Submitted by सुप्रिया जाधव. on 16 September, 2018 - 06:40
स्फुट - नकुशी
ती अशिक्षित म्हणून...
पहिल्या चार मुली,
पुढच्या तिघींची
गर्भातच हत्या !
आठवा श्रीकृष्ण
मात्र आईच्याच मुळावर उठलेला !
गर्भाशयाचा कर्करोग
देऊन जन्मास आलेला
मरताना तोंडात पाणी घालण्यासाठी जन्मलेला
पण
जगताना तिच्याच तोंडच पाणी पळवणारा !
ही शिक्षित असून...
पाहिले दोन सिझर
जन्मतःच मेलेले,
तिसरे सिझर
कन्यारत्न !
जीवाशी खेळून चौथे सिझर
पुत्ररत्न !
आईच्या पोटाची चाळणी करून आलेला
म्हातारपणीची काठी म्हणून जन्मास घातलेला
पण
म्हातारपणी तिच्याच डोक्यात काठी घालुन हाकलुन देणारा !
आई असो वा मुलगी
सून असो वा सासू
एकुणात ...नकुशीच !!
सुप्रिया
( प्रेरणा - वर्षा देशपांडे लिखित 'कोयत्याच्या मुठीत')
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा