सगळी बांधाबांध झाली. मुलाने मला पैंटिंगचे किट, कॅमेरा, सकाळी वॉकसाठी ट्रॅक सूट, बायकोला सुनेने कपडे, अजून कायकाय घेऊन दिले होते. (बायको काय-काय घेतलं नाही सांगत!) सामना पेक्षा आमचे पाय ज्यास्त जड झाले होते. तो सकाळचा गारवा, सुंदर सुरेख वातावरण, फुलांपेक्षाही सुंदर पिवळी पडून गळालेल्या पाईन ऍपलच्या पानांचा सडा, आपली माणसं, सगळंच येथे सोडावं लागणार होत.
डिकीत सामान अन डोळ्यात पाणी घेऊन आम्ही घर सोडलं. नातींनी सोबत येण्यासाठी ठेवणीतले सूर काढले. चार दिवसात माया लागली होती. आज आजून त्यांचं रडणं कानात घुमतय!
अनंताच्या यात्रेसाठी
जय्यत तयारी केली आहे
चांदणचुर्याचे भूकलाडू
हिमनगांचे तहानलाडू
(तहानभूक हरपू दे पण)
रसद टकाटक तयार आहे
प्रकाशवर्षी मोजपट्टी
डार्कमॅटरचा भव्य फळा
धूमकेतूचा खडूतुकडा
होल्डाॅलमध्ये भरला आहे
दिशा कोन ढळून जातील
घड्याळ काटे उलटे फिरतील
उद्याच्या बातम्या काल कळतील
याची तयारी ठेवली आहे
मुक्कामाला पोचलो तर
दृृृष्ट तिथे काढतील माझी
त्यासाठी मी कृृृष्णविवरछाप
काजळडब्बी घेतली आहे
माझा मित्र, सुधीर, परक्या ठिकाणी गेला कि सवड असेल तर आवर्जून तेथल्या लोकल मार्केटमध्ये एक चक्कर मारतो, मग ते भारतातले एखादे खेडे असो, कि परदेशातला शहर! मी एकदा त्याला कारण विचारले.
"अरे, नगरला आल्यावर लोक किल्ला, नाहीतर चांदबिबीचा महाल पहायला जातात अन तू आधी बाजारात जाऊ म्हणतोय?"
"तेच काय, कि बाजारात चक्कर मारली कि, स्थानिक लोकांची, त्यांच्या आवडीनिवडींची, राहणीमानाची, अशी खूप माहिती मिळते! "
मला त्याचा हा फंडा आवडला. मी बाजार पालथे घालायचो पण हा दृष्टिकोन माझ्या आकलनात आला नव्हता. याचा फायदा मला अमेरिकेत झाला. ऑस्टिनच्या वास्तव्यात मी मॉल आणि दुकान पहिली.
कैलास मानसरोवर यात्रा (मे २०१२)
येथे गरीब असो श्रीमंत असो कार आवश्यक आहे. 'कार' हि येथे, रोटी-कपडा-और मकान इतकीच गरजेची आहे. त्याला करणेही आहेत. विरळ आणि विखुरलेली रहिवाशी वस्त्या. दूर अंतरावरील गरजेच्या वस्तूंचे आउटलेटस, सार्वजनिक वाहतूक खूप अविकसित, त्यामुळे तिच्यावर अवलुबुन रहाणे अशक्य, स्वस्त कार्स, आणि त्या साठी सहज, कमी दरावरील कर्ज, उत्तम रस्ते, त्यामुळे चारचाकी वाहन गरजेचे झाले असावे. तसेच येथील कार चालवायला तश्या सुलभ आहेत. ऑटो गेअरचा गाड्या असतात. हाताने टाकण्याचा फक्त एकच गियर, रिव्हर्स गियर. हातात स्टियरिंग, पायात ब्रेक आणि एक्सलेटर! त्यामानाने टुव्हीलर्स, बाईक नगण्य होत्या. 'बाईक' हि येथे लक्सवरी समजली जाते!
न्यूयार्कच्या विमानतळावर एक गोष्ट मला जरा खटकली. आमची वरात(वरात म्हणजे व्हीलचेयर वरली बायको, त्यामागे चेयर ढकलणारी कन्या, तिचा सोबत त्या चेयरला अडकवलेल्या आमच्या चाकाच्या बॅगा,आणि त्याच्या मागे हातात पासपोर्ट घेऊन मी.) सामानासकट कार्गोच्या लाईनीत होतो. तिथे गर्दी होतीच. ती मॉनिटर करायला एक आफ्रिकन अमेरिकन ऑफिसर बाई होती. तिला माझे मोकळ्या हाताने चालणे आणि एका अमेरिकन व्यक्तींनी आमच्या लगेज मॅनेज करणे रुचले नसावे. तिने त्या व्हीलचेयरवाल्या पोरीला सांगून, चेयरला अडकवलेली मोठी बॅग माझ्या हाती सोपवली. मला हे थोडस लागलं. पण जरा विचार केल्यावर असे कळले कि, हा अनुभव आपल्याला नवा नाही.
आम्ही आमच्या नंबरची सीट हुडकून त्यावर बसलो. एका 'हवाईसुंदरी'च्या मदतीने, हिची हातातली बॅग आणि माझी लॅपटॉपची बॅकसॅक, सीटवरील रॅक मध्ये सारून दिल्या. सीटवर पाघरायची शाल, एक चिटूर्नि उशी, आणि हेडफोनचे पाकीट होते. समोरच्या सीटच्या पाठीवर एक मॉनिटर होता. खूप 'प्रयत्न-प्रामादा'(Trail -error साठी हा शब्द कोठेतरी वाचला होता. कसा आहे?) नंतर, या स्क्रीनने माझी पंधरा तास करमणूक केली होती. दोन सिनिमे मी पहिले, एक त्यानेच दाखवला!
खूप दिवसांनी वश्या दिसला. आधीच कळकट ध्यान, त्यात मांजरवक्या रंगाचं ढोपरापर्यंत ओघळलेली हुडी, पायात मात्र फ्लुरोसंट रंगाचे स्पोर्ट शूज होते. आम्ही, म्हणजे मी अन श्याम्या, मुडक्याच्या 'टी शाप' मध्ये बसलो होतो.
"सुरश्या, आलं बघ वश्याच ध्यान!" श्याम्या खाली मुंडी घालून, चहात खारी बुडवून खाताना पुटपुटला. तोवर वेश्या जवळ आला. त्याने नाकाला एका हाताने रुमाल लावला होता. सतराशे साठ खिशे असलेल्या पॅंटीच्या एका खीशातून, दुसऱ्या हाताने एक टिशू पेपर काढून, त्याने आधी बाकड्यावरली धूळ साफ केली. मग उगाच खांदे उडवत शेजारी बसला.