मनोरंजन

संस्थळीय बिंगो

Submitted by सामो on 14 October, 2019 - 17:24

हा खेळ माबोवरच नव्हे तर अन्य कोणत्याही मराठी संस्थळावर खेळता यावा. यातील काही गुन्हे लेखिकेने केलेले असू शकतात. अजुन काही मानवी स्वभावातील विसंगती आढळल्यास जरुर शेअर कराव्यात.
कृपया सर्वांनिच हलके घेणे.
.

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

Submitted by पाषाणभेद on 13 October, 2019 - 13:22

एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे
स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले

(जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला. कारण कुणी कलम ३७७ चा विचार करतील!)

जुळले ते जुळले
कुणा न कळले

ज्याच्यात्याच्या जोडीदाराचा हातात हात घालूनी
प्रत्येक जोडी हनिमूनास निघाली

एकत्र मजा करायचा विचार नेक
भटकायचे ठिकाण ठरवले एक

बूक केले छानसे सी फेसींग हॉटेल थ्री स्टार
रूम शेजारी शेजारी नंबर दोनशे तिन, दोनशे चार

दिवसभर फिरले डोंगरावर
खाल्ले पिल्ले पोटभर

सेल्फी काढल्या घालून गळ्यात गळे
व्हाट्सअ‍ॅप फेबूवर स्टेटस शेअर केले

शब्दखुणा: 

इंग्रजी मालिका : सुपरनॅचरल

Submitted by radhanisha on 13 October, 2019 - 09:52

साधारण वर्ष दिड वर्षापूर्वी सुपरनॅचरल ही मालिका गवसली . प्रत्यक्षात ह्या मालिकेची प्लॉट लाईन काय आहे हे 6 - 7 वर्षांपूर्वीच पाहिलं होतं ..

" 2 भाऊ आपल्या वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत पॅरानॉर्मल गोष्टी शोधून काढून नष्ट करण्याच्या आपल्या फॅमिली बिजनेस मध्ये उतरतात "

ब्रॉडचर्च - इंग्रजी मालिका

Submitted by radhanisha on 11 October, 2019 - 11:48

मी फारशा क्राईम- डिटेक्टिव्ह / पोलीस मालिका पाहिलेल्या नाहीत ... इंग्रजीतील ह्या प्रकारातली पहिलीच पाहिलेली ही मालिका , ती आवडली .. हिच्यापेक्षाही खूप चांगल्या- अधिक प्रसिद्ध इंग्रजी क्राईम मालिकां इथे अनेकांनी आधीच पाहिलेल्या असतील , त्यामुळे कदाचित यात फारसा रस वाटणारही नाही याची मला कल्पना आहे .. तरीही कुणालातरी पाहावीशी वाटेल आणि आवडेल म्हणून इथे शेअर करत आहे .

नोकरीतील मजेशीर व्यक्तीमत्वे

Submitted by सामो on 10 October, 2019 - 16:37

हां बोला, सिंहाचे शेपूट व्हायला आवडेल की गाढवाचे डोके? च्यायला पण हे दोनच पर्याय का दिले जातात हे मला न समजलेले कोडे आहे. एखाद्याला वाटलं गाईचं आचळ व्हावं किंवा अथवा हरिणांचे शिंग व्हावे तर? हां आता बरोब्बर बोललात. अशी साळींदराचे काटे, चतुराचे पंख , पालीचे शेपूट (याईक्स!!!), सशाचे कान वगैरे वगैरे व्यक्तिमत्व आजूबाजूस दिसतात बरं का. व्यवस्थापनाबद्दलचा विशेषतः संगणक क्षेत्रातील व्यवस्थापनाबद्दल काही अनुभव नाही मला, पण दांडगे निरीक्षण आहे. एकेक वल्ली व्यक्तीमत्व आजूबाजूला पाहीली आहेत. कंपनी आणि व्यवस्थापनाला त्रास होताना पाहीला आहे. त्यांचा कंपनीवर होणारा परीणाम पाहीला आहे.

विषय: 

हॅरी पॉटर - भाग चार

Submitted by radhanisha on 9 October, 2019 - 04:46

हॉगवार्ट्सच्या संस्थापकानंतर महत्वाची पात्रं पुढीलप्रमाणे -

१ - एल्बस डम्बलडोर

एल्बस डम्बलडोर हे हॉगवॉर्ट्सचे वर्तमान मुख्याध्यापक . त्यांच्या काळातील सर्वात शक्तिमान जादूगार म्हणून हे प्रसिद्ध आहेत . शालेय जीवनात , हॉगवॉर्ट्स मध्ये विद्यार्थी असताना सातही वर्षे त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेची चमक दाखवली , संशोधने करून जादुई जगताला उपयोगी ठरतील असे अनेक शोध लावले ...

दूरदर्शीपणा , माणसं ओळखण्याचं कसब , लोकांच्या मनात आधाराची विश्वासाची भावना निर्माण करेल असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे ..

उद्या माझ्या आनंदाचा दिवस आहे!!

Submitted by सोमा वाटाणे on 7 October, 2019 - 12:01

उद्या दसरा सण आहे. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा. राव मी लैच वाट पाहिली दसऱ्याची. कारण.. कारण काय तर राव गटारी आमुश्याला खारं कालवण खाल्लं होतं. ते आता दसऱ्याला खायला मिळेल. म्हणून मला आनंद झाला आहे.
श्रावणात खायचं नाही, गणपती, गौरीच्या काळात खायचं नाही, नवरात्रात खायचं नाही. किती बंधनं टाकून ठेवली आमच्या आज्या पणज्यांनी. तसं तरुणपणात बाहेर खाल्लेलं वशाट,पण अपराधीपणाची भावना आतापतोर छळते आहे. जाऊ दे. जे झालं ते झालं. उद्या दसरा आहे. माझ्या आनंदाचा दिवस आहे.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन