मनोरंजन

लव्ह इन ट्रबल भाग- १४

Submitted by स्वरांगी on 28 June, 2019 - 05:40

लव्ह इन ट्रबल भाग-१४
“ आपल्याकडे कोणताच ठोस पुरावा नाहीये ज्यामुळे सिद्ध होईल की तो निर्दोष आहे…त्याने आपल्याला जे जे सांगितलं तिथे तिथे तो गेला होता याचा काहीच पुरावा नाहीये… तुझा त्याच्यावर विश्वास बसला???” थोड्या वेळाने जेव्हा अनु आणि अभिजित पोलीस स्टेशनमधून बाहेर पडले,तेव्हा अभिजितने विचारलं…
“ मीही तेव्हा सेम कंडिशनमध्ये होते…माझ्याही निर्दोष असण्याचा कोणताही पुरावा नव्हता..” अनु म्हणाली..
“ हे बघ तुझ्या फिलिंग्स यात involve होऊ देऊ नकोस..” अभिजित तिला समजावत म्हणाला..

ती

Submitted by JayantiP on 27 June, 2019 - 02:32

ती
ती म्हणाली नंबर दे
मी विचारले का?
म्हणाली दाखविन इंगा
मी बोललो माझ्याशी पंगा?
म्हणाली पडेल महाग
मी बोललो चल भाग.
म्हणाली माझ्याशी टक्कर?
मी बोललो चल हट डुक्कर.
म्हणाली तू विकृत, वेडा
मी बोललो तू तर पीडा.
अशी सारखी पिडत असते
माग हुंगत पाठी लागते.
पिडण्या तिच्या नाही सुमार
घेऊन लाठी दिला मार.
नको म्हणत झाली पसार
भेटली जर तुम्हा कुणाला.
नाव माझं सांगा तिला
होईल लगेच गोगलगाय.

विषय: 

आज काल मी पित नाही.

Submitted by अतरंगी on 25 June, 2019 - 11:53

गाडीत बसल्या बसल्या अर्ध्या तासात प्रसवलेली पहिलीच काहीच्या काही गझल माबोकरांच्या समोर सादर करत आहे. Lol
ता.क.:- गझलेच्या नियमांत बसो व न बसो मी याला गझल म्हणूनच सादर करत आहे.

काय सांगू मित्रहो माझी व्यथा, आज काल मी पित नाही,
हरेक सांज बुडवायचो प्याल्यात मी , आता घशाखाली उतरत नाही.

पुसती सर्व मित्रगण, येत नाहीस पारावर पुर्वीसारखा,
संसाराने केलेली माझी दुरावस्था, त्यांना स्वःमुखे सांगवत नाही.

पावसा

Submitted by JayantiP on 25 June, 2019 - 09:45

पावसा
हे पावसा सालाबादप्रमाणे
जून महिना मृग नक्षत्रावर
तू यावंस धरतीवर
हे ठरलंय ना .
तू येतोस तुझ्या मर्जीने
रेंगाळतोस, बरसतोस, कहर
करतोस तुझ्या रागाने.
पण आजकाल तू फार
खोटारडा झालाहेस.
फार वाट पहायला
लावतो आहेस.
मित्रा असं नको ना वागूस.
माझ्यासारखे नवकवी डोळ्यात
प्राण आणून वाट पाहतो तूझी
तू पडलास तरच फुटतो कंठ
मग सगळीकडे आमची डराव डराव.
पावसाळ्यात बेडकांची गाणी
आणि आमच्या कविता
हेच तू जीवनदाता आहेस
पटवतात सर्वांना.

आनंदाचे गाणे व्हावे

Submitted by पुरंदरे शशांक on 24 June, 2019 - 22:38

आनंदाचे गाणे व्हावे

माळरानी एकांतात
रानफुले फुललेली
बहुरंगात रंगोनी
मस्त मजेत डोलली

नाही कौतुक कराया
नाही सुगंध लुटण्या
रंग गंध उधळिता
कोणी न ये त्या जाणण्या

अनामिक वाटसरु
जाई पहात तयांस
थबकून पूर्णपणे
वेडावून जात खास

करी नवल मनात
म्हणे कशी ही फुलत
नये कौतुकाला कोणी
वार्‍यावर डोलतात ?

गोंजारुन जाता तया
फुले गोड हसतात
सहजचि उमलोनि
नकळत व्हावे लुप्त

अपेक्षाचि न ठेविता
आनंदाचे गाणे व्हावे
दिस सरता सरता
हळु निघोनिया जावे...

घात (कथा)

Submitted by चैतन्य रासकर on 23 June, 2019 - 06:49

(व्हाट्सॲपवर पूर्वप्रकाशित)
...................................................................................

"मला वाच...."
सोमनाथ एवढचं म्हणू शकला, मग तो खोकू लागला.
मला वाच...का मला वाचव? याला नेमकं काय म्हणायचं?
सोमनाथची खोकल्याची उबळ कमी झाली, त्याच्या आईने त्याला पाणी दिले, तो खोकत कसंतरी पाणी पिऊ लागला, खोलीभर औषधांचा वास पसरला होता. मी सोमनाथकडे बघितले, त्याच्या डोळ्यांच्या खाचा झाल्या होत्या, गालफड बसली होती, चेहऱ्यावर सुरकुत्या वाढल्या होत्या, केस गळून पडले होते, हातापायांच्या काड्या झाल्या होत्या.

लव्ह इन ट्रबल भाग- १३

Submitted by स्वरांगी on 20 June, 2019 - 00:59

लव्ह इन ट्रबल भाग- १२
https://www.maayboli.com/node/70297
लव्ह इन ट्रबल भाग- ११
https://www.maayboli.com/node/70284
लव्ह इन ट्रबल भाग- १०
https://www.maayboli.com/node/70266
लव्ह इन ट्रबल भाग- ९
https://www.maayboli.com/node/70153
लव्ह इन ट्रबल भाग- 8

लव्ह इन ट्रबल भाग - १२

Submitted by स्वरांगी on 16 June, 2019 - 06:20

लव्ह इन ट्रबल भाग – १२
“ मला वाटलं नव्हतं,तू एवढी घाबरशील ते!! खूप दुखतंय का??” गरम पाण्याची पिशवी अनुकडे देत अभिजितने विचारलं..त्याला खरंच वाईट वाटलं होतं..अनुने पिशवी घेऊन पाय शेकवायला सुरवात केली..तिच्या पायाला थोडी सूज आली होती..सकाळी अभिजीतच्या बेडरूममधून बाहेर पडताना तिचा डावा पाय उंबरठ्यावर आपटून ती खाली पडली होती..दिवसभर कामात असल्याने तिचं पायाच्या दुखण्याकडे लक्ष नव्हतं गेलं..आणि अत्ता अभिजीतने घाबरवलं तेव्हा तिचा डावा पायच मुरगळला…त्यामुळेच तो सुजून लाल झालेला..अनु पायाखाली उशी घेऊन,पाय टीपॉयवर ठेऊन, वाकून पाय शेकवत होती..अभिजित तिच्यासमोरच सोफ्यावर बसला…

लव्ह इन ट्रबल भाग- ११

Submitted by स्वरांगी on 14 June, 2019 - 12:36

लव्ह इन ट्रबल भाग- ११
अनु आणि अभिजित डायनिंग टेबलवर बसून गरमागरम मॅगी खात होते…उशिरा घरी आल्यामुळे आणि दोघांनाही भूक लागल्यामुळे मॅगी हाच बेस्ट ऑपशन होता…
“ बाय द वे, मला असं वाटतं की आपण काही गोष्टी discuss करायला हव्यात…” अभिजितने तोंड उघडलं..अनुने त्याच्याकडे पाहिलं आणि होकारार्थी मान हलवली..
“हम्म..काही गोष्टी आपण आत्ताच ठरवलेल्या बऱ्या अस मला वाटतं..तुला काय वाटतं??” अभिजीतने विचारलं..
“ बरोबर…आपण समोरासमोर बसून, बोलून सगळं क्लिअर करून घ्यायला हवं..” अनु म्हणाली..

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन