मनोरंजन

चिमणी घड्याळ - Cuckoo clock

Submitted by अजित केतकर on 28 April, 2022 - 10:07

बहिणीच्या नव्या जागेत गेलो तेव्हा भिंतीवर एक छान 'कक्कु क्लॉक' दिसले पण ते बंद होते. अधिक विचारणा केल्यावर ते बिघडल्याचे बहीण म्हणाली. ते चालत नाही आणि त्यामुळे त्यातली चिमणी ओरडत नाही तरीपण छान दिसतेय म्हणून ठेवलंय शो-पीस सारखे.

घड्याळ होतेच ते छान, नजर खेचून घेणारे. तिने जर्मनीतून 'ब्लॅक फॉरेस्ट' भागातून खास आणले होते. हे ठिकाण अशा घड्याळांसाठी प्रसिद्ध आहे. पण इथे दुरूस्त करायला द्यायला ती घाबरत होती. एकदा एका दुकानात दिले पण त्याने आणखीनच बिघडवून परत दिले. त्यामुळे ते आता शो-पीस म्हणून ठेवायचे असे बहिणीने ठरवून टाकले होते.

चैत्र पहाट

Submitted by पुरंदरे शशांक on 28 April, 2022 - 04:01

चैत्र पहाट

पहाटे शशी बिंब अस्तावताना पिसे लाविते मन्मना हुर्हुरी
सुखावून गात्री जडावून नेत्री दिठीही सख्याची उरी शिर्शीरी

हळू वात मंदावलेला सुखावे उभा वृक्ष डोले सुपर्णातुनी
तनू रोमरोमी हळुवार जागे खुणा रेशमाच्या मऊ स्पर्शुनी

कळी मोगर्‍याची टपोरी फुलोनी सुवासात न्हाते जरी यामिनी
सुखाच्या तिरी देह निद्रिस्त दोन्ही खुळी कंकणे लोप नादावुनी

उजाडेल आता रवी बिंब पूर्वे दिशा व्यापुनी सर्व तेजाळुनी
उसासून गंधाळुनी म्लान आता निजे मोगरा शांत केसातुनी.....

आवडलेला माहितीपट

Submitted by Srd on 26 April, 2022 - 03:39

मी पाहिलेला माहितीपट

मी वाचलेलं पुस्तक, किंडलवर वाचलेलं पुस्तक, तुम्ही कोणते यूट्यूब चानेलस subscribe केले आहेत असे धागे इथे आहेत. ते पाहून वाचून हा धागा सुचला. मला documentaries - माहितीपट पाहायला आवडतात.
धागा मायबोली admin ने चालवला तर उत्तमच. सुरुवात करत आहे.

dw tv - जर्मनीचा चानेल,
Nhk world - जपानचा चानेल,
Aljazeera - कत्तारचा चानेल,
ABC - ओस्ट्रेलिया,
History - चानेल ( इजिप्तचे खासच.)
असे आणखी बरेच आहेत ते माहितीपट प्रसारित करत असतात. सर्वच विडिओ पाहणे अशक्य असते. पण कुणी पाहून त्याबद्दल सांगितले तर वेळ वाचेल आणि काम सोपे होईल.

मिलो न तुम तो..

Submitted by पाचपाटील on 21 April, 2022 - 11:11

मिलो न तुम तो हम घबराये
मिलो तो आँख चुराये
हमें क्या हो गया है...!

तर कधीकधी हे असं होतंच ना म्हणजे..!
म्हणजे समजा ती त्याला आवडत असते.
आणि म्हणूनच तिला ते जाणवू न देण्याची त्याची
कोशिश चाललेली काही काळापासून..!

मग समजा ती दिसण्याची शक्यता असेल,
अशा जागांवर एक मूर्ख चक्कर मारून येणं वगैरे..
उदाहरणार्थ स्वतःपासून दूर बेखबर कॉरिडॉरच्या
शेवटी...
कधी जिन्यांवर अधेमधे दीदार ए यार..
कधी कॅन्टीनच्या टोकाला एकटीच सितमगार..
किंवा कधी संध्याकाळी पार्कींगमध्ये एक ॲक्टीव्हा
वाऱ्यावर सवार होत असलेली वगैरे...

विषय: 

वाया जाण्याच्या आधीच्या गोष्टी

Submitted by पाचपाटील on 14 April, 2022 - 15:03

असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक
प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असे प्रश्न
पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी
असणार, हे ओघाने आलेच समजा.
पण तेव्हा ती तशी नव्हती.

शब्दखुणा: 

मजेशीर (धन्य त्या) गायनी कळा.

Submitted by शांत प्राणी on 10 April, 2022 - 11:34

बरेचदा आपला सामना अशा काही मजेशीर म्युझिक व्हिडीओजशी होतो कि काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही. गायकाच्या विविध तर्‍हांमुळे असे व्हिडीओज व्हायरल होतात. कधी कधी गायन भयानक या प्रकारात मोडत असते. आणखीही काही काही धमाल गोष्टी असतात. असे काही व्हिडीओज इथे शेअर करूयात.
गाजराची पुंगी नावाचे एक धमाल नाट्य औरंगाबादच्या दोघा प्राध्यापकांनी आणले होते. त्यात अशा गायकांच्या, गायनाच्या विविध तर्‍हा होत्या.
उदा.
नूरानी भगिनी नावाने प्रसिद्ध असलेल्ञा दोन सूफी गायिकांची शैली पाहिली तर हसू आल्याशिवाय राहवत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

मला नेमके काय करायचे होते !

Submitted by पशुपत on 6 April, 2022 - 05:57

आयुष्यात बर्‍याच गोष्टीं आपण, गतानुगतिको...नियमानुसार करत जातो.
काही जण पुढे जाऊन, "उगाच या मार्गावर आलो" या पश्चात्तापात अडकतात. किंवा परत नीट विचार करून नवी दिशा स्वीकारतात..आणि बहुतांशी यशस्वी देखील होतात.
पण एकदा स्वीकारलेल्या मार्गाने चालताना चित्त मोकळे ठेवून डोळसपणे मार्गक्रमणा करत राहिल्यास खूप चांगल्या संधी येतात , उत्तम माणसे भेटतात. आणि कष्ट आणि प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते.
प्रवासाचा आनंद निर्माण होईल अशी अटिट्यूड ठेवली की प्रवास उत्सव होऊन जातो.

वाचकाचे अनुभव याच्याशी मिळते-जुळते किंवा अगदीच उलटे असू शकतील..

विषय: 

राईज , रोअर , रिव्होल्ट ( आर आर आर ) चित्रपटासाठी धागा

Submitted by शांत प्राणी on 29 March, 2022 - 22:06

आर आर आर (RRR) या एस एस राजामौली यांच्या बहुचर्चित व बहुखर्चिक चित्रपटाबद्दल हितगुज करण्यासाठी हा धागा. RRR

विषय: 
शब्दखुणा: 

चित्रपटाचे नाव कसे वाटले?

Submitted by मानव पृथ्वीकर on 27 March, 2022 - 00:15

कुठल्याही चित्रपटाचे नाव पहिल्यांदा आपण ऐकतो तेव्हा एक काहीतरी कल्पना मनात येते, किंवा असलं कसलं नाव ठेवलं बरं असं वाटतं.

काही नावे अशी असतात की या नावाचा चित्रपट आम्ही पाहिलाय असं चार चौघात सांगायला कुणाला संकोच वाटू शकतो. (याचा सिनेमाच्या रेटिंगशी किंवा त्यातील दृश्यांशी काही संबंध नाही.)

चित्रपटांना अशी नावं ठेवण्यात आणि त्या नावांना नावं ठेवण्यात मराठी माणुस अग्रेसर आहे असे मला वाटते.

उदा. "अगं बाई अरेच्चा", "पक पक पकाक" वगैरे.
अशी काही नावं हिंदी चित्रपटांचीही असतात, इंग्रजी चित्रपटांचीही असतील, माहीत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 

हेच आपलं नेहमीचंच - ६

Submitted by पाचपाटील on 20 March, 2022 - 14:14

( विजुभाऊंच्या डायरीतली लिहायची राह्यलेली
समजा चावट वगैरे पानं )

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन