मनोरंजन

सध्या तो काय करतो ?

Submitted by पुरूष हक्क समिती on 6 May, 2019 - 17:12

ऋन्मेष नावाचा एक आयडी होता ना इथे ?
दिसत नाही हल्ली.
मला चांगलं आठवतंय त्याच्या मागोमाग निघणा-या धाग्यांनी मायबोलीकर त्रस्त झाले होते. पण का त्रस्त आहोत हे सांगता यायचं नाही.
कारण ते सर्वच धागे निरूपद्रवी होते.
खरं तर तुसडेपणे न पाहता प्रेमाने पाहीलं तर ते सर्वच मनोरंजन होतं.
म्हणून मी तरी करमणूक करून घेतली.
क्वचित कधी तरी वैतागलो पण.

पण ऋन्मेष च्या धाग्यांमुळे मायबोलीवर एक जिवंतपणा रहायचा.
आता स्मशानशांतता नांदते.
त्याचं ललित लेखन, कथा, त्याचे चातुर्यपूर्ण प्रतिसाद हे काहीच दिसत नाही.

मर्द को दर्द नाही होता - खरा सुपरहिरो (चित्रपट परीक्षण)

Submitted by अज्ञातवासी on 17 April, 2019 - 09:14

हा चित्रपट बघणारा मी संपूर्ण थेटरात एकटा माणूस होतो.
आणि लगोलग त्याचा पुढचा शो बघणारा सुद्धा. पर्सनल स्क्रिनिंग म्हणा ना!
(आणि तिसरा शो झालाच नाही. लगोलग त्या स्क्रीनवर केसरी चढवला गेला.)
पण जे मी बघितलं, ते अदभुत होतं.
तर, जास्त पाल्हाळ न लावता, सादर आहे, मर्द को दर्द नही होता - cliche bollywood review!!!

(आम्ही कोण ?)

Submitted by अनन्त्_यात्री on 17 April, 2019 - 09:01

आम्ही कोण म्हणोनि काय पुससी? आम्ही असू लाडके-
श्रेष्ठींचे, दिधले तये कुरण हे आम्हास पोसावया
पैशाने तुमच्याच आम्ही मिरवू चोहीकडे लीलया
दुष्काळातही अर्थप्राप्ती आमुची पार्टी कराया शके //

सारेही विधी, कायदे, नियम हे आम्हा तृणासारखे
हस्तक्षेपच आमुचा शकतसे राष्ट्राप्रती द्यावया
अस्थैर्यातिशया अशी वसतसे जादू करांमाजि या
प्रज्ञेचे प्रति-सूर्य पाळू पदरी - सत्तेपुढे जे फिके //

विषय: 

ठक्-ठक् मासिक खरेदी करायचे आहेत.

Submitted by vichar on 7 April, 2019 - 15:33

कुणी विकणार किंवा share करणार असेल ठकठक मासिके (जुनी-नवी) तर कृपया संपर्क करणे.
धन्यवाद.

सॅड सेटन

Submitted by Rupesh dongare on 2 April, 2019 - 08:08

सॅड सेटन
(दुःखी दानव)

सॅड सेटन हि एक पीसी गेम आहे जी टेरर इंजीन याने बनवली आहे या गेमची सगळ्यात पहिली नोंद15 जून 2015ऑबस्क्युर हाॅरर काॅर्नर या यूट्युब चॅनलवर सापडली होती गेमच्या पहिल्या समीक्षे नंतर त्या चॅनलवरची व्हिडियो जागतिक पातळीवर चर्चेत आली.

विषय: 
शब्दखुणा: 

आजच्या ठळक बातम्या

Submitted by किरणुद्दीन on 31 March, 2019 - 14:34

फेकूदिनाच्या सर्व भारतोयांना हार्दीक शुभेच्छा ! आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या.

विषय: 

द चेक

Submitted by सखा on 25 March, 2019 - 11:50

अरबस्तानातील जातिवन्त उंटांनी देखील 'क्या बात है' असे म्हणावी अशी बोकलवाडीची ती रखरखीत दुपार. सेंट परशु महाविद्यालयातला तो आमचा सातवी ड चा कळकट्ट वर्ग आणि डोक्यावर डग मारत फिरणारा जुना पुराणा सिलिंग फॅन. मध्येच फॅनने कर कट्टक कर कट्टक असा आर्त आवाज केला आता मरतय हे मरतुकडं म्हणून वर पाहिलं तर मेलेल्या पेशन्टने, गचमन आंग झटकावं अन पुन्हा फ़क्कक-कन श्वास घ्यावा तसा पुन्हा पंखा सुरु झाला आणि डग मारू लागला.

भास की खरे ?

Submitted by पुरंदरे शशांक on 25 March, 2019 - 01:17

भास की खरे ?

सगेसोयरे जमले भवती नात्याकरता
दिले घेतले आठवती व्यवहारापुरता

माझे मीपण साठत गेले वर्षे सरता
तुटले सारे त्यातून का हे जोड जोडता

सुखदुःखाची ओझी वाहून थकता कण्हता
स्वार होऊनी माझ्यावर ती गाजवी सत्ता

काय राहते हाती अपुल्या येथून जाता
भास की खरे अवतीभवती विरता विरता

Pages

Subscribe to RSS - मनोरंजन