रंगीबेरंगी पौष्टिक सलाड - नटी-मिंटी घरगुती सॅलड! - मॅगी

Submitted by मॅगी on 19 September, 2018 - 13:54

डोक्यात भरपूर सॅलड रेसीपीजचे कडबोळे करून शेवटी शेतातून ताज्या आलेल्या शेंगा दिसल्यावर त्याच उचलल्या. स्पर्धेसाठी फारच लिंबूटिंबू (नाही नाही 'त्यांची' नाही, माझीच!) एन्ट्री आहे. तरी म्हटलं आपल्या देशी, घरगुती वस्तू वापरून काय तयार होतं पाहू. (तसेही सध्या स्वदेशी बाबा 'इन थिंग' आहेत!) नावात जरा घरगुती वगैरे शब्द टाकले की जरा दवणीय कामपण साधून जातं Proud

तर हे साहित्य:
तीन कोवळया करकरीत लहान काकड्या
दोन लाल पिकलेले टोमॅटो
एक लहान कांदा
एक हिरवी ढब्बू मिरची
मूठभर सोललेले ओले शेंगदाणे (शेंगा खायच्या तर सालं उचललीच पाहिजे!)
मूठभर चणाडाळ (दोन- तीन तास भिजवलेली)
काही डहाळ्या कोथिंबीर आणि पुदिना

2018-09-19-23-11-41-268.jpg

ड्रेसिंगसाठी: (फोटो काढायचा राहिला)

एक मोठी वाटी दही
चिमूटभर जिरेपूड
चिमूटभर सैंधव किंवा मीठ
चिमूटभर लाल तिखट

आणि कृती:

१. शेंगा सोलून दाणे काढले. चणाडाळ भिजवून ठेवली.

२. दही स्टीलच्या गाळण्यात ठेवले, म्हणजे जास्तीचे पाणी निघून जाऊन क्रिमी दही शिल्लक राहील.

३. आता चिराचिरी सुरू! काकडीच्या चकत्या केल्या, ढब्बू मिरचीचे जुलियन्स केले. कांद्याच्या चकत्या करून रिंग्स सोडवून घेतल्या. टोमॅटोचे चौकोनी तुकडे केले. दाणेही अर्धे चिरून घेतले. कोथिंबीर बारीक चिरली आणि पुदिन्याची पाने हाताने फाडली.

४. वाटीत ड्रेसिंगचे साहित्य घेऊन काट्याने नीट ढवळून एकत्र केले.

2018-09-19-23-16-19-492.jpg
ड्रेसिंग घालण्यापूर्वी.

५. एका वाडग्यात सगळे चिरलेले साहित्य हळुवार एकत्र ढवळून, सॅलड सर्व्ह करायच्या बोलमध्ये काढले. वर ड्रेसिंग ओतून पसरले.

तयार!
2018-09-19-23-17-57-984.jpg

सॅलड घरगुती आहे, चुलीवरचे नाही Proud

आमच्याकडे नटी आणि मिंटी नावाचे कोणीही नमुने नाहीत.

चिमूटभर साखर टाळली आहे!

ड्रेसिंग आयत्या वेळी घाला. आधीच मिसळून ठेवले तर घरगुती सॅलड घरगुती पनीरसारखे दिसेल Lol

टिपा: १. सॅलड दोन व्यक्तींना पुरेसे आहे.

२. बरोबर एखादा व्हाईट वाईनचा ग्लास असेल तर लै भारी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोशिंबीर वाटतेय. आम्ही करतो अशीच मटण केले असेल तर. चणाडाळ आणि शेंगदाणे नाही घालत फक्त. कांदा टाकतो पातळ लांब चिरून.

आमच्या आवाक्यातलं ... दाणे चिरण्याचे कष्ट नाही घेणार आणि अजून पौष्टिक करीन चण्याडाळी ऐवजी स्प्राउट्स घालून...

नक्की खरेखुरे सॅलड करून त्याचे फोटो काढले आहेत ना? का नेहमीप्रमाणे अप्रतीम कलाकारी केली आहे? Wink

ओले शेंगदाणे घालून सॅलडची कल्पना आवडलेली आहे. करून खाण्यात येइल.

छान आहे सॅलड.
मी अशी कोशिंबीर करते. चणा डाळ आणि शेंगदाणे वगळुन
झंपीने म्हणल्याप्रमाणे मट्ण असेल तेव्हा करतेच.
चणा डाळ कच्ची खायचीय?

सगळ्यांना धन्यवाद.
माधव, खरंखुरंच केलंय सॅलड Happy
सस्मित, हो कच्ची डाळच आहे. भिजवल्यामुळे मऊ असते, आपण वाटली डाळ वगैरेमध्ये खातो ना कच्ची डाळ. प्रोटीन आणि फायबरसाठी घेतली आहे यात.

आरारा, मी हे सॅलड करत होते तोपर्यंत मला नियमांच्या धाग्याची लिंक सापडली नव्हती. शेवटी आज धागा दिसला तर बरोबर बसत आहेत घटक. कमीत कमी तीन रंग म्हटलेत तेवढे आहेत. लाल, हिरवा आणि पांढरा.

wow....

slurrrrrrrrrrr.........rp Happy

छान सलाद, लिहीलंय छान.

आमच्याकडे नटी आणि मिंटी नावाचे कोणीही नमुने नाहीत.>> मग मिंटी नावाची आवडती नटी आहे का कोणी?