मनुष्य आणि त्याचे आधुनिक शोध

Submitted by राजपुर on 4 October, 2013 - 14:20

वाहने आली, मनुष्याची चालण्या, धावण्याची क्षमता कमी झाली.

टंकलेखन सुरु झाले, हाताने धड चार पाने सरळपणे लिहु शकत नाही माणुस, चारदा मध्येच बोटे मोडेल दुखतात पंजे म्हणुन.

कानात सतत इयर पीस ठुसुन फोन आणि गाणी ऐकत राहिल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी झाली.

कॅलक्युलेटर वापरायची तर ईतकी संवय झाली आहे मनुष्याला कि साधी रोजच्या व्यवहारातली गणितंही सर्रास "कॅलसी", वर चालतात.

मोबाईल फोन्स आणि कंम्प्युटर मुळे पुष्कळ गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या भानगडित मनुष्य पडतच नाही. स्मरणशक्ति बोथट होत चालली आहे.

दिवसातुन जवळ जवळ ९तास नुसती स्क्रीन्स ( मोबाईल वा कंम्प्युटरची ) पाहाण्यातच जात असल्याने डोळ्यांची अवस्था गडबडली. चष्मे लवकर लागायला लागलेत.

अश्या पुष्कळश्या गोष्टी आहेत जिथे मनुष्याची शारिरीक क्षमता हळु हळु कमि होत चाललेली दिसते.

आता तो दिवस अंधुकसा डोळ्यांपुढे येतो जेव्हा मनुष्याची सर्व कामे त्याचे पर्सनल कंम्प्युटर करत असणार आणि हे महाशय जवळ जवळ नि:सहाय अवस्थेस पोहोचले असतील.

हे बरोबर आहे का ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योग्य ऑप्शन निवडा
अ] हे सगळे परप्रांतीय आल्यामुळे घडतेय
ब] हे सगळे परकीय आक्रमक आल्यामुळे घडतेय
क] हे सगळे हिंदू धर्माची निंदा केल्यामुळे घडतेय
ड] हे सगळे वेदातील विज्ञान विसरल्यामुळे घडतेय
इ] हे सगळे भाजपची सत्ता न आल्यामुळे घडतेय

नन ऑफ एनी ऑफ दीज फनी रिप्लायज् !

पियु ? परी असुन तोंडात दात दिसत नाहित ?

विचकण्यासाठी " Proud " हे ऑप्शन वापरा.

जे वरती बायकांना ऑफर केलें तेच तुलाही लागु होते इब्लीसा Happy

सेम टु यु अ‍ॅज तोंडाचं बोळकं दाखवणारी..........

तात्पर्यः

वाहने वापरु नका. ऑफिसात चालत जा आणि चालत या. भले तुम्हाला ऑफिसात जायला एक आणि परत यायला एक दिवस का लागेना.

टंकलेखन बंद करा. मायबोलीवर स्वतःच्या हाताने लेखी लेख लिहून तो अपलोड करायची सुविधा असावी. स्वतःच्या हस्ताक्षरात लिहील्याने डु आय देखील ओळखता येतील.

मोबाईल आणि संगणक वापरु नका. निरोप द्यायचा झाल्यास पत्र पाठवा. सध्या वाढलेल्या कबुतरांचा योग्य वापर करता येइल.

आणि राहुल १२३, प्रतिसाद देण्यासाठी राजपुरला पोस्टकार्ड पाठवा.
Biggrin
दात दाखवण्यासाठी G वापरा Wink

लिहायची सवय अजूनतरी बर्यापैकी टिकून आहे पण आकडेमोडीची सवय नक्कीच सुटत चाललेय लोकांची.
माझ्या गावात तरी दुकानदार, रिसेप्शनिस्ट सगळे कॅल्सी वापरतात साध्यासोप्या हिशेबाला.
पन्नासची नोट देऊन पस्तीसची वस्तू घेतली तर परत किती करायचे यासाठी पण लोकाना कॅल्सी लागतो.

स्क्रीन आणि काँप्युटर रिलेटेड डोळ्यांच्या आणि इतर विकारांचे पद्धतशीर डॉक्युमेंटेशन झालेलेच आहे.

माणसांची चालायची क्षमता पण कमी होत्येय.
अगदी साध्या गावातसुद्धा हल्ली वडापच्या रिक्षा वैगेरे मिळत असल्याने लोक चालणं विसरू लागलेत.

यावर मी काढलेला उपाय म्हणजे शक्य तिथे यंत्रं टाळायची.सोप्पे हिशोब तोंडी करायचे.
मुलांना तोंडी गणिते करायला शिकवायची. ( मेंदूला अश्याप्रकारे चालना दिल्यास अल्झायमर सारखे स्मृतीभ्रंशाचे विकार होण्याची शक्यता थोडीफार कमी होते.)
मुलांना जवळच्या अंतरावर चालतच घेऊन जायचं.
क्लिनिकला शक्यतो चालत जायचं.

मुलांना गरज नसताना उगाच मोबाईलगेम, टिवी, काँप वापरू द्यायचा नाही.

माझा स्क्रीन टाईममात्रं कमी होत नाही. Wink

यावरुन एक निबंध आठवला - दार्वीनच्या थेअरीनुसार, १०००+ वर्षांनी म्हणे माणसाला फक्त मेंदू, डोळे आणि एकच बोट असेल, अशी एक कल्पना एकाने मांडली होती. Happy

आडनावावरुन तरी जातीयवाद पेटणार नाही (अशी आशा)
> > >

आडनांव कशाला ? असले रिकामे वाद सुरु करायला आपल्या माबो वर भरपूर टवाळ आहेत,

सर्व तेच आपल्याआपण लावतात असो.

आधुनिकी करणाने फायदे आणि नुकसान कसे व कोणत्या दूर दृष्टीने होऊ शकते हा ह्या धाग्याचा मूळ मुद्दा,

आता डार्विनची थेरं ( थिअरीज ), मला पटत नाहित. नवा गडी उभा करा भाऊ !

आम्हाला जर कोणाची मतं पटत नसली तर आम्ही अपमानकारक, अभद्र, अमंगळ, तुच्छ लेखणारी भाषा, वाद वाढवणारी भाषा न वापरता सरळ बोलुन मोकळे होतो.

कारण अश्या भाषा वापरणारे आमच्या खिजगणतित नाहित. त्यांच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही फालतु आमच्याकडे.

राजपुर, तुमच्या लेखाचा रोख गेल्या २०-३० वर्षात विकसित झालेल्या तंत्रज्ञानावर व तांत्रिक वस्तुंच्या वापरावर आहे. पण अजून थोडा विचार केलात तर आढळून येईल की आदिमानवाने आगी कशी लावायची व नियंत्रित करायची (माबोवरील आग लावणे नव्हे, खरीखुरी) ह्याचा शोध लावल्यावर आपले कच्चे मांसभक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले दात/नखे वगैरे बदलले. वस्त्राच्या/निवार्‍याच्या नवीन वस्तुंच्या शोधानुसार अंगावरील केस/थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लागणारी नैसर्गिक क्षमता कमी होत गेली. हे होत आले आहे व होत राहील. घोडे/बैल ह्यांना पाळायला लागल्यापासून चालण्याची/धावण्याची क्षमता कमी होत गेली. नैसर्गिक उत्क्रांतीपासून आपण आता मानवाने गती दिलेल्या उत्क्रांतीकडे गेली हजारो वर्षे झाली वळलेलो आहोत. आता त्या गतीचा वेग/वेळ (अ‍ॅक्सलरेशन) वाढते आहे इतकेच.

तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: हो, बरोबर आहे.

>>>
आता डार्विनची थेरं ( थिअरीज ), मला पटत नाहित.>>>
अच्छा असं आहे होय. मग आता तुमची थेअरी सांगा.

>>>
आता डार्विनची थेरं ( थिअरीज ), मला पटत नाहित.>>>
अच्छा असं आहे होय. मग आता तुमची थेअरी सांगा.>>>>

त्यांची थेअरी दशावताराची आहे.
१. एका मोठ्ठ्या शिंगवाल्या माशाने प्रलया मधून ब्राह्मण मनुला वाचवले
२. सापाची दोरी आणि पर्वताची रवी वापरून समुद्रमंथन करत असताना एका मोठ्ठ्या कासवाने तो पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरलेला. या मंथना मधून लक्ष्मी, अप्सरा, दारू, कामधेनु, कल्पवृक्ष इत्यादी रत्ने बाहेर आली.
३. एका राक्षसाने पृथ्वीच पळवून नेली. तेव्हा एका डुकराने, त्या राक्षसाबरोबर ढिशुम-ढिशुम करून पृथ्वी आपल्या सुळ्या वर उचलून परत आणली.
४. एक खूप वाईट राजा होता. इतका वाईट की देवांना त्याची भिती वाटू लागली. सिंहाचे डोके आणि माणसाचे शरीर असलेल्या एका जीवाने त्या सो-कोल्ड दुष्ट राजाला ठार मारले.
५ . एक खूप सत्शील आणि चांगला राजा होता. इतका चांगला की देवांना त्याची भिती वाटू लागली. त्याच्या मनात भरवले की यज्ञ कर आणि ब्राह्मणांना दान दे. मग एक बुटका ब्राह्मण तिथे आला आणि त्याने ३ पावले जमीन दान मागितली. पहिल्या दोन पावलात त्याने अख्खी पृथ्वी, स्वर्ग आणि चराचर व्यापून टाकले. आणि तिसरे पाउल त्या चांगल्या राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला त्याच्या चांगुलपणाबद्दल पाताळात गाडले.
६. अजून एका ब्राह्मणाने मग २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली.
७. उत्तरेकडून आलेल्या एका आर्य राजाने दक्षिणे कडील एका द्रविड राजाचा पराभव केला.
८. एका मुलाने आपल्या मामाचा खून, सॉरी वध केला. मग आपल्या मानलेल्या बहिणीच्या घरगुती भांडणात त्याने एका बाजूचा विजय होण्यामध्ये मदत केली आणि हे अधोरेखित केले की जी बाजू लढाईत जिंकते तिच बाजू सत्याची असे मानले जाते.
९. आणि १० यामध्ये तज्ञांमधे एकवाक्यता नाही. शास्त्रीय चिकित्सा चालू आहे.

माझ्या एका सनातनी मित्राने हिरीरीने असे मत मांडले की खुद्द डार्विन ने उत्क्रांती वाद आपल्या दशावातारातून शिकला.

१. मत्स्य: पहिले जीवन पाण्यामध्ये सुरु जाहले
२. कुर्म: उभयचर जीव तयार झाले.
३. वराह: जमिनीवर प्राणी तयार झाले
४. नरसिंह: प्राण्यांची माणूस होण्याकडे वाटचाल
५. वामन: बटू माणूस
६. परशुराम: माणूस आयुधे वापरू लागला
७. राम: माणूस समुहात राहू लागला
८. कृष्ण: माणूस पशुपालन करू लागला
९. बलराम: माणूस शेती करू लागला
१० कल्की: माणसाकडे प्रचंड विनाशकारी शक्ती आली

दात न दाखवता हसणे हाही एक आधुनिक शोध आहे.
>>
अरे बापरे! असे दात न दाखवता हसल्याने दात नष्ट तर नाही ना होणार? Happy

शारिरीक क्षमतां बरोबर बौद्धिक क्षमता ही पुष्कळच कमि झालेली दिसते आहे. >>>> डार्विनला विचारवं लागेल. Biggrin
बाकी हे प्रचंड धाडसी विधान आहे.