भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर पुणे!

Submitted by कृष्णा on 13 August, 2018 - 09:06

नुकतीच बातमी वाचली लोकसत्तावर.

जगण्यासाठी भारतातील सर्वात सुंदर शहर पुणे!

पुणे तेथे काय उणे!!! Happy

पुण्याचे व पुणेकरांचे अभिनंदन! Happy

विशेष म्हणजे नवी मुंबई आणि मुंबई दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर! तर दिल्ली बहोत दूर थेट ६५व्या क्रमांकावर!

https://www.loksatta.com/desh-videsh-news/pune-most-livable-city-new-del...

Group content visibility: 
Use group defaults

पुणेकरान्चे अभिनन्दन!! Happy
रच्याकने, हिन्जवडी पुण्यात येत नाही ना, कारण जगण्यासाठी आणि तिथे जाण्यासठी अत्यन्त बेकार आहे ..
स्वानुभव बर का Proud

पुणे तीसात कोथ्रूड, आपलं ते हे नगर, ती ही कॉल्नी अन तो हा रोडसुद्धा येत नाही ओ!>> खरय .. सन्शोधनाचा आणि चर्चेचा विषय आहे Happy

आजच ई-सकाळ वर पुण्यात ट्राफिक जाम ने कसा कहर केला हे वाचले. पुण्याइतके गैर्सोयिंनी भरलेले, अरुंद गल्लीबोळ रस्ते, फज्जा उडालेली वाहतुक व्यवस्था, अतिक्रमणांनी अधिकच आक्रसलेले रस्ते, थोडाही ट्राफिक सेंस नसलेले आडमुठे लोक्स, औषधालाही न सापडणारी माणुसकी आणि गरज नसताना जिथे-तिथे 'आमचीच लाल' दाखवण्याची व्रुत्ती असलेल्या पुण्याला "भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर" करणार्या समितीचे करावे तेवढे कौतुक कमीच..!!

अहो DJ., या सर्व कारणांमुळेच पुणे हे संपूर्ण भारताचे प्रतिनिधित्व करणारे शहर आहे.
समिती नेमून जाहीर करावे लागते की पुणे सुंदर आहे. कारण पुण्यातल्यात लोकांना माहित आहे, इतर गावच्या लोकांना अक्कल कमी, समजणार नाही.

पुण्याइतके गैर्सोयिंनी भरलेले, अरुंद गल्लीबोळ रस्ते, फज्जा उडालेली वाहतुक व्यवस्था, अतिक्रमणांनी अधिकच आक्रसलेले रस्ते, थोडाही ट्राफिक सेंस नसलेले आडमुठे लोक्स>>>सहमत. (ही अवस्था गैरपुणेकरांनी केलीये. जो उठतो तो पुण्यात येतो, अव्यवस्था माजवतो, वर बोंबही पुणेकरांच्याच नावाने मारतो. येवढे जर पुणे आवडत नाही तर जगण्यासाठी अगदी नालायक शहर म्हणुन नोंद करा पुण्याची आणि फिरकू नका इकडे. हाकानाका)

औषधालाही न सापडणारी माणुसकी आणि गरज नसताना जिथे-तिथे 'आमचीच लाल' दाखवण्याची व्रुत्ती >>>असहमत

तुम्हाला पुणे समजलेच नाही हो. अजिबातच नाही.

पहिला क्रमांक देता कि टोमणे हाणू ? >> Lol

पुणेकरांचे अभिनंदन मलाही चांगलेच अनुभव आलेत.
पण कोणाला पत्ता विचारु नये. लगेच पाटी दाखवतात. Happy

आजच ई-सकाळ वर पुण्यात ट्राफिक जाम ने कसा कहर केला हे वाचले. पुण्याइतके गैर्सोयिंनी भरलेले, अरुंद गल्लीबोळ रस्ते, फज्जा उडालेली वाहतुक व्यवस्था, अतिक्रमणांनी अधिकच आक्रसलेले रस्ते, थोडाही ट्राफिक सेंस नसलेले आडमुठे लोक्स, औषधालाही न सापडणारी माणुसकी आणि गरज नसताना जिथे-तिथे 'आमचीच लाल' दाखवण्याची व्रुत्ती असलेल्या पुण्याला "भारतात जगण्यासाठी सर्वात सुंदर शहर" करणार्या समितीचे करावे तेवढे कौतुक कमीच..!!>>>> तरीही लोक पुण्यातच का येतात? Confused face

