मायबोलीवर राजकीय पक्षांच्या आयटी सेल कार्यरत आहेत का?

Submitted by हायझेनबर्ग on 28 May, 2019 - 10:27

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्यावेळी आणि पुन्हा मागच्या दोनेक वर्षात २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत राजकारणा संदर्भातले अनेक धागे फॉलो केले. हरेक धाग्यावर धुळवड सुरू होण्याआधी येणार्‍या चर्चात्मक प्रतिसादांची संख्या, प्रत्येक नवीन धाग्यागणिक कमी कमी होत गेली. शेवटी पहिल्या प्रतिक्रियेपासूनच धागाकर्त्याला डिसक्रेडिट करणे सुद्धा चालू झाले. सध्या राजकीय धागा म्हणजे प्रतिसादातून धुळवड असेच समीकरण झालेले दिसत आहे.
अनेकांचे चर्चात्मक प्रतिसाद वाहून दुर्लक्षिले जातात आणि विषय त्याच त्याच द्वेष पसरवणार्‍या मुद्द्यांभोवती फिरत राहतो.
चर्चा त्याच त्याच मुद्द्याभोवती फिरत राहून त्याचे पर्यावसान धुळवडीत व्हावे ह्यासाठी जाणून बुजून प्रयत्न होत आहेत असे आता माझे ठाम मत झाले आहे.
पक्षांचे आयटी सेल कसे काम करतात ह्याची माहिती तुम्हाला युट्यूब विडीओ आणि प्रिंट मिडियातूनही मिळू शकेल.

ह्यावर ऊपाय काय असावा मला माहित नाही पण चर्चेसाठी एक अनबायस्ड व्यासपीठ ऊपलब्ध असावे एवढीच ईच्छा आहे. ते ऊपलब्ध करून देण्यासाठी मायबोली प्रशासनाने कृपया प्रयत्न करावे ही विनंती.

सध्या तरी मला "मायबोली ऊद्योजक गृप"च्या धर्तीवर राजकारण ग्रूपही चालवावा असे वाटते

  • खरे नाव आणि ईमेल आयडी असणार्‍या व्यक्तींनाच राजकारण गृपमध्ये प्रवेश दिला जाईल.
  • गृपचे सभासदत्व मिळण्यासाठी एका ठराविक मायबोली सभासदाला संपर्क करावा लागेल.
  • गृपबाहेर राजकारणाचे धागे फक्त वाचता येतील त्यावर लिहिता येणार नाही.
  • ह्या गृपबाहेर राजकारणा संदर्भात काहीही लिहिण्यार्‍या वा चर्चा करणार्‍या आयडींवर सक्त कारवाई केली जावी

चर्चेची sanctity जपण्यासाठी अशी काहीशी सोय करणे नितांत गरजेचे झाले आहे असे वाटते. ज्या सभासदांनी पूर्वी ऊद्योजक गृपचे सभासदत्व घेतले असेल त्यांना ह्या पद्धतीचा अनुभव नक्की असेल.
आयटी सेल बाबतीत माझा होरा चुकीचा सुद्धा असू शकेल, पण असा सेमी-क्लोज्ड ग्रूप राजकारण संदर्भातल्या धाग्यांवर रोजच चाललेली धुळवड थांबवण्यास एक ऊपाय ठरू शकेल असे वाटते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी अगदी!
मी तर म्हणतो मायबोलीचे सभासदत्वच रेफरल बेसीसवर द्यावे
"Join by invitation only"

व्वा हाब व्वा मस्त धागा, माझी मायबोली प्रशासनाला विनंती आहे की राजकारणी धागे उघडताच धुळवडीची बॉलीवूड/मराठी गाणी लागावीत जेणेकरून आनंद द्विगुणित होईल. जय हिंद जय महाराष्ट्र.

काँग्रेसचा प्रचार किंवा मोदींचा विरोध करणारे जे काही आयडीज् आहेत त्यांनी इतक्या खालच्या पातळीवर आणि घाणेरड्या शब्दांत काँग्रेसचे समर्थन व मोदीविरोध केला आहे की त्यामुळे काँग्रेसची मते वाढणे तर दूरच उलट अनेकांनी ह्या आयडीज् चे विचार वाचून काँग्रेसला मत द्यायचा विचारही मनातुन पुसून टाकला असेल. तेव्हा असला आतबट्ट्याचा प्रचार करणारे काँग्रेसचे पेड आयटी सेल नसणार इतके खात्रीने सांगू शकतो.

