कोविड १९ : वर्षपूर्ती आणि लसीकरण

Submitted by कुमार१ on 7 December, 2020 - 07:30

या विषयाचे आधीचे संदर्भ :

१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)

२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)

३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)

४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )

मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..

करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :

डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.

जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.

फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.

मार्च :

* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.

एप्रिल-मे :

* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली

जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.

ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.

सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.

ऑक्टोबर
:
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.

नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.

डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............

समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !

लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोविड होऊन बरा झालेल्या काही रुग्णांचा पुढे पाठपुरावा करून अभ्यास चालू आहेत. अशा एका अभ्यासात सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा सर्व प्रकारच्या आजाराचे रुग्ण अभ्यासले गेले.

त्यांच्या रक्तातून अँटीबॉडीज आणि ‘टी’ व ‘बी’ स्मृतीपेशींचा अभ्यास केला गेला. हे तिन्ही घटक मूळ आजारानंतर सुमारे आठ महिने टिकतात, असा निष्कर्ष आहे. तीव्र आजाराच्या लोकांत या सर्व घटकांचे प्रमाण सर्वात जास्ती होते.

अशा लोकांना भविष्यात पुन्हा संसर्ग झालाच तर तेव्हाचा आजार सौम्य किंवा लक्षणविरहित असू शकेल, असा प्राथमिक अंदाज आहे.
असे निष्कर्ष आपल्यासाठी उत्साहवर्धक ठरतील.

पुस्तकात मेमरी सेल 50 वर्षे टिकू शकतात , असे दिले आहे, पण ते average आहे , स्पेसिफिक कुठल्या रोगाला किती , असे दिले नाही

ही बातमी चिंता वाढवणारी आहे. नॉर्वे मध्ये 23 लोक मेले. रोग ही जालीम आणि औषध तर त्यावर जालीम. मधल्यामध्ये माणूस मात्र हलाल

https://www.ndtv.com/world-news/norway-warns-of-vaccination-risks-for-sick-elderly-patients-after-23-die-2353257

एकंदरीत पाहता:

१. अतिवृद्ध (८५+) व दुर्धर आजाराच्या शेवटच्या टप्प्यातले रुग्ण यांना लस न दिलेली बरी. इथे धोक्याचे पारडे बरेच जड राहील. फायदा शंकास्पद.

२. कुठल्याही औषधाची ऍलर्जी असणाऱ्यांनी लस टाळलेली चांगली.

सक्ती नकोच.

डॉ. कुमार१,
१. पेनिसिलीनची अ‍ॅलर्जी असल्यास लस घ्यावी का नाही? मी ही माहिती शोधण्याचा प्रयत्न केला पण ठोस उत्तर सापडलं नाही.
२. रेमिडीसीव्हिअर दोन दिवसात सहा डोस कितपत सेफ आहे?

अंजली

१. अमुक एक औषध आणि ही लस ऍलर्जी असे अभ्यास सध्या झालेले नसावेत; तेवढा वेळ नाही. मात्र लसीचे दुष्परिणाम काही लोकांत तीव्र झालेत.

हे पाहता कुठल्याही औषधाची ऍलर्जी असणाऱ्यांनी ती टाळावी अशी सूचना पुढे आली आहे.

आपापल्या डॉ चा सल्ला घ्यावा. घाईने निर्णय नको.

अंजली,
2.
रेमिडीसीव्हिअरच्या डोस बद्दल इथून टिपणी करणे अयोग्य आहे कारण तो डोस खालील गोष्टींवर अवलंबून असतो:

रुग्णाचे वय, लिंग, वजन,
आजाराचे स्वरूप, मूत्रपिंड व यकृताची कार्यस्थिती , इ.

"ओडिशा प्रशासनानं लसीकरणाची ही मोहिम रविवारच्या दिवसापुरती थांबवली असून, पहिल्या दिवशी लस घेतलेल्यांच्या निरिक्षणासाठी त्यांनी हा वेळ दिल्याचं कळत आहे."

(https://marathi-abplive-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.abplive.com/n...)

हा दृष्टीकोन अगदी योग्य वाटतो.
दमादमानेच पुढे जावे.

Covishild योग्य आणि सुरक्षित आहे असे वाटते.ह्याच लशीच्या चाचण्या पुर्ण झाल्याने हिची मागणी करावी.

लस घेतल्यानंतरही मुखपट्टी का लावायची याची ५ कारणे :

१. या लसीची उपयुक्तता १००% नाही

२. लसीकरणानंतर दीड महिन्याने संरक्षण मिळेल

३. लसीमुळे 'आजारा'पासून संरक्षण मिळेल, पण नवा संसर्ग वा प्रसार यापासून मिळेल की नाही हे अजून अस्पष्ट.

४. ज्यांना कर्करोग/गंभीर आजार आहेत त्यांना तशीही
मुखपट्टी उपयुक्तच असते.

५. जनुकबदल झालेल्या विषाणूपासून संरक्षणास उपयुक्त. चालू लस याबाबत किती उपयुक्त आहे हे संदिग्ध आहे.

भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनबद्दल factsheet प्रसिद्ध केली आहे.
तीत स्पष्टपणे क्लिनिकल ट्रायल मोड असं स्पष्ट म्हटलंय.
Screenshot_2021-01-19-13-30-08-801_com.google.android.apps_.docs_.jpg

कोव्हिड जाईल असे आता वाटत आहे.हर्ड इम्युटीनी डेव्हलप होत आहे . >>>> अवघड दिसतंय ते सध्यातरी
‘COVID-19 herd immunity unlikely in 2021 despite vaccines’
https://www.thehindu.com/sci-tech/science/covid-19-herd-immunity-unlikel...

+ १
विज्ञानानुसार अपेक्षित असलेल्या ७०% समूह-प्र श साठी बराच वेळ लागेल.

भारतासह द. आशियातील आजार सौम्य राहील

पश्चिमी जगाबाबत बघायचे काय होतंय.

आरोग्य मंत्री म्हणतात 14 ते 35 वयो गटा मधल्या लोकांनी लस घेऊ नये, स्थानिक डॉक्टर म्हणतात लहान मुलांना लस ची गरज नाही, भारत बायोटेक म्हणते रक्त पातळ होण्याची गोळ्या सुरू असणारे, डायबिटीस वाले, ब्लड प्रेशर वाले, केमोथेरपी वाले यांनी लस घेऊ नये. वरच्या सगळ्या फिल्टर मधून मला वाटते 20 टक्केच जनता उरती ज्यांनी लस घ्यायची आहे.

+ १
......
Ivermectin या जंतावरील औषधाचा सौम्य कोविड रुग्णांवर एक शास्त्रशुद्ध प्रयोग स्पेनमध्ये पार पडला.
रुग्णास लक्षणे जाणवल्या वर ७२ तासांत जर हे औषध एकदाच दिले तर बऱ्यापैकी फरक पडतो असे दिसले.

भविष्यात अजून प्रयोग केले जावेत.

संसर्ग झाल्यानंतरच्या रोगप्रतिबंधांसाठी याचा विचार होऊ शकतो .

Pages