|| तत्सत् || सर्व मायबोलीकर ! येतो आम्ही . . . .

Submitted by परब्रम्ह on 9 August, 2013 - 12:48

सर्व मायबोलीकरांस नमस्कार,

यत: प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् |
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धीं विंदति मानवा: ||

ज्याच्यापासुन सर्व भूतांची प्रवृत्ति झाली, व ज्याने हे चराचर विस्तारिले आणी व्यापिलेही आहे, त्याची पूजा आपल्याला प्राप्त झालेल्या कर्मांनी केली, म्हणजे त्यानेच मनुष्याला सिद्धी प्राप्त होते.
-----
मी भगवंताची तीव्र भक्ति म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म सर्वव्यापी आहे म्हणुनच माझ्यासमोर, माझ्या अंतरंगांत आणी मला अगम्य अश्या विश्वातही आहे ह्याच विश्वासाने, सर्व कर्मे करतो.
तोच सर्वत्र ओतप्रोत भरलेला आहे ह्याच जाणीवेने वागतो. ( भावनांवर संयम राखण्याचा अटोकाट प्रयत्न करतो, पण कधी-कधी संयम तुटतो तो त्याची अवहेलना झाली तर ).
त्याच्याशीच मनोमन संवाद करतो, आणी त्यात प्रेरणा आणी मार्गदर्शन घेतो.
त्यालाच सर्व कर्मे अर्पण करुन मनोमन अलिप्त राहातो.
प्रत्यक्ष त्यालाच भजतो.
जे काही भक्षण करण्यास मिळते ते सर्व काही त्यालाच सर्वप्रथम अर्पण करतो ( आता ही संवय झाली आहे, काहीही असेल ते मनोमन आपोआपच त्यालाच अर्पण होते, मगच मुखात जाते ).

वरील प्रमाणे आचरण करतांना काहीही कठीण वाटत नाही.
वरील प्रमाणे कर्म करतांना धर्म, वेद, उपनिषदे, पुराण, शास्त्रे, गुरु - शिष्य, भौतिक, आधिभौतिक आणी अध्यात्मही मध्ये कुठेच येत नाही . . . . ते सर्व मला कर्म कांडच वाटतात. ( ह्याचा अर्थ असा नाही कि अध्यात्म, वेद, शास्त्रे, गुरु, पुराणे आदी नगण्य झाले ! नाही ).

मला फक्त एकच गोष्ट अनुभवते, वरील प्रमाणे तीव्र आणी सरळ भक्ति, मग बाकी सर्व कुठे आले ह्यामध्ये !

राहाता राहिली एकच गोष्ट, मी आणी तो अशी प्रत्यक्ष द्वैत भावना, ही जेव्हा अद्वैतात परीवर्तित होईल ( जाणीव आहे लवकरच होणार ), म्हणजेच माझ्यातला तो आणी शरीराबाहेरील परब्रह्म एकच ही जाणीव, हा प्रत्यक्ष अनुभव ( काही वेळेस अवश्य अनुभवले आहे हे अगदी काही क्षणांसाठी ), नीत्य काळासाठी येणे.

सर्व कर्मे भगवंतालाच अर्पण करीत वाटचाल करतो आहे, काही कमि-जास्त माझ्याकडुन बोलले गेले असेल तर मोठ्या मनाने मला क्षमा करावी आपण सर्वांनी.

सर्व जण चांगले आहात, सुशि़क्षित आहात, धार्मिक आहात ( काहीजण नास्तिक असलात तरीही Happy ),
जाणकार आणी अनुभवी आहात. . . . तिरस्कार सोडुन एकमेकांच्या विचारांची देवाण - घेवाण करीत चलावे, ज्ञान वर्धनच होईल.

आपल्या "अक्षर", अवस्थेत तो सर्वव्यापी परमेश्वर आपल्याच मायेने निर्मिलेल्या ह्या चराचरात आपल्या शक्तिने लवलवत आपल्या शरीरात आणी शरीराबाहेर प्रत्यक्ष अस्तित्वात आहे, त्याला ओळखा, ओळखण्याचा प्रयत्न करा . . . . हा निर्गुण असतो म्हणुनच आपल्यालाच चार पाऊले पुढे जावे लागेल, आणी तसे केल्यास हा परमपिता परमेश्वर, सर्वशक्तिमान भगवान प्राप्त होईलच.

ईथे सर्व जाणकार, पंडित, धार्मिक लोकं हे त्याचेच अवतार सर्वांचे उद्धार करण्यास आणी ज्यांना तर्क-कुतर्क करुन हेटाळणी करण्यात आनंद ( काही जणांच्या भाषेत " मजा " ), मिळतो वा समाधान होते ते सर्व ही त्याचेच अवतार, उद्धाराचीच वाट पाहाणारे अश्याच भावनेने ह्या मायबोलीच्या जगात वावरलो, म्हणजेच हा एक भगवंताने प्रेरणा देऊन निर्मिलेला मंच अशी भावना होती.
कुणाची ही अवहेलना करण्याचा हेतु कधीच नव्हता आणी नाही आहे. सर्वांस समान सन्मान देण्याचाच प्रयत्न केला.

मायबोली ह्या सर्वांच्या उपस्थितीने सजली आहे, हा मंच कृपया सर्वांनी मिळुन अत्यंत यशस्वी करावा ही विनंती.

आपणा सर्वांचे कल्याण असो, ही भगवंताच्या चरणी मनापासुन प्रार्थना.

खर्‍या अर्थाने हे लिखाण धार्मिक नाही कारण ह्यात धार्मिक असे काहिच नाही. Happy ह्यात माझा देव आणी मी आहे,

आशा आहे, अजुन ही मी काय म्हणतो ते कळाले आसेल !

परब्रम्ह . . . . आलो स्वेच्छेने आणी प्रस्थानही स्वेच्छेनेच करीत आहे, सादर प्रणाम आपणा सर्वांस. . . .

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेडा राघू जी ....अहो मागील वेळी मी त्याना "भेटूच" म्हणालो होतो व तसे का म्हणालो हेही नंतर सांगीतलेले होतेच ...ते वाचून ते कदाचित मलाच भेटायला आले आहेत !!!!

(लोक म्हणतान ना "इथे भेटलात ते भेटलात ..तिथे भेटू नका !!" तिथे म्हणजे मर्त्यलोकातून गेल्यावर जिथे जातात तिथे ....तसे काहीसे कारण असावे )

किंवा कदाचित इतकी भक्ती करुनही त्यान्ना अजुन मोक्ष मिळालेला नाही.

म्हणून पुनरपि आय डीं पुनरपि धागां .. असे झाले असावे.

Proud