कदाचित ते छुपे भाजपसमर्थक असल्यास कल्पना नाही.

धागालेखकाशी व खरा पुणेकर यान्च्याशी सहमत. राजकारण हा विषयच असा आहे की जिथे ट्रोलिन्गला व शिवराळ भाषेला भरपुर वाव आहे ( कोन्ग्रेस समर्थकन्च्या प्रतिसादान्वरुन ते दिसुन येईलच).

माझी मायबोली प्रशासनाला विनंती आहे की राजकारणी धागे उघडताच धुळवडीची बॉलीवूड/मराठी गाणी लागावीत जेणेकरून आनंद द्विगुणित होईल.>>+१ Wink

जर काँग्रेस आयटी सेल असेल तर यांचे पगार भाजपने दिले पाहिजेत कारण यांच्या पोस्ट वाचून अनेक तटस्थ लोक भाजपला सपोर्ट करू लागले असतील.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या बाजूने लिहीणारे अत्यंत तिखट विषारी भाषा मला वापरून गेले. आता भाजपला आवडणार नाही असे लिहीले की मला काँग्रेसी ठरवून अत्यंत गलिच्छ भाषेत प्रतिसाद येत आहेत. धागा भरकटवणे हा उद्देश आहेच.
एखाद्या दोन्ही पक्षाशी संबंधित नसलेल्यांना मत मांडणे अवघड आहे. तिसरा पक्ष, तिसरा विचार अस्तित्वात नाही असे आहे का देशात ?

विशेष म्हणजे भाजपच्या आयटी सेल वाल्यांना / समर्थकांना / सहानुभूतीदारांना हे २०१४ नंतरच सुरू झाले असे वाटते तर काँग्रेसचे लोक २०१४ च्या आधी कसे फोटोशॉप होत होते याच्या आठवणी काढताना दिसतात.

मात्र भाजपच्या कुठल्याही कॅटेगरीतल्या व्यक्तीला टीका सहन करता येत नाही. ते फक्त टीका करण्याचा अधिकार बजावतात. टीका केली की कुठल्या पातळीला ते जाऊ शकतात हे सोशल मीडीयात वारंवार दिसतेच आहे.

त्यामुळे या दोन पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात रडण्याचा किंवा उन्मादाचा कार्यक्रम असेल तर त्याला सन्माननीय फाटा.

जिथे ट्रोलिन्गला व शिवराळ भाषेला भरपुर वाव आहे ( कोन्ग्रेस समर्थकन्च्या प्रतिसादान्वरुन ते दिसुन येईलच).>> ह्याला म्हणतात कांगावा. आपले झाका दुसर्याचे वाकून बघा...

राजकीय धाग्यावर ओळखीसह बोलण्य्सारखे काही राहिलेले नाही. प्रत्यक्ष ओळख असूनही भाजप समर्थक कसे विखारी सर्पासारखे दंश करतात आणि मग खाजगीत भेटून 'मनाला लावून नका घेऊ हां' अशी मखलाशी करतात ह्याचा दीर्घ अनुभव आहे..

समविचारी लोकांनी आपआपसात कुजबुज करायला whatsapp ग्रुप्स काढलेले असतीलच. तेव्हा विरोधी विचारांच्या कुस्तीसाठी अशा कोणत्याही विशेष मैदानाची आवश्यकता नाही असे माझे मत...

