मला नेमके काय करायचे होते !

Submitted by पशुपत on 6 April, 2022 - 05:57

आयुष्यात बर्‍याच गोष्टीं आपण, गतानुगतिको...नियमानुसार करत जातो.
काही जण पुढे जाऊन, "उगाच या मार्गावर आलो" या पश्चात्तापात अडकतात. किंवा परत नीट विचार करून नवी दिशा स्वीकारतात..आणि बहुतांशी यशस्वी देखील होतात.
पण एकदा स्वीकारलेल्या मार्गाने चालताना चित्त मोकळे ठेवून डोळसपणे मार्गक्रमणा करत राहिल्यास खूप चांगल्या संधी येतात , उत्तम माणसे भेटतात. आणि कष्ट आणि प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते.
प्रवासाचा आनंद निर्माण होईल अशी अटिट्यूड ठेवली की प्रवास उत्सव होऊन जातो.

वाचकाचे अनुभव याच्याशी मिळते-जुळते किंवा अगदीच उलटे असू शकतील..

ते रोचक अनुभव जाणून घ्यायला , वाचायला निश्चित आवडतील.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Happy मी कालच एका वाहत्या धाग्यावर लिहीले होते. "कोणास ठाऊक कसा पण सर्कशीत गेला ससा" असे क्षण आयुष्यात बरेच आले. (म्हणजे निवांत गाजर खायचे होते पण अचानक सर्कशीच्या रिंगणात ढकलले गेलो). लिहीते सवडीने....

The Road Not Taken
By Robert Frost

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
And be one traveler, long I stood
And looked down one as far as I could
To where it bent in the undergrowth;

Then took the other, as just as fair,
And having perhaps the better claim,
Because it was grassy and wanted wear;
Though as for that the passing there
Had worn them really about the same,

And both that morning equally lay
In leaves no step had trodden black.
Oh, I kept the first for another day!
Yet knowing how way leads on to way,
I doubted if I should ever come back.

I shall be telling this with a sigh
Somewhere ages and ages hence:
Two roads diverged in a wood, and I—
I took the one less traveled by,
And that has made all the difference.

<< काही जण पुढे जाऊन, "उगाच या मार्गावर आलो" या पश्चात्तापात अडकतात. किंवा परत नीट विचार करून नवी दिशा स्वीकारतात.. >>
आयुष्य असे ठरवून, मोजून मापून जगता येत नाही, असे माझे मत आहे. त्यामुळे पश्चात्ताप, दुःख हे माझ्या मते तरी मिथ्या आहे. मी तेव्हा असं केलं असतं तर अमुक तमुक तसं झालं असतं, याला काही अर्थ नाही. काळ आणि आयुष्य कुणासाठीही थांबत नाही. आपण केवळ आपल्या स्वतःच्या समाधानासाठी आयुष्यात अर्थ शोधत असतो, अन्यथा आयुष्याला खरंतर काहीही अर्थ नाही. व्यक्तिशः माझे स्वतःचे आयुष्य अपेक्षेपेक्षा भलतेच सुखाचे गेले, या चांगल्या नशिबाबद्दल कृतज्ञ आहे इतपतच म्हणू शकतो.

<< प्रवासाचा आनंद निर्माण होईल अशी अटिट्यूड ठेवली की प्रवास उत्सव होऊन जातो. >> माझ्या मते हा शुद्ध भंपकपणा आहे. पोट भरलेले असले की आयुष्याचा प्रवास हा उत्सव होऊन जातो. रिकाम्या पोटी, कितीही सकारात्मक अटिट्यूड असला तरी आयुष्याच्या प्रवासात आनंद मिळत नाही.

Maslow च्या पिरॅमिड प्रमाणे माझी स्वतः:ची "रिव्हर्स पिरॅमिड" थिअरी आहे, ज्यात तो पिरॅमिड उलटा असतो आणि खालचा भाग वरील भागाला तोलून धरतो. यात सर्वात खाली माझा जीव/आरोग्य आहे, त्याच्यावर पैसा आहे, त्याच्यावर कुटुंबीय आणि मित्रपरिवार आहे आणि त्याच्यावर इतर सर्व काही (गरजा/मौजमजा वगैरे). जर माझा जीवच नसेल किंवा आरोग्य खराब असेल तर आयुष्यात बाकी सर्व व्यर्थ आहे. आरोग्य चांगले असेल तर पैसे कमावता येतात, पैसा असला की नातेवाईक/मित्र जवळ येतात आणि आरोग्य/पैसा/कुटुंब आणि मित्र जवळ असले की इतर सर्व गोष्टी करता येतात ज्यामुळे तुम्हाला सुख मिळू शकते. Maslow ची थिअरी motivational theory आहे ज्यात तुम्ही पिरॅमिडच्या जास्ती वर जायचा प्रयत्न करता. माझ्या थिअरीत तुम्ही, पिरॅमिड न कोसळता मोठा कसा करता येईल, ते बघता. हा फरक आहे

उबो, तुम्ही जी रिव्हर्स थिअरी म्हणताय ती म्हणजेच मास्लोव्हची थिअरी आहे अशी माझी समजूत आहे!
यात सर्वात खाली माझा जीव/आरोग्य आहे, >> physiological needs
त्याच्यावर पैसा आहे, >> safety
त्याच्यावर कुटुंबीय आणि मित्रपरिवार आहे >> belonging and love needs
आणि त्याच्यावर इतर सर्व काही (गरजा/मौजमजा वगैरे). >> esteem, cognitive, aesthetic needs etc.
Maslow ची थिअरी motivational theory आहे ज्यात तुम्ही पिरॅमिडच्या जास्ती वर जायचा प्रयत्न करता. माझ्या थिअरीत तुम्ही, पिरॅमिड न कोसळता मोठा कसा करता येईल, ते बघता. हा फरक आहे >> हे कळलं नाही.

मी रिव्हर्स पिरॅमिड ऐवजी इन्व्हर्टएड पिरॅमिड म्हणायला हवे होते. Maslow ची थियरी motivation संबंधात आहे, माझी survival संबंधात. एखादा निर्णय घेताना या ४ कप्प्यात कुठे फरक पडेल ते बघतो मी. ही फक्त माझ्या स्वतःच्या उपयोगासाठी आहे आणि ती १००% बरोबर आहे, असा माझा दावा नाही. जाऊ द्या. जास्त विचार नको.

अजूनही कळले नाही. जाऊ दे!
धाग्याच्या विषयाला धरून बरेच काही लिहीता येईल. पण तितके लिहायला वेळ नाही आत्ता. आजवरच्या अनुभवातून जाणवलेली मुख्य शिकवण अशी आहे की त्या परिस्थितीत जे सर्वोत्तम शक्य आहे त्याचा आग्रह धरणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे हे नेहमीच उपयोगी पडले आहे. Never give up हे वाक्य डोळसपणे आणि विचारपूर्वक आंगिकारायला हवे. उगीच अयशस्वी मार्गांवरून पुनःपुन्हा धावणे म्हणजे give up न करणे नाही.
आणि जेव्हा आणीबाणीची परिस्थिती असते तेव्हा
"सर्वनाशे समुत्पन्ने अर्धं त्यजति सः पंडितः" या सुभाषिताच्या ओळीचा फायदा झाला आहे.
सर्वात शेवटी आपल्या नियंत्रणाबाहेरचे अनेक घटक आपल्या आयुष्यावर परिणाम करत असतात - जेव्हा चांगले घडते तेव्हा कृतज्ञ रहाणे आणि जेव्हा वाईट घडते तेव्हा ते स्विकारणे आवश्यक आहे. Denial mode मध्ये राहीलो तर परिस्थिती बदलता येत नाही.

वेळ असेल तेव्हा नक्की लिहेन.

मॅस्लोच्या चढत्या भाजणीतली शेवटची पायरी भौतिक - लौकिक सुखसमाधान यापेक्षा स्वत्व गवसणं आणि साध्य करता येणं आहे , असं मला वाटतं.

आयुष्यात बर्‍याच गोष्टीं आपण, गतानुगतिको..........उत्तम माणसे भेटतात. आणि कष्ट आणि प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते.>>>
आपल्या सर्वांचे भविष्य ज्यावेळी(म्हणजे १३ कोटी वर्षांपूर्वी) 'बिग बँग' झाली त्याच दिवशी निश्चित झाले.त्यामुळे वरील चिंंतन फोल आहे.
जेव्हा चांगले घडते तेव्हा कृतज्ञ रहाणे आणि जेव्हा वाईट घडते तेव्हा ते स्विकारणे आवश्यक आहे.>>>
कोणाशी कृतज्ञ राहायचे? स्वीकारा नाहीतर नका स्वीकारू.
क़्वांटम फिजिक्स इज लीस्ट बॉदर्ड्!

