झब्बू क्र. ३ - पेय.

Submitted by संयोजक on 16 September, 2018 - 23:25

झब्बू क्र ३ पेय
आपल्याला सतत काहीना काही पिण्यासाठी हवे असते. दिवसातून किमान चार लिटर पाणी प्यावे म्हणजे शरीर तंदुरुस्त राहतं असं डॉक्टर म्हणतात. पाहुणे आले की आपण त्यांना विचारतो, काय घेणार चहा, कॉफी, सरबत इ. मित्रांच्या कटिंग पार्टी पासून बाळाच्या दुधापर्यंत आपलं दैनंदिन आयुष्यात पेय हे आपल्याला हवं असतंच. मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय दुसरा झब्बू पेय म्हणजेच तुम्ही पाहिलेल्या, अनुभवलेल्या, बनवलेल्या पेय चे प्रकाशचित्र

Screenshot_20180917_085040.png

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून तलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह! वरचा फेस पाहूनच कळाले हे धारोष्ण दुध आहे. त्याला एक विशिष्ट सुगंध असतो किंचित, तो मला फार आवडतो. बरेच जणांना नाही आवडत.

एका मैत्रिणीकडे पाहिलेला हा टी सेट इतका आवडला मला, म्हणून फोटो काढला होता मुळात. त्या सेट पेक्षा चहा मुळे फोटो इथे चालावा आता Happy
chai set.JPG
'कटिंग' चहा सेट

सोलकढी सांडली कशी काय नाही?>>>> Wink
जादूची आहे.
माझ्या मोबाईल वर तर सरळच आहे ग्लास अपलोड केल्यावर आडवा कसा पडला काय माहीत.