शोध स्वतःचा.

Submitted by मन्या ऽ on 12 August, 2019 - 16:02

शोध स्वतःचा..

शोध घे तु स्वतःचा
नको घेऊस आता
तु आधार कुणाचा
प्रश्न आहे आता
तुझ्या अस्तित्वाचा

खुप झालं आता
मुसमुसत तुझं ते रडत
अंधारात चाचपडणं
आणि खुप झालं ते
दुसर्यांकडे मदतीच्या
आशेने केवीलवाणं बघणं

उठ आणि उभी राहा
तु हिंमतीनं
रखरखत्या उन्हात
आज पोळशील
काचर्या पावसात
आज भिजशील

आज सारंकाही
सहन करशील तेव्हाच
तर उद्याच्या सुर्याला तु
तुझ्या नजरेत पाहशील

स्वाभिमाननं जगायला
अन् खंबीरपणानं
दुनियेला तोंड
द्यायला शिकशील

दर्पणात स्वतःचे प्रतिबिंब
पाहताना तु तुझ्याच
नजरेला रोज एक
नवे आव्हान देशील

(Dipti Bhagat)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अज्ञा welcome back... Happy Happy आता परत गायब नको होऊस.

श्वेताताई,अक्की प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद! Happy

छान

आज सारंकाही
सहन करशील तेव्हाच
तर उद्याच्या सुर्याला तु
तुझ्या नजरेत पाहशील.........

मान्य आहे
असेच आयुष्य असते
सुदंर लेखन