कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य

Submitted by कुमार१ on 1 August, 2020 - 00:55

करोना सार्स २ - धडकी भरवणारे विचित्र शब्द ! या विषाणूने कोविड१९ ची महासाथ घडवली. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील एक अभूतपूर्व घटना. तिच्या उगमाला सात महिने उलटले तरी अजूनही तिची घातकता जाणवतेच आहे.

या विषयावर आतापर्यंत मी इथे दोन धागे असे प्रकाशित केलेत:
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

वरील दुसर्‍या धाग्यावर बरीच साधक-बाधक चर्चा झालेली आहे. तिथल्या प्रतिसादांची संख्या आणि मजकूर एव्हाना विस्तृत झाला आहे. त्याला अनुसरून काही वाचक मित्रांनी अशी सूचना केली, की आता यावर नवा धागा उघडावा. त्यास मान देऊन हा धागा चालू करतोय.

या नव्या धाग्यावर सर्व वाचकांचे स्वागत !

एव्हाना गेल्या सात महिन्यातील या आजाराची बदलती सामाजिक व्याप्ती आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत आहे. अगदी सुरुवातीच्या काळात वृद्ध, अन्य मोठा आजार असलेले, डॉक्टर्स ,आरोग्य सेवक आणि बराच जनसंपर्क असणारे लोक या आजाराची शिकार होत होते. त्या काळात आपण बहुसंख्य लोक एका सुरक्षित कोषामध्ये होतो. जे कोणी रुग्ण आपण ऐकायचो, ते बहुतेक ‘दुसऱ्याच्या’ घरातील असायचे. गेल्या दोन महिन्यात माणसांचे चलनवलन वाढले आहे आणि आता आजार तुमच्या-माझ्या, आपल्या सगळ्यांच्या दारापर्यंत पोहोचलेला आहे. अर्थात त्याचबरोबर सौम्य आजार असलेल्या लोकांचे प्रमाण भरपूर आहे. आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या गोष्टी नक्कीच आशादायक आहेत. गेल्या काही महिन्यांत आपल्या माबोपरिवारातील १-२ लोकांना हा आजार गंभीर होऊन मरण आले. त्यांना भावपूर्ण आदरांजली. सध्या आपल्यापैकी जे सौम्य आजाराने बाधित आहेत त्यांनी घरीच पूर्ण विश्रांती, विलगीकरण आणि आपापल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कमी-अधिक औषधे घ्यावीत. सर्वांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा !

अन्य सर्वांनी आरोग्यशाली जीवनशैली, मनाचा खंबीरपणा आणि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून या आजाराच्या सध्याच्या टप्प्याला सामोरे जाउयात. सर्वांना पुन्हा एकवार मनापासून सदिच्छा.

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मानव ,
करोनाची बाधा झाल्यापासून दहा दिवसानंतर तो रुग्ण इतरांना संसर्ग देऊ शकत नाही अशा अनेक बातम्या आता येत आहेत. >>>

बाधित रुग्ण किती काळ संसर्गक्षम राहील याचे उत्तर आजाराच्या तीव्रतेवर अवलंबून असते. स्वाब चाचणीवर आधारित दोन अभ्यासांचा निष्कर्ष असा आहे:

१. 8 ते 37 दिवस ( सरासरी २० दिवस )
२. 18 ते 48 दिवस ( सरासरी 31 दिवस)

( म्हणून संबंधित डॉ चा सल्ला आवश्यक ).

आमच्या सोसायटीच्या कोविड टीमचे जे मुख्य आहेत ( जे त्यांच्या ऑफिसमध्येही वरच्या पातळीवर कोविड management चा भाग आहेत) त्यांचं म्हणणं असं आहे आपल्या सोसायटीतसुद्धा ३०-४० ℅ लोकांना कोविड होऊन गेला असणार आहे. asymptomatic प्रकारे. (अधिकृतपणे एकही केस नाही आमच्याइथे) कारण त्यांचा ऑफिसमधला अनुभव असा, की कितीही काळजी घेतली तरी केसेस निघतातच.
हे मला तरी पटलं नाही. कारण एकाला तरी लक्षणं दिसली असतीच ना? सोसायटीत १४० flats आहेत.

पण खरंच तसं असण्याची शक्यता आहे का? सध्या बंगळुरात रोज २००० च्या आसपास नवीन केसेस निघतात. अनेकजण कामासाठी, दुकानात वगैरे जाण्यासाठी बाहेर जातात. कितीतरी जण लॉकडाऊन शिथील झाल्यावर तमिळनाडू, आंध्रप्रदेशमधून वगैरे (जिथे भरपूर केसेस आहेत) आमच्या सोसायटीत परत आले. अर्थात आल्यावर त्यांना १४ दिवस विलगीकरणात ठेवलं होतं.

वावे,

भरत यांनी डकवलेल्या पत्रकावरून मुद्दा स्पष्ट होत आहे.
आंतरराष्ट्रीय आकडेवारीही साधारण असेच दर्शवते.
४०-४५% बाधित लक्षणविरहित असतात.
हाच मुद्दा महासाथ घडवण्यात प्रभावी ठरला.

होय, ही बातमी पेपरमध्ये वाचली होती दोन तीन दिवसांपूर्वी. दिल्लीतही हे सर्वेक्षण केलं गेलं होतं.
जास्त लोकांमध्ये antibodies असणं ही एका अर्थी चांगली गोष्ट आहे. कारण ते आता इम्यून झाले असा त्याचा अर्थ होतो ना? (किती काळासाठी ते कदाचित आत्ता सांगता येणार नाही) मग अशा इम्यून लोकांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायची आवश्यकता आहे का? ( ते कोविड पॉझिटिव्ह नसतील तर)

४० -४५% बाधीत लक्षण विरहित असले तरीही
वावे यांच्या १४० सदनिका असलेल्या सोसायटीत ३० ते ४० टक्के लोकांना कोव्हीड होतो पण त्यातील सगळ्यांनाच तो लक्षणविरहीत होतो एकाही व्यक्तीला लक्षणांसकट होत नाही हे जरा अती वाटते.

BC +1
वावे, नाही.
अंतर, मुखपट्टी आणि हात स्वच्छता ही त्रिसूत्री अजूनही सर्वांनाच लागू आहे. ज्यांच्या रक्तात अँटीबॉडीज सापडल्यात त्यांना कसेही वावरण्याचा मुक्त परवाना देता येत नाही. कारण, त्या अँटीबॉडीजचा प्रकार ‘संरक्षित’ असतोच असे नाही. जरी तो तसा असला, तरी त्यापासून मिळणाऱ्या संरक्षक कालावधीबाबत अजून संदिग्धता आहे.

मला तर अशी शंका वाटते की नेहमीचा सिझनल फ्लु झालेले आजारी पडत आहेत व कोरोना चाचणी झाल्यावर कोरोनामुळे आजारी पडले असा निष्कर्ष निघत असावा.तसेही पावसाळ्यात लोक आजारी पडतातच.फक्त सध्या एकच कोविड टेस्ट होत असल्याने पोझिटीव्ह येत असावेत . तज्नांनी सांगावे काय ते .

महाराष्ट्रात MEDD कोविडची आकडेवारी देते..
सुरुवातीला त्यात लक्षणे नसलेल्या positive केसेस चे प्रमाण खूप जास्त म्हणजे ८० टक्के पर्यंत असे.
पुढे टेस्टिंगचे नियम बदलल्यावर ही टक्केवारी कमी होऊ लागली.
आता लक्षणे नसलेले व सौम्य लक्षणे असलेले यांची एकत्रित टक्केवारी देतात.

आकडेवारी positive केसेस ची असते. म्हणजे ज्यांची टेस्ट झाली व कोव्हिड संसर्ग दिसला त्यांची.

आपण जेव्हा ‘लक्षणविरहित’ व्यक्ती असे मानतो, तेव्हा तिच्या “लक्षात न आलेली” लक्षणे देखील हलकेच घेऊन जाऊ शकतात. त्यांची तिला फारशी जाणीव सुद्धा होत नाही. उदाहरणार्थ ही लक्षणे बघा :

मरगळ, थकावट, सौम्य अंगशीण, घशात कसेतरी वाटणे, नाक थोडेसे वाहणे, भूक मंदावणे.

समजा, अशी दोन-चार ‘लक्षणे’ एखादा दुसरा दिवस राहून निघून गेली तर ती व्यक्ती तक्रार सुद्धा करत नाही. अशी व्यक्ती सर्वेक्षणात लक्षणविरहित म्हणून नोंदली जाऊ शकते.

डॉक्टर ,एखाद्याला कोरोना इन्फेक्शन झाले आहे पण लक्षणं नाहीत परंतु त्याला त्याचवेळी सिझनल फ्लुमुळे लक्षणं असतील जी कोरोनासारखीच आहेत तर नक्की लक्षणं कशामुळे आहेत हे कसे समजते?

पूर्वीच्या धाग्यावरून ....
होय. एकदा विषाणूची शरीरातील घनता पुरेशी झाली की तो रक्तात येतो (viremia) आणि मग सर्वत्र जातो. >> वार >> गर्भाकडे........ अन्य एका घटनेत बाधितेच्या योनीद्रावात देखील तो आढळला होता.

गर्भावस्थेतील बाळाचे टेस्ट >>>> अद्याप अशी केल्याचे माझ्या वाचनात नाही. >>>>>

धन्यवाद कुमार सर.
म्हणजे संसर्ग वाढणे, viremia, संसर्ग हाताबाहेर जाऊन फुफ्फुसे व अन्य अवयव धोक्यात येणे हे ३ टप्पे आहेत की
viremia = संसर्ग हाताबाहेर जाऊन फुफ्फुसे व अन्य अवयव धोक्यात येणे ?

थोडक्यात अजूनपर्यंत गर्भवती नसलेल्यांनी काहीकाळ हा टप्पा पुढे ढकलणे हिताचे ठरेल.

viremia = संसर्ग हाताबाहेर जाऊन फुफ्फुसे व अन्य अवयव धोक्यात येणे ? >>>> होय.

शब्दशः अर्थ 'संपूर्ण रक्तप्रवाहात विषाणूचा संचार '.

ओके. थॅन्क्स. किती अंदाज चुकवणारे आहे या विषाणुचे वर्तन. केसगणिक वेगळा मुद्दा समोर येतो.

Covid19 चा विषाणू ठराविक प्रथिने असलेल्या मानवी पेशींना लक्ष करतो.
त्या पेशी श्वसन मार्ग ,फूफुस,आणि आतड्या मध्ये असतात..
असे वाचले होते.
मग इतर अवयव वर covid 19 कसा काय
हल्ला करतो.

कोविड विषाणू म्हणजे एका अपार्टमेंट मध्ये घुसलेला भुरटा चोर आहे, तो प्रत्यक्ष कुणाला ठार करत नाही,
पण जाता जाता मेन स्विच वर दगड मार , गेस कनेक्शन लिक करून ठेव, अशा उचापती करून तो पळून जातो

मधल्या काळात तो पळूनही जाईल किंवा सिक्युरिटीला सापडेलही
पण त्याने उचापती केल्याने स्फोट , शॉर्ट सर्किट , पाण्याची मोटर बिघडली , अंधारात लोक धडपडून पडले , धूर झाला , काहीही होईल

पण तेंव्हा तो स्वतः अंतर्धान पावलेला असतो,

अँटी व्हायरल वापरणे म्हणजे चोराला डायरेक्त गोळी घालणे , पण त्याने बाकीचे प्रश्न सुटतात का ? त्यासाठी इतर दुरुस्त्या कराव्या लागतात

आजच वाचलेकेी अगदी माइल्ड सिम्प्टम्स असणार्यांचा कोवोद लवकर जात नाही व महिना महिना चालतो व त्रास देतो .
खरे अआहे का?

ब्लॅक कॅट
उदाहरण एकदम मस्त दिलं आहे.
उपमा पण योग्य
भुरटे चोर

डॉक्टर ना एक प्रश्न
मी वाचलेले.
आपली रोगप्रतिकार शक्ती दोन फळ्यात काम करते .
एक जी तत्काळ response देते बाहेरील कोणी त्रासदायक जिवाणू,विषाणू ह्यांनी प्रवेश केला की आणि त्या बाहेरच्या आक्रमक ला थोपवून धरते .
तोपर्यंत दुसऱ्या फळी तील प्रतिकार शक्ती त्या बाहेरील आक्रमक जिवाणू ,विषाणू ह्यांची ओळख पटवते,त्याला मारायचा कसा ह्याची योजना आखते,कोणती हत्यार वापरायची हे ठरवते आणि सुनियोजित हल्ला करून विषाणू ,जिवाणू चा खात्मा करते.
ह्या मध्ये 7 ते 8 दिवस जातात.
तर प्रश्न हा आहे बाधा झाल्या नंतर तत्काळ औषध घेतली तर दुसऱ्या फळी तील प्रतिकार शक्ती निर्माण च होणार नाही.
आणि त्या विषाणू ,जिवाणू ची ओळख पटवणे राहून जाईल.
म्हणजे परत परत बाधित होण्याची शक्यता वाढेल.
हा तर्क योग्य आहे का?

रेव्यु,
माइल्ड सिम्प्टम्स असणार्यांचा कोवोद लवकर जात नाही व महिना महिना >>>

याचे सर्वांसाठी एकच असे उत्तर असणार नाही. १.समाजातील बऱ्याच जणांना जुन्या करोना विषाणूंमुळे प्रतिकारशक्ती मिळालेली आहे म्हणून ते लक्षणविरहित आहेत अशी एक थिअरी आहे.

२. संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीतील विषाणूंचे प्रमाण कमी अधिक असेल.

३. वरील दोघांचा मिलाफ केल्यावर प्रत्येक व्यक्तीसाठी तो आजार सौम्य स्वरूपात शरीरात किती काळ राहील याचे उत्तर ठरेल.

मा.डॉ. कुमार1
लिंक देत आहेच शिवाय कॉपी पेस्ट करतोय वाचुन भाष्य कराल का ? धन्यवाद.

https://www.lokmat.com/national/coronavirus-study-shows-variant-coronavi...

CoronaVirus News: मोठा दिलासा! भारतातील कोरोनाबद्दल महत्त्वाची माहिती समोर; आता लढा होणार सोपा
CoronaVirus News: देशातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्यानं वाढतेय; सध्या दिवसाला ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून येताहेत
By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: August 2, 2020 09:58 AM | Updated: August 2, 2020 09:58 AM

नवी दिल्ली: देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. भारतात पसरलेला कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, बहुतांश केसेस युरोपशी संबंधित आहेत. याआधी देशात पसरलेला कोरोना विविध प्रकारचा होता. मात्र आता एकाच प्रकारच्या कोरोनाचा फैलाव होत असल्याची माहिती पुढे आली आहे. एकाच प्रकारचा कोरोना असल्यानं आता त्याचा मुकाबला करणं सोपं असेल. सरकारनं केलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यास बऱ्यापैकी मदत झाल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

जैवतंत्रज्ञान विभागानं कोरोनाबद्दलचा अहवाल तयार केला आहे. शनिवारी हा अहवाल आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना सोपवण्यात आला. देशात कोरोनाचा A2a होलोटाईप विषाणूचा वेगानं फैलावत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. या विषाणूनं दुसऱ्या प्रकारच्या विषाणूला हटवलं आहे. सुरुवातीला भारतात कोरोना विषाणूच्या विविध प्रजाती पाहायला मिळत होत्या. यामध्ये युरोप, अमेरिका आणि पूर्व आशियातून आलेल्या कोरोनाच्या प्रजातींचा समावेश होता.

जगभरात कोरोना विषाणूच्या विविध प्रजातींचा फैलाव झाला आहे. यामध्ये A2a होलोटाईप, D614G, 19A आणि 19B चा समावेश आहे. भारतात आधी सर्व प्रजातींमधील कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. A2a होलोटाईप विषाणू युरोप आणि सौदी अरेबियातून भारतात आला. याआधी जानेवारीत आलेला विषाणू वुहानमधून आला होता. हा विषाणू 19A आणि 19B प्रजातीमधील होता. मात्र त्यांचं प्रमाण A2a च्या तुलनेत कमी होतं. त्यानंतर देशात केवळ A2a होलोटाईप शिल्लक राहिला. दिल्लीत D614G प्रकारच्या विषाणूचा फैलाव झाला होता

Michto,
तूर्त icmrचे संस्थळ त्याबद्दल काही दर्शवित नाही. ३-४ दिवस नजर ठेवून राहतो. काही अधिकृत समजले की लिहीन.
..
A2a हा प्रकार सुरवातीस फक्त युरोपात होता एवढी अधिकृत माहिती वाचली.

>> याचे सर्वांसाठी एकच असे उत्तर असणार नाही. १.समाजातील बऱ्याच जणांना जुन्या करोना विषाणूंमुळे प्रतिकारशक्ती मिळालेली आहे म्हणून ते लक्षणविरहित आहेत अशी >>
समजले नाही सर

Pages