क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिऑन इतका पुढे आहे? मध्यंतरी आपल्याविरूद्ध त्याने विकेट्स काढल्या होत्या इतकेच लक्षात आहे.

होप पहिले दोन वॉर्न आणि मॅग्राथ आहेत!

पाकिस्तान जो बोलर्सची मेक्का समजला जातो तिथे फक्त वसीम अक्रमचे ४००पेक्षा अधिक (४१४) बळी आहेत. मग आहेत वकार ३७३ आणि इम्रान ३६२.
नंबर ४वर थेट दानिश कनेरिया २६२ बळी. म्हणजे क्रमांक३ वरील इम्रानपेक्षा १००बळी कमी.

शक्य आहे ना. हल्ली सामने किती खेळले जातात ते बघ ना. परत तो चांगला स्पिनर आहे. आपल्या विरुद्ध तरी आता विकेट्स काढायला लागलाय, इतरांच्या विरुद्ध आधी पासून घेतो आहे.

पाकिस्तान जो बोलर्सची मेक्का समजला >> मक्का आहे म्हणूनच असेल Happy जितकी स्पर्धा अधिक तितक्या संधी कमी असे होत असेल.

लिऑनचे जवळ जवळ ४०० बळी होत आले आहेत !!!!
त्या मानाने (ऑसी समालोचकांकडुनही) जरासा उपेक्षीतच राहिला आहे का हा गडी???

जिंकले! स्टोक्स सारखी इतर उदाहरणे कोणाला आठवतात का? मधल्या फळीतील कोणी किंवा जनरल फटकेबाज खेळाडू पटकन रन्स करायला ओपनिंगला आल्याची?

सचिन एकदा ओपनिंगला आला होता ते लक्षात आहे. पण फारसे रन्स केले नाहीत त्याने. बोथमसुद्धा आला होता बहुधा एकदा.

*मधल्या फळीतील कोणी किंवा जनरल फटकेबाज खेळाडू पटकन रन्स करायला ओपनिंगला आल्याची?*-
आपल्याकडे तर फटकेबाज खेळाडूच ओपनिंगला आणायचा शिरस्ता आहे - फारूख इंजिनिअर, बुधी कुंदरन, श्रीकांत, सेहवाग. .... !! Wink

९२ वर्ल्ड कपमधे कपिल आला होता ओपनिंगला श्रीलंका विरुद्ध.... पण ती मॅच पावसाने २ -३ ओव्हर्स नंतर कॅन्सल झाली आणी भारताचा १ गुण फुकट गेला म्हणुन हळहळलो होतो... ४ च वर्षात श्रीलंकेने रडवले आपल्याला.... Happy

स्टोक्स वेडा झाला आहे... काल मी घरी गेल्यावर थोडी मॅच पाहिली तेव्हा तो मिड ऑफ अन मिड ऑन न लावता गोलंदाजी करत होता, दिवसातली ६ - ७ वी ओव्हर असेल.... स्वतःच्या गोलंदाजीवर पठ्ठ्याने एक ऑफ ड्राईव्ह सीमारेषेपर्यंत चेज करुन आडवला !!! कमाल फिटनेस !!!
पुर्वीचे गोलंदाज ओव्हर झाल्यावर थर्ड मॅनला असताना चेंडु वाकुनही अडवत नसत Happy

९२ वर्ल्ड कपमधे कपिल आला होता ओपनिंगला श्रीलंका विरुद्ध >> धन्यवाद Happy मला वाटत होते की कपिलही कधीतरी आला होता पण नक्की आठवत नव्हते.

९२ वर्ल्ड कपमधे कपिल आला होता ओपनिंगला श्रीलंका विरुद्ध.... पण ती मॅच पावसाने २ -३ ओव्हर्स नंतर कॅन्सल झाली आणी भारताचा १ गुण फुकट गेला म्हणुन हळहळलो होतो...
>>>>>>

मी सकाळी उठून लाईव्ह पाहिलेला तो सामना. कारण माझा पहिला वर्ल्डकप होता. त्यात कपिलला सुरुवातीला बघून हडबडून गेलेलो. सामना पावसाने कमी ओवरचा झाल्याने तो पुढे आलेला. एक सिक्सही मारलेला बहुतेक आल्याआल्याच.
पण माझ्या आठवणीप्रमाणे लंकेनेही चांगली सुरुवात केलेली. कदाचित तेवहही धक्का दिला असता पाऊस आला नसता तर. चेक करायला हवा त्या सामन्याचा स्कोअरबोर्ड..

>>> मी सकाळी उठून लाईव्ह पाहिलेला तो सामना. कारण माझा पहिला वर्ल्डकप होता. त्यात कपिलला सुरुवातीला बघून हडबडून गेलेलो. सामना पावसाने कमी ओवरचा झाल्याने तो पुढे आलेला. एक सिक्सही मारलेला बहुतेक आल्याआल्याच. >>>

सामना फक्त २० षटकांचा होणार होता. कपिल व श्रीकांतने सुरुवात केली होती. श्रीकांतने डावाचा पहिला चेंडू निर्धाव खेळला व दुसऱ्या चेंडूवर १ धाव घेतली होती. परंतु कपिल पुढील चेंडू खेळण्यापूर्वीच जोरदार पाउस आला व शेवटी सामना रद्द झाला.

अंतिम धावफलक - भारत १/० (०.२), श्रीकांत नाबाद १ (२), कपिल नाबाद ० (०).

युवराज सिंह २ एकदिवसीय सामन्यात सलामीला आला होता, परंतु दोन्ही डावात मिळून फक्त १२ धावा केल्या होत्या.

धोनी २ वेळा सेहवाग बरोबर सलामीला आला होता. २००५ मध्ये लंकेविरूद्ध डांबुला येथे सलामीला येऊन धोनीने फक्त २ धावा केल्या होत्या. २००६ मध्ये जमशूदपूर येथे इंग्ल़डविरूद्ध धोनीने सलामीला येऊन १०६ चेंडूत ९६ धावा केल्या होत्या.

रूनमेश बहुतेक झिम्बाबवे सामन्याबद्दल बोलत आहे. त्यातही कपिल सलामीला आला होता आणि कपिलने एक सिक्स मारली होती त्याच्या 10धावात.
पावसामुळे तो सामना कमी षटकांचा केला होता आणि झिम्बाबवेने चांगली सुरुवात केली होती. 1 आउट 104 धावा 19 षटकांत. पण रिवाईज्ड लक्ष 139चे होते

पुरोगामी,
हो कपिल लंकेविरुद्ध ओपनिंगला आला असे वर उल्लेख आला म्हणून गल्लत झाली. आठवणी फारच लहानपणीच्या आहेत ना Happy

तर ती मॅच भारत बनाम झिम्बाब्वे होती - १९९२ वर्ल्डकपचीच

कपिल ओपनिंगला आला होता.
वर म्हटल्याप्रमाणे एक सिक्सही मारला होता Happy

३२ ओवरमध्ये २०७ झालेले आपले

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने १९.१ ओवरमध्ये १०४/१ अशी आश्वासक सुरुवात केलेली.
आणि पाऊस आल्याने सामना थांबला.
डकवर्थ लुईस की तेव्हाचा जो काही पावसाचा नियम लाऊन आपल्याला जिंकलेले दिले दिसत आहे. पण आठवणींप्रमाणे सामना थांबेपर्यंत झिम्बाब्वेच्या सुरुवातीने थोडे चिंतेत टाकले होते. कारण दुय्यम संघाशी आरामात जिंकणे अपेक्षित असते.

हा स्कोअरकार्ड - https://www.espncricinfo.com/series/8039/scorecard/65136/india-vs-zimbab...

हो आठवल्या त्या गेम्स. तसेही आपण भिकारच खेळत होतो पण पावसाने आपला सेमीज चा चान्स आणखी कमी केला. याउलट पाकही भिकार खेळत असून इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात त्यांना पावसानेच वाचवले व लाइफलाइन दिली. ती घेउन ते पुन्हा वर आले.

आपल्या खेळाडूंचे डार्क निळे कपडे, चित्रविचित्र शेप्स ची ग्राउण्ड्स, अतिशय स्पष्ट टेलिकास्ट, दर्जेदार कॉमेण्टरी, सर्वात भारी फॉर्मॅट (९ संघ, प्रत्येक जण एकमेकांशी खेळणार, आणि एकदम सेमीज. नो ग्रूप्स, नो लिंबूटिंबू संघ). क्रीजवर खेळायला उभे असले की सचिन आणि संजय मांजरेकर मधला फरक ते बॉल फेस करेपर्यंत चटकन ओळखू यायचा नाही. मात्र बॉल मारला की लगेच कळायचे Happy

आणि भारत-पाक मधला वर्ल्ड कप्स मधला पहिलाच सामना!

आपल्या खेळाडूंचे डार्क निळे कपडे
>>>.
बहुधा त्याच वर्ल्डकपपासून क्रिकेटमध्ये रंगीत कपडे पांढरा चेंडू डेनाईट सामने सुरु झाले. त्यामुळे तो वर्ल्डकप म्हटला की तो चकचकीतपणा ल्ख्ख आठवतो. कारण ते तेव्हा पहिल्यांदा पाहिले होते.

बरोबर - पण जनरल क्रिकेट मधे नव्हे, फक्त "वर्ल्ड कप" मधे. जनरल वन डेज मधे थोडे आधीच सुरू झाले होते. १९८५ च्या वर्ल्ड सिरीज मधे ऑलरेडी रंगीत कपडे व पांढरा बॉल होता.

>>> डकवर्थ लुईस की तेव्हाचा जो काही पावसाचा नियम लाऊन आपल्याला जिंकलेले दिले दिसत आहे. >>>

तेव्हा डकवर्थ-लुईस नियम नव्हता. एक वेगळाच अन्यायी नियम होता जो प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने खूप पक्षपाती होता ज्याचा फटका धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला बसत होता.

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून ५० षटकांत २३९ धावा केल्या होत्या. भारताची फलंदाजी सुरू झाल्यानंतर काही वेळाने पाऊस सुरू झाल्याने सामना थांबला व नंतर परत सुरू झाला तेव्हा सामना ४७ षटकांचा करण्यात आला. तेव्हा असा नियम होता की समजा क्ष इतकी षटके कमी झाली तर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने कमीत कमी धावा केलेली क्ष षटके निवडून त्यातील एकूण धावा मूळ धावसंख्येतून वजा करून सुधारीत लक्ष्य दिले जायचे. प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघावर हा अन्याय होता.

या नियमानुसार ऑस्ट्रेलियाने सर्वात कमी धावा केलेली ३ षटके निवडली व त्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ०, १, १ अशा एकूण फक्त २ धावा कमी करून ४७ षटकांत २३८ धावांचे सुधारीत लक्ष्य दिले गेले. म्हणजे ५० षटकांत २४० धावांचे लक्ष्य, पण ४७ षटकांत २३८ धावांचे लक्ष्य. दुर्दैवाने भारत तो सामना फक्त १ धावेने हरला.

या विचित्र नियमाचा सर्वाधिक फटका उपांत्य फेरीत आफ्रिकेला बसला होता. इंग्लंडविरूद्ध धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेला विजयासाठी अंतिम १३ चेंडूत २२ धावा हव्या होत्या. परंतु त्याचवेळी पाऊस येऊन २षटके कमी झाली. इंग्लंडने फलंदाजी करताना २ निर्धाव षटके खेळली असल्याने निर्धारीत लक्ष्यातून ० धावा कमी केल्या गेल्या व आफ्रिकेसमोर १३ चेंडूत २२ धावांऐवजी १ चेंडूत २२ धावा असे हास्यास्पद लक्ष्य ठेवले गेले.

पण या नियमाचा फायदा भारताला झिंबाब्वेविरूद्ध झालेला दिसतो. भारत ३२ षटकांत २०३. नंतर सामना १९ षटकांचा झाल्यानंतर भारताने सर्वात कमी धावा केलेली १३ षटके निवडून त्यात भारताने केलेल्या फक्त ४५ धावा कमी करून १९ षटकांत १५९ धावा असे सुधारीत अवघड लक्ष्य झिंबाब्वेला दिले गेले जे झिंबाब्वेला पेलले नव्हते.

१९९९ मध्ये सुद्धा एका वेगळ्या विचित्र नियमाचा फटका भारताला झिंबाब्वेविरूद्धच्या सामन्यात बसला होता.

पुरोगामी - बरोबर. तो १९९२ च्या वर्ल्डकप चा नियमच वर्थलेस-लुइस ची नांदी ठरली.
१९९२ च्या वर्ल्डकपची सगळी स्क्वाड्स बघितली तर असं वाटतं की सगळ्या टीम्स, निदान कागदावर तरी, स्ट्राँग होत्या.

९२ वर्ल्ड कपमधे सगळ्यात डिसर्व्हिंग न्यु झीलंड होते असे मला फार वाटते....
मार्टिन क्रो कर्णधार असल्याने त्याला खूप श्रेय दिल पाहिजे -
त्या काळात ग्रेटबॅच सलामीला येउन १५ ओव्हरचा फायदा उचलत असे अन नंतर सगळे ऑल राउंडर्स.... अर्थात कप्तान मार्टिन क्रो अन रूदरफॉर्ड मधल्या फळीत...
स्पिनर ने गोलंदाजी चालु करणे (आपल्या सामन्यात श्रीकांत आउट झालेला, दीपक पटेल ला ६ मारायला जाउन).... मिलिटरी मिडियम पेस (गॅव्हिन लार्सन, ख्रिस हॅरिस , रॉड लॅथव) बॉलिंगला (तेव्हा) विचित्र वाटणारी फिल्ड प्लेसमेंट्स.... अर्थात घरी वर्ल्ड कप असल्याचा त्यांनी पुरेपुर फायदा उठवला होता....
मार्टिन क्रो जबरदस्त आवडायचा... गेला बिचारा लवकर

तेव्हा डकवर्थ-लुईस नियम नव्हता. एक वेगळाच अन्यायी नियम होता
>>
हो कर्रेक्ट, ती अनफेमस आफ्रिका मॅच १ बॉल २२
दुसर्‍या एखाद्या देशाबद्दल वाईट वाटायची ती माझी पहिलीच वेळ होती.
आणि तितकेच प्रकर्षाने वाईट आफ्रिकेनेच पुन्हा ९९ च्या वर्ल्डकपला वाटायला लावले होते.

@ मार्टीन क्रो,
२००३ वर्ल्डकप जसा सचिनचा होता तसा ९२ वर्ल्डकप मार्टीन क्रो चा होता.
यांचे संघ हरले तेव्हा या दोघांबद्दल जास्त वाईट वाटले.
२००३ ला निदान ऑस्ट्रेलिया जिंकली जे डिझर्व्हिंग होते. ९२ बाबत तसेही म्हणता येत नाही.

आणि तितकेच प्रकर्षाने वाईट आफ्रिकेनेच पुन्हा ९९ च्या वर्ल्डकपला वाटायला लावले होते.>>> सेमी फायनलला वॉ ब्रदर्स पैकी कोणाचा तरी कॅच हर्षल गिब्सने सोडल्याचा आठवतोय. त्याने कॅच पकडला होता पण कॅच पकडल्याच्या आनंदात चेंडू वर उडवायला गेला आणि चेंडू हातातून सुटला.

कोणाचा तरी कॅच हर्षल गिब्सने सोडल्याचा आठवतोय. >> स्टीव्हचा..... पण तो सेमी ला नव्हत, तर साखळी सामना होता... (ऑसी साठी मस्ट विन होता)

आणि तितकेच प्रकर्षाने वाईट आफ्रिकेनेच पुन्हा ९९ च्या वर्ल्डकपला वाटायला लावले होते. >>> २००३ सुद्धा बहुधा.

Pages