Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48
Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33
क्रिकेटवरील पहिले चार धागे -
http://www.maayboli.com/node/1889
http://www.maayboli.com/node/30450
http://www.maayboli.com/node/51908
https://www.maayboli.com/node/60723
भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
*जुन्या आणि नव्यांची जेंवा
*जुन्या आणि नव्यांची जेंवा आकडेवारीची तूलना करतात तेंव्हा.* सहमत. तुलना करायचीच असली तर एखादा खेळाडू कोणत्या/ कोणाच्या क्लासमध्ये बसतो , तें सांगावं.
( माझं तर मत आहे कीं सामना सुरूं असताना मधेच अशी तुलना करणं, जुन्या क्लिपस/ आंकडेवारी दाखवणं अगदीं अत्यावश्यक असेल तरच करावं. आधीच चालू असलेल्या खेळाचा पूर्ण आस्वाद जाहिराती घेवूं देत नाहीत , त्यात आणखी हा लक्ष विचलित करणारा रसभंग ; मध्यंतर किंवा इतर कारणांसाठी खेळ थांबला असेल तेंव्हा जरूर दाखवा ना हया गोष्टी !! )
विक्रमसिंह - त्यात
विक्रमसिंह - त्यात एकदिवसीयमध्ये दोन बॉल्स असल्याने बॉल जुना कधीच न होता बॅटवर जोरात येत राहतो ...
बुमराला का बाहेर काढला?
बुमराला का बाहेर काढला?
१६२ धावांचे लक्ष्य दिले!
१६२ धावांचे लक्ष्य दिले!
परत पंडया व जडेजा तारणहार
परत पंडया व जडेजा तारणहार ठरले.
चेंडूला 'बाऊनस' व थोडासा 'सविंग'ही मिळतोय..बघूं आपले गोलंदाज कसा फायदा घेतात. बुमराहची उणीव जाणवणारच.
डावरा स्टार्क 'ओव्हर द विकेट' गोलंदाजी करताना उजव्या फलंदाजांसाठी ऑफ स्टंपवरून चेंडू सफाईने आंत आणतो. डावरा धवन अशाच चेंडूवर बोलड झाला ! 140+ वेगाचा असा चेंडू खेळणं महाकठीणच !!
जडेजा च्या जागी चहाल
जडेजा च्या जागी चहाल concossion sbstitute म्हणजे या rule चा पूर्ण गैरफायदा आहे
इंग्लंड - द. आफ्रिका
इंग्लंड - द. आफ्रिका दरम्यानचा एकदिवसिय सामना आफ्रिकन खेळाडू कोव्हिडग्रस्त आढळल्याने पुढे ढकलला!
जडेजा च्या जागी चहाल
जडेजा च्या जागी चहाल concossion sbstitute म्हणजे या rule चा पूर्ण गैरफायदा आहे>>>
पहिले दोन्ही बळी फिंच आणि स्मिथ चहलला मिळाले..
Hawkeye ला खूपच उशीर होत आहे.
Hawkeye ला खूपच उशीर होत आहे.
जिंकण्याची शक्यता बळावली!
जिंकण्याची शक्यता बळावली! प्रत्येक चेंडूला चौकारा पेक्षा अधिक धावा हव्यात
शामीला जास्तीत जास्त २५ धावात षटक संपवावे लागेल!
जिंकले एकदाचे. शामी दोन्ही
जिंकले एकदाचे. शामी दोन्ही संघात सर्वात महागडा ठरला! ४ षटके ४६ धावा!
*...म्हणजे या rule चा पूर्ण
*...म्हणजे या rule चा पूर्ण गैरफायदा आहे* हेराफेरी न करतां अस्तित्वात असलेल्या नियमाचा लाभ मिळाला तर तो 'लक फॅकटर' म्हणता येईल पण 'गैरफायदा' कसं म्हणता येईल ?
पण 'गैरफायदा' कसं म्हणता येईल
पण 'गैरफायदा' कसं म्हणता येईल ?>>
बरोबर गैरफायदा नाही घेतला. नियम उपयोगात आणला आणि फायदा झाला म्हणता येईल.
मॅच जिंकलेली पाहून छान वाटलं.
मॅच जिंकलेली पाहून छान वाटलं. पहाटे उठल्याचं सार्थक झालं. शामी चा ऑफ-डे होता, पण बाकीच्या बॉलर्स ने मस्त बॉलिंग केली. चहल, चहर, सुंदर आणी नवोदित नटराजन - सगळ्यांचंच कौतुक आहे.
डार्सी शॉर्ट हा ऑस्ट्रेलियाचा युसूफ पठाण / अतुल बेदाडे / अमय खुरासिया असावा.
कन्कशन सब च्या रूलवर बरीच चर्चा झाली आज. लँगरने बून शी (सामनाधिकारी) वाद घातला वगैरे. पण हा 'वाद' निंदनीय आहे. हा काही आज तयार केलेला नियम नाहीये. गेली दोन-एक वर्षं तरी तो अस्तित्वात आहे. आणी ऑस्ट्रेलिया ला तर ह्या नियमाचा भरगोस फायदा झालाय. इंग्लंड विरूद्ध टेस्ट मॅच मधे कन्कशनमुळे स्मिथ बाहेर गेल्यावर लबुशेन ने दुसर्या इनिंग ला कक्शन सब म्हणून येऊन शतक झळकवलं होतं.
परत एकदा फिल्डींगः कोहलीने सोडलेला कॅच, सॅमसन च्या पायातून गेलेली ओव्हरथ्रो ची बाऊंड्री - सरकारी अधिकारी (पक्षी: कोच) इकडे लक्ष देतील का?
कन्कशन सब च्या रूलवर बरीच
कन्कशन सब च्या रूलवर बरीच चर्चा झाली आज. लँगरने बून शी (सामनाधिकारी) वाद घातला वगैरे. पण हा 'वाद' निंदनीय आहे. हा काही आज तयार केलेला नियम नाहीये. गेली दोन-एक वर्षं तरी तो अस्तित्वात आहे. आणी ऑस्ट्रेलिया ला तर ह्या नियमाचा भरगोस फायदा झालाय. इंग्लंड विरूद्ध टेस्ट मॅच मधे कन्कशनमुळे स्मिथ बाहेर गेल्यावर लबुशेन ने दुसर्या इनिंग ला कक्शन सब म्हणून येऊन शतक झळकवलं होतं. >> +१. परत ऑसी ओपनली म्हणतायेत कि त्यांना सब बद्दल प्रॉब्लेम नाहीये तर चहल जाडेजा चा सब आहे का ह्याबद्दल आहे. एक जन ऑल राऊंडर, गन फिल्डर तर दुसरा रीस्ट स्पिनर नि आठ-अकराव्या नं. चा बॅटस्मन. पण ह्यात मुद्दा असा आहे की, लाईक टू लाईक सब करताना किती कीस काढायचा ? शेवटी जाडेजा हा मेन स्पिनर होता आजच्या मॅच मधे तोही बॉल बाहेर काढणारा त्यामूळे चहल जो बॉल बाहेर काढतो ह्या जोरावर लायक स्पिनर ठरतोच. समजा अक्षर किंवा थोरला पांड्या असता तर गोष्ट वेगळी - लाईक टू लाईक सब होता. ते नाहीत म्हटल्यावर अजून काय करणार होते ? यादव नि चहल मधे चहल येणार हे उघड होते.
आज कोहली चा ड्रॉप वगळता कॅच फिल्डींग जाडेजा नसतानाही सुधारलेली दिसली - सॅमसन नि पांड्याचे कॅचेस झक्कास होते, पांडेचा प्रयत्नही चांगला होता.
सॅमसन ला कीप करायला बघायला आवडले असते. बहुधा राहुल हाच कीपर ह्यावर आत्ता शिक्का मोर्तब झालेय. पांडे ने आज परत संधी फुकट घालवली. पुढच्या मॅचला धवन ऐवजी मयांक ला आणायला हवे.
असामीजी, तुमचं मेन्यूकार्ड
असामीजी, तुमचं मेन्यूकार्ड वाचूनच पोट भरलं >> भाऊ असा पळ काढू नका बर, तुमी हवे तर अजून सबस्टिट्यूट करा
एक तराजू नाही आहे. >> हे नेहमी लागू होणारे आहे. नियम बदलते आहेत नि दडपणे पण बदलती आहेत. तुलना करणे अशक्य आहे.
पांड्या आणि सॅमसनच्या कॅच
पांड्या आणि सॅमसनच्या कॅच बघून छान वाटले. गचाळ क्षेत्ररक्षणाला फिट्टूस केले त्यांनी.
शमीच्या पेसने धावा लीक केल्या. आज सामना सुरु व्हायच्या आधीच मी टीम बघून वन डे मध्ये जे झाले ते पाहता याची शक्यता वर्तवलेली.
पुढच्या सामन्यात शार्दुलला घ्यावे. त्याचे व्हेरीएशन अंतिम वन डे मध्ये फायदेमंद ठरलेले. शमीला कसोटीसाठी आराम द्यावा. बुमराहला सुद्धा आराम द्यावा.
चहलला विकेट शक्यतो तेव्हाच मिळतात जेव्हा त्याला फलंदाज मारायला जातो. तो फ्लाईटही याचसाठी देतो. समोरून सुण्दर आणि नटराजनच्या टाईट स्पेलने चहलसाठी तो स्टेज सेट केला जिथे फलंदाज त्याला मारायला जातील.
याच कारणासाठी एखादा सुण्दर संघात हवासा वाटतो. पण तो बॅटींगमध्ये काहीतरी चमकदार कामगिरी करेल असे कधीच वाटत नाही. जडेजासुद्धा त्याच्या सुरुवातीच्या काळात मस्सल टस्सल नसलेला प्लेअर होता जो जीव तोडून मारायचा पण बॉल सीमापार जायचा नाही. सुण्दर तसाच वाटतो. त्याचाही जडेजा झाला तर मजा येईल.
बाकी जडेजा तर खरोखर सर जडेजा आहे. सोपे नव्हते आज टायमिण्ग करत मारणे. पण काय कमाल आश्वासक पद्द्धतीने इनिग बिल्ट करतो तो. आधी पाण्ड्याला मारू द्यावे आणि मग अगदी शेवटच्या काही ओवरमध्ये उत्तुंग फटके खेळावेत. धोनीची जागा तो घेतोय संघात असे वाटतेय.
चहलला विकेट शक्यतो तेव्हाच
चहलला विकेट शक्यतो तेव्हाच मिळतात जेव्हा त्याला फलंदाज मारायला जातो. तो फ्लाईटही याचसाठी देतो. >> फक्त आज त्याने फ्लाईट न देता झंपासारख क्विक लेग ब्रेअक्स वापरले नि बाऊन्स जनरेट केला. मस्त अॅडजस्टमेंट !
म्हणजे झंपाकडून त्याने उचलले
म्हणजे झंपाकडून त्याने उचलले जसे दुसरया वनडे मध्ये हार्दिक पांड्याचा चार ओवरचा स्पेल बघून तीच गोळी त्यांनी पांड्यालाच दिली होती.
बाकी ऑस्ट्रेलियन खेळपट्यांवर हा बाउन्सचाच खेळ असतो. त्यामुळे आपले कित्येक अननुभवी फलंदाज भारतात खेळावे तसे स्पिनरना तिथे खेळायला जातात आणि बाऊन्सचा अंदाज चुकत कॅच देऊन बसतात.. तरीही आपण त्यांना अण्डरएस्टीमेट करत हलक्यात घेतो असे वाटते. कॉमेंटेटरही स्पिनर आले की आता भारतीय फलंदाज यांना टारगेट करून धावा जमवतील असे हमखास बोलतात. त्यामुळे झंपा, लायन वगैरे मंडळी तिथे नेहमीच आपल्यासमोर विकेट टेकर ठरतात.
*तरीही आपण त्यांना
*तरीही आपण त्यांना अण्डरएस्टीमेट करत हलक्यात घेतो असे वाटते. * त्याहूनही वाईट म्हणजे आपण फिरकी खेळायचं आपलं कसब खूप ' ओव्हर एसटीमेट' करतोय. आपण या पारंपारिक कौशल्यात आतां मागे पडलोय, बाहेरच नाहीं तर घरच्या पीचेसवर देखील. हल्ली आपले कोणते फलंदाज सहज फूटवरक वापरत पुढे येवून फिरकी खेळतात ?
*फक्त आज त्याने फ्लाईट न देता झंपासारख क्विक लेग ब्रेअक्स वापरले नि बाऊन्स जनरेट केला* -मीं सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे, ' चेंडूला 'बाऊनस' व थोडासा 'सविंग'ही मिळतोय..' तयानुरूप फ्लाइट कमी करणं सोईचं होतं.
"आपण या पारंपारिक कौशल्यात
"आपण या पारंपारिक कौशल्यात आतां मागे पडलोय" - लाख रुपये की बात हैं| कोहली, रहाणे सारखे तंत्रशुद्ध फलंदाज सुद्धा जिथे 'रिस्ट स्पिनर्स' - म्हणजेच एके काळच्या लेग स्पिनर्स समोर चाचपडतात, तिथे इतरांकडून कुठल्या तोंडानं अपेक्षा ठेवायची? टी-२० च्या तंत्राचा अतिरेक, डोमेस्टीक सर्किटमधे दर्जेदार स्पिनर्स नसणे अशी अनेक कारणं आहेत. बघताना मनाला वेदना होतात. ज्या भारतात शेन वॉर्न सारख्या दादा लेग स्पिनरला रणजीच्या खेळाडूंनी ताकास तूर लागू दिला नव्हता, तिथे तुलनेनं नवखा रशीद खान, अॅडम झंपा (ह्यांच्या कौशल्याविषयी काहीही शंका नाही) सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या भारतीय फलंदाजांना आपल्या तालावर नाचवतात हे पाहून वाईट वाटतं.
संजूसारखा स्पेशलिस्ट विकेटकीपर संघात असताना राहूल ने विकेटकिपींग करण्यामागचं कारण कळलं नाही (जॉब सिक्युरिटी?)
असाम्या, कन्कशन सब ला बॅट्समन च्या जागी बॅट्समन आणी बॉलरच्या जागी बॉलर इतकाच नियम आहे. तू म्हणतोस तितक्या ग्रॅन्युलर लेव्हल ला नाहीये.
कन्कशन सब ला बॅट्समन च्या
कन्कशन सब ला बॅट्समन च्या जागी बॅट्समन आणी बॉलरच्या जागी बॉलर इतकाच नियम आहे. तू म्हणतोस तितक्या ग्रॅन्युलर लेव्हल ला नाही >> हो ना पण नियमांमधे विझ अ विझ असे दिल्यामूळे वाद होउ शकतो. जडेजा बॉलर आहे की बॅट्स्मन कि ऑल राऊंडर ह्यावर लोक अडू शकतात. तेवाटिया कोण आहे ? सँमसन कोण आहे ? मला वाटते फूटबॉल सारखे प्रत्येकाचा मेन रोल सामन्या आधी डीक्लेअर करावा लागावा म्हणजे पुढे वाद नको. खर तर मला आधी १२ खेळाडूंची टीम जाहीर करून बारावा खेळाडू हवा तेंव्हा पण एकदाच पर्यायी म्हणून वापरण्याची सोय द्यावी. मजा येईल डावपेच बघायला. १-२ संघ बगळता बाकीच्यांकडे सच्चे ऑल राऊंडर्स नाहीत त्यामूळे असा पर्याय कामी येऊ शकेल.
" १२ खेळाडूंची टीम जाहीर करून
" १२ खेळाडूंची टीम जाहीर करून बारावा खेळाडू हवा तेंव्हा पण एकदाच पर्यायी म्हणून वापरण्याची सोय द्यावी. " - सुपर सब चा नियम आला होता early 2000's मधे, तो अशाच प्रकारचा होता. पण तितकासा चालला नाही, कारण क्रिकेटमधे प्रत्येक खेळाडूचा स्किलसेट फारच युनिक असतो (असं असावं).
“On the business of
' जडेजा व बदली खेळाडू ' संदर्भातलं गावसकरांचं विधान -
“On the business of concussion substitute itself, I don’t agree with it. Maybe I am old-fashioned, I have always believed that if you are not good enough to play the bouncer and you get hit on the helmet, then you don’t deserve a substitute. I am sorry,”Gavaskar
आय ॲम ऑलसो साॅरी, श्री गावसकर. आपण ग्रेट फलंदाज आहात याबद्दल दुमत नाहीं पण याबाबत मात्र आपला मतभेद नमूद करणं मला भाग पडतंय. ' if you are not good enough to play the bouncer ' हें डोक्यावर चेंडू आदळणयाचं एकमेव कारण असतं , हें नाहीं पटत.
व्हाट अ विन !!
व्हाट अ विन !!
अभिनंदन भारत "!!!
सलाम पंडया , सातत्याने असा अफलातून खेळ !!!
शेवटी रोहितच्या प्लेअरनेच
शेवटी रोहितच्या प्लेअरनेच सिरीज जिंकवून दिली. विचार करा रोहित असता तर काय झालं असतं.
जबरदस्त जिंकली सिरीज भारतानं.
जबरदस्त जिंकली सिरीज भारतानं. पंड्या भारताचा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. काल प्रॅक्टीस मॅचमधे पुजारा आणी रहाणे पण छान खेळले. थोडीशी अडखळत सुरूवात केल्यावर रहाणे ने जम बसल्यावर मारलेले शॉट्स पाहून मस्त वाटलं. पृथ्वी शॉ चं ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला ‘नथिंग शॉट‘ च्या प्रयत्नात आऊट होणं पाहून त्याच्या फॉर्म आणी कॉन्फिड्न्स, दोन्हीविषयी शंका आली.
डोमेस्टीक सर्किटमधे दर्जेदार
डोमेस्टीक सर्किटमधे दर्जेदार स्पिनर्स नसणे
>>
इंटरनॅशनल. टीम मधले प्लेअर्स गेली काही वर्ष डोमेस्टिक बिल्कुल खेळत नाहीत.
जर त्या टीम मधून हकललंच तर परत येण्यापुरतं खेळतात आणि मग परत बंद.
नुसतं आयपीएलमधे मिळालेलं एक्सपोजर डोमेस्टिक प्लेअर्सना असं कितिसं ग्रूम करणार?
बोर्डही याबाबत काही करत नाही.
अन यंदा तर बोर्डानी स्टेट टीम्सना ऑप्शन दिला, २ स्पर्धा निवडा:
१. ४ दिवसा च्या मॅचेसची
२. वन डे मॅचेसची
३. टी-२० मॅचेसची
अन स्टेट टीम्स नी २ आणि ३ ऑप्शन्स निवडले.
जर रणजी ट्रॉफी बद्दल प्लेअर्समधेच इतकी उदासीनता असेल तर अजून काय होणार...???
सुपर सब चा नियम आला होता
सुपर सब चा नियम आला होता early 2000's मधे, तो अशाच प्रकारचा होता. पण तितकासा चालला नाही
>>>
सूपर सब रूल मधे सब्स्टिट्यूट कोण ते टॉसच्या आधी सांगायला लागायचं
टॉस जिंकणार्या टीमला तो प्लॅन नीट एक्झिक्यूट करता यायचा, पण टॉस हरणार्या टीमला बरेचदा सब ला पहिल्या इनिंग्जमधेच आत आणायला लागायचं, अन मग त्याचा फटका दुसर्या इनिंग्ज मधे बसायचा
उदा. :
प्लॅन टॉस जिंकून बॅटिंग करायचा, सो प्लेइंग ११ मधे लक्ष्मण, अन सूपर सब नेहरा
पण टॉस हरल्यावर पहिली बोलिंग करण्यासाठी नेहरा आत अन लक्ष्मण पूर्ण मॅच साठी बाहेर.
इंडियन्स वि. ऑसी-ए सामन्यात,
इंडियन्स वि. ऑसी-ए सामन्यात, ऑस्ट्रेलियाचा रेग्युलर टेस्ट कॅप्टन टिम पेन खेळत असतानाही ऑसी-ए चा कॅप्टन ट्रॅविस हेड आहे.
आपल्याकडे अशा मॅचमधे ही कोहली / धोनी / गांगुली इंडिया-ए कॅप्टन (अनुक्रमे विहारी / पुजारा / युवराज) च्या कॅप्टन्सी मधे खेळले नसते...
Pages