Submitted by यतीन on 24 September, 2019 - 08:04
राजकारण हे राजकारण असतं
पत्ते त्यांचे आणि खेळ ही त्यांचाच
आपण फक्त पत्ते पिसायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
खुर्ची त्यांची अन् बसणं त्यांचच असतं
आपण फक्त पाया म्हणून उभ राहायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
ख-याचे खोटे अन् खोट्याचे खरे
करणं हे त्यांचच काम असतं
आपण फक्त मत मांडायच असतं
राजकारण हे राजकारण असतं
थोड अवघड अन् किचकटच असतं
वरवर सोप्प सोप्प दिसत असल तरी
वरून मुकुट पण आतून काटेरी असतं
आपण मात्र डोळे मिटून बघायच असतं
कानावर हात ठेवून एकायच असतं
तोंडावर हात ठेऊन गप्प बसायचे असतं
बोटाला शाई लाऊन मतदान मात्र
नक्की करायचे असतं
यश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा