क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साहेबांचे पन्नासावे शतक होते बहुधा त्याच सिरीज मधे. >>> हो ५० आणि ५१. कसोटीतील शेवटची. नंतर अनेकदा तो ७०-७५ च्या पुढे गेला पण शतक झाले नाही. सर्वात क्लोज तो ऑस्ट्रेलियामधे सिडनीला, एकदा चेन्नईला ऑस्ट्रेलियाविरूद्ध व एक दोन वेळा विंडीज विरूद्ध आला होता. शेवटच्या डावातही.

*कपिल च्या बॉलिंग पेक्षाही त्याची बॅटींग जास्त अंडररेटेड राहिली असे मला वाटते. * कपिलच्या बाबतीत सगळयात अंडररेटेड गोष्ट म्हणजे त्याचा cricketing brain . इंग्लीशवर प्रभुत्व नसल्याने तसं झालं असावं. पण झहिर आब्बासला नेस्तनाबूत करायचे डांवपेंच सर्वस्वी कपिलचे होते, हें सुनिलनेही मान्य केले आहे. मध्यंतरी, कपिल शर्मा च्या शोमधे 1983 विश्वविजेतया संघातील खेळाडूंना बोलावलं होतं. एकमताने सर्वांनी ठासून सांगितले कीं त्या विजयाचं मुख्य श्रेय कपिललाच जातं ! आपल्या विकेटसवर गोलंदाजी कशी करावी, हें सुनिलने सुचवलंही असेल . पण मला तरी वाटतं कीं याबाबत कपिल हाच खरा अधिकारवाणीने बोलू व निर्णय घेवू शकतो.

पण मला तरी वाटतं कीं याबाबत कपिल हाच खरा अधिकारवाणीने बोलू व निर्णय घेवू शकतो. >> काही कळले नाही भाऊ. कपिल ने स्वतः हे मान्य केलय कि गावस्करच्या सल्ल्याचा त्याला त्याची कारकीर्द लांबवायला उपयोग झाला. एक कप्तान म्हणून खूपच इंस्टींक्टिव्ह होता असे नेहमी वाटत राहिले. म्हणजे प्लॅन करून येणे वगैरे एका लिमीट पर्यंतच करत असावा असे वाटले. ह्याउलट गावस्कर किंवा द्रविड्/ कुंबळे वगैरे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी वाटत राहिले. हा कदाचित त्यांच्या एकंदर व्यक्तीमत्वाचाही प्रभाव असू शकेल.

धावत येऊन बाऊन्स बॉल कोणीही टाकेल पण स्वतः बाऊन्स होऊन सरपटी बॉल टाकणारा गोलंदाज एकच ते म्हणजे आपले अशोक दिंडा.

कपिलने बॅटिंगकडे आणखी लक्ष दिले असते तर त्याने १०,००० रन्स काढले असते असे खुद्द गावसकरच म्हंटला होता.

*म्हणजे प्लॅन करून येणे वगैरे एका लिमीट पर्यंतच करत असावा असे वाटले. ह्याउलट गावस्कर किंवा द्रविड्/ कुंबळे वगैरे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी वाटत राहिले. * Obviously, he was not articulate like Sunil, Dravid & Kumble but that need not be costrued as he not having planning capacity. रांगडया स्वरुपात असेल पण त्याच्या डोक्यात योजना तयार होतच असाव्यात असा माझा विश्वास आहे. केवळ प्रतिभावान खेळाडू म्हणूनच नाहीं तर कर्णधार म्हणूनही त्याला ज्येष्ठ खेळाडूही मानत हें महत्वाचे.

हो ५० आणि ५१. कसोटीतील शेवटची. नंतर अनेकदा तो ७०-७५ च्या पुढे गेला पण शतक झाले नाही. सर्वात क्लोज तो ऑस्ट्रेलियामधे सिडनीला, एकदा चेन्नईला ऑस्ट्रेलियाविरूद्ध व एक दोन वेळा विंडीज विरूद्ध आला होता. शेवटच्या डावातही. >>

नाही. ९१ इंग्लंडविरूद्ध ओव्हलवर, ऑगस्ट २०११, ते सर्वात चुटपुटलेलं शतक. तेव्हाच २०११मध्ये होऊन गेलं असतं, तर १०० झाले असते तिथेच. डिसेंबर २०१२मध्ये इंग्लंडविरूद्ध ७६ही आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्ध ८० आणि ८१ तू म्हणतोस ते. आणि अर्थातच विंडीज.

अरे हो ते ओव्हलचे ९१ विसरलोच. तेव्हाच झाले असते तर बरे झाले असते. तो डाव थोडासा मी पार्ल्यात एका मॉल मधे माबो गटग सुरू असताना पाहिला Happy

पण एकदा विंडिज विरूद्ध मुंबईला ९४ वर आउट झाला. आदल्या दिवशी शतकाकडे जात होता. मी दुसर्‍या दिवशी सकाळी मुंबईला जाणार होतो बघायला. पण तेव्हाच शरद पवारांना कोणीतरी गालावर मारल्याने रस्ते वगैरे बंद झाले. आणि एनीवे शतक झालेच नाही.

भाऊ - हे तुमच्या लक्षात असेल Happy भाऊंनी मला तिकीट ऑफर केले होते वानखेडेच. होपफुली हे आता लिहायला तुमची हरकत नसेल.

*भाऊ - हे तुमच्या लक्षात असेल* - काय? 94 वर आऊट झाला तें कीं शरद पवार ? Wink
इथल्या कांहींची स्मरणशक्ती खरंच हेवा वाटावी अशीच आहे !

मकरंद वांयगणकरचे पुस्तक वाचत होतो त्यात पतौडी बद्दल वाचले. त्याचा एक डोळा शिकारी मधे निकामी झाला हे माहित होते पण ते त्याची क्रिकेट कारकिर्द सुरू होण्या अगोदरच असे मला वाटले होते. ही घटना त्याच्या कारकिर्दीच्या मधे घडली नि त्या नंतर हा सद्ग्रुहस्थ डाऊन अंडर जाऊन जबरदस्त इनिंग्स एका डोळ्याने खेळला हे वाचून त्याच्याबद्दलच आदर एकदमच दुणावला. मूळाय पर्थ अ‍ॅडलेड वगैरे ठिकाणी कव्हर्ड नसलेल्या पिचेस् वर, बिना हेल्मेट दोन डोळ्याने खेळणे मुष्कील काम, तिथे दोन डोळ्यांची सवय असलेला मनुष्य काहीच बिघडले नाही अशा पद्धतीने खेळू शकला हे माईंड बॉगलिंग आहे. डेप्थ पर्सेप्शन कसे जमवले असेल ?

त्याचा एक डोळा शिकारी मधे निकामी झाला हे माहित होते पण ते त्याची क्रिकेट कारकिर्द सुरू होण्या अगोदरच असे मला वाटले होते
>>>
त्याचा डोळा कार अ‍ॅक्सिडेंटमध्ये गेला ना? तो इंग्लंडमध्ये असताना झाले हे. त्याने अजून कसोटी पदार्पण केले नव्हते. या घटनेनंतर एक वर्षाच्या आत तो पहिला कसोटी सामना खेळला

पतौडी हा अत्यंत शैलीदार, आक्रमक व आकर्षक फलंदाज होता व आऊटफिलडमधे तितकाच आकर्षक व चपळ क्षेत्ररक्षकही - अगदीं सोलकर , अझरुद्दीन इ.च्या तोडीचा ! मला नेमकी कोणती मॅच ( रणजी कीं दुलीप ), तें आठवत नाहीं,पण ब्रेबोरन स्टेडियमवरचं त्याचं अविस्मरणीय द्विशतक व त्याला उत्तर म्हणून वाडेकरने ठोकलेलं तितकंच आकर्षक व आक्रमक शतक मात्र स्पष्ट आठवतं !
पतौडीकडे आणखी एक खूपच महत्वाचं श्रेय जातं. त्या वेळपर्यंत, षटकार वगळतां, ground strokes हाच उत्तम फलंदाजीचा कर्मठ निकष होता. वे.इंडिजच्या यशस्वी दौरयावरून आल्या आल्या, दिलीप सरदेसाई एका रणजी सामन्यात स्लिपवरून एक छान 'अप्पर कट' खेळला. काॅमेंटरी बाॅकसमधून विजय मरचंट अख्खा दिवस त्या शाॅटचा उल्लेख करून सरदेसाईचा निषेध करत होते ! ही मानसिकता बदलण्याचं श्रेय पतौडीकडे जातं. तो क्षेत्ररक्षकाच्या वरून शाॅटस मारण्यात स्वत: वाकबगार तर होताच पण अशा शाॅटसना मान्यता व मान मिळवून देण्यात तो कमालीचा यशस्वी झाला. ( आजच्या यशस्वी फलंदाजांच्या अशाच शाॅटसमुळे मिळ्णार्या धावांचं प्रमाण पाहिलं कीं पूर्वीची मानसिकता बदलण्याचं आत्यंतिक महत्व लक्षात येतं ! )

भारतानं पहिली परदेशातली कसोटी पतौडीच्या नेतृत्वाखाली न्यूझिलंड मधे जिंकली होती. असंही वाचलंय की ग्राऊंड फिल्डींग ला महत्व देणारा पहिला भारतीय कॅप्टन होता तो. पतौडी रॉयल फॅमिलीतला असल्यामुळे, परदेशी शिक्षणामुळे त्याने भारतीय खेळाडूंच्या मनातला परदेशी - विशेषतः इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघातल्या खेळाडूंबरोबर वावरताना निर्माण होणारा न्यूनगंड घालवला. त्या खेळाडूंना फर्स्ट नेम ने अ‍ॅड्रेस करण्याची पद्धत रूढ केली.

त्याचा डोळा कार अ‍ॅक्सिडेंटमध्ये गेला ना? तो इंग्लंडमध्ये असताना झाले हे >>> हो.. ईंग्लंडमधे एक काऊंटीची मॅच संपवुन घरी (वाटेत बहुधा तीर्थक्षेत्राचे दर्शन घेउन) जाताना अपघात झाला... त्याच्या बरोबर काऊंटीतील संघ सहकारीपण होता गाडीत (पतौडी चालवत नव्हता गाडी) ...
पतौडी मुलाखतीमधे ऐकल्याप्रमाणे - नंतर बरेच दिवस त्याला २ व्हिजन दिसत असत... सिगरेट पेटवायला पण त्याला जमत नव्हते... अन जगमधुन ग्लास मधे पाणी ओतायलाही जमत नव्हते... त्याला बॉलची लेंग्थ (पुर्वीप्रमाणे) कळायला ५ वर्षे लागली !!!!! मधली वर्षे तो ईन्स्टिंक्टप्रमाणे लेंग्न्थ ओळखुन बॅटिंग करत असे !!
निव्वळ महान !!! .../\...

https://www.youtube.com/watch?v=C9ykM1qvaos

हे एक अनमोल रत्न मिळाले.

टायगर पतौडी राजघराण्यातला असला, इंग्लंडमध्ये उच्चभ्रू शाळा/कॉलेजात गेलेला असला तरी त्याच्या बरोबर खेळलेल्या सर्व खेळाडुंच्या बोलण्यातून जाणवते की मैदानावर तो एक सामान्य मनुष्य म्हणूनच उतरत असे. रणजी सामन्यांसाठी तो रेल्वेतून सेकंड क्लासच्या डब्यातून संघासोबत प्रवास करत असे. तो एक उत्तम तबला वादक होता. हिंदी सिनेसंगीताचा शौकीन होता व कायम गाणी गुणगुणत असे.

लिंक नाही पाहिली... घरी गेल्यावर बघेन.. पण (ह्या लिंकमधे नसल्यास)... ईरापल्ली प्रसन्ना यांची टायगर यांनी जंगलामधे फजिती केल्याचा भन्नाट किस्सा आहे.. हसुन हसुन पुरेवाट.....
लिंक सापडली की टाकतो घरी जाउन...

पतौडी महानच होता. वर लिहिलेल्या सर्वांना अनुमोदन.

त्याचा एक विक्रम म्हणजे एका कसोटी सामन्यात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वात जास्त खेळलेले चेंडू. (५५४) फाफ दु प्लेसि २०१२मध्ये अ‍ॅडलेड कसोटी वाचवताना ५३५ खेळून ह्याच्या जवळ आला होता.

तुमच्या सगळ्यांची इथली चर्चा वाचून मी खूपच जोशात आलो आणि मोबाईलवर क्रिकेट गेम खेळायला लागलो. मी इमॅजिन केलं की मी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलंय, समोर डेंजर डेडली गोलंदाज आहेत. सगळेच बॅटिंग करायला अडखळत आहेत आणि मी एकटा फोर सिक्स मारत सुटलोय. सगळे माझ्याकडे कौतुकाने बघत आहेत. मी तब्बल 925 रन्स केले. किती सिक्स फोर मारले याचा हिशोब नाही. माझ्यासमोर सगळेच गोलंदाज हतबल झाले होते. नन्तर दमून एका बॉलवर मी आऊट झालो. सगळं स्टेडियम उभं राहून मला अभिवादन करत होते.
Screenshot_2020-07-16-21-01-14-869_in.asissuthar.cricket.png

मधली वर्षे तो ईन्स्टिंक्टप्रमाणे लेंग्न्थ ओळखुन बॅटिंग करत असे !!
निव्वळ महान !!! .../\... >> हे तर अजूनच कठीण आहे महाराजा ! Simply genius !

पतौडी रॉयल फॅमिलीतला असल्यामुळे, परदेशी शिक्षणामुळे त्याने भारतीय खेळाडूंच्या मनातला परदेशी - विशेषतः इंग्लंड, ऑस्ट्रेलिया संघातल्या खेळाडूंबरोबर वावरताना निर्माण होणारा न्यूनगंड घालवला. त्या खेळाडूंना फर्स्ट नेम ने अ‍ॅड्रेस करण्याची पद्धत रूढ केली. >> बहुधा अंशुमन गायकवाडच्या मुलाखती मधे हे वाचलेले कि तो त्याच्या पहिल्या- दुसर्‍या सामन्यानंतर पतौडि कडे बॅटींग च्या टिप्स मागायला गेला होता. त्यावेळी पतौडी ने त्याला सांगिततले कि बाबा रे कि तू तुझ्या गुणवत्तेवर इथवर आला आहेस, तुला टिप्स ची गरज नाही. तुझा नॅचरल खेळच खेळ. बाकी सगळे आपोआप वर्क आऊट होईल. सरदेसाई च्या मुलाखती मधे पण असेच काहीसे वाचलेले. बहुधा एकदम अ‍ॅप्रोअचेबल माणूस असावा.

पतौडी _/\_
लहानपणी मला त्याचा किस्सा एक दंतकथा वाटायची. मी स्वतःचा एक डोळा बंद करून बघायचो आणि हे मला अशक्य वाटायचे.
मोठे झालो तेव्हा हे खरे आहे हे कळले तरी त्याच्या या अलौकीक कारनाम्याची म्हणावे तशी चर्चा कधी आढळली नाही. मोठमोठ्या दिग्गज क्रिकेटरमध्ये त्याचे नाव आढळले नाही. सैफ अली आणि शर्मिला टागोरशी संबंध नसता तर त्याहून कमी चर्चा झाली असती.
पण आज ईथे त्यावर चर्चा बघून बरे वाटले. कित्येकांना आजही याची कल्पना नसेल.

मधली वर्षे तो ईन्स्टिंक्टप्रमाणे लेंग्न्थ ओळखुन बॅटिंग करत असे !! >>> हे खतरनाक आहे! टोटल रिस्पेक्ट!

*मधली वर्षे तो ईन्स्टिंक्टप्रमाणे लेंग्न्थ ओळखुन बॅटिंग करत असे !! > पण त्या ईन्स्टिंक्टंचं फाईन टयूनिंग करायला त्याने जिद्दीने खूप मेहनतही घेतली होती, असंही वाचनात आलं होतं. त्याशिवाय उच्चतम दर्जाची गोलंदाजी खेळणं अशक्यच असावं.

हे खतरनाक आहे! टोटल रिस्पेक्ट! >>> अगदी !!

मला हे माहिती नव्हतं. मी समजत होते, अ‍ॅक्सिडेंटनंतर त्याने क्रिकेटमधून काही वर्षं ब्रेक घेतला आणि मग परत खेळायला लागला.

स्टोक्स सध्या पर्पल पॅच मधे आहे. धमाल सुरू आहे नुसती. वेस्ट इंडीज फिल्डींग करून थकणार नि ब्रॉड एकदम जागा झाल्यासरखा ४-५ विकेट्स उडवून फॉलो ऑन देणार असे वाटते.

प्रत्येक देशाचे टॉप विकेट घेणार्‍या बोलर्सची यादी बघत होतो.
ऑस्ट्रेलियातर्फे तिसर्‍या क्रमांकावर कोण असेल? काही अंदाज?

नेथन लिऑन

Pages