राईज , रोअर , रिव्होल्ट ( आर आर आर ) चित्रपटासाठी धागा

Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 22:06

आर आर आर (RRR) या एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित व बहुखर्चिक चित्रपटाबद्दल हितगुज करण्यासाठी हा धागा. RRR

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजामौली यांचा RRR हा सिनेमा नेत्रदीपक आणि डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे. पण बाहुबलीप्रमाणेच तो अ आणि अ कॅटेगरीतला आहे.
पूर्वी दीवार/ जंजीर आणि अमर अकबर अँथनी अशा दोन कॅटेगरीतले सिनेमे बनायचे. दोन्हीही सुपरहीट जायचे. दीवार/जंजीर वर सडकून टीका व्हायची पण अमर अकबर अँथनी वर इतकी व्हायची नाही. कारण अ अ अँ कडून अपेक्षाच ठेवता यायची नाही. डोकं घरी ठेवून जाण्याचा सिनेमा म्हणजे मनमोहन देसाईचा सिनेमा अशी व्याख्या एका समीक्षकाने केली होती.
जे जे दिसेल
ते पहात जावे
पडद्यावरी
असा भाव ठेवून जाणार्‍याचे पैसे वसूल व्हायचे.

राजामौली हे मनमोहन देसाईंची गादी चालवतात. फरक इतकाच की ते सिनेमा लार्ज स्केलला बनवतात. त्यासाठी पैसा लागेल इतका ओततात. जे जे उपलब्ध असेल ते ते अद्ययावत तंत्रज्ञान वापरतात. हॉलीवूडला टक्कर देईल इतका भव्य दिव्य सिनेमा बनवणे हे त्यांचे ध्येय आहे.
बाहुबली मधे हे सगळं जमून आलं. कारण परीकथेप्रमाणेच राजा राणीची गोष्ट भारतीय माणसाला आवडते. तिथेही लॉजिक घरीच ठेवलं जातं. उलट नायकाला जादूई शक्ती असेल तर तो प्लस पॉईंट मानला जातो. आजोबांकडून ऐकण्याची गोष्ट बंद झालेली असताना राजामौलींनी सांगितलेली ही गोष्ट आबालवृद्धांना आवडली. गोष्टीतल्याप्रमाणेच अचाट ताकदीचा नायक आवडून गेला.

पण आर आर आर ही १९२० सालच्या सत्यकथेवर आधारीत काल्पनिक कहाणी आहे. ती सत्यकथेवर आधारीत नसती तरीही ब्रिटीशकालीन म्हटल्यावर परीकथा होऊ शकत नाही. राजाराणीची गोष्ट होऊ शकत नाही. एव्हढे अचाट शक्तीचे नायक भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कधीही इतिहासात ऐकलेले, वाचलेले नाहीत.
त्यामुळे बाहुबलीप्रमाणे लॉजिक घरी ठेवून सिनेमा पाहणे अंमळ जडच जाते. चार वर्षे खपून जर सिनेमा बनवायचा असेल तर तो मुघल ए आजम कॅटेगरीतला तरी बनवायचा. सिनेमॅटिक लिबर्टी असणारच. पण ती लिबर्टी कितपत असावी हा पण मुद्दा आहे. उद्या ब्रिटीश १९५७ सालीच पळून गेले असा सिनेमा काढायचा म्हटलं तर त्याला लिबर्टी म्हणायचं का ? पण असा सिनेमा काढलाच तर तो सणकून आपटेलच याची ग्यारण्टी देता येत नाही.
अशा सिनेमाला देशभक्तीचा थोडासा तडका आणि एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एव्हढाच मंत्र म्हणत पडद्यावर काहीही दाखवले तरी चालेल हा विश्वास आर आर आर देतो.

लॉजिकच्या या फूटपट्ट्या लावल्या नाहीत तर आर आर आर हे एक अतिभव्य असे मनोरंजन आहे. यातली नृत्ये कधीही न पाहिलेली. ज्यु एनटीआर आणि रामचरण दोघेही तुफान नाचले आहेत. ( शूट करताना एफ पी एस रेट वेगळा असावा. २४ एफ पी एस वर दाखवले असावे).
आलिया भट सुंदर दिसली आहे. वो अब बच्ची नही रही हे राजीत दाखवून दिले होते. पण यात तिला वाया घालवले आहे. अजय देवगण पाहुणा कलाकार आहे. पण छाप सोडून जातो. त्याचा अंडरप्ले इथेही लक्षात राहणारा आहे. रामचरणचा अभिनय ठीक ठाक. ज्यु एनटीआरने भोळ्या भीमची भूमिका समरसून केली आहे. त्याची ब्रिटीश हिरॉईन लक्षवेधी आहे. तिला या चित्रपटामुळे मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे.

यातली ब्रिटीश पात्रं " टुमको हॅमने बोला आ ता " छाप हिंदी बोलत नाहीत. राजामौली यांनी हा स्टिरीओटाईप तोडला तसाच अचाट आणि अतर्क्य साहसदृश्यांचा तोडला असता तर बरे झाले असते. भव्य दिव्य दाखवताना भौतिकशास्त्राचे नियम (लवकर गुलगुळीत झालेली संज्ञा) पायदळी तुडवणारी अ‍ॅक्शन पडद्यावर वेगळ्या ग्रहाचे नियम लागू असल्याप्रमाणे दाखवलीच पाहीजे का ? आता तर बॉलीवूडने पण ते स्विकारले आहे. १७०० सी सी ची मॅचलेस मोटरसायकल पायाने फ्लिप करत हवेत उडवणे हे काही येरागबाळ्याचे काम नोहे आणि अशी दृश्ये भक्तीभावाने पाहणेही.

आमच्याकडे कोणाला माहीतही नाही हा पिक्चर
घरी बाहुबली तुफान हिट असल्याने बघावासा वाटतोय.
पण स्वातंत्र्यलढ्याचा बॅकग्राऊंड असेल तर पोरांना त्याबद्दल काही गैरसमज होऊ नयेत, त्यांना ती सुद्धा एक बाहुबलीछाप कथा वाटेल याची भिती आहे.

मस्त लिहिलं आहे शांत माणूस

सिनेमटीक लिबर्टी ने काव आणलाय पार
पुष्पा मध्येही तेच होतं
अचाट प्रसंग किंवा हिरोला सुपरमॅन नाही केलं तर लोकं बघणारच नाहीत हा समज का फैलावला असावा

सशक्त तगडी कथा, दमदार अभिनय आणि श्रवणीय गाणी हे आता सगळं कालबाह्य झालं आहे का?

सशक्त तगडी कथा, दमदार अभिनय आणि श्रवणीय गाणी हे आता सगळं कालबाह्य झालं आहे का?>>>>> गाण्यांबद्दल सांगता येणार नाही मला पण मल्याळम सिनेमे या कैटेगरीतले वाटतात..
तमिळ सिनेमे जास्तच मास आणि रिएलीटी, ग्राउंड लेवलला दाखवण्यात भर देतात..तमिळ गाणी बरीच श्रवणीय आहेत सध्याची डि इम्माम, श्रेया घोषाल वगैरे यांची.
पण तेलुगू वाले मोठ्या मोठ्या स्टार कास्टला घेऊन अचाट आणि अर्तक्य सिनेमेच बहुतेक करून पसंत करतात. (सेम फॉर तमिळ मोठे हिरोज अजित,रजनीकांत, विजय दलपती वगैरे)नायिकांना तर काही वावच नसतो या सिनेमांमधे.

धन्यवाद आशुचँप.
सशक्त तगडी कथा, दमदार अभिनय आणि श्रवणीय गाणी हे आता सगळं कालबाह्य झालं आहे का? >>>> अगदीच. डब्ड सिनेमातली गाण्यांबद्दल काहीच बोलता येत नाही. अस्सल गाण्याचा बाज डब्ड गाण्यात आणणे कठीणच काम असते.

तमिळमधे सेन्सीबल सिनेमे पण बनतात आणि अ आणि अ पण. आपल्याला अ आणि अ जास्त करून माहिती आहेत. शंकराभरणम हा सिनेमा मी तेलगूत पाहिला आहे. सागर संगमम, स्वाथीमुथ्थन हे सिनेमे तमिळ मधे पाहिले आहेत. असे बरेच सिनेमे त्या वेळी डबिंग नसल्याने भाषा समजत नसल्याने पाहिले आहेत. रजनीकांत, मामुट्टी यांचे सुद्धा सुपरहिरो नसलेले सेन्सीबल सिनेमे पाहण्यात आले आहेत.

पण मल्याळम सिनेमे या कैटेगरीतले वाटतात..>>>
सहमत अगदीच
आपल्याकडे साऊथ म्हणजे सरसकटीकरण केलं जातं
पण एकूणच मल्याळम सिनेमा खूपच प्रगल्भ आणि वैविध्य असलेला वाटला
मी खूप असे नाही पाहिले पण जे पाहिले ते ज्याला टिपिकल आपण सौथचे सिनेमे म्हणून हिणवतो त्यापेक्षा कैक पटीने अप्रतिम होते

पिरावी एक बाप रेल्वे स्टेशनवर मुलाची वाट बघत असतो, अनेक वर्षे. तो ही सिनेमा अप्रतिम होता. दूरदर्शनकृपेने पाहिला.

होय मीही एक पाहिलेला की एक रिटायर झालेला बाप फोन नीट वापरता आल्यामुळे अप्रत्यक्षपणे मुलाचे करियर बरबाद करतो
आणि मग मनापासुन नवे तंत्रज्ञान शिकायचा प्रयत्न करतो
फार सुंदर होता तो मुव्ही
मी नाव विसरलो

हा बरोबर हाच मुव्ही....धन्यवाद
मला तो परत एकदा बघायचा होता पण मला नावच आठवेना....
प्राईम किंवा कुठेतरी पाहिला होता असाच अचानक

ज्यु.एनटीआर एक मेहनती मुलगा आहे..त्याच्या सारखे इमोशनल, एक्सप्रेसींग ऐक्टींग आणि सुपरफास्ट डान्स तोच करू जाणे....
तेलुगू मधे एक अल्लूर्जून और दुसरा एनटीआर बाकी सगळे नंतर...ह्यांचे आधीचे खूप सारे सिनेमे पाहून झाले आसतील तेव्हा या निष्कर्षाप्रत येतो माणूस... उगाच नाय पब्लिक इनका दिवाना...
राजमौली सर एक सिनेमा बनवायला तीन तीन वर्ष लावतात..चार हजार लोकांना रोजगार मिळतो..कलाकारांकडून जीवतोड मेहनत करून घेतात तेव्हा बनतात त्यांचे असे सिनेमे..

राजमोली सिरीजमध्ये तो डास मुव्ही , मगधीरा जास्त चांगले वाटले.

बाहुबली ठीक होता
नवीन सिनेमा अजून कमी अपिलिंग वाटतो, त्यात 3 तासाचा केलाय , तर बघणे मूषकिल आहे

कलेक्शनचे आकडे मोठे आहेत , कारण पूर्वीच्या पिक्चरचे तिकीट 120 होते , आज 200 आहे

झुरळाचा माहिती नव्हता.

Maryada Ramanna एक आहे.
कॉमेडियन एक्टर मेन लीड मधे घेऊन, हिरोला काहिही एक्शन सीन्स नसलेला तरीही खिळवून ठेवणारा सिनेमा..सुपरहिट सिनेमा.
ह्यावर नंतर तमिळ वाल्यांनी एक रिमेक काढला
आणि हिंदी वाल्यांनी सुपरफ्लॉप सन ऑफ सरदार काढला.

कुमराम भीम हा आदिवासींचा नायक आहे. त्याला दैवत मानतात. भीमसाठी स्थानिक जनतेत जे गीत आहे तेच आर आर आर मधे घेतलेले आहे.
https://www.youtube.com/watch?v=Wk9aUBrzhtE

पण या दोन नायकांची भेट प्रत्यक्षात झाली होती का ? दोघांचे संघर्ष वेगवेगळे होते. बीबीसीने स्टोरी केली आहे.
कोहराम भीमची संघर्ष गाथा
https://www.youtube.com/watch?v=U_5GiGcer10 ( पार्ट १ / पार्ट २)

अल्लुरी सीताराम राजूची कहाणी
https://www.youtube.com/watch?v=UTKszXtcY40

त्या मख्खी मधल्या व्हीलनचे नाव किच्चा सुदीप.

हा त्या महाभारतातील किचकचा कोण ?

व्हीलनच्या घरी आगी लावणे , हा राजामौलीचा आवडता छंद आहे ( लंका दहन ?)

मगधीरा - हेलिकॉप्टर व पेट्रोल पंप जळतो
मख्खी - तिजोरी जळते , शेवटी सगळेच जळते
बाहुबली - राजवाडा जळतो , एकदा गाडीचे चाक जळते
आर आर आर - ह्यातही राजवाडा जळतो

पिक्चर अजून बघितला नाही, युट्युबवर RRR fire scene सर्च केले
Proud

सुपरमॅन ने अनियंत्रित झालेल्या विमानाला हात लावून उतरवले तर ते चालते .
स्पायडरमॅन नदीत कोसळणाऱ्या कार ला जाळे फेकून वर घेऊ शकतो ते ही चालते , आणि मुव्ही कोट्यवधी चा धंद्या करतात .
ऑब्जेकशन फक्त आर आर आर , बाहुबली सारख्या सिनेमांना असते .
तरी राजमौली ने आर आर मध्ये सर्व धर्म समभाव ची दाखल घेतली आहे .

त्यात पण सर्वधर्म समभाव आहे की.

कटप्पाला तलवार देणारा अफगाणी मुसलमान आहे ना ? आणि तो मदत करायचे वचन देतो, पण नंतर ते पात्र गायब होते

मगधीरामध्ये मगधीराचा शत्रू राजाही मुसलमानच दाखवला आहे, तोही त्याला मदतीचे आश्वासन देतो, पुढच्या जन्मी मगधीरा हिंदूच रहातो, हा मित्र मात्र ख्रिश्चन कोळी होऊन जन्माला येतो व मदत करतो

दोन्ही पात्रांचे गेट अप सेम वाटले होते, कदाचित कलाकार तोच आहे असे वाटते

नाही , कलाकार वेगळे आहेत
मगधीरा -श्रीहरी- शेरखान , सॉलोमन
बाहुबली - सुदीप - अस्लम खान

James bond सिनेमा पाहा. किती हळुवार बनवतात. खोली उघडून काही तरी शोधतो आणि बाहेर जातो. पण इतक्यात काही आठवलं म्हणून परत दार उघडतो आणि कुंड्यातल्या घडातलं एक द्राक्षं खातो.

परत तेच
सुपरमॅन हा आधीपासूनच सुपरमॅन आहे
स्पायडी ला कोळी चावतो
थोर तर देवपुत्र आणि देव आहे
ही आधी कार्टून मधून सिद्ध झालेली पात्र आहेत

आता टॉम आणि जेरी मध्ये ते छोटे होतात, चपटे होतात परत सरळ होतात मग आपल्या सिनेमातला हिरो असा झाला तर बिघडलं कुठं असा विचारणार का?

नुकतेच व्हॉटसपमित्राच्या स्टेटसवर एक क्लिप पाहिली ज्यात आर आर आरचा एक हिरो बाईक ऊचलून फिरवतो. आणि ते पाहून हॉलीवूडचे सुपरहिरो शरमेने हक्काबक्का होतात.
क्लिप बघून अभिमान वाटला.
बाहुबली सुद्धा आधी बालिश वाटलेला. आपल्याला असले पिक्चर झेपत नाही म्हणून टिकाही केलेली. पण आजच्या तारखेला हॉनेस्टली कन्फेस करायचे तर गेल्या काही वर्षात पुन्हा पुन्हा सर्वाधिक वेळा पाहिलेला चित्रपट म्हणजे बाहुबली आहे. ते सुद्धा एक नाही तर दोन्ही भाग. निखळ आनंद..

Pages