विराणी

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

कशास मन हे जाते गुंतून,
जर केवळ दो घडीचे रंजन;

क्षणैक भासे, सरले मीपण,
अंतरी परी स्वत्वाचे गुंजन;

कशास होतो जीव घाबरा,
भवताली भरला ना मेळा?

भासे मृगजळ, कधी भासे रण
निसटे ऐसे जीवन क्षण क्षण;

रात दाटते, दिन गुदमरतो,
आर्त श्वासही परका होतो;

जिवाशिवाची भेट नसे अन्,
सखी सावलीही देई अंतर;

मौनामध्ये दु:ख लपेटूनी,
खुळा जीव शोधे सांगाती;

कुणी ऐकावी, कुणी सांगावी,
विकल मनाची विद्ध विराणी....

प्रकार: 

निसटत राहते जीवन क्षण क्षण;>>>
सखी सावलीही देई अंतर;>>>
या ओळी जबरी आहेत शैलजा, आवडली कविता

श्यामली, चिन्नू धन्यवाद, चिन्नू केला गं बदल.

वाह वाह... आयटे.. हे वाचलच नव्हत... तुझे गणेशोत्सवाचे लिखाण तर फारच सुंदर आहे...

जिवाशिवाची भेट नसे अन्,
सखी सावलीही देई अंतर; >>> सुंदर

आधी ते विराणी नाव वाचुन वाटलं की , क्यों कि सास भी कभी ........ शी संबंधीत असेल Proud