
या विषयाचे आधीचे संदर्भ :
१. हात, जंतू, पाणी आणि साबण (https://www.maayboli.com/node/73752)
२. कोविड१९ घडामोडी : समज,गैरसमज (https://www.maayboli.com/node/75123)
३.कोविड १९ : व्याप्ती आणि भवितव्य (https://www.maayboli.com/node/75809)
४. ( पूरक विषय) : पल्स ऑक्सीमीटरचे गमभन (https://www.maayboli.com/node/76797) )
मागील चर्चेत आपल्या सर्वांच्या सहभाग आणि प्रोत्साहनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !
………………………………………..
करोना सार्स-२ या दुष्ट विषाणूने मानवजातीवर हल्ला केल्याला आता एक वर्ष झाले. त्यातून उदभवला कोविड१९ हा आजार. त्याची साथ आली आणि तिची व्याप्ती वाढत ती महासाथ झाली. त्यातून खूप लोक आजारी पडले. काहींचा आजार सौम्य राहिला तर काहींचा गंभीर होऊन ते मृत्युमुखी देखील पडले. महासाथ आटोक्यात आणण्यासाठी जगातील बहुतेक देशांना टाळेबंदीसारखे कठोर उपाय अमलात आणावे लागले. त्यातून अर्थव्यवस्थेची प्रचंड हानी झाली. अनेकांचे रोजगार बुडाल्याने सामाजिक मनस्वास्थ्य हरवले. पुढे काही देशांत आजाराचे प्रमाण कमी झाले आणि आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले. पण अन्य काहींत प्रमाण पुन्हा एकदा वाढल्याने ‘दुसरी लाट’ निर्माण झाली. या आजाराच्या वर्षपूर्ती निमित्ताने गेल्या वर्षातील त्यासंबंधीच्या ठळक घडामोडींचा हा मागोवा :
डिसेंबर 2019 :
चीनच्या वुहान प्रांतात न्युमोनिया या आजाराचे काही रुग्ण आढळले आणि त्याचे कारण अज्ञात होते.
* 31 डिसेंबरला या नव्या आजाराची WHOच्या दप्तरी नोंद झाली. करोना-सार्स २ हा विषाणू तर कोविड-१९ हा त्याचा आजार, अशी अधिकृत नावे दिली गेली.
जानेवारी 2020 :
* या आजाराचे RT-PCR या चाचणीने निदान झालेला पहिला रुग्ण अमेरिकेत आढळला.
* हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो हे स्पष्ट झाले.
* WHOने जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली.
फेब्रुवारी :
बहुतेक देशात आंतरराष्ट्रीय विमानसेवांवर निर्बंध. परदेशातून आलेल्या व्यक्तीस 14 दिवसांचे विलगीकरण लागू.
मार्च :
* 11 मार्च रोजी WHO कडून कोविडची महासाथ जाहीर.
* HCQ या पारंपरिक औषधाचा वापर सुरू.
* संसर्ग साखळी रोखण्यासाठी बऱ्याच देशात टाळेबंदी जाहीर.
* भारतीय रेल्वेच्या १६७ वर्षांच्या इतिहासात (संप वगळता) प्रथमच प्रवासी सेवा काही काळ पूर्ण बंद.
एप्रिल-मे :
* Remdesivir औषधाला तातडीच्या उपचारासाठी मान्यता.
* रोगविरोधी लसनिर्मितीचे सूतोवाच.
* अमेरिकेतील मृत्यूंची संख्या एक लाखांवर पोचली
जुलै :
हा आजार हवेतील सूक्ष्मकणांच्याद्वाराही पसरत असल्याचे WHOचे निवेदन. तसेच बाधित पण लक्षणविरहीत लोकांकडूनही त्याचा प्रसार होत असल्याचे निवेदन.
ऑगस्ट :
बऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून काढलेल्या रक्तद्रवाच्या उपचारास मान्यता.
सप्टेंबर :
जागतिक कोविडमृत्यूंचा आकडा १० लाखांवर पोचला.
ऑक्टोबर :
* Remdesivir ला अमेरिकी औषध प्रशासनाकडून अधिकृत औषधाची मान्यता (पण पुढे याबाबत WHOने नकारात्मक शेरा दिला).
• भारतात कोविडमृत्यूंचा आकडा १ लाखावर पोचला.
नोव्हेंबर : दुहेरी अँटीबॉडी उपचारास तातडीच्या वापरासाठी मान्यता.
डिसेंबर २०२० :
• काही लसी प्रयोगसिद्ध होऊन मान्यताप्राप्त. वितरणास तयार. चीनमध्ये लाखो लोकांना त्यांची लस दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध. रशियाने पण सुरवात केली. इंग्लंड ८ डिसेंबरला लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत.
• आज अखेरीस या आजारावर निर्विवाद असे प्रयोगसिद्ध रामबाण औषध उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिबंधावर अधिक लक्ष केंद्रित.
...............
समाजात या निव्वळ नैसर्गिक आजारातून पुरेशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. त्यामुळे लसीकरणाची कल्पना पुढे आली. वर उल्लेख केल्याप्रमाणे संबंधित लस नव्याने निर्माण करून त्याचे काहीसे घाईतच प्रयोग केले गेलेत. लसीच्या अनेक उत्पादनांपैकी काही आता प्रयोगसिद्ध होऊन वापरासाठी तयार आहेत. लस देताना अर्थातच सामाजिक प्राधान्यक्रम ठरवलेला आहे. ती सर्व नागरिकांना द्यायची की नाही, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. RNA तंत्रज्ञानावर आधारित लसी या नव्यानेच निर्माण केलेल्या आहेत. त्यांची उपयुक्तता आणि दुष्परिणाम अनुभवातून समजतील. लसीकरणातून महासाथ कशी आटोक्यात येते हे यथावकाश समजेल. आपण तसे स्वप्न बघावे अशी WHOने इच्छा व्यक्त केली आहे !
लसीसंबंधी आणि संबंधित घडामोडीबाबाबत चर्चा करण्यासाठी हा नवा धागा.
एव्हाना या आजारावर या धाग्यासह ५ धागे निर्माण झालेले आहेत. आता हा आजार लवकरात लवकर सामान्य होऊन आटोक्यात येवो ही इच्छा. जेव्हा तो सामान्य सर्दीपडशाप्रमाणे समाजात दखलपात्र राहणार नाही, तेव्हा अशा चर्चाधाग्यांचे प्रयोजनही संपेल. तसे लवकरात लवकर होवो आणि हे सर्व धागे इ-रद्दीत जावोत हीच आंतरिक इच्छा !
.............................................................................
चित्र जालावरुन साभार !
श्वसन रोगजंतूंमध्ये हे
श्वसन रोगजंतूंमध्ये हे नित्याचे असते. सद्य विषाणू दरमहा २ बदल करीत असल्याचे या आधीच्या भागात लिहिले आहे.
आता फायझर व मॉडर्न या उत्पादकांनी अधिक प्रयोग सुरू केले आहेत. RNA तंत्रावर आधारित या लसीमध्ये गरजेनुसार बदल करणे सोपे जाते.
बघूयात काय होतंय
ज्यांना कोविड झालाय आणि
ज्यांना कोविड झालाय आणि त्यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता त्यांचा आजार लवकर बरा होतो यात किती तथ्य आहे ?
साद
साद
तसे रुग्ण साधारण तरुण / मध्यमवयीन असतात असे निरीक्षण उत्तर भारतातील काही डॉ नी केले होते. पण तसा प्रकाशित विदा उपलब्ध नाही.
सद्य विषाणूच्या जनुकबदलाबद्दल
सद्य विषाणूच्या जनुकबदलाबद्दल काही मते :
१. मुळात हा RNA प्रकारचा असल्याने त्याचे बदल सातत्याने होतातच.
२. विषाणू एखाद्या दुबळी प्र-शक्ती असलेल्या माणसाला संसर्ग करतो >>> त्याच्या शरीरात अर्धवट दाहप्रक्रिया होते >>> यातून विषाणूला उत्क्रांत व्हायचा संदेश मिळतो >> नवा विचित्र प्रकार उदयास येतो.
सर
सर
Vaccine च्या ऐवजी antibody वापरून रोगप्रतिबंध होऊ शकतो का ?
साद
साद
ज्या लोकांना करोना संसर्ग झालाय पण अजून लक्षणे नाहीत, त्यांच्यासाठी Ab चा वापर करता येतो.
तसेच अन्य मोठ्या आजारांनी ज्यांची प्र-शक्ती दुबळी झालीय त्यांनाही याचा उपयोग होऊ शकतो.
सध्या अशा Ab-मिश्रणाचे संशोधन प्रयोग चालू आहेत.
कोविडच्या विषाणूच्या
कोविडच्या विषाणूच्या पृष्ठभागावर जे प्रोटीन आहेत ते एक हजार आहेत व त्यातले १४ प्रोटीन बदलले आहेत .लस बनवताना हजार स्पाईक प्रोटीन विरोधात बनवली आहे त्यामुळे बहुतांश लसी कोविड प्रतिबंध करतीलच असे तज्ञ म्हणत आहेत.
धन्यवाद सर.
धन्यवाद सर.
अजून मोठी महामारी येणार असे WHO म्हणतेय
http://www.newsonair.com/News?title=More-serious-pandemic-spreading-acro...
जंतूंवर अँटिजेंन असतात
जंतूंवर अँटिजेंन असतात
आपले आर्मी सेल्स त्याना ओळखून अँटी बॉडी तयार करतात व ते त्यांचा नाश करतात
----
वेकसिंन दोन्ही प्रकारची असतात
अँटिबॉडी बाहेर दुसऱ्या प्राण्यात तयार करून ते वेगळे करून व्हेक्सीन तयार करतात , त्याला पेसिव्ह इम्युनायझेशन म्हणतात
पेसिव्ह वेकसिंन त्वरित काम करते , पण ते त्या काळा पुरतेच काम करते , कायमची इम्युनिटी देत नाही
उदा सर्पदंशावरची लस , कुत्रे चावल्यावर गँभिर रोगास देतात ते anti rabies serum , ह्याची गँभिर रिएक्शन येऊ शकते , म्हणून हॉस्पितलमध्येच देतात. आणि ते खूप महाग असतात , ते फक्त इंजेक्शननेच देता येतात
-------
जंतूपासून अँटिजेंन मिळवून त्याचेही व्हेक्सीन करतात , त्याने आपले शरीर प्रतिकार क्षमता तयार करते , पण ते तयार व्हायला वेळ लागतो , पण एकदा तयार झाले की शरीर ती विद्या कायम स्वरूपी शिकते
उदा, धनुर्वात , ट्रिपल वगैरे लशी , कुत्र्य दंशावर नेहमी दिले जाणारे पोटातले किंवा दंडातले इंजेक्षण , कोविड लशी , हे ओपीडित देता येतात , स्वस्त असतात , इंजेक्शन किंवा ओरल डोस दोन्ही असू शकतात
------
डायरेक्त अँटिबॉडी इंजेक्शन देणे म्हणजे आयता चहा कपभर करून देणे / तोंडात ओतणे
अँटिजेंन वेकसिंन म्हणजे सगळे मटेरियल देणे व तूच चहा करून घे म्हणून सांगणे
---
मी च्या प्यायला जात आहे
Bl C चहाची उपमा छान !
Bl C
चहाची उपमा छान !
WHO लोकांना घाबरवायलाच बसलं
WHO लोकांना घाबरवायलाच बसलं आहे का? येवढ्यातले त्यांचे भाकीतं पाहता मानवजात पुढच्या 5 वर्षात नष्ट होईल असच वाटतं.
Covid19 चे सर्वात जास्त बळी
Covid19 चे सर्वात जास्त बळी हे यूरोप आणि अमेरिकेत गेले आहेत.
आशिया खंडातील गरीब देशात जिथे आरोग्य यंत्रणा पण ढिसाळ आहे तिथे मात्र तुलनेने कमी बळी गेले आहेत.
ह्याची कारण काय असावीत.
महाराष्ट्रात 49000 मृत्यू झाले आहेत महाराष्ट्र च्या तीन पट जास्त लोकसंख्या असलेल्या आधुनिक सुविधा नी परिपूर्ण अशा अमेरिकेत मात्र 3 लाख च्या वर लोक मृत्यू पावले आहेत.
म्हणजे मृत्यू दर महाराष्ट्र च्या दुप्पट आहे.
मस्त समजवलं आहे ब्लॅक कॅट.
मस्त समजवलं आहे ब्लॅक कॅट.
भारताचा मृत्यू दर तुलनेने कमी
भारताचा मृत्यू दर तुलनेने कमी असण्याचे ठोस शास्त्रीय विश्लेषण अजून वाचायला मिळालेले नाही. काही निव्वळ शक्यतांची चर्चा आहे.
त्यावर उद्या लिहीन
'भारताचा मृत्यूदर अमेरिकेच्या
'भारताचा मृत्यूदर अमेरिकेच्या तुलनेत बराच कमी असण्याचे कारण काय ?'
याचे एकच एक असे सबळ कारण स्पष्ट झालेले नाही. खालील शक्यतांचा एकत्रित परिणाम असू शकतो:
१. भारतात ( द. आशियात) तरुणांचे प्रमाण वृद्धांपेक्षा जास्त आहे. यापैकी दुसऱ्या गटात मृत्यूदर जास्त असतो.
२. आजार आपल्याकडे उशीरा दाखल झाला. तेव्हा त्यांचा अनुभव पाहून आपण टाळेबंदी वगैरे उपाय तुलनेने लवकर लागू केले.>> लोकसंख्येच्या मानाने प्रसार कमी.
३. भारतात डेंग्यू व तत्सम आजार endemic आहेत. त्यांच्या विरोधी Ab आपल्या लोकांत अस्तित्वात असतात. या Ab मुळे कदाचित करोना विरोधी फायदा झाला असावा.
…. तूर्त इतकेच. योग्य संशोधन वाचनात आल्यास भर घालेन.
सोप्या भाषेत छान सांगितलं आहे
सोप्या भाषेत छान सांगितलं आहे ब्लॅककॅट.
कुमार1, तुम्ही दिलेले सगळे प्रतिसाद छान. मनातले प्रश्न कोणीतरी विचारलेले असतात . धागा उघडला की उत्तरे मिळून जातात. धन्यवाद.
Bcg लसीमुळे क्रॉस इम्युनिटी
Bcg लसीमुळे क्रॉस इम्युनिटी मिळाली आहे असे म्हणतात.
केतु
केतु
BCG >>> नाही, ते गृहीतक सिद्ध नाही झाले. म्हणून मी तो मुद्दा टाळलाय !
ब्राझीलमध्ये पण BCG देतात, पण त्यांचा मृत्यूदर आपल्याहून
खूप जास्त आहे
दर लाख लोकसंख्येत मृत्यू (विकीनुसार):
अमेरिका 91
ब्राझील 86
भारत 10
BCG लस : अन्य काही मुद्दे /
BCG लस : अन्य काही मुद्दे / थिअरी
१. बालकांना दिलेल्या या लसीचा परीणाम २० वर्षे टिकतो; आयुष्यभर नाही.
२. भारतातील वातावरणात Mycobacteria (क्षयरोगजन्य सोडूनचे) भरपूर असतात. त्यांच्यामुळे आपल्यात एक सामूहिक प्र-शक्ती निर्माण झाली असावी.
३. त्यातून कोविड संसर्गाचे संरक्षण जरी मिळत नसले, तरी तो झाल्यावर तितका गंभीर होत नाही.
ब्रिटनकडून ऑक्सफर्डच्या करोना
ब्रिटनकडून ऑक्सफर्डच्या करोना लसीला मान्यता
https://www.loksatta.com/desh-videsh-news/astrazeneca-oxford-covid-vacci...
+१
+१
ऑक्सफर्ड लसीला इंग्लंडची मान्यता.
लस वैशिष्ट्य:
व्हेक्टर प्रकार
२ डोस; १-३ महिन्यांच्या अंतराने
साठवण : साधा फ्रीज
अन्नपदार्थ वा औषधांची ऍलर्जी असणाऱ्यांना बंदी नाही
मात्र लसीतील पूरक रसायनांची ऍलर्जी असणाऱ्यांना बंदी
Asia's new richest person is
Asia's new richest person is a Chinese vaccine investor who made $70 billion in 2020, surpassing Indian billionaire Mukesh Ambani
The sources of Shanshan's wealth are his roles as chairman at two major companies: bottled water maker Nongfu Spring and Beijing Wantai Biological Pharmacy Enterprise, which makes vaccines and hepatitis test-kits. Nongfu Spring reported $3.5 billion in revenue in 2019, while Shanshan's pharmacy enterprise reported revenue of $171 million, per Bloomberg.
In 2020, Shanshan's net worth skyrocketed as he took both of his companies public. Beijing Wantai Biological Pharmacy Enterprise went public on the Shanghai Stock Exchange in April, and Nongfu Spring's $1.1 billion initial public offering in Hong Kong in September made Shanshan China's third-richest person overnight.
https://www.businessinsider.in/retail/news/asias-new-richest-person-is-a...
देशात दोन लसींना मंजुरी; पण
देशात दोन लसींना मंजुरी; पण अद्यापही ६९ टक्के लोकांमध्ये द्विधा मनस्थिती
https://www.loksatta.com/desh-videsh-news/approval-of-two-vaccines-in-th...
HIV positive लोक कोविड
HIV positive लोक कोविड वेकसिंन घेऊ शकतील का ?
माझ्या वाचनानुसार ज्या
माझ्या वाचनानुसार ज्या एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांचा आजार औषधे घेऊन नियंत्रणात आहे, त्यांना उलट लसीच्या प्राधान्य गटांमध्ये ठेवलेले आहे. फायझर व मॉडर्न लसींच्यामध्ये एम-आरएनए तंत्रज्ञान आहे. त्यामुळे त्यापासून अशा लोकांना काही धोका दिसत नाही. अशा लोकांमध्ये कोविड लस घेतल्यानंतर एखादे वेळेस लसीचा परिणाम कमी दिसेल असे cdcच्या पत्रकात म्हटलेले दिसते.
या लसींच्या प्रयोगांमध्ये एचआयव्ही पॉझिटिव्ह लोकांचा समावेश केलेला होता. त्यांना काही त्रास झाल्याचा उल्लेख दिसत नाही.
Ok
Ok
भारत बायोटेकची लस अजूनही
भारत बायोटेकची लस अजूनही क्लिनिकल ट्रायल स्टेजला असतानाच ती लोकांना टोचायला मान्यता देण्यात आली आहे. ज्याला देणार त्याची कन्सेंट घ्यायची म्हणे. गरीब, अज्ञानी लोकांना लच टोचल्याच्या बातम्या आहेत. यात भोपाळ गॅस व्हिक्टिम्सही आहेत.
‘सिरम’ व ‘भारत बॉयोटेक’ या
‘सिरम’ व ‘भारत बॉयोटेक’ या दोघांच्या लसीना ज्या प्रकारे ‘तातडीच्या वापराची मान्यता’ मिळाली त्या संदर्भात नामांकित लसतज्ञ डॉ. गगनदीप कांग यांची दीर्घ मुलाखत इथे आहे :
https://thewire.in/health/gangandeep-kang-karan-thapar-covid-19-vaccine-...
ठळक मुद्दे :
१. दोघांनाही दिलेली मान्यता ‘घाईगडबडीतली’च आहे.
२. 'भारत बॉयोटेक’ने पुरेशा परिणामकारकतेचा विदा सादर केलेला नाही.
३. म्हणून ती लस (२)स्वतःसाठी डॉ. कांग ‘ट्रायल’ दरम्यानच घ्यायला तयार आहेत; थेट उपयुक्त लस म्हणून नाही.
कोव्हीशिल्डच्या जगभर चाचण्या
कोव्हीशिल्डच्या जगभर चाचण्या झाल्या आहेत त्यामुळे ती घेण्यात अडचण नाही.
लसीकरण १०० टक्के सुरक्षेची
लसीकरण १०० टक्के सुरक्षेची हमी देत नाही, मास्क वापरणं आवश्यकच – तज्ज्ञांचा सल्ला
https://www.loksatta.com/desh-videsh-news/wearing-mask-is-must-vaccinati...
Pages