आयपीएल-१३ (२०२०)

Submitted by स्वरुप on 18 September, 2020 - 06:43
cricket IPL 2020

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-१३ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तरीच बोललो उद्या मॅच आणि अजून धागा कसा नाही आला. यावेळच्या सामन्यात गॅप मोठा वाटतोय. डबल हेडर नाही म्हणून असेल कदाचित.

अरे हो रहाणे आहे नाही का!
मला अजूनही तो राजस्थान रॉयल्सवालाच वाटतो.... इतक्या वर्षाचे समीकरण आहे!

थँक यू रे स्वरूप!! मी ह्याच धाग्याची वाट पहात होतो. (मग तूच का नाहे काढलास, असा प्रश्न विचारू नये. quintessential आळशीपणा हे एकच उत्तर आहे. Happy )

उद्या मुंबई - चेन्नई. गल्फमधल्या स्लो विकेट्स चा चेन्नई ला फायदा होईल असं वाटतय.

अनेक वर्षं केकेआर मधे काढलेल्या पियुष चावलाला पिवळ्या कपड्यात बघणं, उथप्पाला गुलाबी कपड्यात बघणं आणी रहाणे ला दिल्ली च्या तंबूत (राजस्थान बरीच वर्षं निळ्या कपड्यात होते, म्हणून तो संदर्भ बाद. आणी फर्स्ट चॉईस ११ मधे रहाणे बसणं अवघड आहे म्हणून तंबूत) बघणं - सगळीच उत्सुकता आहे.

राजस्थान रॉयल्स जिंकेल असे मला वाटते -
१. स्टोक्स, बटलर, आर्चर, स्मिथ
२. चौघे ही फॉर्म मधे आहेत.
३. १-२ महिने खेळून येतायेत. त्यामूळे सूरात असतील.
४. स्पिन चांगला खेळतात जो यंदा मेजर फॅक्टर असेल असे म्हणताहेत.

जयस्वाल, पड्डीकल, रियान, गिल, नाग कोटी, पोरेव, त्यागी चांगले खेळोत नि पुढची जनरेशन तयार होवो. हार्दिक पांड्याला तोडीस तोड रिप्लेसमेण्ट तयार होवो Happy

>>राजस्थान रॉयल्स जिंकेल असे मला वाटते
इंटरेस्टींग!!

बटलर, स्मिथ खुप भारी फॉर्मात आहेत असे वाटत नाही
स्टोक्स खेळणार आहे की नाही माहिती नाही
उथाप्पा is past
सॅमसन चांगला आहे पण अजूनही पूर्ण भरवश्याचा वाटत नाही
यशस्वी जयस्वाल कसा खेळेल माहित नाही
आर्चर सोडून बॉलींग मध्ये पण फारसा दम वाटत नाही!

तू इंग्लंड - ऑस्ट्रेलिया सिरीज बघितलीस नाहीस का ? त्या आधी पाकिस्तान बरोबर ? स्टोक्स खेळणे आवश्यक आहे नाहीतर रॉयल्स चा बॅलॅन्स गंडणार पूर्ण

उद्यापासून तुम्हाला दुप्पट वाफ घ्यावी लागणार, आणि काय ! तोंडाची वाफ दवडायची असेलच ना 'आयपीएल' वर !! 20200918_235052_1.jpg

मुंबई टिपिकल पडझड.
डुप्लेसीच्या दोन कॅचेसनी सामना फिरवला
पण मुंबई चेन्नई आहे. सामना लास्ट ओवरला जाणार हे नक्की Happy

रायडू कमाल खेळला काल..... त्याने आणि फाफने इनिंग कशी बिल्ड करायची याचे उदाहरण घालून दिले.
वॉटसन आणि मुरली विजय कंप्लीटली आउट ऑफ फॉर्म वाटले
कुरन आणि एंडीडी चा धोनी योग्य वापर करुन घेईल असे वाटतेय.
धोनीच्या आधी जेंव्हा जडेजा आणि कुरन आले तेंव्हा आधी आश्चर्य वाटले पण that is typical dhoni
एकतर सीझनच्या सुरुवातीला असे प्रयोग करुन बघावेत म्हणजे नंतर ऑप्शन मिळतात आणि दुसरे म्हणजे selfless captain म्हणून धोनी परत एकदा आवडला
स्वत चमकण्यापेक्षा त्याला मॅच च्या रिझल्टमध्ये जास्त रस असतो.
त्याचा पोस्ट मॅच इंटरव्ह्यू पण नेहमीप्रमाणे आवडला.

राहुल चहर आणि कृणाल पांड्या च्या ओव्हर मुंबईला महागात पडणार असे दिसतेय.
बाकी बॉलर्स चांगले असूनही हे दोघे प्रेशर रिलीज करणार समोरच्याचे असा अंदाज आहे.

>>थँक यू रे स्वरूप!! मी ह्याच धाग्याची वाट पहात होतो.

धन्यवाद फेफ!
मी पण बाकी कुणी काढतय का याची वाट बघून काढला धागा!

>>अरेच्चा, स्टेडियम रिकामं, इथंही शुकशुकाट !

हो ना!
तिथे जसे रेकॉर्डेड चीअर अप ऐकवतात तसे ड्यू आयडी काढून त्यांना उतरवावे का इथे वातावरण बनवायला Wink

नॉन टेक्निकल चर्चेसाठी माझी हजेरी असेल इथे Happy
अंबाती रायडू ला yellow jersey मध्ये पाहिल्यावर आठवल की तो CSK मध्ये आहे.
सॅम करन की कुरेन ? आवडेश. बाकी मॅच थंड वाटली.
धोनीचा नवीन लूक आवडला..

डी काॅक व हार्दीक पांडया यांची फलंदाजी मुंबैला आश्वासक वाटावी अशीच होती. मुंबै सुरवातीलाच जिंकणं जरा त्यांच्या प्रतिमेशी विसंगतच झालं असतं.

*तसे ड्यू आयडी काढून त्यांना उतरवावे का इथे वातावरण बनवायला * - Wink त्याना उतरवावे लागत नाहीं, फक्त त्यांची भूक चाळवली कीं झालं !

पुर्ण सामना उजव्या हाताचे फलंदाज होते अचानक मोक्याच्या क्षणी दोन फटकेबाज डावखुरे फलंदज आले हा एक मास्टरस्ट्रोक ठरला.

सॅम करनबाबत मी स्पर्धेच्या आधीच म्हणालो होतो की हा प्लेअर आता धोनीच्या सानिध्यात उजळून चमकून निघणार. त्याच्या स्वत:च्या कारकिर्दीतले सुद्धा हे एक महत्वपुर्ण वळण असेल. गोलंदाजी आणि फलंदाजीत दोन्हीकडे तो फ्लोटर म्हणून वापरला जाईल. वर खाली मध्ये कुठेही गोलंदाजी वा फलंदाजीला येऊ शकतो.

दुसरे म्हणजे जेव्हा काल दोन विकेट पडल्यावर रायडूने लगेच आपला क्लास दाखवत जो डाव सावरला ते पाहता तो वर्ल्डकपला का नव्हता हा विचार मनात येऊन पुन्हा त्रास झाला. कदाचित तो न्यूझीलंडचा सामना वेगळा असता.

*बाकी मॅच थंड वाटली.* दोन संभाव्य कारणं-
1. चेंडू उसळत नव्हता व विशेष स्विंग/ स्पीन होत नव्हता;
2. वातावरण निर्मितीच्या अविभाज्य घटकाचा- प्रेक्षक- अभाव .

कालची मॅच मस्त झाली. मुंबई ने मधे पोलार्ड, हार्दिक ला १-२ ओव्हर्स देऊन स्पिनर्स चा कोटा हेज करावा असं वाटत होतं. पण रायडू आणी फाफ मस्तच खेळले. एकंदरीतच सगळे प्लेयर्स इतके रस्टी वाटत होते की सिनियर्स (रिटायर्ड प्लेयर्स) चं क्रिकेट बघतोय की काय असा प्रश्न पडला.

आज पंजाब वि. दिल्ली!!

अंबाती रायडु काल खेळला ती आणि वर्ल्डकप सेमी फायनल मधील खेळपट्टी, स्विंग, यात जमीन अस्मानाचा फरक होता. तरीही बरीच चांगली लढत दिली. कदाचित रायडु असता ऐवजी धोनी / जाडेजा बाद झाला नसता तर निश्चितच फायनल आणि यदाकदाचित वर्ल्डकप जिंकलो असतो तर कोणी रायडु ला विचारलं पण नसतं.

Pages