क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज गेम वेगळा होतोय. पहिले १३-१४ ओवर रोखून धरलाय.
आज जिंकू असे वाटतेय आतून
पांड्या जडेजा म्ची खेळी फुकट जायला नको आज

खेळपट्टीचा नूर पालटला कांगारूंसाठी ती पोषक होतेय आता!
भारतीय गोलंदाज आणि कांगारू फलंदाज यांचे कामगिरीतील सातत्य बघा.

बुमरा आणि पंड्या रोहितच्या कॅप्टनसीखाली जेव्हढे मोकळेपणाने खेळतात तेव्हढेच कोहलीच्या कॅप्टनसीखाली दबावाने खेळतात.

एक निरीक्षण- कुलदीप यादवला ऑसीज अगदीं सुरवातीपासून पुढे येवून अटॅक करत होते. कदाचित, तोच ऑसीजना अधिक धोकादायक वाटत असावा.
आज बराच वेळ मॅच पाहिली . कांहीं अवांतर गोष्टी जाणवल्या /भावल्या -
1. त्याच्या गोलंदाजी प्रमाणेच मॅग्राच्या काॅमेंटसही अचूक व नेमक्या असतात.
2आपल्या डावाच्या सुरवातीचा एक षटकार एका प्रेक्षकाने झेलला व त्याचं कौतुकही झालं. पण बिलगून बसलेल्या त्याच्या 8-9 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यातून वडिलांबद्दल जें कौतुक, अभिमान ओसंडत होता त्याला तोड नाहीं! कॅमेराने फार छान टिपलः तें !
3 ऑस्ट्रेलियात प्रेक्षक मास्क, डिसटनसिंग इ. बंधनं
पाळताना दिसत नाहीत;

मनुका ओव्हल च्या विकेटवर जिंकण्यासाठी ३३०+ स्कोअर करणं गरजेचं आहे असं कॉमेंटेटर्स सांगत होते, पण भारतीय संघानं थोडा 'बिलो-पार' स्कोअर करूनही सामना जिंकला. त्याबद्दल संघाचं अभिनंदन!! पंड्या,जडेजा आणी बॉलर्स मस्तच खेळले.

कोहलीच्या नेतृत्वाला केवळ टीव्हीवर त्याचा आक्रमक वावर पाहून (ते ही हल्ली फारसं दिसत नाही, किंवा मी कमी टीव्ही बघतो) जास्त क्रीटीसाईझ केलं जातं का? available resources मधे तो काही फार वावगं करत नाही असं मला वाटतं. टीम सिलेक्शन आणी बॅलन्स मात्र नक्कीच तपासून पहायला हवं. जॉन राईट च्या काळात त्याने बॉलर्स ना बॅटींग करायला शिकवलं/लावलं होतं. हा त्याच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. हरभजन ने सांगितलं होतं एकदा की, 'रन्स नही बनेंगे तो कोच डंडा लेके पीछे पडता है|'. तशी काही शास्त्री ची स्ट्रॅटेजी नसावी (शास्त्री ची, वरिष्ठांची हांजी करून स्वतःचं स्थान टिकवण्याव्यतिरिक्त काही स्ट्रॅटेजी आहे का हा वेगळाच प्रश्न आहे Happy )

थोडक्यात काय तर पिच थोडेसे बॉलिंग ला साथ देणारे असल्यावर आपल्या बॉलिंग ला धार आली नि ऑसीज चे मातीचे पाय उघडे पडले. जर धवन ने स्लिप मधला फिंच चा कॅच घेतला असता तर ऑसी ची स्थिती मॅक्स्वेल आल्यावर आपली पांड्या बरोबर पहिल्या मॅच मधे होती तशी झाली असती. सलामीची जोडी किती मह्त्वाची ठरते ते लक्षात आले.

टी २० साठी संघ काय असावा
मयांक्/धवन/ संजू
राहुल
कोहली
अय्यर्/संजू
पांड्या
सुंदर (पॉवर प्ले मधे बॉलिंग करतो + हँडी बॅटींग)
ठाकूर (महागडा असला तरी विकेट टेकिंग अ‍ॅबिलिटि)
चहल (विकेट टेकिंग बॉलर + पॉवर प्ले मधे बॉलिंग करतो))
बुमरा
चहर ( पॉवर प्ले मधे 'बुमरा + सुंदर + चहल' बरोबर वापरता येतो + हँडी बॅटींग
नटराजन (एंड ओव्हर्स साठी )

ऑसी बॅटींग डेप्थ बघता विकेट घेत राहणे हा एकमेव पर्याय आहे. नुसते थ्रॉटल करून जिंकणे कठीण जाईल. ह्याच कारणासाठी जाडेजा बाहेर नि ठाकूर आत.

*ऑसी बॅटींग डेप्थ बघता विकेट घेत राहणे हा एकमेव पर्याय आहे.* 100% सहमत. म्हणूनच, क्षेत्ररक्षणात ढिलाई , विशेषतः झेल व धांवचित करण्याच्या संधी हुकणं, हेंही ऑसीज विरूद्ध टी-20 मधे निर्णायक ठरेल.

