मनोरंजन

भिंगनिरपेक्षता, उरोगामी आणि फेक्युलॅरिझम

Submitted by नोझिपा मरारे on 18 November, 2019 - 13:50

कित्येक वर्षे झाली.
भारावलेल्या अवस्थेत मायबोलीवर माझा वावर भिरभिरत असे. तसे कुठे कधी वावगे लिहीले जाणार नाही याची काळजी मी घेत असे.

म्हणजे आपण काहीच लिहायचे नाही हा काळजी घेण्याचा सर्वोत्तम उपाय. कधी कधी आपण आपल्या मनातले काहीच लिहीत नाही याचे वैषम्य वाटायचे. पण थोड्याच दिवसात आपण असे काही लिहीले असते तर आपले थोबाड कसे फुटले असते याचे प्रात्यक्षिक इतरांच्या बाबत पहायला मिळत असे.

विषय: 

फत्तेशिकस्त (चित्रपट कथा आणि परीक्षण)

Submitted by निमिष_सोनार on 15 November, 2019 - 20:16

फत्तेशिकस्त मराठी चित्रपट: (कथा आणि परीक्षण)
- निमिष सोनार, पुणे

दिगपाल लांजेकरचा "फर्जंद" मी बघितला होता आणि आवडला होता. फत्तेशीकस्त येईल असे कळल्यावर तो बघायचे ठरवले होते आणि बघितला! मी चित्रपटाची कथा सांगत जातो आणि परीक्षण "चौकोनी कंसातील" वाक्यात अधून मधून येईलच!! कथा किचकट असल्याने थोडी विस्ताराने सांगतो म्हणजे हे संपूर्ण परीक्षण वाचल्यावर तुम्हाला चित्रपट समजायला सोपा जाईल.

माझ्या नजरेतला रुपेरी पडदा (भाग 1)

Submitted by आत्रिक on 12 November, 2019 - 10:54

माझ्या नजरेतला रुपेरी पडदा (भाग 1)

http://surajponkshe.blogspot.com/2019/11/1.html

मी पुन्हा येईन

Submitted by पाषाणभेद on 11 November, 2019 - 04:08

घेतले तू उधार पैसे
आता देत नसशील
करण्यास ते वसूल
मी पुन्हा येईन

जात असले मी माहेरी
करू नका तुमची थेरं
पाहण्या ते सारं
मी पुन्हा येईन

नाही लिहीता येत पेपर
कॉपी जरी करशील
काय ते तपासण्यास
मी पुन्हा येईन

मला न दाखवता
व्हाटस अप मेसेज पाहता
काय ते पाहता ते पाहण्यास
मी पुन्हा येईन

लेख वगैरे लिहीता येथे भारी
पण या कवीतेला
प्रतिक्रीया देतात की नाही ते पाहण्या
मी पुन्हा येईन

- पाषाणभेद
११/११/२०१९

रांगोळीच्या शोधात दशदिशा

Submitted by mi_anu on 6 November, 2019 - 02:58

(लेखनमूल्य बिल्य शोधत असाल तर हे लिखाण वाचू नका.कोण रे ते मागून "तुझ्या कोणत्या लेखात असतं तसं पण.." पुटपुटतंय?)

याची सुरुवात झाली ती 15 दिवसांपूर्वी. तेव्हा मी एक शहाणी,उगीच कोणाशीही न बोलणारी,आपलं काम करणारी,आपले पैसे जपणारी शांत बाई होते.

अचानक गुगल पे ने दिवाळी स्टॅम्प योजना काढली आणि तेव्हापासून मी कोणालाही काहीही मेसेज, पैसे, स्टॅम्प पाठवणारी, काहीही खरेदी करणारी वेडी बाई झाले.

विषय: 

चा चा चो !

Submitted by साद on 1 November, 2019 - 00:31

मराठी आंतरजाल सुरु होऊन आता वीस वर्षांहून अधिक काळ लोटलाय. अनेकविध विषयांवर त्यावर आपण चर्चा, वादविवाद करतो. त्यातले काही विषय बरेच वादग्रस्त असतात आणि त्यामुळे सतत चर्चेत येतात. त्यातल्या काहींचा तर चावून चावून चोथा (चा चा चो ) झालेला असतो. त्या विषयांच्या वारंवार चर्चेतून एक लक्षात येते ते असे. अशा विषयाच्या दोन्ही बाजूस भक्कम असे मुद्दे असतात. आपण सगळे प्रौढ असल्याने त्यातल्या कुठल्यातरी बाजूवर ठाम असतो. इथल्या चर्चेतून त्यावर काही परिणाम होत नसतो (काही अपवाद सोडून देऊ वरवर आपण कधी म्हणतो की मला त्या विषयाची दुसरी बाजू समजली. पण सहसा आपले मतपरिवर्तन होत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

इंग्रजी गाण्यांची आवड

Submitted by सामो on 29 October, 2019 - 13:54

* ज्योतिषाचे काही उल्लेख आलेले आहेत. ज्यांना त्या विषयात, रस नसेल, त्यांनी ते उल्लेख टाळून बाकी वाचावे व मुख्य म्हणजे धाग्याची गाडी फक्त त्या तीळभर ज्योतिषावरती डिरेल करु नये.
________________________________________________________________

Online दिवाळी अंक

Submitted by शब्दांश प्रकाशन on 27 October, 2019 - 13:21

दिवाळीच्या शुभेच्छा!
तुमच्या आनंदात भर टाकण्यासाठी साहित्याच्या पणत्या सिध्द केल्या आहेत मसअप प्रकाशित स्पंदन या दिवाळी अंकाने!!
जरूर वाचा! Happy

https://drive.google.com/file/d/1mSPhu94-6z5SdcQpU6IvcaGOCG_us94b/view?u...

___________________

शब्दखुणा: 

ग्रेसफुल एजिंग

Submitted by सामो on 25 October, 2019 - 15:46

"ममा - ग्रेसफुल एजिंग चा अर्थ काय?" माझ्या १६ वर्षीय मुलीकडून हा प्रश्न अनपेक्षित होता. पण प्रश्न विचारल्यावर माझ्या डोळ्यासमोर माझ्या एजिंगची एकदम फिल्लमच चमकून गेली. म्हणजे केस काळे करायचा केलेला आटापिटा आणि पार्लरमध्ये भरमसाठ पैसे देऊन, पर्स रिकामी करुन आल्यावर घरी आरशात बघताना दिसणारे पांढरेशुभ्र केस पाहून होणारी तणतण. आतापर्यंत केलेले "फक्त कॉटेज चीझ डाएटींग" कुठे "नो बटाटा आणि भात डाएटींग", "पानात घेतलेल्याच्या अर्धच खायचा केलेला निश्चय आणि तो पूर्ण करण्याच्या भरात मूळातच तिप्पट भरुन घेतलेली प्लेट" ......... अन या सर्व सव्यापसव्यानंतरही "वाढता वाढता वाढे , भेदिले शून्यमंडळ" जाडी.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन