माझा २ वर्षे जुना सोनी कॅमकॅडोर मध्ये आता बटन ऑन केले कि, "रिट्रायव्हिंग' असा संदेश येतो आणि काहीच होत नाही. शुट, फोटो काही करु शकत नाही. सतत रिट्रयव्हिंग चालु राहते....... उपाय काय करावा?
बॅटरी काढुन, पुन्हा टाकुन ट्राय केले. जमले नाही.
त्यातील डाटा सेफ असेल का? काढता येईल का? भारतात नेउन? बॅकप आहे, पण काही व्हिडीओ चे नाही केलेले. ते जरा कमी महत्वाचे होते. ...
धन्यवाद!
मला इथे (अमेरिकेत) वॉशर/ ड्रायर विकत घ्यायचं आहे. कुठल्या कंपनीचं घ्यावं. घेतानां नेमक्या काय गोष्टी विचारात घ्यायला हव्यात? मी ऑनलाईन बर्याच ठिकाणी पाहिलं, पण त्या माहितीवरुन अजुनच गोंधळ वाढला. मायबोलीकरांकडुन ह्याबाबतीत माहिती मिळाली तर मला वॉशर/ ड्रायर विकत घ्यायला सोप्पं पडेल.
अगाऊ धन्यवाद!
आयफोनवर वापरता येणार्या वेगवेगळ्या अॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्या अॅप्सबद्दल लवकरच लिहीन.
मला भारतात /अमेरिकेत मिळणार्या रुम हीटरविषयी माहिती हवी आहे. इतरान्नाही उपयोगी पडेल असेल वाटते म्हणुन हा लेखनाचा धागा.
भारतात (पुण्यात) रुम हिटर मिळतात त्याचा कुणाला अनुभव आहे का?
असल्यास कोणत्या कम्पनीचा, कोणते मॉडेल चान्गले?
अमेरिकेतुन भारतात नेता येईल का? म्हणजे तिथे २२० वोल्ट ला चालतात का हे हिटर?
नेल्यास कस्टममध्ये काही अडचण येण्याची शक्यता?
अजुन काही पर्याय्/माहिती असल्यास कृपया शेअर करा.
धन्यवाद!!
कोणी Palm Centro, LG Rumor, किंवा Samsung M520 हे फोन वापरले आहेत का? कसा अनुभव आहे? Sprint बरोबरच्या इतर काही मॉडेल्सचा चांगला/वाईट अनुभव दिला तरी उपयोग होईल.