आमच्या सोसायटीच्या जवळ 'खानदेशी तडका' नावाचे हॉटेल सुरु झाले आहे. एकदा गेलो जेवायला सहकुटूंब. कशीबशी जागा मिळाली. कळण्याची भाकरी, भरीत आणि शेवभाजी मागवली. जेवण छान होते. पण त्या अर्ध्या तासात हॉटेलमध्ये ओसंडून वहाणाऱ्या गर्दीत, पार्सल नेणाऱ्या कारवाल्यांच्या गर्दीत थोडीही मराठी भाषा कानावर पडली नाही. बिल देताना विचारले तर उत्तर आले "हे सगळे आमचेच आहेत. घरचं जेवण मिळतं म्हणून गर्दी करतात."

खानदेशी हॉटेल त्या लोकांमुळे फुल
कोल्हापुरी कट्टा त्या त्या लोकांमुळे फुल
गुजराथी थाळी त्या लोकांमुळे फुल
मालवणी कट्टा त्या त्या लोकांमुळे फुल
वर यांच्या शाखाही निघताहेत आणि त्याही ओव्हर फ्लो होतायेत. तरीही पुणे चांगले शहर नाही आणि पुणेकरांना मानुसकी नाही?

एकदा बादशाही थाळी मधे गेलो होतो. ८५ नंबर होता. मॅनेजरला विचारले "साधारण किती वेळ लागेल "? तर एक नाही दोन नाही. त्यांना पुन्हा विचारले, "एका जागेवर उभे राहीले कि पाय दुखतात, तर आम्ही पाय मोकळे करून येतो." ते म्हणाले " असे काही सांगता येत नाही. तुम्ही गेलात आणि नंबर आलात तर पुन्हा नंबर लावावा लागेल " मनात चरफडत उभे राहिलो.
मित्राने जवळ जाऊन कथा मधल्या फारूक शेखसारखा चालूपणा केला " आम्ही बारामतीहून आलो आहोत, पवार साहेबांचे खास कार्यकर्ते आहोत "
मॅनेजर वर जराही परिणाम झाला नाही . अगदी विरक्ती आलेल्या संन्याशाप्रमाणे चेह-यावर भाव ठेवत म्हणाले " स्वतः पवार साहेब जरी आले तरी त्यांना रांगेतच यावे लागेल "

मग चुळबूळ करत गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हता.
या ठिकाणी त्या टीमला जेवायला पाठवायला हवे होते. शेवटचा नंबर दिला असता.

आमचे येथे चावून चोथा झालेल्या विषयांचे पुनर्वापरीकरण व पुनर्चोथिकरणानंतर टाकाऊ झालेल्या विषयांचे पुनर्जीवन योग्य दरात करुन मिळेल---- केशव ॲण्ड सन्स (पु"णे"कर)

केतु Lol

आमचे येथे चावून चोथा झालेल्या विषयांचे पुनर्वापरीकरण व पुनर्चोथिकरणानंतर टाकाऊ झालेल्या विषयांचे पुनर्जीवन योग्य दरात करुन मिळेल---- केशव ॲण्ड सन्स (पु"णे"कर)>>> Rofl Rofl

ह्या धाग्यात समस्यांचं सोयीस्कर खापर परप्रांतीयांवर कधी फोडणार विचार करतोय तोच शालिंची पोस्ट दिसली. Rofl मज्जा

अवांतर ज्ञान : जगातील प्रत्येक व्यक्तीत एक पुणेकर दडलेला असतो. पुण्याबाहेरच्या व्यक्तींच्या बाबतीत जर तो नको त्या वेळी उफाळून आला तर मोठे नुकसान होते. समोरचाही त्या कॅलिबरचा असेल तरच बरोबरीत सामना सुटतो.

ही बातमी का फोडताय?

वाचून सगळे पुण्यात येऊन, ते घाण करतील ना !

काय उद्देश्य आहे असे सर्वेक्षण घेऊन प्रसिद्ध करण्यामागे? "केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाने ही यादी प्रसिद्ध केली आहे" हेच खूप काही सांगून जाते. धार्मिक आणि भांडवलशाही प्रवृत्ती एकत्र येऊन सरकार चालवत आहेत. ते कधी म्यागी विषारी आहे म्हणतात, कधी गटारीतून ग्यास निर्मिती करतात तर कधी पुण्याला सर्वात सुंदर शहर म्हणतात. कालपरवाच प्लास्टिकबंदीचे नाटक पार पडले. आता हे दुसरे सुरु झाले. त्यामुळे उगाच हुरळून जायचे कारण नाही. पंधरा वीस वर्षापूर्वी माध्यमांना हाताशी धरून एका तत्कालीन लॉबीने अशीच आवई उठवली होती कि भविष्यातले आयटी हब कोल्हापूर होणार. माध्यमांना बातम्या छापून आणल्या. आणि त्यानंतर स्थावर मालमत्तांचे भाव काहीही कारण नसताना भराभरा वाढवले गेले. झाले, लगेच ह्याला भुलून अनेक येड्यानी (विशेषतः तेंव्हा जे परदेशात गेलेले होते) पाण्यासारखा पैसा ओतून कोल्हापुरात भराभरा सदनिका बुक करून टाकल्या. आज पंधरा वर्षे झाली तरी कोल्हापुरात आयटीचा हब राहूदे हवा सुद्धा नाही. अजेंडे कुणाचे फायदा कुणाला आणि मूर्ख बनून आनंदाने नाचायला कोण लागतात. येड्यांचा बाजार.

"पुण्याइतके गैर्सोयिंनी भरलेले, अरुंद गल्लीबोळ रस्ते, फज्जा उडालेली वाहतुक व्यवस्था, अतिक्रमणांनी अधिकच आक्रसलेले रस्ते, थोडाही ट्राफिक सेंस नसलेले आडमुठे लोक्स>>>सहमत. (ही अवस्था गैरपुणेकरांनी केलीये"

===> कोणत्याही पेठेत जा. नाना पेठ, भवानी पेठ, गुरुवार पेठ, गंज पेठ (बायदवे कुणाच्या डोक्यातून नाव आले असेल? नावातच गंज. निदान नाव तरी ग्रेसफुल ठेवायचे) किंवा कोणतीही पेठ. जिथे पारंपारिक पुणेकरांच्या पिढ्या राहत आहेत. काय दिसते? खिचडी सारखी घरे आणि वस्ती. जेमतेम सायकल चालवता यईल या लायकीचे रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूना महिनोन्महिने धूळ खात पडलेल्या गाड्या. आणि तात्पुरते पार्किंग करणाऱ्यांना मग्रुरीची भाषा. जसे काय पार्किंग म्हणजे आपल्या पिताश्रींचीच जागा असल्यासारखे. हेच जिथे जिथे आयटी मुळे आलेले "गैरपुणेकर" राहतात औंध, बाणेर, हिंजवडी, नगर रस्ता, विमाननगर इत्यादी ठिकाणचे राहणीमान पहा. माझ्या माहिती नुसार पुणे महानगरपालिकेला सर्वाधिक कर ह्या आयटी कंपन्या, म्हणजेच गैरपुणेकर नागरिक, देतात. पेठेत राहणारे, पाट्या लावणारे आणि दुपारी झोपा काढणारे राहणारे पुणेकर किती कर भरतात?

पुण्यासारखं वाईट्ट शहर जगात दुसरं नाही. अजिबात कुणी येऊ/जाऊ नये त्या शहरात. तुम्ही फ्लॅट वगैरे घेतले असतील तेही ही विकुन टाका, आपापल्या मूळ गावी जाऊन रहा. आहेच काय त्या शहरात रहाण्यासारखं, मुलांना वाढवण्यासारखं.

Wink

शनिवारवाड्याच्या जागी एक मॉल सुरू करावा. त्यात पाच सहा मल्टीप्लेक्स, आठ दहा सुपरस्टोअर्स, डाकघर, रेस्तराँज, झालेच तर एक पेशव्यांचे वस्तूसंग्रहालय (तिकीट लावून), मधोमध करमणुकीचे कार्यक्रम, मुलांसाठी खेळ, चकाचक दुकाने इत्यादी सर्व असावे. त्याचे नाव शनिवार कसबा कॉम्प्लेक्स ठेवावे. आजूबाजूचे चाळवजा वाडे पाडून टाकून मस्त ट्विन टॉवर्स उभारावेत. मोठा रस्ता, भला मोठा चौक. चौकाच्या कडेला बीच, बीचच्या कडेला समुद्र, समुद्राच्या कडेला दुबई अस्सं अस्सम असावं ..
लहानपणापासूनचं स्वप्नं आहे हे.

Pages