अ‍ॅन्ड्रॉईड: संस्थापक, स्थापना

Submitted by लंबूटांग on 11 February, 2014 - 17:36

इतरत्र पूर्वप्रकाशित

२००३ च्या शेवटी शेवटी असाच एक दिवस. स्टीव्ह पर्लमन -एक हुशार, यशस्वी अभियंता आणि भांडवल पुरवठा/ गुंतवणूकदार - याचा दूरध्वनी खणखणला, पलीकडे होता जुना मित्र आणि सहकारी अ‍ॅन्डी रुबीन जो तिथून जवळच्याच एका भाड्याच्या जागेत आपली कंपनी चालवत होता.

अ‍ॅन्डी: मी कफल्लक झालोय, पैशाची गरज आहे.
स्टीव्ह: कधी पाहिजेत?
अ‍ॅन्डी: आत्ताच्या आत्ता!
Andy Rubin
अ‍ॅन्डी रुबीन
Steve Perlman
स्टीव्ह पर्लमन

स्टीव्हने जवळच्याच बँकेत जाऊन १०० डॉलरच्या १०० नोटा काढल्या. ते १०,००० डॉलर एका साध्या पाकिटात घालून तो अ‍ॅन्डीच्या ऑफिसात गेला आणि त्याच्या टेबलावर ते पाकीट ठेवले. ही तर फक्त सुरुवात होती. पुढील काही दिवसात स्टीव्हने अ‍ॅन्डीला उधार दिलेल्या रकमेची बेरीज झाली होती ह्याच्या दसपट, तब्बल एक लाख डॉलर. (ज्याची परतफेड नंतर अ‍ॅन्डीने १८ महिने स्टीव्हच्या ऑफिसचे भाडे भरून केली). हे एक लाख डॉलर अमूल्य होते कारण हे पैसे वापरूनच अ‍ॅन्डीला त्याच्या नवीन कंपनीच्या धंद्याची रूपरेषा बनवणे शक्य झाले. जिच्याशिवाय कोणताही उद्योजक अ‍ॅन्ड्रॉईड कडे ढूंकुनही बघायला तयार नव्हता.

अ‍ॅन्डी रुबीन हा काही महिन्यांपूर्वीपर्यंत Danger Inc. चा सीईओ म्हणून काम करत होता. ह्या कंपनीने २००२ मध्ये हा बहुधा पहिला इंटरनेट फोन बनवला होता. ह्याच फोनने पहिल्यांदा app store ही संकल्पना मांडली. ह्या फोनने तरुणाई आणि सेलेब्रिटीजचे लक्ष वेधून घेतले. पण काही महिन्यांतच कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेला अ‍ॅन्डी बोर्डाबरोबर झालेल्या चर्चेनंतर ह्या पदावरून पायउतार झाला. त्याने खुल्या दिलाने कंपनीला नवीन सीईओ शोधण्यास मदतही केली.पण नवीन सीईओ सापडताच त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि Cayman Islands ह्या त्याच्या आवडत्या सुट्टी घालवायच्या ठिकाणी निघून गेला.

जात्याच अतिशय हुशार आणि सतत नवीन काहीतरी करण्याचा ध्यास असलेल्या अ‍ॅन्डीच्या डोक्यात एक स्मार्ट कॅमेरा बनवायची कल्पना आली. त्याचे सॉफ्टवेअर लिहिण्यास त्याने सुरुवातही केली. पण एक तर ह्या कल्पनेला मूर्त स्वरूप देण्यास त्याला कोणतीही कंपनी मदत करायला तयार नव्हती आणि लवकरच त्याच्या लक्षात आले की तसेही वर्षाला उणेपुरे ३ कोटी कॅमेरा विकले जातात. त्याला करायचे होते काहीतरी भव्य. त्याच्या लक्षात आले की आपण आधी बनवलेल्या फोनप्रमाणेच, सेलफोन्ससाठी open source प्रणाली बनवली तर तिची मागणी कैकपटीने अधिक असेल.

त्याला त्याच्या जुन्या नोकरीत त्याच्या रोबोट्सवरील प्रेमामुळे आणि Andy Rubin शी साधर्म्य असल्याने Android हे टोपणनाव मिळाले होते. ते नाव वापरून त्याने android.com हे संस्थळ आरक्षितही करून ठेवले होते. तेच संस्थळ आणि आपल्या काही जुन्या सहकाऱ्यांना गोळा करून त्याने ऑक्टोबर २००३ मधे android ही नवी कंपनी सुरू केली. ध्येय होते एक असा प्लॅटफोर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल.

कंपनी सुरू तर केली पण अजूनही कोणती कंपनी/ गुंतवणूकदार नुसता open source प्लॅटफोर्म ह्या कल्पनेवर पैसे लावायला तयार नव्हता. स्वत:चे जमवलेले पैसे वापरून अ‍ॅन्डीने काही काळ तग धरली पण सरतेशेवटी ऑफिस ची जागा रिकामी करायची वेळ आल्यावर मात्र त्याने पर्लमन ला फोन केला.

वर लिहिल्याप्रमाणे एक लाख डॉलर संपेपर्यंत २००५ चा मध्य उलटून गेला होता पण android ची रूपरेषा बऱ्यापैकी तयार झाली होती आणि . ती बघितल्यानंतर मात्र गुंतवणूकदाराचे लक्ष वेधले गेले. ह्या पैकीच एक होता Craig McCaw जो आज Clearwire ह्या mobile operator कंपनीचा chairman आहे. त्याने ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्याच्याशी बोलणी सुरू असतानाच अ‍ॅन्डीने google च्या २ संस्थापकांपैकी एक लॅरी पेज ह्याला ह्या वाटाघाटींबद्दल इ मेल पाठवली. लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन ह्या google च्या संस्थापकांना अ‍ॅन्डी आधी एकदा एका conference मध्ये भेटला होता. ते दोघे बराच काळ SideKick हा फोनही वापरत होते. काही आठवड्यातच १७ ऑगस्ट, २००५ रोजी एका गुप्त रकमेला google ने android विकत घेतली होती.

Larry Page
लॅरी पेज

Larry Page
सर्गे ब्रिन

हा लेख संपवण्याआधी अ‍ॅन्डीच्या दूरदृष्टीची दाद द्यावी लागेल कारण २०१२ च्या जून महिन्यात त्याने twitter वरून घोषित केले की एका दिवसात १.१७ दशलक्ष android उपकरणे activate केली गेली आणि त्या दिवसापर्यंत ४० कोटींहून अधिक android उपकरणे विकल्या गेली होती.

Android च्या ह्या थक्क करणाऱ्या प्रगतीबद्दल पुढील लेखात.

संदर्भः

http://en.wikipedia.org/wiki/Android_(operating_system)
http://en.wikipedia.org/wiki/Andy_Rubin
http://www.nytimes.com/2007/11/04/technology/04google.html?_r=3&hp=&page...
http://online.wsj.com/article/SB1000142405311190425320457651272021435109...
http://news.cnet.com/8301-1023_3-10245994-93.html?tag=mncol
http://www.bubblews.com/news/340798-know-quotandy-rubinquot-brain-of-the...
http://www.eetimes.com/electronics-news/4402119/Andy-Rubin--After-rough-...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयफोन-अँड्रॉयड बेस्ड फोनच्या लुक अँड फील मधील साम्य, आणि त्यावरुन झालेला अ‍ॅपल-गुगल यांच्यातील संघर्ष; निव्वळ या विषयावर हॉलीवुड एक ब्लॉकबस्टर सिनेमा काढु शकतो. Happy

राज, खरंच खूप मसाला भरला होता/ आहे त्या युद्धात. सुरुवातीची स्टीव्ह जॉब्सची चीड चीड तर अगदी बिल गेटस ने विंडोज मधे त्यांचा यु आय वापरल्यानंतरच्या दिवसांसारखीच. नंतर नंतर तर तो अगदी थर्मो न्युक्लिअर वार वगैरे सुद्धा बोलला होता. :).