मोगरा फुलला...

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

mogarafulala.jpg

मोगरा फुलला, मोगरा फुलला
फुले वेचिता बहरु कळियांसी आला...

विषय: 

wow....खुपच सही....छानच..मला मोगर्‍याचा सुगंध खुप आवडतो...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
नवीन वर्ष सर्वांना सुख-समृध्दीचे ,भरभराटीचे ,उन्नतीचे , समाधानाचे आणि आनंदाचे जावो , ही सदिच्छा!!!

हा तू काढलेला फोटो आहे आयटे? सही....च आलाय.
मोगरा या एकाच शब्दाने काय काय आठवत याची यादी फार मोठी आहे.
शहाण्या मुलीसारखे सगळे डीटेल्स दे फोटोचे Proud

आधी काय काय आठवलं ते सांग Proud

सुंदर फोटो.
फक्त एक सुचवावसं वाटतं. तुझा watermark ठळक आणि मध्यभागी दिसेल असा कर.

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

सुवास इथपर्यंत पोचला..

मस्तच आलाय फोटो. Happy सही. ती निळी फुले पण सुंदर. पण मोगरा अजुन फुललेला हवा होता, कळ्यांचा एवढा एफेक्ट नाही आला. ते बॉर्डरला ब्लर कसे केलेस?

~~~~~~~~~~~~
Life is like Ice-Cream. Eat, before it melts. Happy
~~~~~~~~~~~~

धन्यवाद केपी, अजून नाही फुलत हा मोगरा. साधारण एवढाच, असाच फुलतो. परवा सलील कुलकर्णी आणि सुनील बर्वेच्या कार्यक्रमाला गेले होते , तिथे ठेवली होती ही फुलं. तेह्वा काढलेला फोटो आहे हा.

फोटोशॉप, पिकासा वा फोटोफ्लेक्सर वगैरे वापरुन ब्लर करु शकतोस तू.

भाग्या, त्याचसाठी काढला गं तो फोटो. इतका घमघमाट सुटला होता ना अवती भवती! सकाळ सुगंधित झाली! त्याची आठवण म्हणून काढला फोटो. धन्यवाद Happy

फारच छान फोटो! आत्ता ओंजळ भरून घ्यावीशी वाटतात ही फुलं! Happy

चिनूक्स, तुझ्या सुचवणीवर विचार केला. वॉटरमार्क मध्यवर्ती आणि ठळक ठेवला, तर मग पाहणार्‍याचं लक्ष फुलांवर केंद्रित होणार नाही, किंबहुना फोटो कुरुप झाल्यासारखा वाटेल आणि त्याचं सौंदर्य नष्ट होईल, म्हणून वॉटरमार्क मध्यभागी नकोच, ठळक त्याहून नको.

नीरजा, तुला मेल करते मी.

अभिजीत, फोटोला फोटोप्रभूची दाद! अजून काय हवं!

चिन्नु, धन्यवाद गं!

आयटी,
मला वाटत चिनूक्सला बहुदा असे सुचवायचे होते की वॉटरमार्क जर ठळक किंवा सहज दिसेल असा केला तर मग लोक फोटोची चोरी करुन तो वापरणार नाहीत किंवा तसे वापरणार्‍यांना थोड्या प्रमाणात आळा बसेल. वॉटरमार्क मध्यभागी ठेवला तर फोटो क्रॉप करुनपण वापरता येत नाही Happy

बरोबर. इथे फोटो सहज डाऊनलोड करता येतो, आणि परवानगी कोणीच मागत नाही.

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

अगं, ते सगळे मान्य आहे, पण त्यामुळे फोटो खूप वाईट दिसतो. करुन पाहिले मी, नजाकत जाते गं फोटोची.

चिनूक्स, अगदीच तसं काही नाही. मागे जुन्या मायबोलीवर मी एक देखाव्याचा फोटो टाकल होता, तेह्वा ज्यांना डाऊनलोड करायचा होता, किंवा डेस्कटॉपवर लावायचा होता, त्यांनी विचारले होते मला. मायबोलीकरांवर विश्वास आहे मला. Happy तुझ्या सूचनेमागची भावना पोचली. Happy

शैलजा, तुझे दोन्ही प्रकाशचित्र कसे उठून दिसत आहे मायबोलिच्या पानावर!!!

मलाही वॉटरमार्क कसा देतात ते माहिती करून घ्यायचे आहे.

आयटे..... अगदी 'मार डाला' आलाय फोटू!
रूनी म्हणतेय तस्सं काय काय आठवलं अन काय झालं अन काय नाही..... काय नव्हेच ते.

आता नुस्ता मोगरा म्हटलं की हा तुझा बहरू आठवेल Happy

आयटे, खूपच सुरेख... !!
मला ही कळव, वॉटर मार्क कसा द्यायचा ते. Happy
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

.

दादची दाद Happy धन्यवाद गं.
बी, नीरजा, किरु, तुमचेही खूप आभार, आणि इथे पहा - वॉटरमार्कसाठी तुम्ही हे सॉफ्टवेअर वापरु शकाल. Lite version चकटफू आहे! काही शंका असेल तर जरुर विचारा Happy
जमेल तेवढ सांगेनच.

वा, काय प्रसन्न फोटो आहे..! सुंदर!!
अन बर्‍याच आठवणी मोगर्‍याशी जोडल्या गेल्या आहेत, त्यामूळे नजर खिळून राहिली काही क्षण.. Happy

माबोकरांवर विश्वास आहे हे भारीच, त्यामूळे तुला न विचारता लावतो बघ मी डेस्कटॉपला. Proud

--
आतली पणती, तेवायला अशी;
अंधाराची कुशी, लागतेच..!!

धन्यवाद साजिरा, अन् मी जुन्या माबोकरांविषयी बोलतेय बरं का! Proud

वा! Happy

आयटे कसला नाजुक आणि देखणा फोटो!

>>काय काय आठवत याची यादी
रुनी, नमुन्यादाखल २-४ गोष्टी सांग बघु! Proud

स्वाती, मृण्मयी धन्यवाद Happy

वॉव.. फोटो पाहुनच धुंदी चढली बघ..!!! Proud
मदमस्त फोटु है !!! तुमचा जवाब नाही.. Happy अजुन येउंदेत !!!! मस्त ! मस्त ! मस्त !

आयटी -गर्ल
तुझा हा फोटो पाहुन आमच्या घरच्या मोगर्‍याची आठवण झाली.

Photos_478.jpgPhotos_468.jpgPhotos_469.jpgPhotos_475.jpgPhotos_479.jpgPhotos_464.jpg

अरे वा! मस्त! Happy मोगर्‍याची बाग! सही एकदम!
प्रणित, यो धन्यवाद.

सह्हीच फोटो , मोगर्‍याच्या फार हळव्या आठवणी आहेत मनात Happy
प्रणित बाग एकदम झक्कास .

***************
गोड बोलायला
तिळगूळ कशाला ?

Pages