धाग्याशी सहमत. आणि असे केवळ राजकारणाच्या धाग्यावरच होत आहे असे नाही. मागे वाचक म्हणून एक धागा follow केला होता. "आयआयटी कानपूरचा एक प्रशंसनीय उपक्रम" म्हणून. त्यामध्ये आयआयटी कानपुर ने भारतीय धर्म आणि तत्वज्ञान विषयी माहिती देणारी वेबसाईट बनवली आहे त्याची माहिती दिली आहे. आता भारतीय संस्कृती, धर्म, तत्वज्ञान याविषयी कुठे काही चांगले झाले की काही लोकांच्या पोटात लगेच दुखते. धाग्यावर काहीजण अक्षरशः तुटून पडले. काहीजणांची विरोधात चांगल्या चर्चा केल्या परंतु एका आयडी ने धागा तर भरकटवलाच वर पुन्हा हिंदू धर्माविरुद्ध आणि ब्राह्मण जातीविरुद्ध व्यक्तिगत टिप्पणी पण केली. लेखकाने तक्रार केल्यावर त्या आयडीचे वादग्रस्त विधानांचे प्रतिसाद ऍडमिन ने उडवले परंतु आयडीवर कारवाई झाली नाही. तोच आयडी पुन्हा इतर धाग्यांवर असाच उच्छाद मांडतोय. त्याचे बहुतांश प्रतिसाद धर्मद्वेषक, विशिष्ट जातिद्वेषक, भडकाऊ, खोट्या बातम्या पसरवणारे आणि पुरावे मागितले की पाठ फिरवणारे किंवा उडवाउडवीची उत्तरे देणारे असतात.
योगायोग म्हणा किंवा बाकी काही परंतु त्या आयआयटी कानपूर धाग्यावर विरोध करणारे बरेच आयडी राजकारणाच्या धाग्यावर काँग्रेसी समर्थक दिसले. या सर्वांवरून असे वाटते की मायबोलीवर निदान एका राजकीय पक्षाची आयटी सेल कार्यरत असणार.
पण एका आधीच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे- यांचा राजकीय अजेन्डा काही सफल झाला नाही. याचे कारण १. मायबोलीची/राजकीय धाग्यांची भारतातली वाचनसंख्या कमी असणार/अश्या द्वेषयुक्त धाग्यामुळे आणि प्रतिसादामुळे कमी झालेली असणार किंवा २. यांचा अजेन्डा ओळखून काही लोकांनी मुद्दाम मत परिवर्तन केले असणार
पहिले कारण असेल तर थोडे चिंताजनक आहे. आजकाल प्रशासनाविरोधात उठणारे सूर, मायबोलीकडे पाठ फिरवणारे जुने लेखक आणि कमी होणारे चांगले लेख (हे माझे मत नाही...असं एक धागा वाचल्याचे आठवते) यावरून पहिली शक्यता काही प्रमाणात का होईना संभव आहे.

मायबोली प्रशासनाने वेळीच पावले उचलून वातावरण गढूळ करणाऱ्या मोकाट सुटलेल्या आयडी विरोधात कारवाई करावी. अनेकदा किंवा अनेकांनी रिपोर्ट करून कारवाई होत नसेल तर निदान ती का होत नाही याचे स्पष्टीकरण तरी द्यावे. इथे एक, दोन आयडी असे अजूनही वावरत आहेत याची नोंद घ्यावी.

हे मायबोलीचं फार जुनं दुखणं आहे. डुप्लिकेट किंवा फेक आय्डी, रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्येच इंटरसेप्ट करुन बाद करणं फार कठिण नाहि. इतक्या वर्षामध्ये मूळात ते झालेलं नाहि तेंव्हा तुमची सूचना रास्त असली तरीहि अंमलात येइल का याची शक्यता अजिबात वाटत नाहि. तेंव्हा तुम्ही म्हणता तशी सँक्टिटी (किंवा सॅनिटी) टिकवायला आपलं ओल्ड फॅशन्ड वर्क अराउंड (इग्नोरास्त्र) वापरणं भाग आहे... Proud

मला राजकारणात आवड असल्याने मी हे सर्व राजकारणी धागे वाचत व कधी कधी प्रतिसाद दिले आहेत. त्यात एक आयडिचे बहुतांश प्रतिसाद धर्मद्वेषक, विशिष्ट जातिद्वेषक, असल्याचे दिसून आले. त्या आयडीला ब्राह्मणान्चा अत्यन्त द्वेष आहे. त्यान्च्याकडे मी दुर्लक्ष केले. तेच सर्वानी करावे ही विनन्ति.

मला आठवतंय त्यानुसार माबो ऍडमीननी साधारण दोनेक(?) वर्षांपूर्वी दोन्ही बाजूचे भरपूर आयडी उडवले होते. त्यानंतर काही काळ माबो ठीक चाललं होतं.
बरेचसे भाजप समर्थक मिपावर जमा झाले होते. पण मिपा प्रशासनाने मार्चमधे नोटीस लावली आणि तिकडे बऱ्यापैकी शांतता झाली. आता ते सगळे आयडी परत(?) इकडे आले आणि जास्तच गोंधळ चालू झाला.

> मायबोलीवर राजकीय पक्षांच्या आयटी सेल कार्यरत आहेत का? > उघड भाजप/मोदी समर्थकांशी बोलणे जवळपास अशक्य आहे. काही छुपे समर्थक आहेत, जे नेहमी चर्चेत भाग घेत नाहीत, तसेच काही छुपे विरोधकदेखील आहेत. सेंटरच्या किंचीत उजवीकडचे किंवा डावीकडचे. यांच्यात चर्चा घडू शकतात.

मला वाटत माबो प्रशासनाने परत एकदा साफसफाई मोहीम हाती घ्यावी.
'केवळ' राजकारणावर चर्चा करण्यासाठी जन्मलेल्या आयडीना उडवावे. यासाठी एक ठरावीक तारीख ठरवून त्याआधी त्या आयडीने किती इतर विषयांवरील धाग्यांवर प्रतिसाद दिले आहेत ते चेक करावे.
सध्यातरी एवढेच सुचतेय.

त्या आयडीने किती इतर विषयांवरील धाग्यांवर प्रतिसाद दिले आहेत ते चेक करावे. >>> अगदी बरोबर.

राजकारणावर प्रत्येक जण बोलतोच बोलतो. पण नॉर्मल मनुष्य इतर गोष्टीतही रस घेतो. ज्यांचा जन्मच ट्रोलिंगसाठी झालेला आहे , त्यांच्या रडारवर इथे राजकीय काही लिहीलेच की तो धागा येतो. कोणत्याही पक्षाचे का असेना आयडी उडवून साफसफाई केली पाहीजे.

असतील ,असू शकतात कारण आजकाल न्यूज पेपर,चॅनेल ह्यांच्या बातमीवर ठराविक पठडीतील कमेंट असतात त्या वरून असे वाटत हे मीडिया वाले सुधा स्वतःच कमेंट देत असतील खोटं आयडी बनवून
राजकीय पक्ष तर नोकरीला माणसं ठेवत असतील शक्य आहे.

मोदी आल्यापासुन दोनच पक्ष आहेत - मोदी च्या बाजुने आणी मोदीच्या विरोधात. पक्ष , देश वगैरे काहिहि राहिले नाहि आता. भारतातील प्रत्येक माणुस यातील एका बाजुचा आहे. त्यामुळे अधिक्रुत आयटी सेल असु दे किंवा नसु देत काहि फरक पडत नाहि आता.

घर घर मोदी हे असेल तर आयटी सेल माबोवर अस्ण्या नसण्याचा काय संबध आहे.

वा वा. उत्तम कल्पना.
पुरातन काळी मुंबई लोकलने प्रवास करताना रुळाच्या बाजूला कमरेचे सोडून उकीडवे बसलेले नि यथेच्छ घाण करत असलेले लोक दिसायचे.
तर ते लोक घाण करणे थांबवू शकत नाहीत नि ते आवडत नाही म्हणून लोकलने प्रवास करणेहि बंद करता येत नसे.
तसेच मायबोलीचे झाले आहे. काही सभ्य मित्र, काही चांगले लेख कविता लिहीत असतात ते वाचायला यावे तर ही घाण दिसते.
घाण करणार्‍यांना असे उघड्या वर न येता एखाद्या बंद जागेत सोय करून दिली तर बरे असे वाटत असे.

तसेच आता मायबोलीचे! जे या धाग्यावर जाऊ इच्छितील त्यांना ही घाण सहन करावी लागेलच. कारण चांगले लेख हे या राजकीय धाग्यांवर इथले लोक तरी लिहू शकत नाहीत. पण निदान इतर लोक तरी ते टाळू शकतील!