मजेशीर (धन्य त्या) गायनी कळा.

Submitted by शांत प्राणी on 10 April, 2022 - 11:34

बरेचदा आपला सामना अशा काही मजेशीर म्युझिक व्हिडीओजशी होतो कि काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही. गायकाच्या विविध तर्‍हांमुळे असे व्हिडीओज व्हायरल होतात. कधी कधी गायन भयानक या प्रकारात मोडत असते. आणखीही काही काही धमाल गोष्टी असतात. असे काही व्हिडीओज इथे शेअर करूयात.
गाजराची पुंगी नावाचे एक धमाल नाट्य औरंगाबादच्या दोघा प्राध्यापकांनी आणले होते. त्यात अशा गायकांच्या, गायनाच्या विविध तर्‍हा होत्या.
उदा.
नूरानी भगिनी नावाने प्रसिद्ध असलेल्ञा दोन सूफी गायिकांची शैली पाहिली तर हसू आल्याशिवाय राहवत नाही.
https://www.youtube.com/watch?v=wSJ94_bqmBU

ए दोस्ती हम नही छोडेंगेचं हे एक नवीनच व्हर्जन. याला रीमीक्स म्हणावे का ?
https://www.youtube.com/watch?v=hst5Qb16exs

(तटी : असा धागा सापडला नाही. अ आणि अ सीन्स असा धागा आहे पण तिथे हे व्हिडीओज देणे योग्य वाटले नाही म्हणून नवीन धागा)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कमजोर हृदयाच्या श्रोत्यांनी (प्रेक्षकांनी) आपल्या जबाबदारीवरच हा गायन प्रकार पहावा.
https://www.youtube.com/watch?v=tEXWFAxGKeI

नाहीतर मग भजनाचा आनंद घ्यावा
https://www.youtube.com/watch?v=d0zziyqmSX8

ये दोस्ती समोर मी नतमस्तक झालो. गाण्याचं जाऊ दे, नाही जमत एकेकाला. पण गाणारा कुठल्याही सुरात आणि तालात गात असला तरी मागचे वादक बरोबर पाहिजे त्या गोष्टी गपगुमान वाजवत आहेत, मध्ये मध्ये तर कडव्यांच्या मधलं म्युझिक पण येतं आहे. आपली म्युझिक वाजवायची वेळ आली की ते प्रामाणिकपणे ते वाजवत आहेत. गाणारा काहीही गावो!

बाकी त्या अन्वर दरबारींच्या व्हिडिओत मागे काही वेळा तमराज किल्विष बसलाय की काय असा मला भास झाला.

वरील क्लिपचा मूळ व्हीडीओ अखेर सापडला. हे संपूर्ण पाहण्या/ऐकण्यासारखे आहे:
https://www.youtube.com/watch?v=YtANY74ZI6A

आणि त्यात वरच्या क्लिपमधला भाग इथे आहे:
https://youtu.be/YtANY74ZI6A?t=1176

Lol
मायबोलीवर दाद यांची एक महान विनोदी कथा आहे गायनस्पर्धेबद्दलची. त्यात एक स्पर्धक असे प्रचंड हातवारे करून गात असतो त्याची आठवण झाली!
https://www.maayboli.com/hitguj/messages/75/125244.html?1177673002