हर्ट यांचे रंगीबेरंगी पान

मे महिन्याच्या कविता

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

ह्यावेळी आम्हाला विषय आहे: कुणी काही म्हणा आणि दुसरा विषय अधिकार. ह्यावर केलेल्या कविता:

कुणी काही म्हणा
सुरवात करायची आहे.
नवीन काहीतरी करायचे
जिथे आहे तेथून सुरवात करायची आहे.
पण भिती वाटते
मग भितीपासूनच सुरु करा!
संकोच वाटतो
मग संकोच सोबत घेऊन सुरवात करा.
हात थरथर कापतात
मग शेकहॅन्ड पासून सुरवात करा
आवाज अडखळतो
मग अडखळणार्‍या आवाजापासून सुरवात करा
नैराश्य वाटते.. दु:ख जाणवते
मग ह्या दोन्हीसोबत सुरुवात करा.
सुरवात करा.. कुणी काही म्हणा
जिथे आहे तेथून सुरवात करा.

- बी

प्रकार: 

तगमग

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

खूप दिवसांपासून सुरु असलेली तगमग

शरिरातून निघून गेलेला जीव,
सुकलेल्या गवतासारखी
त्वचेची लागलेली वाट,
मावळलेला उत्साह,
हरवलेला ओलावा,
आपल्या परिघापासून
वाढतच चाललेला दुरावा
वाटत जणू सगळ सगळ संपून गेल!!!

प्रकार: 

३१सावी मॅरीएज अ‍ॅनीवर्सरी

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

रोज माझी करकरीत सकाळ
तुझ्यामुळे उद्ध्वस्त होते
आणि माझ्यामुळे तुझी सकाळ
उमलत.. उमलतच जाते!

तुझ्या पुढ्यात असते
करकरीत वर्तमानपत्रांची चळत
एका पाठोपाठ येणारे चहाचे कप
खमंग रुचकर उपहार
सुगंधित झुळका
आणि तुझ्या खास प्रिय
जगभरातील बातम्या!!!!

प्रकार: 

एक सेकंद

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

एखाद्या निवांत रात्रीच्या शांततेवर
ओरखडा उमटवणारा
अवचित कुणाचा तरी फोन येतो
आणि अंगभर भितीची लहर पसरते

मनात असंख्य पाली चुकचुकायला लागतात
काळजाचे ठोके वाढायला लागतात
हातपाय डळमळायला लागतात
काय झाले असेल? कुठली बातमी असेल
समद्रपार असलेले जिवलग ठिक तर आहेत ना?

त्या तेवढ्या एका क्षणात जिवाचे पाणी पाणी होते
एका सेकंदात सगळे अंतर पार करता आले तर!!!!

बी

प्रकार: 

निचरा

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

निचरा
बरं असतं कधीकधी

जगाला तात्पुरता गुडबाय करणं,
हसून निरोप देणं,
परत येईल असं म्हणून
दीर्घकाळ वनवासासाठी कुठेतरी दडून बसणं!
आपल्या भटंकतीत आपली उत्तरे आपणचं शोधणं
आपल्या स्वैर मनाला कुठेही भरकटु न देणं.

खूप काही साचत जात घोळक्यात वावरताना
नकोसा होऊन जातो रोजचा अभिनय
ओठावर हसू आणि हृदयात किल्मीष बाळगताना
ओळखीच्या चेहर्‍यासमोर काहीतरी लपवताना
आणि लपवलेलं ताडलं हे पचवताना!!!

बर असतं कधीकधी ..नको ते रिक्त करुन
फिरुन परत .. नव्याने मैफलीत येताना!

-बी

प्रकार: 

सिंगापुरातील खाद्यसंस्कृती (भाग-पहिला)

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

मला इथे सिंगापुरमधे येऊन तब्बल २० वर्ष पुर्ण झालीत. ३० वर्षाचा पुर्ण होता होता इथे आलो तो इथे इतके वर्ष होतील असे तेंव्हा जराही वाटले नव्हते. अगदी माझ्या पहिल्याच दिवशी मी भुकेजल्या पोटी अन्न शोधायला बाहेर पडलो आणि समोर दोन मोठी कावसे उलटी टांगलेली होती आणि त्यांच्या तोंडातून काळेकुट्ट लाल लाल भडक रक्त वाहत होते.

प्रकार: 

निरवानिरव

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

रोजची दुपारची.. रात्रीची
निरवानिरव करता करता
एक दिवस डळमळतं
आयुष्य काठावर येतं

आणि सुरु होते
शेवटची निरवानिरव
जड वाटतात तेंव्हा
मोठ्या जिकरीने
साठवलेल्या ..
संग्रह केलेल्या
गाठोड्यात बांधून ठेवलेल्या
ठेवणीतल्या
वस्तू..
गजबजलेल्या संसाराचं
रिक्त..रिकामं चित्रं!

निर्जीव वाटायला लागतात
त्यावेळेसचे ते सर्व क्षण अन क्षण
काहीच उरलेलं नसतं
उरलं असतं
एक न पेलणार ओझं
प्रत्येक आग्रहातला अट्टाहास
हास्यास्पद होऊन जातो!

प्रकार: 

डेटींग...

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

स्वीस चॉकलेटसारख्या गोड
शुक्रवारच्या निवांत संध्याकाळी

हसत-बागडत स्टारबक्समधे भेटू
पाईनच्या बाकड्यावर बसून
गारेगारशी कॉफी चाखू ..
वेळेचे भान हरपून
मधाळशा गप्पांमधे विरघळून जाऊ

चांदण्याच्या मौज-मस्तीत
रमत-गमत डॉमिनोमधे जाऊ
टोमॅटो-मोझेरिला पित्झा खाऊन
डीझर्टला तिरामिसू मागवू
आणि अ‍ॅल्कोहोलिक चवीबरोबर
कष्टाळलेल्या वीकडेजला गुड्बाय करत
पुन्हा एक वीकेण्ड साजरा करु!!!!

-बी

प्रकार: 

प्रक्रिया

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

अजब.. विचित्र असते
आतल्याआत तुटत जाण्याची प्रक्रिया...

चेहर्‍यावर पसरलेली असते
वाळवंटासारखी रुक्ष कोरडी शांतता
आतमधे मात्र सलसलत असतात
चरचरणार्‍या जखमा ओल्या!!!!

जितकी ती आपल्याला तोडत जाते
तितकीच ती जोडत जाते
आपल्यातील बळ.. सामर्थ्य कणकणाने!

ह्या सगळ्याची अनपेक्षित सवय होईपर्यंत
ही प्रक्रिया आयुष्याचा एक हिस्सा बनून जाते...
एखाद्या कडेकोट अभेद्य किल्ल्यासारखी
ती स्वतःला बंदीस्त करुन ..सामावून घेते...

हळूहळू आपल्या जगण्याच्या कलेवर
प्रतिकुल परिस्थितित मात करुन
प्राप्त केलेल्या बळावर.. सामर्थ्यावर
कोरडेपणावर आणि हृदयहीनतेवरही
आपले प्रेम होऊन जाते...

प्रकार: 

डिसेंबर

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - हर्ट यांचे रंगीबेरंगी पान