Inverted pyramid लक्षात आलं पण पिरॅमिडची स्थिरता ही त्याचा बेस किती मजबूत आहे यावर असते ना म्हणून बेसला आरोग्य किंवा इतर मूलभूत गरजा आणि मग बाकीच्या गरजा असा आकार आहे ना. त्यामुळे inverted pyramid stable नसेल असा विचार मनात आला. Isn't survival the basic motivation for everything? I think we both are thinking in different directions. पण मला तुमचा मुद्दा थोडा लक्षात आला आहे आणि मी त्याच्याशी सहमत आहे.

केशवकुल, कोणाशी कृतज्ञ हे महत्वाचे नाही. कशासाठी (अनुकूल परिस्थितीसाठी कारक सर्व घटकांसाठी) कृतज्ञ एवढे पुरे.
क़्वांटम फिजिक्स इज लीस्ट बॉदर्ड्! >> Agreed, but as I said being grateful "to" does not matter. Being grateful for all good things in life makes you a better person. It's a good coping mechanism to survive.

सगळ्या प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
उ.बो. तुमचे मुद्दे चागले आहेत पण माझा विषय वेगळाच आहे. "बरोबरचे सगळे सायन्सला गेले म्हणून मी गेलो ...आणि फसलो " असे वाटणार्‍या मानसिकते बद्दल बोलत आहे.
केशव , मी आहे ती परिस्थिती कशी वळवायची , उपयोगी करून घ्यायची ..ते म्हणतोय.
जिज्ञासा , जरूर लिहा.

मला डॉक्टर व्हायचे होते. बारावीत गव्हर्मेंट कॉलेजची अ‍ॅडमिशन चुकली. प्रायव्हेटला घरचे सगळे जा म्हणत होते पण गेले नाही कारण फी खुप जास्त वाटली. (तत्व होत कि फ्री सिट्नेच जाईन. )घरचे सगळे फीज भरायला तयार असूनही इंजिनीअरिंगला (इलेक्ट्रॉनिक्स) अ‍ॅडमिशन घेतली. प्रचंड मोठी चुक. कारण अज्जिब्बात मन रमत नव्हते. आवडत नव्हते. थर्ड ईअरला थोडी फार आवड निर्माण झाली जेव्हा कंप्युटर सायन्सचे सबजेक्ट इन्क्लुड झाले. (त्या अगोदर इलेक्ट्रिकल मशिन, मायक्रो इले. , व्हिडिओ इंजी, इले. डीझाईन सिस्टीम वगैरे विषय होते. Sad ) आणि नंतर डेव्हलपमेंट मध्ये घुसल्यावर आपली डिग्री इले. मध्ये होती हे लक्षात पण राहिले नाही. आता परत ८-९ वर्ष हेल्थकेअरमध्येच काम करते. पण अ‍ॅक्चुअल मेडीकल डॉक्टरच काम न करता टेक्निकल काम. डोमेन हेल्थ्केअरच.
पस्चाताप वगैरे होत नाही. अपेक्षेपेक्षा खुप मिळाले आयुष्यात. त्यामुळ कसलेच रीग्रीट्स नाहीत. कधीकधी कॉलेज २ वर्षे पहिली एंजॉय केल नाही ते जर आवडीच्या विषयात मेडीकलला गेले असते तर झाल असत अस वाटत. पण जॉब मध्ये तेव्हा आणि आताही अगदी मस्त मजेचे दिवस मिळाले.
डॉक्टर झाले असते तरी खुषीतच असते. इले इंजीनीअरिंगला गेलेले म्हणुन ते आवडल नाही कि नाईलाजानी गेले म्हणुन. माहित नाही. कारण कंप्युटर सायन्सचे सबजेक्ट सुरु झाले आणि चांगल जमायला लागल. माझा अंदाज आहे मला ते वायरिंग /डिझाईनिंग वगैरे आवडत नव्हत. किंवा मग दुसर्‍या वर्षापर्यंत ,मेडिकलला फीज भरून जावुया का अशी द्विधा मनस्थिती होती म्हणुन . माहित नाही.
एक समजलय, तेव्हा त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातात. नंतर उगाच जर तर करण्यात काहीही अर्थ नसतो. जे काही करतोय ते मात्र बेस्ट कराव. बॉस बघतोय म्हणुन करु नये. हे पटलय. काहीतरी कंस्ट्रक्टिव्ह केल्याच समाधान असेल तर आयुष्य मजेत जात.

छान धागा. यावर बरेच लिहिता येईल. मी बरेचदा विचार करतो याचा. आयुष्याच्या विविध टप्यावर मी अमुकतमुक निवडले असते तर माझे आयुष्य आता कसे असते.

यात पहिले तर सारी प्रेमप्रकरणे आठवतात. त्या मुलींना आज बघतो आणि विचार करतो की हिच्याशी माझे लग्न झाले असते तर आज माझी लाईफ कशी असती. मला रोज जेवणात काय खायला मिळाले असते. आमची पोरं दिसायला आणि स्वभावाने कशी असती. माझे सासूसासरे कसे असते. हो, हा विचारही येतो मनात कारण मी सासुरवाडीच्या जवळ राहतो.

मग शैक्षणिक प्रवास आठवतो. स्पेशली दहावी बारावीला जी काशी केली, ती केली नसती तर लाईफ कशी असती. पहिल्याच वर्षाला सिविल ईंजिनीअरींग बदलायची संधी होती ती सोडली नसती तर आज कुठल्या क्षेत्रात काय करत असतो.

मग करीअरमध्ये सुरुवातीलाच रिलायन्सच्या ज्यादा पगाराच्या नादात लाँग टर्म विचार न करता एल एण्ड टी ची चांगले शिकायला मिळणाऱ्या जॉबची ऑफर धुडकावली नसती, त्यानंतर एमपीएससी क्लीअर करून मिळवलेल्या सरकारी नोकरीला टांग दिली नसती, वा त्याचवेळी मित्रासोबत दुबईला सेटल व्हायचा पर्याय सोडला नसता, असे एकूणच करीअरमध्ये आलेले एकेक मार्ग न टाळता त्यातला एखादा स्विकारला असता तर आज करीअरमध्ये ग्रोथ किती असती. माझा जॉब प्रोफाईल, माझे पॅकेज, आणि या सर्वांमुळे माझी लाईफस्टाईल कशी असती..

पण मग सारे विचार एका विचारांवर येऊन थांबतात की जर रिलायन्सचा जॉब माझ्या आयुष्यात आला नसता तर माझी तेव्हाची गर्लफ्रेंड आणि आताची बायको आयुष्यात आली नसती. आणि सध्या माझ्या सुखाचे, आनंदाचे सर्वात मोठे कारण माझी जी दोन पोरे आहेत ती नसती, वा वेगळी असती. त्यामुळे भूतकाळात जाऊन कसलेही चक्र फिरवायची ईच्छा होत नाही Happy

पण त्याचवेळी हे सुद्धा जाणवते की मी प्रत्येक वेळी सेफ गेमच खेळलो आहे. आयुष्याने बरीच उत्थलपुत्थल केलीय आयुष्यात ती पुन्हा कधीतरी. जेव्हा नियतीसमोर आपले काही चालत नाही तेव्हा सोडून द्यावे. पण जिथे निर्णय घेणे माझ्या हातात होते तिथे निवांत गाजर खाणारा ससा बनून राहायचे माझे सारे प्रयत्न आजवर तरी यशस्वी झाले आहेत Happy

बाकी ईतरांशी तुलना न करता आहे त्याच्यात आनंद शोधायचा स्वभाव असेल तर सरळसोट लाईफही आपण आपल्यासाठी हॅपनिंग बनवू शकतो या तत्वावर विश्वास असल्याने तसे जगायला बघतो. त्यामुळे अमुकतमुक करायचे होते अन काय केले असा पश्चाताप न करता केवळ रंजनासाठीच अश्या गोष्टी आठवतो आणि पुढे जातो.

लग्न ठरल्यानंतर 1 वर्ष नवऱ्याच्या नोकरीमुळे दोघांना सोबत राहता येणार नव्हतं,म्हणून मग tp म्हणून 1 वर्ष B,Ed केलं,Bsc नंतर पॉकेट मनी साठी थोड्या फार ट्युशन घेतल्या होत्या म्हणून शिकवण्याचा अनुभव होता पण आवड बिलकुल नव्हती
B ed ला उत्तम मार्क मिळाले आणि सासरच्यांची नोकरी लावायची धडपड सुरू झाली,एक सोडून दोन दोन संधी आल्या होत्या,पण नेमकं काय करायचं हे माहीत नसलं तरीही शिक्षिका व्हायचं नाही हे माझं पक्क होतं, पण अनुदानित शाळेतली संधी नाकारल्यामुळे नवरा सोडून बाकी सगळे माझ्यावर खूप खूप नाराज होते
पण त्यानंतर 6 च महिन्यात सरळसेवा भरती मध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन शासकीय सेवेत नोकरी लागली, कोणताही वशिला न लावता Happy

