आम्चं बाळ...

Submitted by पुरंदरे शशांक on 6 July, 2014 - 23:04

आम्चं बाळ...

पाळण्यात झोपलंय इटुक्लं बाळ
चळवळ करुन दमलंय पार

इटुकल्या बाळाचं नाक नै बट्टऽण !!!
डोळे टकाटका नी डोके पार चमन ... Happy

इटुक्लं बाळ चालवते सायकल
हाता-पायांची किती ती वळवळ

इटुक्लं बाळ काय काय सांग्ते
आईला माझ्या बरोब्बर कळ्ते Happy

इटुक्लं बाळ ओळख्ते हां मला
नसूं दे बोलत पण कळ्तं ना मला Happy

इटुकल्या बाळाची मी ताई किनै
खेळ्तं माझ्याशीच कध्धी रडत नै Happy

आई ग्ग लवकर ये ना जरा
केला बै याने फ्रॉक माझा ओला ... Wink

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

Pages