क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राष्ट्रीय संघातून खेळतांना कोणताही खेळाडू मुद्दाम खराब खेळेल, हें खरंच पटत नाहीं.
>>>>
पैश्यासाठी फिक्सिंग झालीच ना अझर जडेजाच्या काळात.
मग कप्तानीचे राजकारण करायला का नाही?

बाकी सध्या रोहीत प्रकरणावरून संघात ऑल ईज वेल नाही हे नक्की. गोलंदाजी खराब झाली अश्यातला भाग नाही. पण ईंटेंट असा दिसलाच नाही दोन्ही सामन्यात. स्पेशली बुमराहकडूनही नाही. संघभावना कमी पडतेय, प्लेअर हलकेसे गोंधळात आहेत. जेव्हा ड्रेसिंग रूममध्ये राजकारण शिजत असते तेव्हा त्या अध्यातमध्यात नसलेल्यांच्याही मानसिक स्थितीत बदल होतोच.

अँकी नं.१, संपूर्ण पोस्टशी सहमत आहे. भुवनेश फिट असता तर त्यातल्या त्यात थोडा फरक पडला असता, पण तरीही टीम चा बॅलन्स गंडला आहे असं वाटतं. जरी ह्या संघानं मॅचेस जिंकल्या तरीही अंडरलाईंग इश्यूज आहेतच.

अँकी नं.१, संपूर्ण पोस्टशी सहमत आहे. भुवनेश फिट असता तर त्यातल्या त्यात थोडा फरक पडला असता, पण तरीही टीम चा बॅलन्स गंडला आहे असं वाटतं. जरी ह्या संघानं मॅचेस जिंकल्या तरीही अंडरलाईंग इश्यूज आहेतच. >> +१. ईश्यू हे आहेत की
१. पाच बॉलर्स ना अजिबात बॅकप नाही . सिडनी चे पिच बर्‍यापैकी पाट्या पिच होते. स्विंग नव्हता नि मधल्या ओव्हर मधे चहल बरोबर विकेट टेकिंग बॉल्रर नव्ह्ता. बॉलिंग मशिनच्या उपयोगामूळे पार्ट टाईम बोलिंग करण्याची पद्धत पूर्णच बंद झाली आहे असे वाचले. त्यामूळे पहिल्या सहा मधले कोणीच बॉलिम्ग करत नाही.
२. पांड्या खाली एकही बॅट्समन नाही. - ह्याला काहीच पर्याय नाही. ठाकूर ला सैनीच्य ऐवजी आण ले तर जडेजा नि ठाकूर मिळून एक काम चलाऊ बॅत्समन मिळेल. अर्थात ते बॅक अप बॅत्समन आहेत - जर वर पडझड झाली तर स्कोर खेचू शकतील एव्हढेच. ठाकूरचा कमी असलेला पेस सैनीच्या सुपर ड्युपर पेस पेक्षा अधिक कामी येउ शकतो. जडेजा, शमी किंवा ठाकूर ला गो ब्रोक असा संदेश देत पिंच हिटींग करायला मधल्या ओव्हर्स मधे मेन बॉलर्स नसताना पाठवणे हा एक पर्याय होउ शकतो. गाजराची पुंगी बाकी काही नाही.

ह्या दोन्ही प्रॉब्लेम ना थोड फार स्पिन ला मदत करणारी पिचेस असणे हे आपले एकमेव सोल्युशन आहे.

एक मह्त्वाचा प्रश्न कि रोहित नि ईशांतला साहासारखेच सुरूवातीपासून घेऊन जाऊन तिथेच रीहॅबिलीटेट करणे खरच अशक्य होते का ?

मयांकला गोलंदाजी देतो कोहली तर क्वचित स्वतः प्रयत्न करायला हवा.. एक दिवसीय सामन्यात जवळपास १०० षटक गोलंदाजी केली आहे त्याने.

मला आयपील मधे कोहली च्या एका ओव्हर मधे पोलार्ड किंवा वॅटसन ने कुत्र्यासारखा मारला होता एव्हढेच आठवते Happy रोहित शर्मा बर्‍यापैकी चांगली ऑफ स्पिन नि मधे थोडेफार लेग ब्रेक टाकत असे. २-३ ओव्हर्स सहज काढता येत असत. त्याने पण सोडून दिलेय.

स्मिथ काय नि मॅक्सवेल काय त्यांना आयपील च्या जर्स्या घालायला लावले तर आपला प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह होईल Wink

कोहलीला विश्रांती द्यावी. किमान टॉस तरी जिंकू>>> मला वाटतंय कोहलीच्या वेळी टॉसला शोलेमधला पाचचा डॉलर उडवत असावेत. कोहलीने टॉस चेक करून घ्यावा.

आजकालचे फलंदाज स्वार्थी आहेत, injury च्या भीतीने अजिबात गोलंदाजी करत नाहीत, पहिले सचिन, सौरव, युवराज, सेहवाग, रैना गोलंदाजी करत, रोहित आणि विराट आता गोलंदाजी अजिबात करत नाहीत

त्याने पण सोडून दिलेय. >>> मेमध्ये तो स्टार स्पोर्ट्सच्या टॉकशोमध्ये म्हणाला, की बोटाला दुखापत आहे त्यामुळे तो आयपीएल किंवा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये करत नाहीये.

तिसऱ्या सामन्यात कुलदीप, नटराजन आणि ठाकूर ला संधी द्यावी, चाहल, सैनी आणि बुमराह च्या जागी. श्रेयस अय्यर उघडा पडला आहे शॉर्ट pitch bowling समोर, त्याच्या जागी मनीष पांडे ला।संधी द्यावी,

भारताकडे सध्या allrounders चा दुष्काळ आहे. विजय शंकर आणि दुबे अजून तरी त्या लेव्हल चे वाटत नाही, tewatiya ला संधी देऊन बघावी जरी तो फार चांगला फलंदाज वाटत नाही तरी , आजकाल बहुतेक टिम्स लेगस्पिन चांगली खेळत नाहीत त्यामुळे त्याची गोलंदाजी चालून जाईल नाहीतर हनुमा विहारी ला संधी द्यावी फार आश्वासक वाटत नसला एकदिवसीय सामन्यात तरी

मेमध्ये तो स्टार स्पोर्ट्सच्या टॉकशोमध्ये म्हणाला, की बोटाला दुखापत आहे त्यामुळे तो आयपीएल किंवा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये करत नाहीये. >> पण तो बॉलिंग गेली कित्येक वर्षे करत नाहीये. त्याने डॉक्टर बदलायची गरज आहे जर बोटाची दुखापत इतकी वर्षे राहिली असेल तर Wink

*तिसऱ्या सामन्यात कुलदीप, नटराजन आणि ठाकूर ला संधी द्यावी, चाहल, सैनी आणि बुमराह च्या जागी.* आधी, आपले हुकमी एक्के कां फुसके ठरताहेत, हें नक्की ठरलं पाहिजे. कोण चुकतंय यापेक्षा काय चुकतंय याला व कोणाला बदलायचा यापेक्षा काय बदल हवाय, याला अग्रक्रम देणं अत्यावश्यक.

बुमराह, सैनी, चहल आणि श्रेयस बाहेर आणि नटराजन, शार्दूल, कुलदीप आणि मनीष पांडे आत हा वर सुचवलेला पर्याय योग्य वाटतोय.

शिवाय राहुलने सलामीच्या जागी खेळावे.

तिसऱ्या सामन्यात कुलदीप, नटराजन आणि ठाकूर ला संधी द्यावी
>> दिली

तसंच मयंकला हटवून (होतकरू) जावईबापू आलेत सलामीला...

*गिल छान खेळत होता. इतका अनावश्यक स्वीप का मारायला गेला!!!* +1. आणि सारवासारव करायला अकारण 'रिवहयू'ही मागितला !

आपले आताचे फलंदाज पूर्वीच्या फलंदाजांसारखे थोडी का होइना बॉलिंग का टाकत नाहीत त्याचे लॉजिकल कारण वाचले. हल्ली नेट मधे थ्रो इन बॉलर असतात दुसरे. त्यामुळे गोलंदाज जेंव्हा नेटमधे फलंदाजी करत असतात तेंव्हा या थ्रो इन बॉलर्मुळे फलंदाजांना गोलंदाजीचा सराव मिळत नाही. (किंवा ते आळशी बनतात. Happy ).

५/१५५ - ३४ षटके

एकतर खेळपट्टी भयंकर आहे किंवा आपले फलंदाज गंडलेत.

कांगारू जिंकले सहज तर खेळपट्टी नंतर फलंदाजीला पोषक होईल.

मला वाटतंय आजची कॅप्टनसी रोहितला द्यायला हवी होती. जरी तो मैदानावर नसला तरी कोहलीने त्याला व्हाट्सएप कॉल करून तो सांगतोय तशी बॉलिंग फिल्डिंग लावायला हवी होती.

*आपले आताचे फलंदाज पूर्वीच्या फलंदाजांसारखे थोडी का होइना बॉलिंग का टाकत नाहीत त्याचे लॉजिकल कारण *-
पण आपले कोच, ' thin tank' काय करत असतात. त्यांच्या लक्षात संघाच्या या आत्यंतिक गरजा लक्षात नको यायला ! जें फलंदाजांनी गोलंदाजी करणयाबाबत, तेंच गोलंदाजांनी फलंदाजीत योगदान देण्याबाबत!!

Pages