जेवणाचा डब्बा

पोळी-भाजी केंद्रे

Submitted by स्वाती२ on 27 December, 2013 - 10:02

आजकाल बर्‍याचदा आपल्याला बाहेरच्या जेवणाची गरज भासते. कधी अचानक बाई रजेवर जाते, कधी आजारपण+ पाहुणे मंडळी असे होते. कधी कामाच्या वेळा सोईच्या नसतात. हॉटेलातले चमचमीत खाणे एक-दोन दिवस चालतेही. पण रोजच्या पोळी भाजीची सर त्याला नाही. अशावेळी मदतीला येते ते पोळीभाजी केंद्र. तुमच्या भागातील चांगल्या पोळीभाजी केंद्रांची माहिती या धाग्यावर दिलीत तर गरज पडल्यास खात्रीचे केंद्र शोधायला उपयोग होईल.

वाशीत डब्बा पुरवणारी अथवा जेवण करून देणारी बाई हवी आहे तातडीने

Submitted by मनःस्विनी on 16 December, 2009 - 01:12

एक विनंती आहे इथे वाशीमधील रहण्यार्‍यांपैकी कोणाला माहीती असल्यास, माझ्या ओळखीतल्या जवळच्या काकांची अपघातामूळे जेवण करू शकत नाहीत. हॉटेलमधील तिखट,तेलकट खाणे पचत नाही.
खूपच वाईट अवस्था आहे त्यांची जेवण्याची. कोणी सांगू शकेल का कुठे साधे शुद्ध शाकाहरी जेवण/डबा मिळेल वाशीत? नाहीतर कोणाला अशी काही कंपनी माहीती आहे का जी जेवण करणारी बाई उपलब्ध करून देतात?

कुठे लिहायचे नक्की कळले नाही व हे खास वाशी मधील साठी होते म्हणून इथे लिहिले. मला ई-मेल केले तर चालेल. धन्यवाद.

मला व माझ्या कुटींबीयाना वाशीतली काहीच माहीती नाही व आता आम्ही मुंबईतच रहात नाही तेव्हा कसे कळणार.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - जेवणाचा डब्बा