कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by हेमंतकुमार on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नमस्कार मित्रांनो,
मी कुतूहल म्हणून सर्व डाॅक्टर मित्रांना विचारले कि कोवीशिल्ड वॅक्शीन घेताने कोल्ड चेन मेनटेन आहे हे पाहिले का .?बर्याचजणांना विचारले
तर डाॅ अभिजित अन्नदाते नी सांगितले ,

"नाही. मी एका समजुतदार, शहाण्या पेशंटसारखा स्टूलवर बसलो, बाही वर केली, लस टोचून घेतली आणि बाहेरच्या हाॅलमध्ये येवून अर्धा तास बसलो, रिअॅक्शन काही आली नाही, पॅरासिटॅमाॅलच्या गोळ्यांची पुडी घेतली, सिस्टरचे व गोळ्या देणार्यचे मनःपूर्वक आभार मानून घराचा रस्ता धरला. सिस्टरने काय टोचलं, ते कुठं ठेवलं होतं, कूठून काढलं काही पाहिलं नाही. कोल्डचेन मेन्टेन नसेल हा विचार डोक्यात आलाही नाही. "

अतीशय प्रातिनिधिक हे उत्तर आहे.

सर्वांनीही हेच केलं आणि त्यात वावगं काहीच नाही.

पण मी IMA, YEOLA BR.PRESIDENT ची जबाबदारी म्हणून दोन व्हॅक्शीन सेंटरला भेट दिली..तर खालील प्रकार आढळले

एका ठिकाणी व्हायल आईस क्यूबमध्ये होती पण आईस क्यूबमध्ये बर्फाऐवजी पाणी होते.

दुसर्या ठिकाणी चार वाजता पश्चिममेच्या खिडिकितून उन टेबलावरील व्हॅक्शीन व्हायल वर पडत ,व्हॅक्शीन गरम झालं होतं त्यातूनच टोचण्याचा कार्यक्रम चालू होता.
दोन्हीही ठिकाणी व्हॅक्शीन व्हायल पकडायला थंड केलेला फोरसेफ नव्हता अगदी मुठीत व्हायल घट्ट पकडून सिरिंजने व्हॅक्शीन काढून टोचलं जात होतं.

ही गोष्ट तुम्हाला आम्हाला सर्वांना मनाला यातना देणारी आहे.

म्हणून मी ठरवलं IMA चा प्रतिनिधी म्हणून याबद्दल डाॅक्टरमध्ये जागरूकता अभियान चालू करावं म्हणून हा लेख...........

सध्याच्या कोरोना लसीकरणात कोल्ड चेन मेनटेन न झाल्यास ही लशीकरण मोहीम वरदान ठरण्याऐवजी शाप ठरेल.

कारण....

1.कोव्हीशिल्ड हे व्हॅक्सीन प्राण रक्षक आहे...पण ते तितकेच नाजूकही आहे.

2. त्याचे तपमान (टेंप्रेचर) 2ते10 डीग्री सेंटीग्रेड राखलं गेलं(मेन्टेन झालं) तरच आणि तरच ते उपयोगी आहे.

3. तपमान राखलं गेलं नाही तर व्हॅकशीनचे इंजेक्शन म्हणजे शुध्द पाण्याचे (डिस्टील्ड वाॅटरचे) इंजेक्शन घेतल्या सारखे होईल व त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि कोरोना पुन्हा होईल.

4. व्हॅक्शीन कारखान्यात तयार झाल्यापासून तर थेट पेशंटला टोचण्यापर्यंतचा हा प्रवास खूप मोठा आहे व अनेक स्तरातून (स्टेजमधून) जाणारा आहे.अनेक व्यक्ती, वाहने, साठवणूक शीतयंत्र ( रेफ्रीजेटर्स), टोचणार्या व्यक्ती यांच्या हातातून जाणारा आहे.

5. या सर्व प्रवासात त्याचे तपमान 2 ते 8 डिग्री राखणं म्हणजेच त्याची शीत साखळी (कोल्ड चेन)मेन्टेन करणे अत्यंत जटील आणि जबाबदारीचे काम आहे.

6. आज मेडियावर चर्चा आहे कि काही लोकांना दोन्ही डोस घेऊनही पुन्हा करोना होत आहे. तर त्या लोकांना ही "कोल्ड चेन (शीत साखळी ) मेन्टेन झाली नसलेली " लस टोचली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
7. कारण ही लस साठवण्यासाठी साधा फ्रीज चालत नाही. याचे कारण त्याचे टेम्प्रेचर (तपमान) सतत कमी जास्त होत राहाते. समजा हा साधा फ्रीज फार वेळ बंद राहीला म्हणजे उदा. जेव्हा रात्रभर बंद असतो तेव्हा तपमान हे 2 डिग्रीच्या खाली जाते बर्फ तयार होते आणि जर फ्रीज उघडला तर आतली थंड हवा जड असल्यामुळे झटकन खाली पायाकडे जाते याचा पायांवर एकदम थंड झोत येण्याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे पण त्याच वेळेला लगेच वरची गरम हवा फ्रीजमध्ये घुसते. ही गरम हवा थंड होताने , तपमान एक डिग्री सेल्सियसने कमी होताने लॅटन्ट हीट 540 कॅलरीज रीलीज होते त्यामुळे सुरुवातीला फ्रीजची आतली हवा गरम होते व ताबडतोब तपमान 8 डिग्री च्या कितीतरी वर वाढून जाते. म्हणजेच व्हॅक्शीन ठेवण्यासाठी ह्या फ्रीज उपयोग चा नाही. तसेच ही लस चुकून जरी गोठली गेली तरीही देखील तिची क्षमता नष्ट होते.

तर अशा लशीसाठी स्पेशल असा ILR(आईस लाईन्ड रेफ्रीजेटरच) पाहिजे असतो. त्याची रचना म्हणजे त्याच्या कडेला एकमेकांना चिकटून उभ्या बर्फ भरलेल्या नळ्या बसवलेल्या असतात.शिवाय तो आडवा असतो त्यामुळे उघडला तेव्हा त्यातील जड थंड त्यातच राहते व त्याचे तपमान स्थीर 2 ते 8 डिग्री च असते. हे आपणा सर्वांना माहीत आहे.

"लशीचे बर्फ करायचे नाही तर ती बर्फाशेजारी ठेवायची आहे. "

8. असे ILR सरकारी दवाखान्यात असतीलच पण लस टोचणार्या खाजगी हाॅस्पिटल मध्ये असे फ्रीज आहेत का याची खातरजमा करून घेणे जरूरीचे आहे. नसतील ती खाजगी लस केंद्रे तबडतोब बंद करावीत.

9. या ILR पासून तर पेशंटला मिळेपर्यंतचा व्हॅक्शीन चा प्रवास व हाताळणी ही अत्यंत महत्त्वाची आणि जबाबदारीची असते.

8. ILR मधून व्हॅक्शीन काढून ती व्हॅक्शीन सेंटरवर पोचवण्यासाठी ती "व्हॅक्शीन कॅरियर" या बाॅक्समध्ये टाकून न्यावी लागते. तर ह्या "व्हॅक्शीन कॅरियर " मध्ये व्हॅक्शीन बाटल्या ज्याला मेडीकल भाषेत "व्हायल" म्हणतात त्या ठेवताने सरसकट एकदम ओंजळ भरून कांदे बटाटे घेतले आणि व्हॅक्शीन कॅरियर मध्ये टाकले असे करता येणार नाही कारण त्याचा शरीराशी संपर्क येईल व त्याचे तपमान आपल्या शरीराईतके म्हणजेच 37.5 डिग्री ला पोचेल आणि व्हॅक्शीन निरोपयोगी होईल.

10. तर ...ही प्रत्येक व्हायला एक एक करून आगोदरच थंड करून ठेवलेल्या चिमट्याने अलगद उचलून व्हॅक्शीन कॅरियर मध्ये ठेवायला पाहिजे.

10. हा व्हॅक्शीन कॅरियर ज्यात एक तास अगोदरच आइस पॅक ठेवून थंड केलेला असावा. नाहीतर घेतला व्हॅक्शीन कॅरियर आणि भरले त्यात व्हॅक्शीन, तर या रूम टेम्रेचरला असलेल्या म्हणजे गरम , 28 -30 डिग्रीला असलेल्या हवेने या व्हॅक्शीन कॅरियर मध्ये व्हॅक्शीन व्हायलचे तपमान वाढून व्हॅक्शीन निकामी होऊ शकते.
लस भरल्यावर व्हॅक्शीन कॅरियर टाईट बंद असावा.

11. आता व्हॅक्शीन सेंटर वर हे व्हॅक्शीन कॅरियर नेताने सावलीत व जमल्यास ए सी गाडीतूनच न्यावेत. कुठल्याही परिस्थितीत गाडीतून नेताने त्यावर गाडीच्या खिडकीतून येणारे उन पडणार नाही याची काळजी घ्यावी.

12. व्हॅक्शीन टोचण्यसाठी एक एक व्हायला बाहेर काढताने पूर्वीच थंड (प्री कूल्ड) केलेल्या चिमट्यानेच पकडून बाहेर काढावे.मुठीत पकडून नाही.

13. बाहेर काढेलेले व्हॅक्शीन आइस पॅकमध्येच ठेवावे.
त्या ऐवजी बर्याच ठिकाणी बाहेरच टेबलावर पडलेले व्हॅक्शीन व्हायल ( बाटली) दिसते , किंवा आइस पॅकमध्ये ठेवलेले तर दिसते पण आईस पॅकमध्ये आइसचे पाणी झाले तरी नवा आईस पॅक घेतला जात नाही, किंवा सध्या उन्हाळा सुरु झाला आहे, खिडकितून टेबलावर उन येत आहे. त्या टेबलावर हे व्हॅक्शीन व्हायल ठेवलेले दिसतात तर अशा व्हॅक्शीनचा काहीही उपयोग होणार नाही.

14. शेवटची व महत्त्वाची स्टेप जिथे हमखास चूक होतेच ती म्हणजे व्हॅक्शीन बाटली सर्व बोटांनी किंवा मुठीत पकडायची नाही..कारण सरळ सरळ आहे तसं जर झालं तर व्हॅक्शीनचं तपमान शरीराइतके होऊन व्हॅक्शीन निकामी होइल. त्यासाठी बाटली अंगठा व अंगठ्याजवळचे बोट यानेच व ते ही बाटलीच्या तोंडाला जिथं आत रबरी बूच आहे (स्टाॅप रबर) आहे तिथं पकडून तिच्यातून हवं तेवढा डोस काढून झाल्यावर ताबडतोब आइसपॅक मध्येच ती बाटली ठेवावी. म्हणजे तपमान मेन्टेन राहील.

अशी ही प्रक्रिया आहे.तीचे सखोल ट्रेनिंग सर्व आरोग्य कर्मचार्याना दिलेले आहे.

पण कामाच्या रगाड्यामुळे प्रत्यक्ष लस देणार्या व्यकतीकडून त्याकडे दुर्लक्ष होते. आणि तसे झाले तर कोट्यवधी रूपये किमतीचे हे औषध वाया जाईल आणि हे प्रचंड श्रम वाया जातील.

असं होऊ नये म्हणून यावर लक्ष ठेवणारी फिरती पथकं तयार करावी.त्यांनी या व्हॅक्शीनेशनवर कडक नजर ठेवावी.

सरकारी लोक म्हणतात ह्या व्हॅक्शीनची क्षमता 70% च आहे. ते खरंच असेल .पण जरी ह्या लशीची क्षमता 70-80 टक्केच आहे म्हणजे 100 टक्के सरंक्षण ती देऊ शकत नाही पण काटेकोर कोल्ड चेन मेन्टेन केलेली लस टोचली गेली तर जे 70% सरंक्षण मिळेल, जीव तर वाचेल. मृत्यू होणार नाही.

पण कोल्डचेन मेन्टेन न केलेली लस टोचली गेली तर कुणालाही अजिबात कोरानापासून सरंक्षण मिळणार तर नाहीच ....

मात्र ....मात्र......

जनता लस घेतल्याच्या फसव्या भ्रमात राहील... मास्क वापरणार नाहीत...काळजी घेणे बंद करतील. आणि मग कोरोना केसेस अशाच भरमसाठ वेगाने वाढत राहतील.

मृत्यूचे हे तांडव असेच चालू राहील.

लसीकरणातून सरंक्षण मिळण्याऐवजी आपल्याला तो शाप ठरेल.
याची सद्सद्विवेक बुद्धी ने नोंद घ्यावी, काळजी घ्यावी.

डॉ. सुदाम पाटील...
प्रेसिडेंट, आय. एम्. ए. येवला

Whatsapp forward
ह्यात कितपत तथ्य आहे?

डॉ. रवी,
आपण आस्थेने या व दुसर्‍याही धाग्यावर प्रतिसाद दिलात त्याबद्दल मनापासून आभारी आहे.
आपणही आपले अनुभवाचे बोल जरूर सांगावेत
धन्यवाद !

कुठलीही लस घेतल्यावर लोकांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिसून येतात, काहीच नाही/ अगदीच सौम्य ते दोन-तीन दिवस ताप वगैरे. यावरून कोव्हिडच्या नसेल पण पूर्वीच्या लसींबद्दल काही अभ्यास आहेत का?
काहीच नाही किंवा सौम्य प्रतिक्रिया असणाऱ्यांची त्या विषाणुंबाबत प्रतिकारशक्ती चांगली, जास्त प्रतिक्रिया दिसून आलेल्यांची त्या तुलनेत कमी वगैरे?

मानव, चांगला प्रश्न.
याचे उत्तर खूपच गुंतागुंतीचे आहे. निरनिराळ्या लसींच्या बाबतीत शरीर प्रतिसादाचे असंख्य प्रयोग झालेले आहेत. एखाद्याचे शरीर लसीला कसा प्रतिसाद देते हे किमान २५ घटकांवर अवलंबून असते !
नमुन्यादाखल खालचे चित्र पहा :

response to vacc.jpg

थोडक्यात, वय, लिंग, वंश, लसीचा प्रकार, इतर आजार, व्यसने .... आणि असंख्य गोष्टींचा या प्रतिसादावर परिणाम होतो. त्यामुळे अगदी एका परिच्छेदात हा विषय मांडणे खरंच अवघड आहे.

ताप येणे हे प्रतिसादाचे एक लक्षण असते; पण तो आला नाही म्हणजे प्रतिसाद नाही असेही म्हणता येत नाही.
नंतर Abs व टी पेशी किती निर्माण होतात ते महत्वाचे.
तूर्त इतकेच.

माझ्या ओळ्खीतल्या ७५+ वयाच्या काकांना दिल्लीला कोव्हॅक्सिन मिळाले. ६०+ साठी सुरु केले त्या पहिल्या दिवशीच जाउन त्यांनी व्हॅक्सिन घेतले. त्यांना कसलाही त्रास झाला नाही. त्यांचे त्यांच्यापेक्षा ३-४ वर्षे लहान शेजारी. त्यांना सुद्धा तेच व्हॅक्शिन मिळाले. त्यांना २ दिवस सौम्य ताप आलेला व अंग दुखले.

पहिला शॉट कोव्हीशील्ड आणि तुटवड्यामुळे दुसरा शॉट कोव्हॅक्सिन घेता येतो का?
दुसरी गोष्ट अशी की वर कोल्ड चेन बद्दल जे लिहिले आहे येवल्याचे तेवढी गम्भीर स्थिती आहे का ... अन्य ठिकाणि काय स्थिती आहे?
अत्यंत निराशाजन्क आहे वाचलय ते.....
इतर डॉक्टर (या फोरम वरील) प्रकाश टाकू शकतील काय?

कोविडचे डोस सेंटर मोठ्या हॉस्पिटलातच होतात, शेतात शाळेत नाहीत

तिथे सर्व प्रकारचे फ्रीज व आईस पॅक सतत असतात , दर आठवड्याला लसीकरण , प्लस पोलिओ वगैरे होत असतात , आपला स्टाफ पल्स पोलिओला शाळेत , शेतात कॅम्प असेल तर तिथेही कोल्ड चेन मेंटेन करतो,

त्यामुळे काळजीचे अजिबात कारण नाही

पहिला शॉट कोव्हीशील्ड आणि तुटवड्यामुळे दुसरा शॉट कोव्हॅक्सिन घेता येतो का? >>>
>>
असे करण्याऐवजी मी हे सुचवेन :
कोविशिल्डचे अधिकृत माहितीपत्रक इथे आहे:
https://www.seruminstitute.com/pdf/covishield_fact_sheet.pdf

त्यात असे म्हटले आहे : पहिल्या डोस नंतर दुसरा डोस चार ते सहा आठवड्यांनी घेता येतो आणि तो बारा आठवड्यांपर्यंत घेतला तरीही चालतो, असे अभ्यास झालेले आहेत.
वाट पाहता येईल.

किंबहुना परदेशात झालेल्या प्रयोगांमध्ये दोन डोस मधले अंतर जितके जास्त होते (२-३ महिने), तितकी लसीची परिणामकारकता जास्त आढळली , असे वर मी एका प्रतिसादात आधीच लिहीलेले आहे.

असं होणार नाही पण समजा असं झालंच की कोव्हीशील्डचा एक डोस घेतला आणि मग पुढील सहा महिन्यात कोव्हीशील्डचा दुसरा डोस उपलब्ध होण्याची शक्यता नाहीच.

पण दुसरी लस मात्र उपलब्ध आहे.

तर ज्यांनी आधी कोव्हीशिल्डचा एक डोस घेतलाय, त्यांनाही मग या दुसऱ्या लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागतील ना (दोन डोसवाली लस आहे)?

पहिली कोव्हिशील्ड
मग साठा उपलब्ध नाही
कितीही जंग जंग पछाडले तरी नाही
मग दुसरी घेतली मन जुनी अन नवी यांचा शरीरात असल्याने दुष्परिणाम काय होतील?
म्हण्जे कोव्हिशील्ड ...... दुसरा ब्रॅन्ड............ २८ दिवसांनि दुसरा ब्रॅन्ड......... काय होईल क्लिनिकली??

म्हण्जे कोव्हिशील्ड ...... दुसरा ब्रॅन्ड............ २८ दिवसांनि दुसरा ब्रॅन्ड......... काय होईल >>>>

लसीकरण नियमानुसार असे करू नये इतकेच माहित आहे. कारण दोन लसींचे तंत्रज्ञान वेगळे आहे.

तसे करण्याची वेळ न येवो, पण तसे केल्यास प्रत्यक्षात काय होते याचा मला तरी अनुभव नाही.
विशेष लसीकरण तज्ञांनाच यावर भाष्य करता येईल.

>>> कोविडचे डोस सेंटर मोठ्या हॉस्पिटलातच होतात, शेतात शाळेत नाहीत

तिथे सर्व प्रकारचे फ्रीज व आईस पॅक सतत असतात , दर आठवड्याला लसीकरण , प्लस पोलिओ वगैरे होत असतात , आपला स्टाफ पल्स पोलिओला शाळेत , शेतात कॅम्प असेल तर तिथेही कोल्ड चेन मेंटेन करतो,

त्यामुळे काळजीचे अजिबात कारण नाही??? येवलावाले उत्तर देतील का?
बाय द वे, मी आय एम ए वर गूगल केले... सुदाम पाटील या नावाचे कोणतेही डॉक्टर येवल्यात नाहीत? प्रेसिडेंट तर पुढची गोष्ट.... या मुळे ज्यांनी ही इथे फॉरवर्ड केली त्यांनी काळ्जी घ्यायला हवी असे मला वाटते

सत्यता माहित नाही हेच forward paste करताना लिहिले आहे, आता ज्यांनी मला हा पाठवला आहे तिथे उत्तर देता येईल
Thanku revyu

रेव्यु, सहमत.
यानिमित्ताने एक विनंती करतो. या धाग्यावर वैज्ञानिक चर्चाच व्हावी ही इच्छा आहे. विज्ञानाच्या अंगाने तुमच्या स्वतःच्या शंकाकुशंका जरूर विचाराव्यात.

व्हाट्सअप किंवा अन्य ठिकाणच्या ढकलपत्रांना कुठलीही अधिकृतता नसते. त्यामुळे ती येथे न डकवल्यास बरे होईल. म्हणूनच मी त्याबाबत काहीही लिहीले नव्हते.

वैयक्तिक वैज्ञानिक शंका जरूर विचारा, जेणेकरून या धाग्याची पातळी वैज्ञानिक संवाद अशीच राहावी .
धन्यवाद !

जस्ट डायलवर सुदाम पाटील येवला मिळाले.
https://www.justdial.com/Yeola/Dr-Patil-Sudam-Shree-Hospital/9999P2559-2...
आय एम ए च्या संकेतस्थळावर सुदाम पाटील आणि सौरभ सुदाम पाटील असे दोन डॉक्टर येवल्यात आहेत.

पण मला तो फॉर्वर्ड पटलेला नाही.

लसीकरण आणि ताप, इ.

मानव यांच्या या कालच्या प्रश्नाच्या अनुषंगाने अजून काही वाचन केले.

“लस दिल्यानंतर इंजेक्शनच्या जागी दुखले, जागा लाल झाली आणि थोडा ताप आला, म्हणजे ‘चांगलेच’ झाले. याचा अर्थ लस काम करीत आहे”, अशी एक सामान्य समजूत (मिथक) असते. ( नो पेन, नो गेन कन्सेप्ट).

यासंदर्भात बराच शास्त्रीय अभ्यास झालेला आहे. लसींच्या विविध प्रकारानुसार अगदी भिन्न स्वरूपाचे अनुभव आलेले आहेत. लोकांमध्ये ताप येण्याचे प्रमाण तर सहसा 25 टक्‍क्‍यांवर जात नाही. एकंदरीत विदा पाहता वरील मिथक शास्त्रीयदृष्ट्या काही सिद्ध झालेले नाही.

या संदर्भातील अभ्यास निरंतर चालू आहे. दर दशकागणिक नव्या लसी निर्माण होतात. त्यात नवनवे तंत्रज्ञान वापरले जाते. त्याचा हेतू, लस टोचल्यानंतर व्यक्तीस दाहप्रक्रियेमुळे होणारा त्रास (म्हणजे लालपणा, ताप इत्यादी) कमीत कमी व्हावा, हाच असतो.

फार जास्त भीती बाळगून उपयोग नाही
त्यातल्या त्यात चांगल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये लस घेतल्यास सर्व कोल्ड चेन नीट मेंटेन केलेली असेलच.

कुमार सर.. Psorasis च्या पेशंट साठी vaccine च्या काय guidelines आहेत?वय ७० च्या पुढे

केया
अर्थात वयाचे बाबतीत संबंधित डॉ ना विचारावेच..

डॉ. कुमार सोरायसिसच्या पेशंटसाठी mRNA वॅक्सिन घ्यावे असं रेकमेंडेशन वाचलं. भारतात कोणते वॅक्सिन mRNA आहे? कोवॅक्सिन आणि कोविशील्ड ही दोन्ही Adenovirus आहेत ना? सध्याच्या लसीकरण योजनेत आपल्याला विशीष्ठ लसीची मागणी करता येत नाही. मग सोरायसिसच्या पेशंटनी काय करावे?

भारतात कोणते वॅक्सिन mRNA आहे? >>> सध्या तरी नाही.

(कोवॅक्सिन >>> निष्प्रभ विषाणू
कोविशील्ड >>> प्रथिन- कोड -व्हेक्टर विषाणू)
.
सोरायसिसच्या पेशंटनी भारतीय विशेष तज्ञांचा सल्ला घ्यावा.

लस संशोधन : भारतीय घडामोडी

१. भारत बायोटेकने नाकाद्वारे घ्यायची लस बनवली असून त्याचे मानवी शास्त्रीय प्रयोग सुरू झालेले आहेत.

२. प्रेमास बायोटेकने तर तोंडातून घ्यायच्या कॅप्सूलच्या माध्यमातून लस विकसित केली आहे. तिचे प्राणीप्रयोग यशस्वी झालेले आहेत.

वरील दोन्ही लसी अमेरिकी कंपन्यांच्या सहयोगाने तयार होत आहेत.
https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/vaccine-updates/story/ind...

अत्यंत दिशाहीन आणि हताशेने भरले आहे सर्व जनमानस! इतके हताश पहिल्या लाटेच्या वेळेस वाटत नव्हते अन तेव्हा तर लस देखील दृष्टोपत्तीत नव्हती.... या शिवाय आता आर्थिक संकट ओढवून घ्यायची स्थिती राहिली नाही.... लशीचे व्यवस्थापन पेंड खात आहे.
सर्व कॉर्पोरेट हाऊसेस ना आपापल्या संस्थेतील कर्मचार्^यांचे लसीकरण स्वतः कर्ण्यास सांगितेले तर? फक्त लस सरकार देईल.... या मुळे, त्यांना अनुशासनिक अनुभव असल्या मुळे काम सुरळित होईल आणि सरकारचा बोझा कमी होईल.... हातातून वेळ निस टत आहे.

स्वतः कसे करणार ?

चार दिवस टोचायला सिस्टर अन डॉकटरला 4 दिवसाची नोकरी देणार ?

सुया दिसपोज कशा करणार ?

कुणी रिएक्शन येऊन कम्पणीत पडला तर ?

Pages