रंगीबेरंगी पौष्टिक सॅलड -टोमॅटो कॅनपीज - मनीमोहोर

Submitted by मनीमोहोर on 23 September, 2018 - 17:59

घटक 1. धान्य : मका
घटक 2. पालेभाजी : कोथिंबीर
घटक 3. कंदभाजी आणि फळभाजी : गाजर, आणि काकडी टोमॅटो, फुगी मिरची.
घटक 4. फळ : बदाम कापून ( जाडसर काप करावेत)

मीठ, मिरपूड, चवीसाठी.

टोमॅटो ला v कट देऊन त्याच्या कॅनपीज करून घ्याव्यात. आतील बिया काढून टोमॅटो आतून पोकळ करून घ्यावेत. टोमॅटो ला आतून थोडं मीठ मिरपूड चोळावी. काकडी, गाजर, फुगी मिरची ह्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यात बदामाचे तुकडे, मक्याचे दाणे, घालावेत. चवीसाठी मीठ, मिरपूड घालावी आणि ते मिश्रण टोमॅटो कॅनपीज मध्ये भरावे. वरून कोथिंबीर घालावी.

हा फोटो

IMG_20180923_204148899~3.jpg

V कट नाही जमलं तर सरळ सुरीने दोन भाग करू शकता टोमॅटो चे.
सॅलड केल्यावर लगेच खावं. ठेवून दिलं तर मीठामुळे मऊ पडतं.
हे ताटात वाढायला दिसत छान आणि आटोपशीर पणे रहात ताटात.
आपल्या आवडी प्रमाणे ह्यात वेरीएशन करू शकता. टोमॅटो च्या कॅनपीज ही मुख्य कल्पना आहे .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे!
माझ्यामते यात पास्ता भरून जास्त चांगलं लागेल, अर्थात बाकीही बरीच व्हेरीएशन्स होतील.

मस्त दिसतय. आटोपशीर +1
नुसतं सॅलड खायचं असेल तेव्हा हे असं खायला आवडेल. वाचता वाचता हातानेच खायला, चमचा वगैरे भानगड न घेता.