नेटफ्लिक्सची गोष्ट ( पुस्तक परिचय - That Will Never Work : Marc Randolph)

Submitted by ललिता-प्रीति on 22 May, 2022 - 03:54

That Will Never Work: The Birth of Netflix and the Amazing Life of an Idea

मार्क रॅन्डॉल्फ हा नेटफ्लिक्सचा सहसंस्थापक. Online DVD rental ची कल्पना त्याच्या डोक्यात आली तेव्हापासून ते नेट्फ्लिक्स कंपनी पब्लिक लिमिटेड झाली आणि तो कंपनीतून बाहेर पडला तिथपर्यंतची ही ‘नेटफ्लिक्सची गोष्ट’.

लेखकाने ती अगदी रंगवून रंगवून सांगितली आहे. तीन-चार start-ups उभे करून दिल्यानंतर त्याला वाटायला लागलं होतं की आपण काहीतरी वेगळ्या कल्पनेवर काम करावं, स्वतःची कंपनी सुरू करावी. त्या कंपनीद्वारे लोकांना एखादी ऑनलाइन सर्व्हिस देण्यावर त्याचा भर होता. तो आणि त्याचा सहकारी मित्र रीड हेस्टिंग्ज यांनी वेगवेगळ्या start-up ideas वर कशा चर्चा केल्या, त्यातून Online DVD rental ची कल्पना कशी समोर आली, ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आधी दोघांनीच काय काय केलं, मग कंपनी स्थापण्याचं ठरलं, त्यासाठी पहिली team कशी गोळा केली, पुढे business development, असे टप्पे एक-एक करत पुस्तकात येत जातात.

मार्क रॅन्डॉल्फच्या आयडिया आणि हेस्टिंग्जचा पैसा आणि मार्केटिंग स्किल्स, अशी ही जोडगोळी होती. नेटफ्लिक्समध्ये दोघांच्या भूमिका काय असाव्यात त्यावर मुख्य त्या दोघांच्यात स्पष्टता होती. त्यातून कंपनी कशी आकारत गेली, कोणते लहान-मोठे प्रश्न उभे राहिले, त्यावर उत्तरं शोधताना कोणत्या खटपटी-लटपटी कराव्या लागल्या, हे विस्ताराने सांगितलं आहे.

निवेदन नर्मविनोदी, खुसखुशीत आहे. त्यातून ९० च्या दशकाच्या अखेरीस सिलिकॉन व्हॅलीत कशी कामं होत होती, तिथलं तेव्हाचं culture, हाय-स्पीड इंटरनेट हे तेव्हा तिथेही नवलाईचं असणं, तरी यांचा असा बिझिनेसचा निर्णय, या गोष्टींचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. वाचायला खूप मजा येते.

तेव्हा अमेरिकेत DVD rental विश्वातली दादा कंपनी Blockbuster शी यांना झगडावं लागलं. ॲमेझॉनही होतं, तेव्हा ॲमेझॉन फक्त पुस्तकविक्री करत होतं. त्यांचाही बिझिनेस वाढवण्याचा विचार होता. नेटफ्लिक्सचा DVD sales चा बिझिनेस जोरदार सुरू झाला होता. पण त्यांना DVD rental मध्ये जास्त रस होता. तो का हे सुद्धा पुस्तकात सांगितलंय. ॲमेझॉनशी भागीदारीचा विचार झाला. बेझोससोबत मीटिंग्ज झाल्या. पण ते प्रत्यक्षात उतरलं नाही.
डॉट कॉम लाटेत नेटफ्लिक्स बुडलं नाही, ते केवळ हेस्टिंग्जमुळे, असं पुस्तकात म्हटलंय. मात्र त्यानंतर कंपनीतल्या अनेकांना कामावरून काढून टाकावं लागलं. तो सगळा भागही अगदी उत्कटतेने लिहिलाय.

एका टप्प्यावर Blockbuster ला आपली कंपनी विकून टाकावी या निर्णयावर रॅन्डॉल्फ-हेस्टिंग्ज आले होते. ती बोलणीही फिसकटली. पण त्यातून नेटफ्लिक्सचं monthly subscription, DVD wishlist या कल्पना पुढे आल्या. त्या ताबडतोब राबवल्या गेल्या. त्यानंतर मात्र नेटफ्लिक्स सुसाट निघालं.