शास्त्री ची, वरिष्ठांची हांजी करून स्वतःचं स्थान टिकवण्याव्यतिरिक्त काही स्ट्रॅटेजी आहे का हा वेगळाच प्रश्न आहे
>>
प्लेअर्स ना काहीही सल्ला न देता ड्रेसिंग रूम मधे 'लेट्स रॉक, पार्टी हार्ड' मूड ठेवणं...
आणि इनिंग्ज बिल्ड करणारे प्लेअर्स यूझलेस असतात, फक्त अ‍ॅटॅकिंग प्लेअर्स ची टीम पाहिजे हा सिलेक्शन मोटो...

ऑसी बॅटींग डेप्थ बघता विकेट घेत राहणे हा एकमेव पर्याय आहे. नुसते थ्रॉटल करून जिंकणे कठीण जाईल.
>>
लाख रुपए की बात...

पहिल्या दोन्ही सामन्यात आपल्या गोलंदाजाना कांगारुंचा पहिल्या १० षटकात बळी मिळाला नव्हता आणि १००+ धावांची भागीदारी त्यामुळे रचली गेली पहिल्या दोघांकडून ती देखिल ६+ धावांच्या सरासरीने. काल ३००+ धावांचे दडपण होतेच त्यांच्यावर आणि पहिला बळी केवळ ६व्या षटकात मिळाला आणि स्मिथ देखिल लवकर माघारी गेला त्यामुळे सरासरी वाढत गेली त्यात ठराविक अंतराने बळी मिळाले. फक्त त्यांनी आपल्या सारखा एकदम २-३ बळींचा गुच्छ एकाच वेळी नाही दिला.

मध्यंतरी आपली झेल घेण्याची क्षमता सुधारली होती. पुन्हा आपले पहिले पाढे पंचावन्न झाले. धवन दूर क्षेत्ररक्षणासाठी ठिक आहे स्लिप मध्ये बर्‍याचदा खराब प्रदर्शन आहे त्याचे. रहाणे, रोहित, सारखे स्लिप मध्ये योग्य जडेजा गली/पॉईंट, कोहली कव्हर. कोहलीचे उंच झेल घेण्याचे कसब खालावले आहे असे वाटते. आयपीएल मध्ये देखिल बरेच पेढे सोडले त्याने. चहलला दूर ठेवतात पण त्याच्या पासून डावी उजवीकडे थोडा जरी चेंडू गेला तरी दोन धावा पळतात फलंदाज. असे २-३ क्षेत्ररक्षक आहेत.
आपल्या फलंदाजांना फटके मारणे शक्य होत नाही तेंव्हा एकेरी दुहेरी धावांच्या जागा शोधायला हव्या ते सध्या कोहली वगळता कुणी करत नाहीत. त्यामुळे निर्धाव चेंडूंची संख्या आपली बरीच जास्त असते.

*काल ३००+ धावांचे दडपण होतेच त्यांच्यावर आणि पहिला बळी केवळ ६व्या षटकात मिळाला आणि स्मिथ देखिल ... * - अफलातून फाॅर्ममधे असलेल्या वाॅरनरची अनुपस्थिती हाही महत्वाचा घटक होताच !
*मध्यंतरी आपली झेल घेण्याची क्षमता सुधारली होती. पुन्हा आपले पहिले पाढे पंचावन्न झाले*. - हेंच घातक ठरण्याची शक्यता अधिक. कारण, झेल घेतले गेले तर गोलंदाजांचा उत्साह द्विगुणीत होतो व सोडले तर उलटा परिणाम होतोच.

झेल घेतले गेले तर गोलंदाजांचा उत्साह द्विगुणीत होतो व सोडले तर उलटा परिणाम होतोच.>>

अगदी! आणि फलंदाजाला दुसरी संधी मिळाल्याने तो त्यात सुधारणा करतो. एखादाच पृथ्वी तसाच फटका पुन्हा लगेच मारून बाद होतो!

भारताची फिल्डींग अनाकलनीय पद्धतीनं ढासळत चाललीये. जडेजा चे थ्रो बसत नाहीयेत. दुसर्या वन-डेत तर त्याने बाऊंड्रीवर सोपा कॅच सोडला. जडेजा हा आपल्याच नव्हे तर जगातला सर्वोत्तम फिल्डर्स पैकी एक मानला जातो आणी त्याच्याकडून जर फिल्डींग चा दर्जा खालावला, तर ते जास्त चिंताजनक आहे.

असो.. जरा स्ट्रेसबस्टरः आजच्या सकाळ मधली बातमी: "भारतीय संघाचे माजी खेळाडू आणी समालोचक, 'महेश मांजरेकर' ह्यांनी देखील हार्दिक पांड्याची स्तुती करत यू-टर्न घेतला आहे'. Uhoh Rofl बहुदा 'स्तुती' आणी 'संजय मांजरेकर' एका वाक्यात बसत नसावेत. Happy

भारतातील सगळे माजी खेळाडू आणि समालोचक गुडी गुडी बोलणारे आणि प्रमुख खेळाडूंवर टीका न करणारे आहेत, त्यातल्या त्यात संजय मांजरेकर थोडी टीका करतात व परखड बोलतात तर चांगले आहे

हर्षा भोगले बद्दल जो मांजरेकरांचा जो वाद झाला होता त्यात मात्र निःसंशय मांजरेकरांची चुकी होती

भारताची फिल्डींग अनाकलनीय पद्धतीनं ढासळत चाललीये. >> एक कोहली वगळता बाकी कोणि फिटनेस कडे किती लक्ष देतात हे आयपील च्या सुरूवातीच्या मॅचेस मधे उघडे पडले होते. चांगला फिटनेस नसेल तर त्याचा पॠणाम फिल्डींग वर होणे साहजिकच आहे.

काल राहुल बाद झाल्यावर काय बोलत परत गेला देव जाणे पण त्याचा शॉट पूर्णपणे गंडला होता. आग्दी गिल चा तरी थोडा तरी लेग कडे होता.

फिंच, स्मिथ, मॅक्सी , लबो ,, सगळ्यांचे स्टान्स बघितल्यावर वॉर्नर आता डेव्हीड गोवर सारखा वाटायला लागलाय मला. पॉवर गेम च्या हव्यासापोटी नजाकत हरवत चाललीये. Lol

*वॉर्नर आता डेव्हीड गोवर सारखा वाटायला लागलाय मला. *
- वॉर्नरबद्दल आत्यंतिक आदर असूनही हें नाहीं पटत. वृक्ष नारळाचं झाड वाटेल पण वेल नाहीं वाटणार , लोखंड सोनं वाटेल पण रबर नाहीं ! गोवरच्या खेळाची जातकुळीच वेगळी होती, जणूं तो आपल्या उपखंडातील खेळाडू असल्यासारखी ( उदा. विश्वनाथ, झहीर आब्बास, सलीम दुराणी, अझरुद्दीन इ.इ. ) !! Wink

*उपहास होता हो भाऊ ! * - हो, मलाही तें पक्कं कळलं होतं. पण दुर्मिळ होत चाललेल्या फलंदाजीतल्या नजाकतीचं गुणगान करण्याची संधी साधण्याचा मोह आंवरला नाहीं !! क्षमस्व.

पण दुर्मिळ होत चाललेल्या फलंदाजीतल्या नजाकतीचं गुणगान करण्याची संधी साधण्याचा मोह आंवरला नाहीं !! >> एक खमंग पोस्ट करा कि त्यावर. मार्क वॉ येउ दे, गॉवर येऊ दे, अझर येउ दे, सचिन, लक्ष्मण ,द्रविड येऊ दे. दादा नि त्याचा ऑफ साईडचा खेळ येऊ दे. अमला चा सिल्की ट्च येऊ दे. रिचर्ड्स चा बेलगाम खेळ येऊ दे. सलिम दुराणी धबधबा येउ दे, रोहितचा आळसवटलेला खेळ येउ दे.

होउनच जाऊ दे !

असामीजी, तुमचं मेन्यूकार्ड वाचूनच पोट भरलं ! Wink
*एक निरीक्षण- कुलदीप यादवला ऑसीज अगदीं सुरवातीपासून पुढे येवून अटॅक करत होते. कदाचित, तोच ऑसीजना अधिक धोकादायक वाटत असावा.* - आज गावसकरने पहिल्या टी-20साठी तरी कुलदीपलाच संघात घेण्याचा सल्ला दिलाय. कुलदीप हा मन लावून चिवट फलंदाजी करतो, हेंही मला प्रकर्षाने जाणवलंय.

वन डे बघताना माझ्या एक गोष्ट मात्र डोक्यात जाते. जुन्या आणि नव्यांची जेंवा आकडेवारीची तूलना करतात तेंव्हा.
सचिन च्या वेळेला १५ षटकांचा पॉवर प्ले म्हणजे फक्त चार क्षेत्ररक्षक आतल्या वर्तुळाच्या बाहेर. आता हा पॉवर प्ले ४० षटकांचा झालाय. त्यात पहिल्या १० षटकात तर फक्त दोन बाहेर. शिवाय जिथे ३५ षटक ६ क्षेत्ररक्षक आतल्या वर्तुळाच्या बाहेर असायचे ते आता तर नाहीच आणि फक्त १० षटक अशी की ५ क्षेत्ररक्षक आतल्या वर्तुळाच्या बाहेर.
यामुळे आजकाल ३०० स्कोअर सुद्धा बॅटींग विकेटवर कमी पडतो. लोक अगदी सहज चेस करतात. अ‍ॅवरेज स्कोअरही वाढलाय तसेच स्ट्राइक रेटही अती वाढलाय.
कोहलीच्या १२००० हजार धावा झाल्या याचे कौतूकच आहे पण सचिन /पाँटींग पेक्षा जलद केल्या अस म्हणू नका. एक तराजू नाही आहे.
पोस्ट न्यू रूल्स अस नमूद कराव प्रत्येक वेळेस.

Pages