क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

२००३ वर्ल्डकप जसा सचिनचा होता तसा ९२ वर्ल्डकप मार्टीन क्रो चा होता.>> २००३ मध्ये Lance Klusener बद्दल थोडे अधिक वाईट वाटले होते.

पण तो सेमी ला नव्हत, तर साखळी सामना होता... (ऑसी साठी मस्ट विन होता)
>>>

ऑसीसाठी मस्ट विन तर होताच
पण तोच सामना गमावल्याने सेमीमध्ये स्कोअर ईक्वल होऊनही आफ्रिका नाही तर ऑस्ट्रेलिया फायनलला गेली. त्यामुळे विशेष महत्व आले त्याला.

अर्थात या गोष्टी नंतर जाणवतात. फिनिशिंग लाईनला आल्यावर लास्ट मोमेंटला जे घडते तेच मॅटर करते. त्यामुळे तो रन ऑटच चटका लावतो.
पण प्रामाणिकपणे सांगायचे तर ऑस्ट्रेलियाच डिझर्व्ह करत होती असे वाटते.

फिल्मी - ते १९९९ मधे ना? बिचार्‍याने एकटा फलंदाज जे करू शकते ते सर्व केले. दुसर्‍या बाजूने डोनाल्ड पळालाच नाही. नाहीतर पहिल्या दोन बॉल ला दोन कडकडीत फोर्स मारले होते.

१९९९ चे डिसर्विंग विनर्स ऑसीज होते असे मला वाटते. त्यांनी अचूक वेळेला आपापले खेळ उंचावले नि त्यांच्या वाटेला आलेल्या सगळ्या संधींचा पुरेपूर फायदा उठवला. सेमी मधली वॉर्न ची बॉलिंग कसली खतरनाक होती.

ब्रॉड - ५०० !
कुंबळेच रेकॉर्ड कदाचित तोडु शकेल क? ३४ वर्षाचा आहे ब्रॉड... अजुन ३ वर्षे तरि खेळेल असे त्याच्या फिटनेस वरुन वाटत आहे....
मुरलीच रेकॉर्ड तोडायला अजुन काही दशके जावी लागतील.....

इथले लाडके समालोचक , मांजरेकर, आतां पुन्हा काॅमेंटरी बाॅकसमधे येण्यासाठी अर्ज विनंत्या करताहेत !

( मला वाटतं, क्रिकेट करिअरबाबत स्वत: काहीसे वैफल्यग्रस्त असल्याने मधूनच तो वैताग त्यांच्याकडून कुणावर तरी निघत असावा. तो भाग वगळतां, समालोचक म्हणून मांजरेकर मला बरे वाटतात , निदान फार खटकत तरी नाहीत )

खुद्द देवावरही टिका करायचा रोखठोकपणा त्याच्याकडे होता म्हणून तो ट्रोल व्हायचा.

पण त्याच्या बाहेर जाण्यामागे राजकीय कारण सुद्धा आहे.
हे जरूर वाचा.

https://mahasports.in/why-sanjay-manjrekar-was-axed-by-bcci-2/

यातील सर्वात महत्त्वाचे कारण जर कोणते सांगतिले जात आहे तर ते सीएए-एनआरसीला विरोध करणे व मुंबईतील आंदोलकांना पाठींबा देणे. तसेच जेएनयुमधील आंदोलकांना पाठींबा दिल्यामुळे तसेच आंदोलकांवर हल्ला झाल्यावर टीका केल्यामुळे ही वेळ ओढवल्याचे कारण दिले जात आहे.

इंग्लंड - आयर्लंड सामने अगदीच एकतर्फी चालले आहेत. पण इंग्लंड च्या टेस्ट आणी वन-डे च्या टीम्स पहाता असं लक्षात येतं की त्यांच्या दोन्ही टीम्स खूप स्ट्राँग आहेत. त्यांची बेंचस्ट्रेंथ फारच जबरदस्त आहे.

पाकिस्तान - इंग्लंड पहिला कसोटी सामना

पाकिस्तान ३२६ व १६९
इंग्लंड २१९ व १४०/५

इंग्लंड पराभवाच्या मार्गावर आहे.

अजून सांगणं कठीण आहे. इंग्लंड ची बॅटिंग खूप डीप आहे. पण पाकिस्तानची बॉलिंग मस्त आहे. इंटरेस्टींग होईल मॅच असं वाटतय. बटलर वर बरंच अवलंबून आहे.

इंग्लंड ला त्यांच्या देशात टेस्ट मधे हारवणं खूप कठीण आहे. त्यातून पाकिस्तान चा अनुभवही कमी पडला. अर्थात बटलर आणी वोक्स जबरदस्तच खेळले.

चांगले खेळले ईंग्लंड...
पाकींनी दुसर्‍या डावाच्या फलंदाजीत घोळ घातला... तसेच २ लेग स्पिनर वगैरे जरा विचित्र निवडही केली होती...

छान धुलाई सुरु आहे गोलंदाजांची. कांगारुं फलंदाजांना आयपीएल मध्ये भारतीय गोलंदाजीचा छान सराव मिळालाय!
३३० ते ३४० चे आव्हान देऊ शकतात!

आता ३६० होऊ शकतात..
आपीएल मध्ये फेल गेलेले फलंदाज स्मिथ, फिंच, मॅक्सवेल फुल फॉर्मात!

खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहेच आहे पण दडपण आणणारं 350+चं संभाव्य लक्ष्य आपली फलंदाजी बहरण्यासाठी प्रतिकूल ठरूं शकतं.

रोहित नाही तर मजा नाही इंडिया बॅटिंग बघायला. मयांकला घेऊन मोठी चूक केली. दहाच्या पुढे रन्स काढणं अवघड आहे त्याला. आयपीएलला सुमार बॉलर समोर चालून गेला तो.

Pages