१९९७ साली कंपनी स्थापन झाली. २००२ साली रॅन्डॉल्फ त्यातून बाहेर पडला. त्याचं कारण तो सांगतो- He was a start-up guy. जगड्व्याळ कंपन्या चालवणे ही त्याच्या विशेष आवडीची बाब नव्हती. त्यामुळे त्याने विचारपूर्वक, हेस्टिंग्जशी बोलून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

पाच वर्षांचा हा सगळा प्रवास रंगतदारपणे सांगितलाय. क्वचित काही ठिकाणी जरा पाल्हाळ वाटलं. पण एकूण पुस्तक गोष्टीवेल्हाळ आहे. नक्की वाचण्यासारखं आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त ओळख. मार्क रॅण्डॉल्फच्या दृष्टीने या सगळ्याची माहिती वाचायला आवडेल. मी "नेटफ्लिक्स्ड" नावाचे पुस्तक, "बिझिनेस वॉर्स" या पॉडकास्ट मधली "नेटफ्लिक्स वि. ब्लॉकबस्टर" ही सिरीज (ही नक्की ऐका) व वेळोवेळी रीड हेस्टिंग्ज बद्दल आलेली माहिती/त्याच्या मुलाखती असे बरेच वाचले/ऐकले आहे. त्यात साधारण याच काळात ब्लॉकबस्टर व नेफि दोन्हीचा अगदी "नेहमीचा कस्टमर" असल्याने या कंपनीची इनोव्हेशन्स, त्याला ब्लॉकबस्टर ने केलेला शह द्यायचा प्रयत्न - हे दोन्ही एक कस्टमर म्हणून व स्वतः अनुभवलेले आहे व नंतर कंपन्यांच्या स्पर्धेबद्दल वाचायला आवडत असल्याने डीटेल वाचलेले आहे. फार इंटरेस्टिंग आहे ते.

याने २००२ मधे सोडल्याने नेफिचा नंतरचा "स्ट्रीमिंग" चा प्रवास यात नसावा. तो या वरच्या पुस्तक्/पॉडकास्ट मधे आहे. तो ही भारी आहे.

एक वेळ अशी होती - साधारण २००८/०९ च्या सुमारास - जेव्हा ब्लॉकबस्टर ने डीव्हीडीज ऑनलाइन ऑर्डर करा व नंतर जवळच्या स्टोअर मधे परत करा व तेथेच दुसरी बदलून घ्या - ही योजना सुरू केली होती. ती नेफिपेक्षा सरस होती. ते जर ती योजना अजून सहा महिने चालवू शकले असते तर त्यांनी नेफिला स्पर्धेतून बाहेर काढले असते व कदाचित ती कंपनी पुढे टिकली नसती. पण ते हे का करू शकले नाहीत व त्यामुळे स्वतःच नामशेष झाले - ही सगळी माहिती रंजक आहे. त्यात जर आपण ती एक ग्राहक म्हणून अनुभवली असेल तर अजूनच. बाकी ब्लॉकबस्टर च्या अजून बर्‍याच त्रुटी होत्या. जुनी कंपनी, जुन्या विचाराचे शेअरहोल्डर्स, अंतर्गत राजकारण वगैरे. तो ही भाग आहे.

अ‍ॅमेझॉन वि. बार्न्स अ‍ॅण्ड नोबल च्या स्पर्धेबद्दलही अशीच रंजक माहिती आहे. "डिस्र्पटिव्ह" कंपनी व त्या क्षेत्रातील "एस्टॅब्लिश्ड" कंपनी यातील अशी अनेक द्वंद्वे गेल्या दोन दशकात खेळली गेली आहेत.

मार्क रॅन्डॉल्फचं कंपनीत भाषण आयोजित केलं होतं, तो बोलतो पण मस्त. पुस्तक वाचायला हवं.
Lovefilm नावांची कंपनी इथे ते फिल्म रेंटल चालवायची, मी होते ग्राहक Happy बाकीची माहिती बघते शोधून.

फा, मस्त प्रतिसाद.

पुस्तक वाचताना हेच डोक्यात येत होतं की त्या काळात ब्लॉकबस्टर आणि सुरुवातीचं नेटफ्लिक्स दोन्ही सर्विस वापरलेले माबोकर असणारच.

पॉडकास्ट शोधते.