आज मी खूप खूप खुश आहे त्यात ,पण मागे वळून विचार करताना मला शिक्षक पेशा नावडीचा नव्हता तर वशील्याने नोकरी नको होती आणि आयुष्य भर आम्ही लावली म्हणून नोकरी लागली हे ऐकायला नको होतं म्हणून कदाचित मी त्या संधी नाकारल्या असाव्या असं वाटतंय

माझी कहाणी पण अगदीच सीमासारखी. फक्त इलेक्ट्रॉनिक ऐवजी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले. COEP मधे Masters केले. तेव्हापासून वाहन उद्योग (Automotive domain) मधे काम करतेय. डाॅक्टर झाले असते तर खूप आनंद झाला असता पण आता आहे ते पण खूप छान आहे असे मनापासून वाटते.

उपाशी बोका, तुमचा प्रतिसाद आवडला.

आपला जीव्/आरोग्य सगळ्यात महत्वाचे आहे. पण जीव/आरोग्य ‘गरज’ ह्या सदराखाली घालावे का ह्याबाबत मला ठरवता येत नाही. अन्न वस्त्र निवारा ह्या प्राथमिक गरजा जरी असल्या तरी त्या भागत नाहिय अशा स्थितित माणसे काही दिवस काढू शकतात पण जीव नसला तर सगळेच सम्पले.

सीमा , ॠ, धन्वंतरी , साधना खूप छान अनुभव आहेत तुमचे.
मी इंजिनिअरिंग किंवा मेडिकल, काय करायचं ते ठरवू शकत नव्हतो . मेडिकल हे नोबल आणि रिस्पेक्टेड प्रोफेशन पण बिलकुल नावड...
पण १ का २ मार्कानी अ‍ॅडमिशन चुकली आणि प्रश्न आपोआपच सुटला. COEP मधे पाऊल पडले.
मात्र
इंजिनिअरिंगच्या पहिल्या महिन्यातच भयानक चूक केल्याचा साक्षात्कार झाला. विषय खूपच अवघड ! वेळ कमी..जुने मित्र दुरावलेले..एकटेपणा.
, काळजी यानी ग्रासून गेलो होतो !
पण इथेच काहीतरी वेगळेच घडायचे प्रारब्धात होते. संगीत, चित्रकला , नाट्य , क्रीडा या सर्व क्षेत्रातल्या विविध प्रभॄति जीवनात आल्या आणि सगळंच बदलून गेलं. उत्कृष्ठ आणि यशस्वी संगितिका करण्याचा मोठाच पायंडा पाडला !
पुरुषोत्तम फिरोदिया , गदगकर , कालिदास करंडक स्पर्धेत अगणित पारितोषिके , रिगाटा, सबमिशन , अभ्यास, परीक्षा असा मित्रपरिवाराचा सतत एकत्रित जल्लोष चार वर्षे चालूच राहीला.
आजही हा मित्रपरिवार तितकाच जीवाभावाचे आहे !

मार्ग चुकला कि काय असे वाटत असतानाच जीवनातली सर्वात मौल्यवान गिफ्ट ही अशी मिळाली.

डाॅक्टर झाले असते तर खूप आनंद झाला असता पण आता आहे ते पण खूप छान आहे असे मनापासून वाटते.

Proud

आपण डिग्री एक्स्चेंज करूया का ?

<<आपण डिग्री एक्स्चेंज करूया का ?>>
छान आहे कल्पना.. डिग्री एक्स्चेंज करू शकू पण तुमचे इतक्या वर्षांचे मेडिकलचे ज्ञान कसे एक्स्चेंज होईल?

::डाॅक्टर झाले असते तर खूप आनंद झाला असता ::
कदाचित तिकडेही काही भारी व्यक्तिमत्त्व भेटली असती !

मला हायस्कूल वर शिक्षक व्हायचे होते, वडील शिक्षकच होते.

पण वडील नको म्हणाले, आता राम राहिला नाही या पेशात असे म्हणाले.

मी mechanical engineering केलं आणि सध्या ऋन्म्याप्रमाणेच Proud एम एन सी कंपनीत जॉबला आहे.
एकंदरीत सर्व छान चाललय तरी कधीतरी मनात येतच, शिक्षक झालो असतो तर अजून छान झालं असत.

हं... विरंगुळ्याच्या वेळेत तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना (ज्याना इच्छा आहे ..या अर्थाने गरजू) मार्गदर्शन करून तो आनंदही घेऊ शकता !