मनोरंजन

गिरणु !

Submitted by मी-माझा on 13 June, 2019 - 02:56

गेला पाऊण महिना गिरणु आणि त्याच्या मित्रमंडळींमध्ये सुतकाचे वातावरण होते. निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात गिरणु व त्याच्या मित्रमंडळींच्या पक्षाचे पार वाटोळे झाले. पक्षाचा प्रचार प्रभावीपणे केला नाही असा आरोप होऊन आता लवकरच खायचे वांदे होणार या भीतीने सगळ्यांची बोबडी वळली होती.

गोणीया बांधी यांच्या मांडीवर बसलेला लहानगा फाऊल व ग्रीझलीवाल यांच्या भिंतीवरील (वेगवेगळ्या) तसबिरींना गिरणुने मनोभावे नमस्कार केला. फाउलने हळूच डोळा मारल्याचा त्याला उगाचच भास झाला.

"मुण्णा, ए मुण्णा", गिरणीचा वैतागलेला आवाज आला. गिरणी म्हणजे गिरणुची बायको, "ए गिरण्या SSS " गिरणी पुन्हा ओरडली.

विषय: 
शब्दखुणा: 

जागरण....

Submitted by अत्रुप्त आत्मा on 11 June, 2019 - 03:23

काल झोपता झोपता, वेळ बाराची आली.
आमच्या बालकानी काल, जरा लै(च) रात केली.

अडीच वाजता पुन्हा,बालकाला आली जाग
त्याला वाटलं,अंथ-ऋण नव्हे..ही तर बाग!

बागडू लागलं,खेळू लागलं,
माझ्या हिच्या अंगावरून,मुक्तपणे लोळू लागलं!

बरच खेळल्यावर मग, त्यालाही पेंग आली.
पण तोपर्यंत आमची ,पहाट लाले लाल झाली.

मेली झोप, मोडून अंगं!
मीच दिली मग, कोंबड्यासारखी बांगं!

अश्या अवस्थेत, उठून आवरायला,
झुलतच मी गेलो, टॉवेल धरायला!

धरला टॉवेल ओ-रडली ही,
मला म्हणते, "गाऊन सोडा...शीSssssss!"

शब्दखुणा: 

पुरुषांवर अविश्वास का?

Submitted by शक्तीराम on 9 June, 2019 - 02:59

आपला प्रत्येक धर्मग्रंथ व प्रत्येक महापुरुष,साधु हे पुरुषांसाठी परस्त्री माते समान अतिशय आवर्जून सल्ला वजा आज्ञा देतो. परदारा, परस्री यांची अभिलाषा ठेऊ नका. आपल्या पत्नीशीच एकनिष्ठ रहा.
हे सर्व डोस पुरुषांनाच दिले जातात. मला कुठेही परपुरुष बापासमान मानावा हे वाक्य स्त्रियांना उद्देशून लिहीलेले आढळलं नाही की संतसाहित्यात असा सल्ला दिलेला दिसला नाही. याचा अर्थ पुरुष हा वासुगिरी करणाराच असतो असा होतो. येशूने दहा आज्ञा दिल्यात त्यातही व्यभिचार करू नको ही एक आज्ञा आहे, पण ती दोघांना उद्देशून आहे.
तुम्हाला काय वाटतं हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
शब्दखुणा: 

गरीब (यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा)

Submitted by किरणुद्दीन on 8 June, 2019 - 23:25

गरीब
====

(यशराज फिल्म्सचा आगामी सिनेमा)

शाहरूखखान उपाख्य राज मल्होत्रा हा अत्यंत गरीब असतो. त्याच्यावर एक लाख कोटींचं कर्ज असतं. त्याच्याइतका गरीब कुणीच नसतो. तो ज्याला कुणाला भेटेल त्याला विचारत असे की तुझ्यावर किती कर्ज आहे ?
कुणी म्हणे दहा हजार, कुणी पन्नास हजार तर कुणी लाख तर कुणी पन्नास लाख. या पलिकडे डोईवर कर्ज असलेला मनुष्य त्याला भेटतच नसतो. त्याने छंद म्हणून अनेक सिनेमे बनवलेले असतात. ते ही पडल्याने त्याच्या डोईवर कर्जाची भर पडत जाते.

सादर चित्रपट आक्षेपार्ह नाही ? भाग २

Submitted by हस्तर on 3 June, 2019 - 10:45

RACE ३
बॉबी देओल अनिल कपूर चा सख्खा मुलगा
Daisy शाह च्या आईशी अनिलकापूर लग्न करतो व तिला कायदेशीर रित्या मुलगी बनवतो

बॉबी देओल आणि डेसी सावत्र भाऊ बहीण

तरी पण त्यांच्यात प्रेम प्रकरण

हे बरोबर आहे ?

सादर चित्रपट आक्षेपार्ह नाही ?

Submitted by हस्तर on 3 June, 2019 - 08:06

नुकताच दे दे प्यार दे नावाचा चित्रपट बघितला
खफ वर चर्चा झाली

ह्यात अजय देवगण व तब्बू ह्यांचे लग्न झाले पण डिवोर्स नाही
वेगळे राहतात
अजय देवगण भेटायला जातो ,मुलीच्या सासुरवाडीला मामा आहे असे सांगावे लागते

शेवटी त्याला तबुकडून राखी बांधावी लागते ,हे बरोबर नाही वाटले

परत त्याची आणि तब्बू ची शैय्या सोबत पण होते राखी हातावर असून

बाकी चित्रपट cool व चांगला पण हे scene ची गरज नव्हती

टीव्ही आणि आम्ही

Submitted by झगड्या on 1 June, 2019 - 03:07

टिव्ही आणि आम्ही यांचा फारसा संबंधच कधी आला नाही.
जेव्हा जेव्हा आला तेव्हा आम्हांला काही चॉइसच नव्हता !

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन