क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३७५ चे लक्ष्य!

७.५ धावा प्रती षटक!
कोहलीच्या लाडक्या फिंच आणि राहुलच्या लाडक्या मॅक्सवेल ने स्मिथ, वॉर्नर जोडीसह भारताच्या गोलंदाजाची पिसे काढली.
बघुया आपीएल ची केशरी टोपी काही प्रभाव पाडते काय!

लक्ष्य- 373 !
एकही विकेट गेलेली नसूनही ऑसीजचा पहिल्या 25 षटकांत स्कोअर होता 130-0 ! फलंदाजीची फळी लांब व मजबूत असली कीं सुरवातीला सावध खेळणं परवडतं !
'extra innings' मधे मॅग्राला ऐकणं व स्टेडियममधे प्रेक्षक दिसणं खूप आश्वासक !!!

मागे एकदा ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी महाभारताचे सगळे एपिसोड बघितले. त्यातली शकुनीनीती ते अवलंबतात. शकुनी जसा मयसभेत युधिष्ठिर सोबत मुद्दाम द्यूत हारतो आणि नन्तर पांडवांची पिसे काढतो तसेच ऑस्ट्रेलियन खेळाडू आयपीएल मध्ये मुद्दाम खराब खेळून बाकीच्या खेळाडूंना गाफील ठेवतात आणि नन्तर पिसे काढतात.

आम्ही लहान असताना क्रिकेट खेळायचो तेव्हा जो लवकर आऊट व्हायचा त्याला आम्ही सगळे 'एका बॉलाचा धनी' बोलायचो. आज भरपूर धन्यांसोबत भारतीय टीम खेळते.

३/८३
कोहली आणि कंपनी २०-२० चे टार्गेट समजून खेळतायेत असे दिसतेय!

हार्दिक पंड्या हा सामना जिंकवू शकतो. मला वाटतंय नीता भाभीने एक नवीन देश काढावा मुंबई इंडियन्स नावाचा त्यात सगळे भारी खेळणारे खेळाडू भरावेत. आणि कॅप्टन रोहित शर्माला करावं. इंडिया टीममध्ये खूप राजकारण शिजतंय रोहित विरुद्ध.

*कोहली आणि कंपनी २०-२० चे टार्गेट समजून* आपण नेमकी ऑसीजच्या विरूद्ध पद्धतिने लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजी योजली. पहिल्या 5 षटकांत 50 व मग पडझड !

मॅक्सवेल, म्हणतोय ह्यावेळी ३९० पेक्षा कमी नको..
राहुलची केशरी टोपी निळी काळी झाली..
आयपीएल हिरो आंतराष्ट्रीय झिरो..

आपली आतांची गोलंदाजी जागतिक पातळीवरही नक्कीच चांगली असूनही आत्ताच इतकी निष्प्रभ कां ठरत असावी, हें खरंच कोडं आहे.

ते खाजगी कंपन्यात काम करणारे कसे सरकारी नोकरीत आले की पाट्या टाकतात त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपल्या टीमचा आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यातील आजकालची कामगिरी..

खरं म्हणजे आपल्या कॅप्टनचा आयपीएल मालक त्यांना टाकून पळालाय त्यामुळे त्याला आयपील मध्ये विचारणारा कोणी नाही आणि जो इंडियन टीममध्ये त्याच्या कॅप्टनशिपला धोका आहे त्याला राजकारण करून बाहेर ठेवलाय. त्यामुळे सगळीकडे त्याची मज्जाच मज्जा आहे.

पांड्याला अजून बॉलिंग द्यायला होती. उगाच थांबवला त्याला. मस्त टाकत होता. गोंधळलेले सारे त्याच्या स्लो पेसवर. विकेटचे चान्स तोच क्रिएट करताना दिसत होता. चौथ्या ओवरलाही जडेजाने ईतकी सिंपल कॅच सोडली नसती तर त्याला दुसरी विकेट होती. पण त्याला थांबवले आणि उलट बुमराह शमीच्या पेसला दणादण धावा येऊ लागल्या. लास्ट ओवर सैनीलाही आल्या.
अगदी ठोकळेबज कप्तानी करतो कोहली.

लंकेची जेव्हा स्ट्रेंथ स्पिनर असायची तेव्हा स्लॉग ओवरला अगदी पन्नासाव्या ओपवरपर्यंत स्पिनर दिसायचे याची आठवण झाली सहज..

आणि जो इंडियन टीममध्ये त्याच्या कॅप्टनशिपला धोका आहे त्याला राजकारण करून बाहेर ठेवलाय. त्यामुळे सगळीकडे त्याची मज्जाच मज्जा आहे.
>>>>

त्यामुळेच मुंबई ईंडियन्सचा बुमराह धावा लुटवतोय Happy

बाकी कोहलीनेही धोनीच्या वेळी असेच केलेले. कसोटीत खेळायचा आणि वन डेमध्ये पाट्या टाकायचा. वर्ल्डकप सेमीला ११ चेण्डूत १ धाव. अगदी बांग्लादेशशी सुद्धा मालिका हरू हे बघितले. रहाणे बहुधा कोहली सोबत होता. शास्त्रीबुवांचा डोक्यावर हात होता. मग तक्ता पलटला. कोहली वन डे मध्येही कप्तान झाला. रहाणे कसोटीत उपकर्णधार आहे.

जेव्हा द्रविडने २००७ च्या वर्ल्डकप अपयशाची जबाबदारी घेत तोपर्यंतची यशस्वी कप्तानी सोडली तेव्हा त्या स्पर्धेत धोनी बांग्लादेश आणि श्रीलंका या दोन्ही मह्त्वाच्या सामन्यात शून्यावर बाद होता. योगायोग असतात एकेक. वा कोणाच्या मनात काय असेल सांगता येत नाही Happy

स्टीव्हन स्मिथला गॅप्स काढताना बघून आज तेंडुलकरची आठवण झाली. क्षेत्ररक्षक कुठे आहेत ह्याची इतकी जाणीव आणि त्याचा फायदा घेण्याचं तितकं कौशल्य फार दिवसांनी आज बघायला मिळालं. अमेझिंग होतं ते.

राहुलची केशरी टोपी निळी काळी झाली..
आयपीएल हिरो आंतराष्ट्रीय झिरो.
>>> काहीही.. आज चांगला खेळलाय की... 66 बॉल मध्ये 76...

स्मिथला 7 व्या किंवा 8 व्या नंबरवर पाठवायला पाहिजे.
शिवाय zampa ला आपल्या टीम मध्ये खेळवल्यास तिसऱ्या मॅचमध्ये काही चान्स असू शकेल.

390 कुठल्याही pitch वर chase करणे खूप कठीण आहे, फलंदाजांना दोष देण्यात अर्थ नाही, बुमराह, चाहल सारखे विकेट taking bowlers अशी गोलंदाजी करत असतील जडेजा सारखे क्षेत्ररक्षक इतके सोपे झेल सोडत असतील तर कोहलीच्या जागी रोहित किंवा अजून कोणी कॅप्टन असेल तरी काही करू शकत नाही

@ राहुल आयपीएल हिरो..
आयपीएल म्हणजे २०-२० फॉर्मेट
राहुलचा आयपीएल रेकॉर्ड आणि ईटरनॅशनल २०-२० रेकॉर्ड पाहिला तर

आयपीएल - ४४ एवरेज १३५ स्ट्राईकरेट
२०-२० ईटरनॅशनल - ४५ एवरेज १४६ स्ट्राईकरेट

आयसीसी सर्वोत्तम मानांकन २ आहे आणि सध्याचे ४

एकूण त्याला आयपीएल हिरो बोलू शकत नाही.

वनडेमध्येही ४७ एवरेज ८८ स्ट्राईकरेट दिसतोय.
ओपनर म्हणूनच सातत्याने संधी दिली तर आणखी नक्की चमकेल तो. इनिंग बिल्ड करायचे स्किल देखील डेव्हलप होईल त्याचे. लिमिटेड ओवर फॉर्मेटमधील क्लास प्लेअर आहेत तो.. अणि क्लासला मरण नसते.

स्मिथ भारी खेळला काल !

रच्याकने, स्थिमचा स्टान्स कसा आहे ! आणि शॉट खेळायच्या आधी किती हलतो ! त्या हालचालींमुळे बॉलर विचलित होण्याचा फायदा मिळत असावा त्याला Happy ह्या अश्या टेम्परामेंटसह टेस्टमध्ये इतक्या रन काढतो म्हणजे भारी आहे ! Happy

*योगायोग असतात एकेक. वा कोणाच्या मनात काय असेल सांगता येत नाही * - राष्ट्रीय संघातून खेळतांना कोणताही खेळाडू मुद्दाम खराब खेळेल, हें खरंच पटत नाहीं.

आपल्या टीम सिलेक्शन मधे प्रॉब्लेम आहे असं वाटंत नाही का?

- स्पेशलिस्ट कीपर नाही
कीपर बनल्यामुळे ओपनिंग बॅट्समन लोअर मिड्ल ऑर्डरला बॅटिंग करतो
- १००% ऑलराऊंडर नाही
हेल्थ रीजन्स मुळे ऑलराऊंडर फक्त बॅटिंग करतो, इतर प्युअर बॅट्समन पैकी कुणी औषधाइतपतही बोलिंग करत नाही
सर्व बोलर्स ना बॅटिंगची अ‍ॅलर्जी
- इट्सी बिट्सी प्लेअर?
सर जडेजानी बॅटिंगच्या जोरावर शेवटचा सामना कधी जिंकवला होता? त्याला खरंच ऑलराऊंडर म्हणून कन्सिडर करायचं का?
- टीम काँपोझिशन
ऑस्ट्रेलियाच्या पिचेसवर आपण दोन स्पिनर्स घेऊन खेळतो, तीन पेसर्स पैकी एक नवा अन एक नॉट अ‍ॅट पीक

स्पेशलिस्ट प्रोफाइल्सचा संघ आपण केंव्हा बांधणार?

बाकी अवे टेस्ट्स मधला रोहित शर्माचा परफॉर्मन्स बघूनही कोहलीच्या अनुपस्थितित त्याला कसोटी कर्णधार करा म्हणणार्‍यांना तिसरा डोळा असावा / ते भारताचे हितचिंतक नसावेत.

आपली आतांची गोलंदाजी जागतिक पातळीवरही नक्कीच चांगली असूनही आत्ताच इतकी निष्प्रभ कां ठरत असावी, हें खरंच कोडं आहे.>> प्रत्येक खेळपट्टीचे वेगळे गणित असते. म्हणून होम अ‍ॅडव्हांटेज महत्वाचे. शिवाय स्वैर मारा. दोन चांगले चेंडू व दोन सोप्या धावा देणारे, अगदी सिंगल्स का असेनात. पण त्यामुळे आपण प्रेशर क्रिएट करू शकत नाहीये.

कोहली आणि शास्त्रीला रोहितला फोन करून का विचारता येत नव्हते?. प्रेस कॉन्फरन्स मधे आम्हाला रोहितचे काही माहित नाही हे का म्हणावे लागले. इथेच खरी गोम आहे.

*सर्व बोलर्स ना बॅटिंगची अ‍ॅलर्जी* खरी मेख ही आहे. चांगले ऑलराऊंडर तयार करतां येत नाहींत पण तसे संघात असले किंवा नसले तरीही गोलंदाजांना फलःदाजीत आपली कांहीच जबाबदारी नाही असं वाटणं घातकच आहे.
*प्रत्येक खेळपट्टीचे वेगळे गणित असते * मान्य. पण आपल्या पेस गोलंदाजीला भारताबाहेरील खेळपट्या अधिक अनुकूल ठराव्यात , हा गैरसमजच आहे का ?

भारताबाहेरची खेळपट्या अधिक अनुकूल ठराव्यात > हे बरोबर आहे. पण स्विंगला अनूकूल पाहिजे. आणि ऑस्ट्रेलियात बाउन्स मुळे ट्प्प्याचा बरोबर अंदाज आला पाहिजे.

Pages