरिकेच्या पेट्रोल उत्पादनासंबंधी जो मुद्दा आहे - माझ्या माहितीनुसार अमेरिकेचे "एकूण इंधन उत्पादन" वाढले आहे. पेट्रोल वाढले असले तरी हे आकडे फक्त पेट्रोल चे नसावेत. नॅचरल गॅस व बर्‍याच राज्यांमधे फ्रॅकिंग करून मिळवलेली विविध इंधने बहुधा त्यात असावीत.

लोकहो हे पण वाचा. अतिशय रोचक आहे.

Why Putin Is Winning The New Cold War?
http://www.globalresearch.ca/why-putin-is-winning-the-new-cold-war/5417041

यावरुन अंदाज येऊ शकेल की अमेरिका जर हे करत असेल तर का करत आहे.

हो. पण तुम्ही मी लिहिले होते ते वाचले का इतर घडामोडीच्या धाग्यावर ? त्यातुन वाटत होते का पुतिन जिंकत आहे ? आणि तो लेख ३० नोव्हेंबरचा आहे. मी या घडामोडींवर वाचले ते फार आधीचे होते

अहो या विषयाशी संबंधित वाटला म्हणून इथेही दिली लिंक. तो जुना लेख आहे मान्य. म्हणूनच म्हणालो की त्या लेखात दिलेली परिस्थिती बघता आणि एकंदरितच रशियाला शह द्यायला अमेरिकेने ही खेळी केली असावी. पुतीन हे केजीबीचे आहेत, आणि त्यामुळे एक नंबर आतल्या गाठीचे. कधी काय करतील..........असो.

पेट्रोलचे खरे नाही हे खरेच. पण जर या तेलनिर्मात्या अरब राष्ट्रांनी तेलौत्पादन कमी केले, तिथल्या खाणी बंद केल्या तर परत येणार्‍या भारतीयांमुळे ईथल्या अर्थव्यवस्थेवर येणारा ताण हा आणखी एक काळजीचा मुद्दा होऊ शकतो. Sad

कुणी उद्या उगाचच टाळकं सरकल्यासारखं भारताला जगाच्या नकाशावरुन संपवायचं ठरवलं तर मान्य असेल का?>>>>>>

अमेरिका भारताला संपवणे वगैरे असे कधीही करणार नाही. अमेरिका ज्यांच्या मागे लागते ते देश वेगळे असतात.
अश्या देशांना आणि तिथल्या लोकांना दाबून ठेवणे गरजेचेच आहे. आपल्या नशिबानी अमेरिका ते काम करते आहे.

अमेरिकेने तेल आयात करणे २०१३ आधी पासुन बन्द केलेले आहे.

तेल उत्पादनाचे (कच्च्या तेलाचे भाव कमी होणे केवळ रशियाच नाही तर मध्य पुर्व देशांनाही परवडणारे नाही) केवळ रशियाची कोंडी करण्याकरता तेलाचे भाव पडलेले नाहीत.

युरोप , चिन आणि जपान या सारख्या अर्थ व्यवस्था रिसेशन मधे जाण्याच्या मार्गावर आहेत. कच्या तेलाची मागणी कमी झालेली आहे त्या मानाने ओपेक ने आपले उत्पादन कमी करण्याचे नाकारलेले आहे. स्थिर पुरवठा आणि कमी झालेलि मागणि या दर पडण्या मगे जास्त आहे.

रशियन अर्थ व्यवस्थेचा ५६% भाग तेल उत्पादनावर आहे त्याचा फ़टका त्याना बसणे सहजिक आहे तरी रुबल पडणे हा करन्सी स्पेक्युलेशन चा भाग मोठा आहे. रशिया मध्ये सध्या एकुण परिस्थिती मुळे पैसा आणि गुंतवणुक देशा बाहेर जात आहे. अंदाजे ३० ते ४० बिलियन डॉलर्स थोड्क्या वेळात बाहेर गेल्याने हा पेच प्रसन्ग निर्माण झालेला आहे.

रशियन सेंट्रल बॅकेने व्याजदर वाढवण्या मागचे कारण हेच आहे की डॉलर देशाबाहेर जावु नयेत.

अमेरिकेला रशियाची कोंडी करयची असेल तरी आर्थिक नाकेबंदी पुरेशी आहे त्या साठी तेलाचे भाव पाडुन अमेरिकन तेल कंपन्याचे नुकसान कराण्या चे धोरण अमेरिका अवलंबणार नाही.

अरे मझ्या लिहिण्यात कोठेच पंतप्रधान मोदी आलेले नाहीत,. कहितरी नक्किच चुकले असावे.

युरो तुम्ही जगाच्या घडामोडींवर लिहिले आहे तिथे ओबामा आणि पुतिन सारखे येतात Wink

(नोटः- माझ्या लेखनात देखील आले नाही )

कदाचित हि रशिया विरुद्धची खेळी असू शकेल.
ध्रुवीय प्रदेशाजवळही तेल आहेच पण सध्या ते काढणे परवडणारे नाही, भविष्यात किमती वाढल्या तर ते शक्य होईल, असे मी वाचले होते.

मला स्वतःला तरी असे वाटतेय, कि लवकरच पर्यायी इंधनाचा शोध लागेल किंवा सध्या महाग वाटणारे पर्यायी इंधनाचे तंत्र सोपे व स्वस्त होईल.

अश्विनी के | 22 December, 2014 - 14:09

स्वतःच काय स्वतःचा धागा भरकटवताय!
<
मोदी आले की भरकटत असेल तर अनेक लोकांनी मिळून अक्खा देश भरकटवलाय की!

Pages