मनोरंजन

मी अजिबात घाबरत नाही....! - २

Submitted by मी मधुरा on 23 September, 2019 - 22:55

भाग २

तिने स्पर्श केला तसा मी शहारलो..... तिचा स्पर्श मध्यरात्रीच्या हवेतल्या गारव्यासारखा आहे. कधी आल्हाददायक, कधी नसानसांत शिरून जागीच गोठवणारा ! मी तिला भेटलो नसतो तर कदाचित हे मी मान्य केलेच नसते की हृदय नावाचा अवयव ऑपरेशन न करता असा दुसऱ्याला देता येतो आणि तरीही जिवंत राहता येते. हाहाहा! विनोद होता ओ.... नाही कळला तर सोडून द्या. तसेही माझे विनोद केवळ मलाच कळतात. पण अताशा ती सुद्धा हसते माझ्या विनोदांवर. तिला ते कळतात का नाही यावर आपण नंतर विचारमंथन करू.

शब्दखुणा: 

अवघे चाळीस वयमान

Submitted by सामो on 23 September, 2019 - 16:43

तसे तर वेध अगदी पस्तीशीपासूनच लागलेले होते. या वयाबद्दल अनेक पुस्तकातून वाचून होते इतकेच काय ज्योतिष्यांनाही या वयाने दखल घेण्यास भाग पाडलेले होते तेव्हा चाळीशी काहीतरी "Fun age" आहे आणि आपल्या चाळीशीत काहीतरी सनसनाटी घडणार आहे अशा हृदय धडधडवणर्‍या काहीशा अपेक्षा निर्माण झालेल्या होत्या. आमचं धोक्याचं सोळावं वरीस केव्हा आलं आणि केव्हा चालतं झालं ते कळलेच नव्हते तेव्हा निदान चाळीशीने काहीतरी रंग दाखवावे अशी अपेक्षा होती. पुस्तकांतून खूप ऐकले होते की व्यक्ती बंडखोर होते, सरळ, सामोपचाराने चाललेल्या आयुष्यात उलथापालथ घडविण्याच्या मागे लागते.

दुर्मिळ व्हिडिओ अाणि अॉडीअो आणि कलाकारांची माहिती

Submitted by केअशु on 23 September, 2019 - 11:11

खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने आपणाकडे आलोय.नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.

1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?

3)खुप पूर्वी ईटीव्ही मराठीवर सुनिल बर्वे,रविंद्र मंकणी,रसिका जोशी,सुलभा देशपांडे यांची "भुमिका" नावाची मालिका लागायची.याचं शीर्षक संगीत नरेंद्र भिडे यांनी केलं होतं ते Mp3 स्वरुपात आंजावर कुठे मिळेल?

कस्टर्ड ड्रॅगन / बालकविता

Submitted by सामो on 23 September, 2019 - 10:28

रुपांतर - https://www.poemhunter.com/poem/the-tale-of-custard-the-dragon/comments/
.

.
इवल्याशा खेड्यातील इवल्याशा घरात
लहान बेला रहात असे सुखात आनंदात
तिच्याकडे होता एक उंदीर, मांजर, कुत्रा
लहानशी लाल गाड़ी अन ड्रॅगन एक भित्रा
.
मांजराचे नाव तिने ठेवले होते इंक
करड्याशा उंदराला हाक मारे ब्लिंक
पिवळा कुत्रा वागायला होता मोठा परखड़

विषय: 

ट्रोलिंग आणि उपाय!

Submitted by मी मधुरा on 22 September, 2019 - 14:02

हा धागा विरंगुळा प्रकारात आहे. मनावर घ्यायचा की नाही, हे तुम्ही ठरवायचं. Happy

तर लोकहो, या ठिकाणी, आजवर ट्रोलिंग चे एक सो एक प्रकार सादर झालेले आहेत. (माहिती नसतील, नविन असालं, तर एकदा फेर फटका मारून या सर्व धाग्यांवर आरामात आणि हो, हातात पॉपकॉर्न घेऊन बसा कारण काही अत्यंत मनोरंजक वाचावयास मिळणार आहे तुम्हाला.)

विषय: 

आरसा

Submitted by सामो on 21 September, 2019 - 20:26

"तुला माझ्या प्रेमाची पर्वाच नाही!" - लटक्या रागाने , आपले गोबरे गाल फुगवत या महीन्यात पाचव्यांदा तरी नंदिनी हे उद्गारली.
यावेळेस मात्र मी जय्यत तयारीतच होतो.
मी उठलो. मेजावरचा तिचा सुबक आरसा घेऊन तिच्याजवळ गेलो आणि आरसा तिला देत मिष्किलपणे म्हणालो - "बाईसाहेब, हा प्रश्न तुम्ही योग्य व्यक्तीला का बरे नाही विचारत?
तुझ्या सर्व तक्रारी उपकचेरींना धाडण्याऐवजी, मुख्य कचेरीलाच धाड ना.
तुझे सर्व भावनाप्रधान, संवेदनशील मुद्दे हाताळण्यास मला तरी बघ बुवा हीच व्यक्ती योग्य आणि जबाबदार वाटते. तुझे काय मत आहे" ; )

विषय: 

कल्याणी खरच तू अस्तित्वात आहेस ना ?.......

Submitted by Sujaata Siddha on 21 September, 2019 - 05:58

“खुळा आहेस का तू अभ्या ? “ माझा कलीग विभव मला वेड्यात काढत होता , आम्ही दोघेही एका नामवंत रिअल इस्टेट कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करायचो ,कुठं आहे माहितीये का आमची साईट? एका जंगलात,..जंगल म्हणजे प्रॉपर जंगल बरं का ? भोर च्या पुढे साधारण ४० एक कि.मी. वर , जवळ जवळ २०० एकरांचं जंगल आहे , पण develop केलेलं, शहराच्या जंजाळात राहून पकलेल्या ज्या लोकांना सुरक्षित राहून काहीतरी थ्रिल्लिंग करावं असं वाटतं त्यांच्यासाठी इथे फार्म हाऊस आणि मचाण बांधलेले .

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन