मतदार हुशार झालेत का?

Submitted by विवेक9420 on 27 February, 2020 - 14:27

मतदार हुशार झालेत ?

दिल्ली मध्ये नुकत्याच झालेले राज्याचे ईलेक्शन व त्यानंतर आलेले निकाल पाहता आम आदमी पार्टी ने दणदणीत विजय मिळवला व तोही स्वबळावर.
आप पक्षाने हा मिळवलेला विजय नक्कीच कौतुकास्पद आहे.

असो, पन काही जन मात्र ह्या निकालाचे वृत्त करताना जणु हा निकाल आता भाजप संपवत आहे किंवा भाजप साठी फार मोठी धोक्याची घंटा आहे असा काही बोलत आहेत किंवा बोलत होते . आता असे वृत्तकथन करणारे लोकांवर हसावे कि त्यांचा बुद्धी वर किव करावी हा मोठा प्रश्न आहे.
कारण वृत्त कथन करणारेंना मतदार किती कळाला? ह्याचे फार मोठे रहस्य आहे. जर तो कळाला असता तर असे विश्लेषन केले नसते किंबहुना परिस्थिती मधील फरक नक्कीच केला असता.

पन ह्या सगळ्या वृत्त कथनात भाजपचा कायमच विरोध करणारे एका पत्रकार राजदिप सरदेसाई यांचे एक ट्विट खुप बोलके आहे व ज्यावर आजचा हा मेसेज मला करावासा वाटतो अर्थात तो ट्विट मि शेवटी टाकतो

मतदार हुशार झाला का ?

हो. मतदार हुशार झाला आहे व एकदम समजदार पन झाला आहे. मतदार राजा हा प्रत्येक निवडणुकीत आपला मतदान करताना एक ठराविक पॅटर्न ने मतदान करत आहे

मग ती निवडणुक ग्रामपंचायत,जिल्हा परिषद, राज्याची असो वा देशाची
* त्या निवडणुकीत मुख्य प्रतिस्पर्धी कोण आहे ?
* मुख्य प्रतिस्पर्धी मधील लोकांचा मागील काळात केलेली काम कोणती
* निवडुन आलेला लोकांचा कामातुन व्यक्तीगत ,समूहाला,जातीला झालेला फायदा व त्या पलिकडे देशाला झालेला फायदा

तो ह्या सर्व फॅक्टर मनात ठेवुन मतदान करतो व प्रत्येक निवडणुकीत ह्या वरील गोष्टी विचारात घेतो पन निवडणुकी प्रमाणे त्याचे हे फॅक्टर कमी अधिक होत असता

उदाहरण द्यायचे झाले म्हणजे

* ग्रामपंचायतीचा ईलेक्शन असताना माझा समुह माझी जात भाऊबंदकी फॅक्टर जास्त असते व महत्वाचे असते माझा फायदा कोण करवुन देणार माझा भाऊबंदकी मध्ये,समुह,जाती,समाजपैकी ह्याचा विचार जास्त असतो व देशाचा विचार थोडा कमी असतो पन

* राज्यांचा निवडणुकीत दोन प्रतिस्पर्धी पैकी राज्याचा हिताच कोण, राज्यामधील प्रतिस्पर्धी , पार्टींची विशिष्ट समूहाने झालेली ओळख ह्या पद्धतीने जास्त विचार केला जातो व ह्या निवडणुकीत पन देशाचा विचारापेक्षा राज्याचा विचार जास्त केला जातो व व्यक्तीगत फायदा कोन जास्त करून देईल ह्यावर लक्ष असते

* देशाचा निवडणुकीत मात्र मतदार देश आणि देशाचा विचार करतात त्यात समुह,जात,राज्याचे नेतृत्व हे विषय गौण असता पन देश,धर्म व प्रतिस्पर्धी पैकी देशा साठी कोन चांगले हा विचार केला जातो

हि मानसिकता सर्वप्रथम वाचकांचा नजरेत आणुन द्यायची आहे

आता हे एवढे सांगण्यामागे तात्पर्य एवढेच आहे कि आता मतदार झाला आहे जागृक व तो आता ह्या पुर्वीचा जात पंथ धर्म ह्याचा सिमा ओलांडायला लागला आहे त्याला महत्व कमी द्यायला लागला आहे व आपल्यासाठी (देश व स्वतः) उपलब्ध पर्यायांपैकी कोण जास्त चांगले ह्याचा विचार तो करत आहे

दिल्ली राज्याचा विधानसभा व लोकसभेचा ईलेक्शन निमित्त तो पॅटर्न दिसला.

# 2019 लोकसभेचा निवडणुकीत भाजपने 2014 प्रमाणे 7 सीट घेत दिल्लीत 7-0 अशी धुळ विरोधकांना चारली

विशेष म्हणजे 56.68% टक्के मतदान भाजप क्रमांक एकचा पक्ष बनला तर 22.46% घेत कांग्रेस दुसरा तर 18% मतदान घेत आप तिसरा

कारण लोकसभेत मुकाबला होता तो
नरेंद्र मोदी Vs राहुल गांधी
व मतदारांना ह्या दोघापैकी कोन चांगला तो निवडायचा होता

दिल्ली चा मतदारांनी नरेंद्र मोदी एक सक्षम ऑप्शन स्विकारून 7 शीट मोदींचा नावाखाली भाजप ला दिल्यात

मात्र तेच दिल्लीचे मतदार,तीच यंत्रणा,तेच पक्ष व 6 महिन्याचा अवधीनंतर झालेला विधानसभा ईलेक्शन मध्ये आप पक्षाचा विजय होतो व 54% मतदान घेऊन आप पक्ष क्रमांक एकचा पक्ष होतो 40% मतदान घेऊन भाजप 2 नंबर तर कांग्रेस फक्त 5% मत घेऊन 3 नंबर मिळवते

म्हणजे लोकसभेतील क्रमांक एकचा भाजप विधानसभेत 2 नंबर जातो

लोकसभेत क्रमांक 2 चा कांग्रेस विधानसभेत 3 नंबर ला जात

लोकसभेत क्रमांक 3 चा आप पक्ष
विधानसभेत क्रमांक एकचा होतो

असा का झाल ? कारण विधानसभेत लढत झाली ते

अरविंद केजरीवाल विरूद्ध ईतर

ज्यात केजरीवाल समोर अतिशय कमजोर स्थानिक दिल्ली भाजप चे अध्यक्ष मनोज तिवारी व शोधुन पन सापडणार नाही लवकर असे कांग्रेस चे नेतृत्व

मतदारांनी नेहमीच एक सक्षम व कणखर नेतृत्व स्विकारले आहे म्हणुन ते वेगवेगळ्या निवडणुकीत उपलब्ध पर्यायांपैकी जो उत्तम पर्याय आहे त्याला निवडता पक्ष न बघता

ह्याला जोडुनच उदाहरण द्यायचे म्हणजे 2018 मध्ये राजस्थान , मध्य प्रदेश , छत्तीसगड निवडणुकीत भाजप चा सपशेल पराभव स्थानिक नेतृत्वा विरूद्ध असलेला नाराजी मुळे झाला. घोषणा दिल्या गेल्या वसुंधरा तेरी खैर नाही पर मोदी तुझसे बैर नाही

6 महिन्यानंतर 2019 मध्ये

त्याच राज्यांमध्ये लोकसभेत
राजस्थान - भाजप 24 कांग्रेस 1
मध्य प्रदेश- भाजप 28 कांग्रेस 1
छत्तीसगड- भाजप 6 कांग्रेस 5

एवढा दणदणीत विजय मिळवत भाजप ला सीट देऊन बहुमताकडे हे राज्य घेऊन गेले

हे सगळे सांगणे ह्या करिता आहे कि मतदार राजा हा फार हुशार झाला आहे त्यामुळे तो प्रत्येक निवडणुकीत आपला मतदानाचा पॅटर्न वेगळा ठेवतो व एक सक्षम नेतृत्व निवडतो व तो प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो व ईव्हीम मध्ये मत देऊन हिशोब चुकता करतो

हे आज आपल्या देशातील मोठ्या मोठ्या पत्रकारांना कळु नये? मोठ्या मोठ्या पंतप्रधान चे स्वप्न पाहणारेंना कळत नाहीये का ?

जनतेशी नाळ जोडली गेली असेल तर ह्यापुढे आपण जनतेत रहाल. जनतेसाठी काम कराल तरच जनता मतदान करेल त्यामुळे आता सर्व राजकिय पक्षांनी आपला गिअर बदलला पाहिजे ज्यांनी तो बदलला ते आज सिंहासनावर आहेत. बाकीच्यांनी तो लवकर बदलायचा प्रयत्न करावा नाहि तर ह्या विकासाचा बदलत्या काळात दिसेनासे व्हाल व जनतेची फसवणुक करणारेंनी तर हे लक्षात ठेवावे

राजदिप सरदेसाई ट्विट करून म्हणतात

" To those who see this AAP win as the beginning of the end of MO-Shah, here is a statutory warning ;have LS election today and every chance that BJP will dominate Delhi. Voter is making a clear distinction between LS and VS polls "

हे ट्विट निकालाचे दिवसाचे आहे

आपलाच मित्र
विवेक बधान
9420003175

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळात भारतात लोकशाही च्य नावाखाली जे काही चालत त्याला लोकशाही म्हणणे हाच मोठा जोक आहे
भारतीय मतदार हे पाहिले पण हुशार नव्हते आणि आता पण हुशार नाहीत.
आणि जे शिक्षित आहेत विचारी आहेत ते मतदान च करत नाहीत .
जे मतदान करतात त्यांना न देशाविषयी माहिती असते ना स्वतःचा फायदा कशात आहे ह्याची जाणीव असते.
थोडे गाजर दाखवले की हे कोणाला पण मतदान करतात.

मुंबई एपीएमसीवर महाविकास आघाडीचा झेंडा; भाजपची दाणादाण
नवी मुंबई: शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसची महाविकास आघाडी राज्यात सत्तेवर आल्यानंतर स्थानिक पातळीवरील सत्तासमीकरणंही झपाट्यानं बदलत असून त्याचा फटका भाजपला बसत आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय झाला असून भाजपची दाणादाण उडाली आहे. भाजपचे सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत.

राज्यात सत्ता असताना गेल्या पाच वर्षांत राज्यातील सर्व छोटी-मोठी सत्तास्थानं ताब्यात घेण्याचा सपाटा भाजपनं लावला होता. सत्ता गेल्यानंतर हे चक्र उलटं फिरू लागलं आहे. काही जिल्हा परिषदांनंतर आता अत्यंत महत्त्वाच्या अशा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतही भाजपची पुरती पिछेहाट झाली आहे. बाजार समितीच्या सर्व विभागांवर महाविकास आघाडीनं वर्चस्व राखलं आहे.

Proud

ह्यांना भाजी मार्केटतही कुणी विचारेना

>>> तुला कशाला दुसऱ्याच्या गाजराची पडलीय. तू तुझं बघ >>>

कोणी अर्धवट खाऊन टाकलेलं गाजर फेकलं तर याची चंगळ होईल, म्हणून हा उत्सुक आहे.