मायबोली गणेशोत्सव २०१८

आमच्या घरचा बाप्पा

वाजत गाजत ,थाटामाटाने गणराजाचे आगमन झालेले आहे. घरच्यांनी मोठ्या हौसेने सजवलेल्या मखरात मूर्ती विराजमान आहेत. निरांजनाच्या , समईच्या प्रकाशात बाप्पांचा चेहरा आणखीन उजळून , झळाळून निघालाय. या देखण्या मूर्तीची , मखराची, तुम्ही केलेल्या सजावटीची, रोषणाईची प्रकाशचित्रे आणि माहिती इथे द्या.

बाप्पाचा नैवेद्य

तुमच्या बाप्पाची मनोभावे पूजा करून त्याला प्रसन्न करण्यासाठी यंदा तुम्ही कायकाय नैवेद्य अर्पण केले, पाहुण्यांसाठी काय खिरापत तयार केली याची चित्रमय झलक बघायला मायबोलीकर उत्सुक आहेत.

तुमच्या गावाचा गणपती

आपल्या गावचा गणपती म्हणजे आपला खास जिव्हाळ्याचा विषय. मग तो गावच्या जुन्या देवळातला असो की सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा असो. त्याला आपण आपल्या मनाच्या गाभार्‍यात जपून ठेवतो. तसेच त्याची स्मृती कायमची कोरली जावी म्हणून आपल्या कॅमेर्‍यातही छायाचित्राच्या रुपात जतन करतो. अशी प्रकाशचित्रे बघण्यासाठी सगळे मायबोलीकर उत्सुक आहेत.

स्वरचित आरत्या

मायबोली गणेशोत्सव २०१८ चे निमित्त साधून आपल्या स्वरचित आरत्या इथे लिहूया आणि आपली प्रार्थना अनेक मायबोलीकरांकरवी बाप्पापर्यंत पोचवूया. आरत्या लिहिण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१८' या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
ओवी, भजन, पोवाडा अशा वेगवेगळ्या प्रकारांमधे प्रार्थना लिहू शकता .

मायबोली गणेशोत्सव २०१८

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे एकोणिसावे वर्ष!

aaras_index.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

माझी युक्ती (उपक्रम)

मुलांना शिकवता शिकवता अनेक गोष्टी आपण सुद्धा शिकत असतो. एखादी संकल्पना, विषय शिकवताना आपल्याला अनेकदा सोप्प्या पद्धती सापडतात ज्या कोणत्याही पुस्तकात, पाठ्यक्रमात दिलेल्या नसतात.
अशाच सोप्प्या पद्धती, युक्त्या एकमेकांसोबत वाटून घेण्यासाठी हा धागा.

सुरुवात नव्या बदलाची

जे मायबोलीकर पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात, त्यांना त्यांचे अनुभव मांडण्यासाठी हा धागा, त्यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळेल आणि पर्यावरणाची हानी रोखण्यास मायबोलीचाही हातभर लागतो आहे हे सुखद सत्य जगासमोर येईल.

कथासाखळी

कथासाखळी किंवा एस टी वाय म्हणजे स्पिन द यार्न! धागा गुंडाळा.
थोडक्यात,एक सुरूवात देऊन मग बाकीच्यांनी आपापल्या कल्पनाशक्तीने गोष्टं थोडी थोडी पुरी करायची.
१. कथासाखळी- प्लिज मला सॉरी म्हण...
२. कथासाखळी- भूर्जपत्र
३. कथासाखळी- कसं सांगू मी तुला
४. कथासाखळी- उद्याचा इतिहास

खेळ शब्दांचा

आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत.
१. शालेय उपयोगी वस्तू
२.शेतीसंबंधीत वस्तू आणि शब्द
३.मराठी लेखक/कवी किंवा कादंबरी/काव्यसंग्रह
४.मराठी चित्रपट व नाटक
५. खेळ व खेळाडू

मजेशीर कोट्या चॅलेंज

एखाद्या सिनेमातला, नाटकातला संवाद असो किंवा कथा कादंबरी मधलं एखादं वाक्य आपण सतत कोट्या करण्यासाठी वापरतो. थोडक्यात काय तर आपलं आयुष्य हे कोट्यांनी व्यापलेलं आहे.

काव्य अंताक्षरी

आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो तश्याच कवितेच्या भेंड्या "काव्य अंताक्षरी"
नियमावली:
१)कविता चारोळी असावी.
२)लिहताना आधीच्या कवितेतील शेवटची ओळ/शब्द घेऊन पुढील ओळी लिहाव्या.